Halloween Costume ideas 2015

कोविडपासून जगाने कोणता बोध घ्यावा


’’आयुष्याच्या शेवटी सगळयाच गोष्टी क्षुल्लक होऊन जातात.’’

कोविड-19 च्या दोन आवर्तनांनी माणसाला अंतर्मुख होण्याची संधी दिलेली आहे. आता ही जे अंतर्मुख होणार नाही, आपल्या जीवन जगण्याच्या पद्धतीवर पुनर्विचार करणार नाहीत, स्पष्ट आहे असे लोक पुढे येणाऱ्या काळामध्ये टिकू शकणार नाहीत. कोविड-19 मुळे सर्वात जास्त जीवहानी अमेरिका आणि युरोपीय देशांची झाली आहे. यावरून एक गोष्ट सिद्ध होते की या देशांत राहणाऱ्या लोकांची जीवनशैली चांगली नव्हती. म्हणूनच उच्च कोटीच्या आरोग्य सुविधा असतांनासुद्धा सर्वात जास्त चित्तहानी याच देशांची झाली. म्हणून आता कोविड-19 पासून बोध घेण्याची वेळ आलेली आहे. युरोप आणि अमेरिकन लोकांची जीवनशैली उच्च दर्जाची समजली जाते परंतु ती कोविड समोर पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. मग प्रश्न असा उत्पन्न होतो की, जगण्याची सर्वोत्कृष्ट पद्धती कोणती? कुरआनने याचे उत्तर एका वाक्यात दिलेले आहे ते असे, ’’इन्न दिना इंदल्लाही इस्लाम’’ अर्थात तुमच्यासाठी जीवन जगण्याची सर्वोत्कृष्ट पद्धत इस्लाम आहे. (सुरे आले इमरान आयत नं. 19). 

कुरआनचा हा दावा तपासून पाहण्याअगोदर आपण जगात प्रचलित असलेल्या जीवनशैलींचे संक्षिप्त समीक्षण करूया. इस्लामी जीवनशैली वगळता इतर सर्व जीवनशैलींमध्ये हलाल आणि हरामची संकल्पनाच अस्तित्वात नाही. त्यामुळे काय खावं? काय खावू नये? काय ल्यावं काय लेऊ नये? काय घ्यावं काय घेऊ नये? कसं वागावं कसं वागू नये? याबद्दल ठोस असे ईश्वरीय मार्गदर्शन नसल्यामुळे लोक आपापल्या अंदाजाप्रमाणे जीवन जगत असतात. इस्लाम वगळता इतर सर्व जीवनशैल ह्या माणसाने निर्माण केलेल्या आहेत म्हणून त्रुटीपूर्ण आहेत. ज्याने माणसाला जन्माला घातले त्याच्यापेक्षा जास्त माणसाचे कल्याण कशात आहे, हे दुसऱ्या कोणाला ठाऊक असणार? 

इतर जीवनपद्धतींमध्ये अनेक आत्मघाती तरतुदी आहेत ज्यामुळे मानव समुहाची अतोनात हानी झालेली आहे. उदा. इस्लाम वगळता इतर सर्व जीवनपद्धतींमध्ये व्याजाला -(उर्वरित पान 7 वर)

मान्यता आहे. व्याज म्हणजे नफा, असे समजण्याचा मूर्खपणा त्यात केलेला आहे. व्याज ही जीवनाला्निलष्ट करणारी गोष्ट आहे. व्याजामुळे त्यांचेच जीवन सुसह्य होते ज्यांच्याकडे भरपूर संपत्ती आहे. परंतु ज्यांच्याकडे संपत्ती नाही, अशा लोकांसाठी व्याज हे अभिशाप आहे आणि अशाच लोकांची संख्या जगात जास्त आहे. दुसरे उदाहरण दारू किंवा ड्रग्सचे घ्या. शालेय बुद्धीचा कोणताही माणूस हे समजू शकतो की, दारू आणि ड्रग्जचे व्यसन माणसाला देशोधडीला लावण्यासाठी पुरेसे आहे. परंतु इस्लाम वगळता आज सर्वच जीवन पद्धतींमध्ये दारू आणि ड्रग्स अनेकांच्या जीवनशैलीचा भाग आहे. नव्हे सोशल ड्रिंकिंगला तर समाजमान्यता असून, ती अभिमानाची बाब समजली जाते. तीसरे उदाहरण भ्रष्टाचाराचे घेऊ. हलाल-हरामची संकल्पनाच अस्तित्वात नसल्यामुळे भ्रष्टाचार हा इस्लामखेरीज इतर जीवन पद्धतींचा अविभाज्य भाग बनलेला आहे. भ्रष्ट मार्गाने संपत्ती जमविलेल्या लोकांचा समाजामध्ये सन्मान होत असल्यामुळे अप्रत्यक्षपणे भ्रष्ट आचरणाला उत्तेजन मिळत असते. हीच नाही अशी शेकडो उदाहरणे आपल्याला देता येतील. तसे पाहता सर्वच जीवन शैलींमध्ये वाईट गोष्टींना वाईट आणि चांगल्यांना चांगले म्हटलेले आहे. परंतु वाईट गोष्टींचे समाजातून उच्चाटन करून चांगल्या गोष्टी समाजात रूजविण्यासाठी प्रत्यक्षात कार्यकारी योजना कुरआनच्या स्वरूपात फक्त इस्लामकडे आहे. त्यामुळे चांगले आणि वाईट, हलाल आणि हराम यांच्यामध्ये स्पष्ट सीमारेखा आखणे आणि त्यानुसार आचरण करणे प्रत्येकाला सहज शक्य होऊन जाते. मानवनिर्मित जीवनशैलीमुळे समाजाचे नुकसान होत असल्याचा दांडगा अनुभव सोबत असेल तर ईश्वरनिर्मित जीवनशैली कशी असते हे किमान समजून घेण्यास काय हरकत आहे? 

खरच ईश्वरनिर्मित जीवनशैलीची गरज आहे काय? 

मानवनिर्मित जीवनशैलीमध्ये माणसांच्या इच्छा आकांक्षाचा अनिवार्य प्रभाव असतो ईश्वरनिर्मित जीवनशैलीमध्ये तो नसतो. म्हणून या जीवनशैलीप्रमाणे जगणारे लोक आपल्या या जीवनात व पारलौकिक जीवनात यशस्वी होतात. 

पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सर्व माणसांची शारीरिक व मानसिक रचना एकच आहे. त्यांच्या आवडी-निवडी एकच आहेत. त्यांना सर्वांना एकच सुर्यापासून सारखच डी व्हिटॅमिन मिळतं. त्यांचं रक्त एकमेकांना चालतं, त्यांची आपसात लग्न होऊ शकतात. त्यांची लैंगिकप्रकृती सारखीच त्यांची उत्पत्तीची प्रक्रिया सारखीच. त्यांचे सुख, दुःख सारखेच. त्या सर्वांना एकसारखीच बुद्धीमत्ता दिलेली आहे. त्यांच्या क्षमता एकसारख्याच आहेत. त्यांच्यातील वैगुण्यही एकसारखे आहे. अगदी प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत त्यांच्या भावना सारख्याच आहेत. त्यांच्या सर्वच गोष्टी एकसारख्या असतील तर उघड आहे त्यांची जीवन जगण्याची पद्धत ही एकसारखीच असायला हवी. म्हणूनच ईश्वराने त्यांच्यासाठी सर्वोत्कृष्ट अशी जीवन पद्धती पसंत केलेली आहे, ज्याचे नाव इस्लाम आहे. परंतु याची जाण सर्वांना नाही. मात्र जगातील जवळ-जवळ 200 कोटी लोक आज या पद्धतीनुसार समाधानाने जगत आहेत.  

इस्लामी जीवन पद्धती नेमकी कशी असते? 

’अद्-दीन’ या अरबी भाषेतील शब्दाचे अनेक अर्थ आहेत. उदा. वर्चस्व, धर्म, व्यवस्था, सत्ता, मोबदला तसेच या शब्दाचा एक अर्थ ’तरीका’ अर्थात जीवन जगण्याची पद्धत असा सुद्धा आहे. कुरआनचा असा दावा नाही की इस्लाम ईश्वराच्या नजरेत खरी जीवन पद्धती आहे उलट त्याचा दावा असा आहे की, फक्त इस्लाम हीच खरी जीवन पद्धती आहे. यावरून हा दावा तपासून पाहणे अनिवार्य होऊन जाते.  या दाव्याचे वैशिष्ट्ये असे की, हा फक्त अरबस्थानापुरता दावा नाही तर जगात राहणाऱ्या सर्वांसाठी हा दावा करण्यात आलेला आहे. तसेच एखाद्या काळापुरता नाही तर पृथ्वीच्या अंतापर्यंत येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या कल्याणासाठी हा दावा करण्यात आलेला आहे. स्पष्ट आहे हा धर्म ईश्वरीय आहे म्हणूनच हा दावा व्यापक स्वरूपात करण्यात आलेला आहे. 

दीनप्रमाणेच ’इस्लाम’ या शब्दाची स्पष्ट व्याख्या करण्यात आलेली आहे. अरबी भाषेच्या या शब्दाचे खालीलप्रमाणे दोन अर्थ आहेत. 

1. आत्मसमर्पण 2. अनुसरण.

आत्मसमर्पण ईश्वरासमोर आणि अनुसरण ईश्वरीय आदेशाचे. आत्मसमर्पण म्हणजे संपूर्ण आत्मसमर्पण. आज बहुतेक मुस्लिम आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये इस्लामी इबादतींचे अनुसरण करतात मात्र आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये ते भांडवलशाही जीवनपद्धतीचे अनुसरण करतात. म्हणजे इस्लाम आणि भांडवलशाही यांच्या संकरातून निर्माण झालेल्या तिसऱ्याच जीवनशैलीची त्यांना सवय लागलेली आहे. म्हणून अशा लोकांच्या जीवनामध्ये इस्लामच्या बरकती सोबत-सोबत भांडवलशाहीमुळे येणारे नुकसान आपसुकच आलेले आहेत. त्यामुळे एक विचित्र जीवन पद्धती अस्तित्वात आलेली आहे.   

इस्लामी जीवनशैली उत्कृष्ट का आहे? 

इस्लामी जीवनशैली उत्कृष्ट असल्याचा पहिला दावा कुरआनमध्ये असा करण्यात आलेला आहे की, ही प्राकृतिक जीवनशैली आहे. माणसाच्या प्रकृतीशी  अनुकूल असल्यामुळे यात माणसाच्या इच्छा-आकांक्षाना वैधमार्गाने पूर्ण करण्याची क्षमता याच जीवनशैलीमध्ये आहे. उदा. इस्लाम वगळता इतर जीवनशैलींमध्ये ब्रह्मचर्याला पवित्र मानले जाते. सन्यास घेण्यास उत्कृष्ट मानले जाते. त्याशिवाय मोक्ष प्राप्त होतच नाही असेही मानले जाते. या उलट इस्लाममध्ये संसारिक जीवन जगूनही मोक्षप्राप्त करता येतो अशी मान्यता आहे. ब्रह्मचर्य किंवा सन्यस्त जीवन ही प्राकृतिक व्यवस्था नसून असे जीवन जगणाऱ्या अनेक फादर आणि जोगीनींंचे अनैतिक प्रकरणे सातत्याने समोर येत असतात. या उलट इस्लाममध्ये स्त्री-पुरूषांच्या लैंगिक गरजांना सनदशीर मार्गाने पूर्ण करण्याची उत्कृष्ट व्यवस्था केलेली आहे. 

ही जीवनशैली प्राकृतिक आहे, असा दावा कुरआन खालील शब्दात करतो. ’’आता हे लोक अल्लाहच्या आज्ञापालनाची पद्धत (ईश्वरीय दीन) सोडून इतर एखादी पद्धत इच्छितात? वास्तविक पाहता आकाश आणि पृथ्वीमध्ये जे काही आहे ते आपणहून किंवा अपरिहार्यपणे ईश्वराला समर्पित झालेले आहेत. आणि त्याच्याकडेच एक दिवस परत जावयाचे आहे’’ (संदर्भ : सुरे आलेइमरान आयत क्र. 83).

ही जीवनशैली प्राकृतिक आहे. याचा दूसरा दावा कुरआनमध्ये असा करण्यात आलेला आहे की, जीवन जगण्याचा हाच सत्य आणि न्यायपूर्ण मार्ग आहे. ’’वस्तुतः तुमचा पालनकर्ता अल्लाहच आहे ज्याने आकाशांना व पृथ्वीला सहा दिवसांत निर्माण केले, मग आपल्या सिंहासनावर (अर्श) विराजमान झाला. जो रात्रीला दिवसावर झाकतो व परत दिवस रात्रीच्या पाठीमागे धावत येतो. ज्याने सूर्य, चंद्र व तारे निर्माण केले, सर्व त्याच्या आदेशाच्या अधीन आहेत. सावध रहा त्याचीच सृष्टी आहे व त्याचाच हुकूम आहे. फार समृद्धशाली आहे अल्लाह, सर्व विश्वाचा मालक व पालनकर्ता.’’ (संदर्भ : सुरे आराफ आयत क्र. 54). 

या आयातीमध्ये केलेल्या दाव्यामध्ये एक महत्त्वाच्या मुद्याकडे ईश्वराने मानवाचे लक्ष वेधलेले आहे की, माणसाला सोडून इतर सर्व गोष्टी या ईश्वरीय आदेशाने बांधलेल्या आहेत. उदा. दिवसानंतर रात्र येते, रात्रीनंतर परत दिवस येतो, सूर्य, चंद्र, तारे हे आपल्या ठरलेल्या गतीमध्ये व कक्षेत परिक्रमा करीत आहेत. पृथ्वी आणि आकाशामध्ये जे काही आहे ते त्याच्याच मालकीचे आहे आणि त्याच्याच आदेशाचे पाबंद आहेत. फक्त माणूसच हा उत्कृष्ट जीव असल्यामुळे ईश्वराने त्याला बुद्धी देऊन त्यानुसार आचरण करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. मात्र बहुतेक लोक या स्वातंत्र्याचा ईश्वराच्या मर्जीविरूद्ध उपयोग करून स्वतःचे आणि स्वतःबरोबर इतरांचे जीवन संकटात टाकत आलेले आहेत. कोविड ही अशाच संकटापैकी एक संकट असल्याचा अंदाज अनेक साथीच्या रोगाच्या तज्ज्ञ लोकांचा आहे. कारण मानवीय इतिहासामध्ये असे कधीच झालेले नाही की, एका विशिष्ट अशा रोगाची साथ जागतिक स्तरावर एकदाच आलेली आहे. जगात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे वातावरण असते. म्हणून साथीच्या विषाणूंना जे वातावरण अनुकूल असते साथ त्याच ठिकाणी पसरते. कोविड मात्र अपवाद आहे. तो सर्वच वातारणात सारखीच हानी पोहोचवत आहे. म्हणून हे संकट मानवनिर्मित असावे. 

सुरे बकराच्या 130 व्या आयातीमध्ये ईश्वराने पाचवा दावा असा केलेला आहे की, त्याने आपल्या प्रेषितांमार्फत जे ज्ञान दिलेले आहे तेच खरे ज्ञान आहे व खरा उपदेश आहे. अर्थात त्यातच मानवाचे हित लपलेले आहे. नेमक्या शब्दात सांगायचे तर ईश्वर म्हणतो, ’’ जो स्वतःला अज्ञानी बनवील तोच इब्राहीम (अलै.) च्या धर्माकडे पाठ फिरवील. निःसंशय आम्ही त्याला जगामध्ये आमचे कार्य करण्यासाठी निवडले होते आणि परलोकामध्येही याची गणना सदाचाऱ्यांमध्ये होईल.’’ 

बहुतेक आनंदाच्या घटना होणार आहेत, याचा माणसाला अगोदरपासूनच अंदाज असतो. उदा. एक तारखेला पगार येणार आहे. अमूक तारखेला लग्न होणार आहे. मात्र बहुतेक दुःखाच्या घटना अचानक घडतात. उदा. अपघात होणे, चोरी होणे, कोविडने मृत्यू होणे. दुःखाच्या घटना घडल्यानंतर एक श्रद्धावान मुस्लिम तीन प्रकारे व्यक्त होतो. एक दुःखाच्या काळात तो ईश्वराच्या अधिक जवळ जातो. दोन- तो हा विचार करतो की, दुःखाची घटना छोटी आहे, याच्यापेक्षाही मोठी घटना घडू शकली असती. तीन - प्रत्येक दुःखानंतर सुख येणार, याची खात्री ईश्वरानेच दिलेली आहे. थोडक्यात सुख आणि दुःख दोन्हीमध्ये संतुलन ठेऊन तो नेहमी ईश्वराचे धन्यवाद करणारा बनतो. येणेप्रमाणे एका मुस्लिमाचे जीवन, आनंद असो का दुःख संतुलित होऊन जाते. तो भौतिक गोष्टीही कमावतो सोबत मोक्ष प्राप्तीचा विश्वासही ठेवतो.

जगामध्ये स्त्रीयांच्या बाबतीत कोणत्याही जीवनशैलीमध्ये सुरक्षा आणि सन्मानाची खात्री दिलेली नाही. ती फक्त इस्लाममध्ये आहे. इस्लामच्या छत्रछायेखालीच स्त्री सुरक्षित आहे. ती कशी सुरक्षित आहे हा वेगळा विषय आहे. त्यावर पुन्हा कधी चर्चा करू. इस्लामी जीवनशैलीचे एक वैशिष्ट्ये हे आहे की, ही जीवनशैली पूर्णपणे अंगीकारल्यावरच त्याचे चांगले परिणाम अनुभवता येतात.


- एम.आय.शेख


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget