“आणि हे प्रेषित आम्ही तुम्हाला अखिल मानवजातीसाठी खूशखबर देणारा व सावधान करणारा बनवून पाठविले आहे.” (कुरआन)
- प्रेषित मुहम्मद (स.) केवळ मुस्लिमांचेच नाहीत तर सर्वांचे प्रेषित आहेत. (बॅ. बाबासाहेब भोसले.
- प्रेषित मुहम्मद (स.) एक थोर प्रेषित होते. त्यांनी अरबांना जगाचे मार्गदर्शक केले. त्यांनी अरबांच्या हाती जगाच्या संस्कृतीची मशाल दिली. (साने गुरुजी)
- प्रेषित मुहम्मद (स.) यांचे मानवजातीवर अनंत उपकार आहेत. त्यांनी वेगवेगळ्या देवीदेवतांच्या जागी केवळ एकाच स्वामीवर श्रद्धा ठेवण्याची शिकवण दिली. त्यांनी जगातील वाईट चाली आणि अंधश्रद्धा मुळातून उखडून टाकल्या. (साने गुरुजी)
- प्रेषित मुहम्मद (स.) यांनी ना केवळ फौज, कायदा, शासन आणि राज्य अस्तित्वात आणले किंबहुना तत्कालीन जगाच्या एक तृतीयांश लोकसंख्येच्या अंतःकरणासही स्पर्श केला. एवढेच नव्हे तर त्यांनी वाद, धर्म, विचार, आस्था इत्यादींचे स्वरूप बदलून टाकले. (लेमर टाइम)
- विनोबा भावे यांनी म्हटले आहे की प्रेषित मुहम्मद (स.) महापुरुष होते. त्यांचे चरित्र डोळ्यांसमोर आले की माझी समाधी लागते.
- मी, प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या चरित्राचा अभ्यास केला आहे. ते महान मानव होते. माझ्या मते त्यांना मानवतेचे मुक्तिदाता म्हटले पाहिजे. माझी धारणा आहे की जर त्यांच्यासारखा मनुष्य वर्तमान विश्वाचा अधिनायक झाला असता तर त्याने विश्वाच्या समस्त जटील समस्यांचे अशा प्रकारे निराकरण केले असते की मानव विश्व अपेक्षित सुख-शांतीच्या संपत्तीने संपन्न झाले असते. (बर्नार्ड शॉ)
- मायकेल हार्ट यांनी “दि हंड्रेड” नावाच्या पुस्तकात एकूण १०० जणांची यादी केली आहे. ज्यांनी मानवी जीवनावर प्रभाव पाडला आहे त्या यादीत प्रेषित मुहम्मद (स.) यांचे नाव पहिल्या स्थानावर आहे. (संदर्भ- पवित्र कुरआन ज्ञानाचे मूळ स्रोत, लेखक- दत्तप्रसन्न साठे, प्रकाशक- इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट, मुंबई)
- पवित्र कुरआन व प्रेषित मुहम्मद (स.) यांचे उपदेश हे अखिल मानवजातीसाठी आहेत.
समानता
“हे लोकहो, आम्ही तुम्हाला एका पुरुष आणि एका स्त्रीपासून निर्माण केले आणि तुम्हाला समुदाय व कुटुंबांत विभाजित केले जेणेकरून तुम्ही एक दुसऱ्याला ओळखावे. निःसंशय तुमच्यापैकी अधिक प्रतिष्ठित तो आहे जो अधिक ईशपरायण आहे.” (कुरआन)
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले आहे, एका अरबाला एखाद्या अरबेतरावर कोणतेही श्रेष्ठत्व प्राप्त नाही आणि एका अरबेतराला अरबावर सुद्धा नाही, ना एखाद्या गौरवर्णीयाला कृष्णवर्णीयावर. आणि कृष्णवर्णीयाला गौरवर्णीयावर. ईशपरायणतेव्यतिरिक्त वंशाच्या पायावर कोणतेही श्रेष्ठत्व नाही.
शांतता-
पवित्र कुरआनच्या अध्याय क्र. ५ मधील आयत क्र. ३२ मध्ये म्हटले आहे,
“ज्याने एखाद्या माणसाला नाहक अथवा पृथ्वीवर उपद्रव माजविण्याच्या कारणाविना ठार केले त्याने जणू सर्व लोकांची हत्या केली आणि ज्याने एका माणसाचे प्राण वाचविले तर त्याने समस्त मानवांना जीवनदान दिले.” (कुरआन)
न्याय-
पवित्र कुरआनचा अटळ नियम आहे की माणसाशी न्याय केला जावा, महान अल्लाहचा आदेश आहे,
“एखाद्या समूहाच्या शत्रुत्वाने तुम्हाला इतके प्रक्षोभित करू नये की तुम्ही न्यायापासून तोंड फिरवावे. न्याय करा, हे ईशपरायणतेच्या अधिक जवळ आहे.” (कुरआन)
प्रेषित मुहम्मद (स.) यांचे संदेश वर्ण, भाषा, देश इत्यादी तमाम भेदांच्या पलीकडे जाऊन समस्त मानवजातीला संबोधित करतात. त्यांचे काही उपदेश खालीलप्रमाणे-
- मजुराला घाम वाळण्यापूर्वी मजुरी अदा करा. (हदीस)
- काबाडकष्टाने हातावर घट्टे पडलेल्या एका कष्टकऱ्याच्या हाताला चुंबन घेऊन प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, तो श्रद्धावंत होऊच शकत नाही जो पोटभर जेवतो परंतु त्याचा शेजारी मात्र उपाशी राहतो. (हदीस)
- प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, वैध उपजीविका कमविण्यासाठी प्रयत्न करणे ही एक उपासना आहे जशा इतर उपासना. (हदीस)
- प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, द्वेष करण्यापासून दूर राहा, कारण द्वेष चांगल्या गोष्टींना (चांगुलपणाला) खाऊन टाकतो, जसे अग्नी लाकडाला भस्म करते किंवा गवताची राख करत. (हदीस)
- प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, शंका घेण्यापासून सावध राहा. कारण शंका घेणे मोठे खोटारडेपणा आहे. एकमेकांचे द्वेष धुंडत बसू नका. एकमेकांची हेरगिरी करू नका, एकमेकांच्या पाळतीवर राहू नका. एकमेकांचा मत्सर करू नका. एकमेकांवर रागवू नका. एकमेकांकडून तोंड फिरवू नका. (हदीस)
- प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, जो अत्याचारीला व अत्याचार करण्यास बळ देतो आणि त्याला माहीत असते की तो अत्याचारी आहे तर अशा मनुष्य इस्लामचा त्याग केला आहे. (हदीस)
- पर्यावरण संवर्धनासाठी व वैश्विक समतोल राखण्यासाठी प्रेषितांचे मार्गदर्शन मोलाचे आहे.
- “एखादे झाड तोडावे लागले तर त्याऐवजी एक नवीन झाड लावावे व जोपासावे एखाद्याने वृक्ष रोपण करून त्याची निगा राखली तर जोवर जग त्यापासून लाभान्वित होईल तोवर त्याच्यासाठी शाश्वत पुण्याई आहे.” (हदीस)
- मोहम्मद खालीद जकी,
चोपडा,
मो.- ८९८३१०४६९९
Post a Comment