कोरोना! एक अशी महामारी जीने देशालाच नव्हे तर जगाला हादरून टाकले. जगात असा कोनताच देश उरला नाही जिथे या महामारीने विनाशाचे तांडव केले नाही.
एकीकडे या महामारीने सेकड़ो लोकं मृत्युमुखी पड़त आहे, हज़ारों लोकांना दररोज या महामारीची लागण होत असून ते घरी व दवाखान्यात मृत्युशी झुंज देत आहे, पण अशातच दुसरीकळे या कोरोनाने का नव्हे संपूर्ण जग एकत्रित आले आहे, जगातील लोक जात व धर्मा पलिकडे फक्त आणि फक्त माणुसकीचा धर्म जोपासतांना दिसत आहेत. जगातील सर्वच कोरोनाग्रस्त बरे व्हावेत, अन्य कोणालाही कोरोना होऊ नये व या महामारीचा नाश व्हावा हा एकच उद्देश सर्वांसमोर दिसत आहे, आणि हा उद्देश पूर्ण करण्यासाठी व लोकांचा कोरोनापासून जीव वाचविण्यासाठी मानसातील अनेक देवदूत सरसावलेले दिसत आहे. असेच दोन देवदूत शहानवाज़ शेख़ व प्यारे खान. या दोघांनी या कोरोनाकाळात माणुसकीचे दर्शन देत कोरोनारूपी राक्षसाने जखडलेल्या व मृत्युकडे नेणाऱ्या माणसांना जीवनाची संजीवनी देण्याचे कार्य केले आहे.
शहानवाज़ शेख़
प्रेषित मुहम्मद (स.) यांची एक हदीस आहे,
"तुम्ही जमिनीवर राहणाऱ्यांवर दया करा, आकाशवाला (अल्लाह) तुमच्यावर दया करील."
या हदीसमधील हीच शिकवण आपल्या कृतीतून शाहनवाज़ शेख़ या तरुणाने करून दाखविली.
मुंबई येथील शाहनवाज़ शेख़ने या कोरोना काळात मृत्युच्या दारात गेलेल्या कित्येक लोकांचे जीव वाचविले व त्यांना एक नवीन जीवन देण्याची कार्य केले. आज कोरोनाची स्थिती इतकी भयावह आहे की, एका फ़ोनवर अॅम्बुलन्स येत नाही, ना ही फोन केल्या केल्या डॉक्टरची सेवा मिळत आहे. अशा या काळात शाहनवाज़ शेख़ एका फोनवर कोरोनारुग्णापर्यंत ऑक्सीजन पुरविण्याचे कार्य करत आहे. जनसामान्यांच्या मदतीसाठी तयार त्यांच्या टिमने एक 'कंट्रोल रूम' बनविले आहे, याचा उद्देश फक्त रुग्णांना वेळेवर ऑक्सीजन मिळावा हाच आहे. त्यांच्या या पुण्यकार्यामुळेच त्यांना आता 'ऑक्सीजन मॅन' म्हणून ओळखले जात आहे.
रुगनांच्या मदतीकरिता शाहनवाज़ शेख़ यांनी काही दिवसांअगोदर आपली 22 लाखांची SUV कार विकली. आपली फोर्ड अँडेवर गाड़ी विकल्यानंतर आलेल्या पैशाने शाहनवाज़ शेख़ यांनी कोरोना रुग्णांसाठी 160 ऑक्सीजन सिलेंडरची खरेदी केली. रुग्णांच्या मदतीची प्रेरणा शाहनवाज़ शेख़ यांना आपल्या मित्राच्या पत्नीच्या निधनाने झाली. मागील वर्षी त्यांच्या मित्राच्या पत्नीचा ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे ऑटो रिक्षातच मृत्यु झाला होता, त्यानंतर शाहनवाज़ शेख़ यांनी निश्चय केला की आपण रुग्णांची मदत व मुंबईत रुग्णांपर्यंत ऑक्सीजन पोहोचविण्याचे कार्य करणार.
