मागच्या आठवड्यात आपण जीवनशैली आणि क्रॉनिक आजाराबद्दल थोडी माहिती घेतली़ तुमचे या महिन्याचे हेल्थ बजेट तय्यार असेल़ (जर नाही तर आज नक्की बनवा). स्वस्थ जीवन जगण्याची आपली इच्छा आणि त्यासाठी प्रयत्न नक्की वाढलेले असतील अशी आशा आहे़
आज आपण आपल्या आहाराबद्दल बोलू़ विशेषकरून साखरेबद्दल बोलू़ कोणत्याही किराणा दुकानात जा आणि काही पॅकेज प्रोडक्ट (बिस्कीट, नमकीन्स, भुजीया, कॅन्डीज, चॉकलेट्स, टॉफीज, ब्रेडस, सॉस, केचप, मग्गी, पस्ता पॅकेज ज्यूसेस, शीतपेय, सोडा) यांच्यामधील कंटेट बघा़ तुम्हाला साखर वेगवेगळ्या नावाने लिहिलेली दिसेल- सुक्रोज, डेक्स्ट्रॉज, बार्ले माल्ट, आगवे नेक्टर, हाय फ्रूक्टोज, कॉर्न सायरप इत्यादी़ काही प्रोडक्टसमध्ये लपवलेला असतो़ 1950 च्या अगोदर आपला बहुतांश आहार साखरमुक्त होता़ आपल्या आहारात आजा अचानक एवढी साखर आली कुठून? ही समजण्यासाठी, वैद्यकीय संशोधनाचा इतिहास बघावा लागेल़
1950 मध्ये जेव्हा पाश्चिमात्य देशामध्ये ही लाईफ स्टाईल आणि क्रॉनिक आजार वाढू लागले़ तर वैद्यकीय क्षेत्र याची कारणे शोधू लागले़ त्यात प्राथमिक असे आढळून आले की फॅटस् (तेल) हे या साठी जबाबदार आहेत़ या वैद्यकीय डिस्कव्हरीमुळे मीठ आणि फॅट इंडस्ट्री गोत्यात आली़ त्यावेळी फुड प्रोडक्टस चवदार बनविण्यासाठी चरबिचा वापर होत होता़ उत्पादनांना चवदार ठेवण्यासाठी आता त्यांनी चरबीच्या जागी उच्च प्रमाणात साखरेचा वापर केला़ शुगर असोसिएशन नावाच्या संघटनेने 1976 मध्ये एक जनसंपर्क मोहिम राबविली. ज्यामध्ये अन्न आणि ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशन (एफडीए) याला प्रभावी करणे वा मेडिकल रिसर्च फॅट (म्हणजेच तेल/ चरबी)कडे वळविणे समाविष्ट होते़ साखरेच्या धोक्यापासून लोकांना अंधारात ठेवण्यासाठी आणि चरबी हेच रोगाचे प्रमुख कारण आहे म्हणून लक्ष वळविण्यासाठी प्रचंड पैशाची गुंतवणूक केली गेली आणि साखरेमध्ये चटक लावण्याची क्षमता आहे, हे लक्षात आले. पहिल्या गुलाबजामुनला तुम्ही नाकारू शकता, पण एक गुलाब जामून खाल्यानंतर दुसरा खाल्याशिवाय रहावत नाही़
आपल्या मेंदूत जे सर्किटस् कॅनाबिनॉईड्स (नशा देणारी ड्रग्स) साठी आहेत़ या सर्व संशोधनानंतर सगळ्या फुड कंपन्यांना याच्यात भरपूर मार्केट असल्याचे दिसले़ त्यांनी ही गोष्ट नागरिकांपासून दूर ठेवली व स्वत:साठी त्याचा भरपूर फायदा करून घेतला़ वैद्यकीय संशोधनाच्या फेरफारीचे हे क्लासिक उदाहरण आहे़ ते ठीक आहे़ पण शुगर वेट का? आपला शरीर अधिक प्रमाणात घेतलेल्या शुगरचे रूपांतर ट्रिग्लेसेराईड्स आणि व्हीएलडीएल मध्ये करतो़ या दोन्ही गोष्टी लिव्हरमध्ये जमा होतात आणि हेक नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज आणि कोलेस्टेरॉल ही वाढण्यासाठी जबाबदार आहेत़
हे ट्रिग्लीसेराईड्स इन्शुलिन ची ताकत सुद्धा कमी करतात. ज्यामुळे कमी वयात सुद्धा डायबेटिस चे प्रमाण वाढले आहे. सध्या अमेरिकेत 4 पैकी एका किशोरवयीन मुलाला प्रिडायबेटिज आहे. वैद्यकीय संशोधनात आपल्या दररोजच्या आहारात शुगर (प्रोसेस्ड फुड) चे प्रमाण आणि हार्ट अटॅक, लकवा आणि डायबेटिज चा संबंध स्पष्ट दिसून येत आहे.
अल्कोहोल, शुगर आणि डायबेटिज, अल्कोहोलिक्स मध्ये डायबेटिज चे प्रमाण जास्त असते. हे स्पष्ट आहे. डायबेटिज चे प्रमाण सर्वात जास्त असणारे देश - सऊदी अरेबिया, कुवैत, कतार, युएई, आणि मलेशिया. या मुस्लिम देशांमध्ये दारू तर विकली जात नाही. मग तिथे डायबेटिज का वाढले? कोल्ड ड्रिंक्स. या कोल्ड्रींक्समध्ये प्रचंड प्रमाणात साखर असते. आणि हवामान गरम असल्यामुळे आणि कोल्ड्रींक कंपनीच्या उत्तम मार्केटिंगमुळे, कोल्ड ड्रिंक ची लोकांना सवय झाली. सकाळ, दुपार, संध्याकाळ, छोटे मोठे वयस्क, पुरूष आणि बायका, घरात आणि बाहेर कुठेही कोल्ड्रींक घेऊ शकता. एवढ्या प्रमाणात घेतलेली साखर, शरिराचे संतुलन खराब करतेे. इन्सोलिन अकार्यक्षम होतो-हेच लठ्ठपणा आणि डायबेटिजला आमंत्रण आहेत. अमेरिकेत एक प्रयोग केला गेला. दोन बास्केटबॉल टीम्स, लाल टिम आणि निळी टीम. त्यांचा खेळ संपल्यावर त्यांना ड्रिंंक्स देण्यात आले. लाल टिमला साखर युक्त ड्रिंक आणि निळ्या टीमला विनासाखरेची ड्रिंक देण्यात आली.
दोन्ही टिम्सला वेगळे ड्रिंक्स दिले हे त्या टिम्सना कळवले नाही. अर्ध्या तासानंतर दोन्ही टिम्सला सेपरेट जेवणाचा बफेट टेबल लावण्यात आला. दोन्ही टेबलसवर आणि पदार्थही तेच होते.
शेवटी निष्कर्ष हा आला की लाल टिम ज्यांनी साखरयुक्त ड्रिंक घेतली, त्यांनी तुलनेने 1000 कॅलरिज जास्त खाल्ले. आपल्या शरिरात एक फिडबॅक सिस्टीम आहे. जे आपल्याला पोट भरल्याची म्हणजेच भूक संपल्याची सुचना देते. साखर खाल्यावर तुम्ही जेवन सुद्धा कमी कराल.
उपाय काय?
1. अतिरिक्त साखर, आर्टिफिशियल गोड पदार्थांबद्दल माहिती घ्या व ते कोण-कोणत्या पदार्थात आहेत हे जाणून घ्या. (तुम्ही फक्त कमी साखरेची चहा घेऊन निवांत झाले) प्रोसिड फुड आणि ड्रिंक्सतला, शक्य असेल तर बंद करा. तुमचा आहार सिंपल आणि पौष्टिक आणि सोबत टेस्टी ही असू शकतो. असे वेगवेगळे रेसिपीज ऑनलाईन उपलब्ध आहेत.
2.तुमचा फ्रीज आरोग्याच्या दृष्टीने नियमित चेक करा. साखरयुक्त पदार्थाांपेक्षा फळ आणि पालेभाज्या भरून ठेवा.
3. मार्केट ला जाता तेव्हा, प्रासेस्ड फुड सेक्शनमध्ये जाने सुद्धा टाळा.
4.शुगर डेटॉक्सबद्दल ऑनलाईन माहिती घ्या व परिवारासोबत किमान एकदा तरी समजण्याचा प्रयत्न करा.
5. लहान मुलांना कमी वयापूनच ’आरेाग्यासठी जीवन’ ही भावना निर्माण करा. त्यांना स्वतः चॉकलेट्स आणि टॉफिज कमी करण्याचा निश्चय घेण्यासाठी प्रोत्साहित करा. फळे आणि भाजीपाल्यामध्ये त्यांना फेव्हरेट निवडण्यात मदत करा.
6. शासन आणि एनजीओज नी याबद्दल जनजागृती करून प्रोसिड फुड वर सुद्धा टॅक्स वाढवावा.
तुमच्या आहारात नेमकी किती साखर टाकायची याच्यावर शुगर इंडस्ट्री भरपूर संशोधन करते. मग तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी हे उपाय नक्कीच करू शकता.
हे सर्व मी साखर आणि कृत्रिम गोडपदार्थांबद्दल बोललो. नैसर्गिक गोड पदार्थाबद्दल नाही. (तुम्ही नैसर्गिक गोडाबरोबर प्रमाणात घेऊ शकता. जसे फ्रुट, खारीक, मध, इत्यादी आरोग्यासाठी फायद्याचे आहेत.)
अजून माहितीसाठी बीबीसीची ’ट्रुथ अबाऊट शुगर’ ऑनलाईन डाक्युमेंट्री नक्की बघा. पुढच्या शुक्रवारी व्यायामाबद्दल बोलू. तोपर्यंत तुमचा शुगर डेटॉक्स प्लान तयार करा. अंतिम शब्द The
problem is we are not eating food anymore, we are eating food-like products
- डॉ. आसिफ पटेल
एमबीबीएस (मुंबई),
एम.डी. मेडिसीन (नागपूर)
Post a Comment