कोणत्याही राष्ट्राच्या नागरिकांची परीक्षा त्यांच्यावर आपत्ती कोसळल्यास घेतली जाते. कोरोनाच्या जीवघेण्या संकटाने भारतीय समाजाची परीक्षा घेतली, यात दुर्दैवाने आम्ही अपयशी ठरलो. देशात नव्याने अस्तित्वात आलेल्या लॉबीजनी मृत्यूशी झुंज देत असलेल्या रुग्णांचा श्वास हिरावून घेत बाजारात विकला. रेमडेसीवीर इंजेक्शन मधील डॉक्टरांच्या लॉबीने अब्जावधी कमवल. या औषधाचा कोरोनात उपयोग नसताना 1000-1200 चे इंजेक्शन 50 हजारापर्यंत विकले. इबोलासाठी विकसित औषधाला काडीची किंमत नव्हती. ती कमाई कोरोना रूग्णाच्या खिशातून पैसे काढून जगभराच्या डॉक्टरांनी किती कमवले याचा अंदाज नाही. औषध कंपन्या पेक्षाही जास्तच.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री एका टीव्ही वाहिनीला मुलाखत देताना म्हणाल्या की, ते शासनाकडून एक पैसा सुद्धा पगाराचा घेत नाहीत. इकॉनॉमी क्लासमध्ये स्वतःच्या खर्चाने प्रवास करतात. शासनाची गाडी वापरत नाहीत ना बंगला. स्वतःच्या घरात राहतात. प्रश्न असा पडतो त्यांना हेच करायचे होते तर सत्ता कशाला हवी होती. मूर्ख माणसाचाही विश्वास बसणार नाही अशा गोष्टी त्या मुलाखतीत म्हणत होत्या ! गाडी, बंगला, गलेलठ्ठ पगार व अन्य कोट्यावधीच्या सुविधांसाठी तसेच मनसोक्त भ्रष्टमाया कमाविण्यासाठी तर लोक जिवाची बाजी लावून निवडणुका लढतात. घोडेबाजार करतात, स्वतला विकतात पण काहीही करून एकदा आमदार, खासदार होतात आणि आपल्या पुढच्या पाच-पन्नास पिंढ्यासाठी जमीन-जुमल्यासह इतर मालमत्ता कमावतात. जर का नशिबानं मंत्रीपद मिळाले तर मग काही विचारच करायचा नाही. किती पिढ्यांच्या थाटा-माटात जगण्याची सोय होते हे त्यांचे त्यांनाच माहीत. आपण एकदाचे सत्तेबाहेर पडलेच तर आपली मुलं आहेतच बापाचा वारसा सांभाळण्यासाठी. अर्थातच हा सगळा खटाटोप ही मंडळी देशसेवेसाठी करत असतात याची जाणीव आपल्याला असणे महत्त्वाचे आहे. याचा अर्थ ममता बॅनर्जी देशसेवा करत नाही असा तर होत नाही ना. त्यांना राज्याच्या तिजोरीतून काहीच घ्यायचे नव्हते तर त्या रिंगणात उतरल्याच कशाला. हे कोडं समजण्यासारखा नाही. असो ही विचारधारा ममता बॅनर्जींची असेल. ज्याचे त्याला विचारांचे स्वातंत्र्य असायलाच हवे. त्या सरकारच्या तिजोरीतून घेत नाहीत म्हणून इतर मंत्र्यांनी राज्यात असो की केंद्राच्या त्यांनी ही विचारधारा का बरे अमलात आणावी. कुणी शासनाचा बंगला घेत नाही, कुणी स्वतःसाठी देशात लाखो लोक हवेसाठी तडफडत मरत असताना स्वतःसाठी कोट्यावधी रुपयांचा महाल बांधतात अर्थातच ही त्यांची स्वतःची म्हणा किंवा त्यांच्या पाठीशी असलेल्या संघाची मना. त्यांची विचारधारा लोक मरत असतील तर ते म्हणणारच कारण ते याच लायकीचे आहेत, असे त्या विचारधारेच्या एका व्यक्तीनं आधीच जाहीर केलेला आहे. म्हणजेच कुणी माणसांना जगण्यासाठी धडपड करतो तर कोणी माणसांचा जीव गेला तर त्यांच्यावर याचा काहीच परिणाम होत नाही. परिणामासाठी त्यांनी आपली विचारधारा का बदलावी. त्यांनाही त्यांच्या विचारधारेचे स्वतंत्र आहे की नाही. मग त्यांना वाईट म्हणण्यात किंवा ममता सारख्या अविश्वसनीय नेत्याची प्रशंसा करण्यात काय अर्थ. ममतादीदी इथेच थांबल्या नाहीत त्या पुढे म्हणाल्या की, ते स्वतःचा खर्च भागविण्यासाठी पुस्तकांच्या रॉयल्टी कामात आणतात त्याचबरोबर ते संगीतही देतात आणि लिहितात, पेंटिंग करतात अशा व्यक्तीने राजकारणात आणि सत्तेत यायचेच कशाला. त्या आल्या नसत्या तर आज भाजपाला पश्चिम बंगालचा मुलूख राज्य करायला मिळाला असता. त्यांचा हक्क का बरे दीदींनी गिळून टाकला. किती आटापिटा करून निवडणुका लागल्या होत्या. ऐन कोरोनाच्या काळात लोक मरत असताना देखील त्यांची पर्वा नाही केली. या निवडणुकांमुळे कोरोनाचा विस्फोट झाला. एका नेत्याच्या म्हणण्यानुसार दररोज दहा हजार लोक मृत्युमुखी पडतात ही गोष्ट नेत्यांना माहीत नसेल का जे काही होत आहे ते त्यांच्या विचारधारेप्रमाणे होत आहे. त्यांना हेच हवे असेल तर त्यांना दोष देण्यात काय उपयोग. सगळ्यांनी ममता सारखे होऊन सत्तेत उपाशी राहावं असं कधी होत असतंय का? अशा माणसात असून सुद्धा त्या साहित्य लिहितात, चित्र रंगवितात, संगीत देतात, गाणी लिहितात हे सगळं इतरांना कसे जमणार, त्यांना जे जमतं ते करत आहेत, लोक मरताहेत हे पुरेसे नाही काय?
