Halloween Costume ideas 2015

स्त्रिया संपूर्ण पृथक्करण आणि संपूर्ण मुक्ती या दोन टोकांच्या मध्ये झुलत आहेत


भारतात किंवा संपूर्ण जगात हिजाबचा वाद नवीन नाही. मुस्लिम महिलेचे अज्ञान, अंधश्रद्धा, लठ्ठपणा, अशक्तपणा आणि अकाली वृद्धत्व यासाठी हिजाब कारणीभूत असल्याचा आरोप सतत केला जातो. आजच्या काळात हिजाब परिधान केलेल्या मुस्लिम महिलांना त्यांचे मुलभूत हक्क नाकारले जात आहेत हे पाहून अतिशय  दुःख होते. अनेक मुस्लिम महिलांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी भेदभावाचा सामना करावा लागतो आणि त्यांना नोकरी नाकारली जाते फक्त ह्यासाठी की त्या हिजाब पाळत आहेत आणि त्यांच्या आवडीच्या धर्माचे पालन करत आहेत. एवढेच नाही तर मुस्लिम विद्यार्थ्यांना, हिजाब  वापरल्यामुळे त्यांचा शिक्षणाचा अधिकार नाकारला जातो. कर्नाटकातील मुस्लिम विद्यार्थ्यांना केवळ हिजाब घातल्यामुळे त्यांच्या वर्गात प्रवेश नाकारण्यात आल्याची नुकतीच घडलेली घटना याचा स्पष्ट पुरावा आहे.

हिजाब, ज्याचा अर्थ पडदा किंवा अडथळा आहे, हे डोक्यापासून पायापर्यंत शरीर व्यवस्थित झाकण्यासाठी वापरलेले कापड आहे. आध्यात्मिक भाषेत हिजाब म्हणजे मर्यादित पोशाखसह  मर्यादित स्वभाव ज्यामुळे एक चांगला  व्यतीत्व उभारून येतो.

वस्त्र ही ईश्वराची सर्वात मोठी देणगी आहे. प्रथम मनुष्य आदाम (ए. एस.) चे वंशज म्हुणुन सगळ्या जगभरच्या लोकांना संबोधित  करून , ईश्वर / अल्लाह पवित्र कुराणमध्ये म्हणतो:

“हे आदमच्या मुलांनो, आम्ही तुमच्यासाठी पोशाख उतरविला आहे की तुमच्या शरीरातील लज्जा-अंगांना झाकावे. आणि तुमच्यासाठी शरीर रक्षण व भूषणाचे साधन देखील व्हावे, आणि सर्वोत्तम पोशाख ईशकोपच्या भयाचा पोशाख होय. हा अल्लाहच्या संकेतापैकी एक संकेत आहे कदाचित लोकांनी यापासून धडा घ्यावा.” (कुराण ७:२६)

मानवी स्वभावात नम्रता आणि लाजाळूपणा या भावना ईश्वराने उपजतच रुजवल्या आहेत. प्राण्यांच्या विपरीत, त्याने मानवांना शरीरासाठी कोणतेही तयार आवरण दिलेले नाही, परंतु मानवाने ते कपड्यांसह लपवावे हे मानवी स्वभावात रुजले आहे. शिवाय, धार्मिकतेचे कपडे, योग्यरित्या लज्जास्पद भाग झाकण्याची मागणी करतात आणि ते गर्विष्ठपणा, अहंकार किंवा ढोंगीपणा दर्शवू नये.

संपूर्ण मानवतेला उद्देशून कपड्यांवर अवतरलेल्या या सामान्य विधानानंतर, कुराण नंतर पुरुषांकडे वळतो  आणि त्यांना पुढील शब्दांमध्ये हिजाबचे पालन करण्यास सांगतो,

“आणि हे पैगंबर, आस्तिक पुरुषांना आज्ञा करा की त्यांनी आपली नजर रोखून ठेवावी  आणि त्यांच्या गुप्तांगांचे रक्षण करावे . त्यांच्यासाठी हा अधिक न्यायी मार्ग आहे: अल्लाहला ते काय करतात याची माहिती आहे.” (कुराण 24:30)

येथे प्रथम पुरुषांवर बंधने घालण्यात आली आहेत जेणेकरुन महिलांकडे एकटक पाहू नये किंवा अश्‍लील दृश्यांकडे डोळे लावू नयेत.

त्यानंतर पुढील श्लोक स्त्रियांना खालील सांगितल्याप्रमाणे हिजाब पाळण्याची आज्ञा देतो,

“आणि हे पैगंबर (स.), श्रद्धावंत स्त्रियांना सांगा की, त्यांनी आपल्या दृष्टींची जपणूक करावी आणि आपल्या लज्जास्थानांचे रक्षण करावे. आणि आपला साजशृंगार दर्शवू नये त्याव्यतिरिक्त जे सहजासहजी प्रकट होईल आणि आपल्या छातीवर आपल्या ओढणीचा पदर घालून ठेवावा. त्यांनी आपला साजशृंगार प्रकट करू नये परंतु या लोकांसमोर, पती, पिता, पतीचे वडील, आपली मुले, पतीची मुले, भाऊ, भावांची मुले, बहिणींची मुले आपल्या मेलमिलाफाच्या स्त्रिया, आपल्या दासी, गुलाम, ते हाताखालचे पुरुष जे एखादा अन्य प्रकारचा हेतू बाळगत नसतील आणि ती मुले जी स्त्रियांच्या गुप्त गोष्टींशी अद्याप परिचित झाली नसतील त्यांनी आपले पाय जमिनीवर आपटत चालू नये की जेणेकरून त्यांनी जो आपला शृंगार लपविलेला आहे त्याचे ज्ञान लोकांना होईल. हे श्रद्धावंतांनो, तुम्ही सर्वजण मिळून अल्लाहजवळ पश्चात्ताप व्यक्त करा, अपेक्षा आहे की सफल व्हाल. “(Quran 24:31)

वरील श्लोकांनी  हे जाहीर होते  की इस्लाममध्ये हिजाब पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठीही नियुक्त केला गेला आहे तर तो स्त्रियांसाठी अतिरिक्त संरक्षणात्मक कपडे म्हणून काम करतो. आणि त्याचा उद्देश म्हणजे धार्मिकता, चांगुलपणा, प्रामाणिकपणा, शालीनता आणि नम्रता विकसित करणे आहे.

हे लक्षात घेणे देखील महत्त्वाचे आहे की इतर धर्म देखील त्यांच्या धर्मग्रंथांमध्ये स्त्रियांसाठी हिजाबचा प्रचार करतात. बायबल म्हणते:

रिबेकानेही वर पाहिले आणि इसहाकला पाहिले. तिने उंटावरून खाली उतरून नोकराला विचारले, “शेतातला तो माणूस कोण आहे जो आम्हाला भेटायला येतोय ?” “तो माझा स्वामी आहे,” नोकराने उत्तर दिले. म्हणून तिने पदर घेतला आणि स्वतःला झाकले. (बायबल उत्पत्ति २४:६४-६५)

वेदांमध्येही हिजाबची संकल्पना आहे,

जेव्हा ब्रह्मदेवाने तुला स्त्री बनवले आहे, तेव्हा तू आपली दृष्टी खाली ठेवली पाहिजे आणि वर पाहू नये. तुम्ही तुमचे पाय एकत्र ठेवावे आणि वस्त्र आणि परदा  काय लपवतात ते उघड करू नये. (ऋग्वेद ग्रंथ क्र. 8 स्तोत्र क्र. 33 V. क्र. 19)

वरील श्लोकांवरून हे स्पष्ट आहे की जगातील प्रमुख धर्मांमध्ये स्त्रीसाठी हिजाब आवश्यक आहे.

मात्र, आज हिजाब हा अत्याचाराचा लक्षण आणि महिला सक्षमीकरणातील मोठा अडथळा म्हणून प्रस्तुत केला जातो. याचे कारण हेच की, की आधुनिक भांडवलशाही संकल्पनेनुसार, जेव्हा महिला आकर्षणाच्या क्षेत्रात येतात तेव्हाच  महिला सक्षमीकरण होते. हिजाबपासून सुटका , हा मुक्तीच्या वेषात , स्त्रियांना आपल्या आवश्यक हक्कापासून    वंचित करण्याचा नियोजित केलेल्या  मार्गांपैकी एक मार्ग  आहे, कारण त्यांना स्त्रियांचे शरीर सतत प्रदर्शनात हवे असते. अशा महिला स्वातंत्र्यसैनिकांना समाजाने काही प्रश्न विचाराला हवेत : एक कपड्याचा तुकडा जो स्त्रियांना धाकण्यासाटी वापरला जातो तो  कसा काय स्त्रीवर   अत्याचार करू शकतो ?  स्त्रियांना सौंदर्य ऐवजी तिच्या कृतीतून आणि कर्तृत्वाने समाजात ओळख का मिळू शकत नाही? हिजाबला आपल्या गणवेशाचा भाग बनवणे हे सार्वजनिक नैतिकतेच्या, सुव्यवस्थेच्या, आरोग्याच्या किंवा सभ्यतेच्या विरुद्ध कसे काय बरे? महिला सक्षमीकरणाच्या या आधुनिक भांडवलशाही संकल्पनेत महिला किती सुरक्षित आहेत ज्यात महिलांना कोणत्याही संरक्षणाची किंवा त्यांच्या सुरक्षिततेची हमी न देता त्यांच्यासाठी संपूर्ण मुक्तीची मागणी चालू आहे?