गरजुंपर्यंत लगेच मदत पोहोचविण्याकरिता 'ऑक्सीजन मॅन'कडून एक हेल्पलाइन नंबर 12132-98920 सुरु केला आहे या नंबरवर कॉल करून मुंबईतील कोरोना रुग्ण मदत मागू शकता.
मागच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी कोरोना स्थिती फार गंभीर आहे, जानेवारी महिन्यात शाहनवाज़ शेख़ला ऑक्सीजनच्या मागणीचे 50 कॉल यायचे, तर आता दररोज 500 ते 600 कॉल येत आहे. गरज पाहता पुरवठा कमी असल्याने फूल न फुलाची पाकळी म्हणून शाहनवाज़ शेख़ 10 ते 20 टक्के लोकांपर्यंत का असेना आपली मदत पोहोचवित आहे.
सध्याच्या घडीला शाहनवाज़ शेख़ यांच्याकडे 200 ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध आहे, ज्यामध्ये 40 ऑक्सीजन सिलेंडर हे भाड्याने घेतलेले आहेत.
शाहनवाज़ शेख़ यांची पुण्याई अशीही दिसून येते की जे गरजू त्यांच्यापर्यंत येऊन ऑक्सीजन सिलेंडर नेण्यास असमर्थ असतात त्यांना घरपोच ऑक्सीजन सिलेंडर पोहोंचविण्याचे कार्यदेखील शाहनवाज़ शेख़ करीत आहे.
मागच्या वर्षापासून आजपर्यंत या देवदूताने जवळपास 4000 गरजूंना ऑक्सीजनरूपी संजीवनीची मदत केली आहे. अशा या देवदूताच्या कार्याला सलाम.
प्यारे खान
नागपुर येथील प्यारे खान या कोरोनाकाळात गरजूंना मदत करण्यास पुढे सरसावले.
उर्दू कवीच्या एक शेर,
“वो जीना ही क्या ख़ाक जो सिर्फ़ अपने लिये हो, खुद मिटकर किसी और को मिटने से बचाले.”
प्यारे खान यांनी या कोरोनाकाळात ऑक्सीजनची गरज पाहता स्वखर्चाने नागपुरच्या एका सरकारी हॉस्पिटलला 32 टन ऑक्सीजन दिले. सोबतच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना कोरोना रुगनांची मदत म्हणून 50 लाख रुपयेही दिले, इतकेच नव्हे तर नागपुरात जमाअत ए इस्लामी तर्फे चालविल्या जाणाऱ्या 100 बेडच्या कोरोना हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढती गर्दी पाहता ऑक्सीजनची कमतरता भासत आहे व जमाअतच्या लोकांनीसुद्धा प्यारे खान समोर ऑक्सीजनच्या एका टँकरची मागणी केली तो देण्याची प्यारे खान यांनी तयारीही दर्शविली आहे.
प्यारे खान यांना फार कमी लोकं ओळखतात. महामारीच्या या बिकट परिस्थितित गरजूंच्या मदतीला धावून येणारा प्यारे खान कोण आहे? आज हा प्रश्न तुमच्या आमच्या सर्वांच्या मनात आहे. त्यांच्या जीवनाची कहाणी चित्रपटासारखीच आहे. एका अत्यंत गरीब कुटुंबाशी संबंध असलेल्या प्यारे खान यांनी आपल्या ईमानदारी, ज़िद्द, चिकाटीच्या जोरावर शून्यातुन विश्व निर्माण केले.
प्यारे खान यांचे सुरुवातीचे जीवन नागपुरातील कच्ची आबादी येथे अत्यंत ग़रीबीत व्यतीत झाले. त्यांची आई ग्लॉसरीचे दुकान चालवित होती व वडील दारोदारी जाऊन कपड़े विकत असत. दहावीत प्यारे खान नापास झाले व त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले. घरची गरीबी पाहता त्यांनी नागपुर रेल्वेस्टेशनवर संतरे विकन्यास सुरुवात केली. नंतर त्यांनी आईचे दागीने विकून 11 हजार रुपयांच्या डाऊन पेमेंटवर ऑटो घेतली व आता ते ऑटोने संतरे विकू लागले हे कार्य 2001 पर्यंत चालले.
नंतर त्यांच्या मनात काही मोठा करण्याची कल्पना आली मात्र पैसा नव्हता. एकीकडे 50000 रु कर्ज मगितले असता त्याने घराची कागदपत्रे जमा करण्यास सांगितले. बैंकांकळून कर्ज मागिलते पण मिळाले नाही, अशातच तीन वर्षाचा काळ लोटला. शेवटी 2004 मध्ये आय एन जी एशिया बैंकेकडून 11 लाख रुपये कर्ज म्हणून मिळाले त्या पैश्याने प्यारे खान यांनी एक ट्रक खरेदी केला व ते ट्रांसपोर्ट नागपुर ते अहमदाबाद चालवू लागले, पण दुर्दैवाने सहा महिन्याच्या आत ट्रकचा अपघात झाला. आता नातेवाईकांनी प्यारे खानला ट्रांसपोर्टचे कार्य सोडून देण्यास सांगितले. पण प्यारे खान यांनी धीर सोडला नाही त्यांनी ट्रकची दुरुस्ती केली व पुन्हा नव्या दमाने ट्रांसपोर्ट सुरु केले. त्याचेच फलित म्हणून ट्रकमुळेच अवघ्या काही दिवसांत त्यांचा व्यवसाय ट्रॅकवर आला. अवघ्या तीन वर्षांत 2007 साली त्यांनी 'अश्मी रोड ट्रांसपोर्ट' या नावाने एक कंपनी सुरु केली. त्यांच्या या कंपनीला काम मिळू लागले व येथून त्यांची भरभराटी सुरु झाली.
त्यांची एक गोष्ट येथे आवर्जून सांगावासी वाटती, 2013 साली भूतान या देशाने भारतातून काही सामानाची आयात केली पण वाटेत एक दरवाजा होता ज्याची ऊंची 13.5 फूट होती आणि ट्रकाची साधारण ऊंची साढ़े 17 फुट असल्याने त्या गेट मधून ट्रक निघने शक्य नव्हते म्हणून भारतातील कोणताच ट्रक मालक सामान नेण्यास तयार नव्हता. शेवटी हे आव्हान प्यारे खान यांनी स्वीकारले, ते स्वतः भूतानला गेले. तेथे वाटेत असलेल्या गेटचे निरीक्षण केले व असे ठरविले की ट्रक सामान घेऊन येईल. त्यांनी गेटच्या खाली जवळपास चार साढ़े चार फुट रोड खोदले आणि मग ट्रक सुखरूप त्या गेट खालून निघाला.
अशा या ज़िद्दी माणसाने आपल्या चिकाटी व ईमानदारीच्या ज़ोरावर आपल्या 'अश्मी रोड ट्रांसपोर्ट' कंपनीचे जगात नावलौकिक केले. त्यांचा ट्रांसपोर्टचे काम सध्या भारतच नव्हे तर नेपाल व दुबईतसुद्धा चालते. सध्या कंपनीजवळ 250 ट्रक असून वार्षिक उत्पन्न 6 कोटींपर्यंत आहे. अश्मी रोड ट्रान्सपोर्टचे संचालक प्यारे खान यांनी नागपुरातील कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी दोन टँकरमध्ये एकूण ३२ टन ऑक्सीजन देऊ केला आहे. यासाठी त्यांनी तब्बल एक कोटी रुपये खर्च केले आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी भिलाई येथून १६ टन ऑक्सीजन असलेला एक टँकर पाठविला होता. बुधवारी पुन्हा बेल्लारी येथून १६ टन ऑक्सीजनचा दुसरा टँकर पाठविला आहे.
नागपुरात रुग्णसंख्या वाढली असून ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, औषधांचा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत लोकांचे जीव वाचविण्यासाठी आपण काहीतरी करू शकलो, यावर प्यारे खान यांनी समाधान व्यक्त केले आहे.
अशा या धरतीवरील दोन्ही देवदुतांना मानाचा सलाम!
- शेख़ साबेर
शिक्षक, सेठ ई बी के विद्यालय टेंभुर्णी,
जि जालना, मो.- 9421327034
Post a Comment