विनोदाची बाजू सोडून आता इतर गोष्टी असे नाही की फक्त सत्ताधारी हे सगळ करतात, या देशाचे नोकरशहा की ज्यांच्यावर आजवरची देखभाल करण्याची जबाबदारी आहे ते लोक असो की वेगवेगळ्या खात्याचे शासकीय अधिकारी असोत ते सर्व दोषी नसतील पण त्यांच्यासोबत बरेच जण या कोरोना मृत्यूला जबाबदार आहेत. ते जे काही करत आहेत उदा विशिष्ट विचारधारेच्या सत्ताधाऱ्यांचा पायंडा पडत असतील, त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न आहे. त्यांना लोक हवेसाठी (ऑक्सिजन ) मरत असताना हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन सिलेंडर आपल्या जीव सोडत असताना आजारींना न देता बाहेर काळ्याबाजारात सिलिंडर विकत आहेत. हॉस्पिटल मधल्या कुणा आजारीन जर पैसे दिले तर त्यांना सिलेंडर आणून देतात. असा जगाच्या कोणत्याही देशात, जनसमुहात, राष्ट्रात ऐकायला देखील मिळत नाही. देशाला स्वतंत्र देताना ब्रिटिशचे त्यावेळचे पंतप्रधान म्हणाले होते की, आपण स्वातंत्र्य तर देत आहोत पण या देशातला शासक भाजी भाकरी वर देखील टॅक्स आकारतील. त्यांना त्यावेळी कोरोना आणि ऑक्सिजनचा किती घनिष्ट संबंध आहे हे माहीत नव्हते. असते तर ते म्हणाले असते की श्वास घ्यायला हवा सुद्धा ते पैसे घेऊन देतील.
या देशाची जनता गरीबातली गरीब आहे. त्यांना त्यांचे अधिकार काय आहेत तेच माहीत नाही. तर ते मागणार काय आणि कुणाकडून, कोणी मागितलेच तर मग त्यांना जेलची कोठडीे आहेच. अशात गरज आहे या देशात एका सेवाभावी समुदायाने पुढे येण्याची. देशातल्या गरीब जनतेची सेवा करण्याची, त्यांना अन्न पाणी देण्याची, आजारी पडल्यास त्यांना औषध उपचार करण्याची, या व्यतिरिक्त आणखी दुसरे त्यांचे स्वप्नच नाहीत. नशिबाने शिक्षण मिळालेच तर ते लाखमोलाचे.
आमच्या मते या कार्यासाठी मुस्लिमांनी पुढे यावे. या बदल्यात त्यांना काही मागू नये. शासनातल्या नोकऱ्याचा विचार सोडून द्यावा. कोणत्या योजना, त्यांचे काय लाभ सगळं काही विसरून अहोरात्र या देशाच्या दीनदुबळ्यांची सेवा करावी. असे एक उदाहरण आपल्या महाराष्ट्रात मुव्हमेंट फॉर पीस अॅन्ड जस्टीसचे आहे. ते आपल्या साधनानुसार गेली 10-15 वर्षे काम करत आहेत. इतर संस्था ही असतील पण ही संस्था आमच्या परिचयाची. अशा संस्था देशभर उभाराव्या. यासाठी मुस्लिमांनी पुढे यावे. अल्लाहच्या कारणास्तव सेवा करावी. बाकी कशाचा विचार करू नये.
कोणत्याही राष्ट्राच्या नागरिकांची परीक्षा त्यांच्यावर आपत्ती कोसळल्यास घेतली जाते. कोरोनाच्या जीवघेण्या संकटाने भारतीय समाजाची परीक्षा घेतली, यात दुर्दैवाने आम्ही अपयशी ठरलो. देशात नव्याने अस्तित्वात आलेल्या लॉबीजनी मृत्यूशी झुंज देत असलेल्या रुग्णांचा श्वास हिरावून घेत बाजारात विकला. रेमडेसीवीर इंजेक्शन मधील डॉक्टरांच्या लॉबीने अब्जावधी कमवल. या औषधाचा कोरोनात उपयोग नसताना 1000-1200 चे इंजेक्शन 50 हजारापर्यंत विकले. इबोलासाठी विकसित औषधाला काडीची किंमत नव्हती. ती कमाई कोरोना रूग्णाच्या खिशातून पैसे काढून जगभराच्या डॉक्टरांनी किती कमवले याचा अंदाज नाही. औषध कंपन्या पेक्षाही जास्तच.
Post a Comment