अनेक दशकांपासून स्त्रिया संपूर्ण पृथक्करण आणि संपूर्ण मुक्ती या दोन टोकांच्या मध्ये झुलत आहेत. पण स्त्री, तिच्या समस्या, तिच्या गरजा, तिचे कपडे, आणि तिच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आजवर कोणत्याही मानव निर्मित समाजव्यवस्थेला यश आलेले नाही.

अश्या परिस्तितीमध्ये ईश्वरी मार्गदर्शन आमच्या मदतीला येतो जे वरील नमूद केलेल्या जवळ जवळ सर्व धर्मामध्ये सापडते. हेच ईश्वरी मार्गदर्शन ईश्वराच्याच्या अंतिम पैगंबर मोहम्मद ह्यांना अंतिम ग्रंथ कुराणाच्या  रूपात  देण्यात आले.  

“हे नबी (स.), आपल्या पत्नी व मुली आणि श्रद्धावंतांच्या स्त्रियांना सांगा की आपल्या चादरीचे पदर आपणावर आच्छादून ठेवत जा. ही अधिक योग्य पद्धत होय जेणेकरून त्या ओळखल्या जाव्यात आणि त्रास दिला जाऊ नये. सर्वश्रेष्ठ अल्लाह क्षमाशील व परमकृपाळू आहे.“ (Quran 33:59)

वेळ आली आहे हे समजून घेण्याचा  की हिजाब हा महिला सक्षमीकरणात अडथळा नाही, तर ही फक्त लोकांची विचारसरणी आहे जी त्यांच्या विकासात अडथळा बनत आहे.

गंबराच्या काळात देखील स्त्रिया  समाजात सामील होत, मशिदीच्या प्रार्थनेत सहभागी होत, आणि हिजाबमध्ये असूनही समाजासाठी प्रभावी योगदानकर्ते बनत . पैगंबराची पत्नी, आयशा, जिला सर्वात महान विद्वानाची पदवी मिळाली होती, यांनी सांगितले की पैगंबर मोहम्मद  सकाळची प्रार्थना करत असत आणि काही श्रदाळू  स्त्रिया हिजाब ओडून मस्जिदमध्ये त्यांच्याबरोबर सकाळच्या प्रार्थनेला हजर राहत  आणि कोणाच्या ओलकीत ना येता आपल्या घरी परतत.   

अल शिफा बिंत अब्दुल्ला यांनी औषधाचा सराव केला आणि ती अत्यंत जाणकार होती. तिला हजरत उमर (आर.ए.) च्या खलिफात बाजार नियंत्रक म्हणूनही नियुक्त करण्यात आले होते.

ह्या उदाहरणांनी हे स्पष्ट होते कि हिजाब मध्ये देखील स्त्रिया सशक्त होऊ शकतात किंवा हिजाब त्यांच्या सशक्तीकरणात बाधा बनत  नाही. 

इस्लाम एक धर्म नसून एक  जीवनपद्धती आहे. ह्यात सर्वांचा हक  शिस्ती पणाने आणि मर्यादित रीतीने ठरवलं  आहे जेणेकरून समाज योग्य मार्गावर चालू शकते,  सामाजिक आणि नैतिकदृष्ट्या स्थिर राहू शकतात  आणि सर्व संभाव्य नैतिक विचलन आणि विकृतींपासून त्याचे संरक्षण करू शकतात. हिजाब हि असाच एक निर्बंध आहे, पुरुष आणि स्त्री दोघांसाठी, ज्यामुळे नैतिकतेच्या सिद्धांताने खरे  सुरक्षित स्वातंत्र्य मिळवता येते. हिजाबवरील सध्याची चर्चा इस्लामोफोबियाबद्दल अधिक आहे. इस्लामविरुद्ध मनात खोलवर रुजलेला हा द्वेषच आहे जो हिजाबचे फायदे पाहू शकत नाही. एकदा हा द्वेषाचा परदा हटवला की इस्लामचे आदेश आणि हिजाब समजणे सोपे होईल...

- नझराना दरवेश

पणजी, गोवा, Ph. 8975074456


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget