मागच्या आठवड्यात रविवारी हरियाणाच्या मेवातमध्ये राहणारे दोन तरूण औषध घेऊन घरी परत जात असताना वेगवेगळ्या वाहनातून आलेल्या विशिष्ट समाजाच्या एका 25 ते 30 लोकांच्या समुहाने त्यांना अडवून बेदम मारहाण केली. त्यातील एक व्यक्ती पळून जाण्यात यशस्वी ठरला. तर दूसऱ्याचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या तरूणाच नाव आसिफ (वय 25 वर्षे) असून तो व्यवसायाने जीम ट्रेनर होता. तो खेडा खलीलपूर सोहना नावाच्या गावाचा राहणारा होता. त्याच्यासोबतचा भाऊ गंभीर जखमी असून, त्याचे नाव अ.रशीद आहे. त्याने मीडियाला माहिती दिली की. मागून आलेल्या वाहनाने धडक देवून त्यांच्यावर हल्ला केला. 25 ते 30 पैकी संदीप, कालू, अडवाणी, पटवारी, ऋषी, कुलदीप, सोनू, भीम, महेंद्र वगैरेंना ओळखत असल्याचे सांगितले.
Post a Comment