आज आपल्या देशाची जशी अवस्था झाली आहे ते विद्वानांपासून एका सामान्य माणसास पूर्णपणे माहीत आहे किंवा या परिस्थितीचा सर्वाधिक परिणाम कुणावर झाला असेल तर तो सामान्य माणूस आहे. ज्याचं जगणंच एक प्रकारे उद्ध्वस्त झालेलं आहे. धनदांडगे उद्योगपती आणि राजकारण्यांना सध्याची परिस्थिती इतकी अनुकूल आहे की ती भारताच्या इतिहासात कधीही नव्हती. देशात उद्भवलेल्या हलाखीच्या परिस्थितीला जबाबदार कोण? सध्याचे राज्यकर्ते, शासन-प्रशासन ज्यांनी ही परिस्थिती देशावर लादली आहे. याची सुरुवात कधी, कुठे झाली आणि कुणी केली याचा सविस्तर अभ्यास करणं गरजेचं आहे. जयप्रकाश नारायण यांनी गेल्या ४७ वर्षांपूर्वी देशात संपूर्ण क्रांतीचे महाआंदोलन छेडले होते. त्याच्या परिणामस्वरूप देशाच्या राजकारणात, संस्कृती, अर्थव्यवस्था अशा इतर बाबतीत काय काय घडले हा इतिहास लोकांसमोर येणं गरजेचं आहे. आज जसे भाजप नेते प्रत्येक घटनेसाठी नेहरू-गांधी परिरवारास जबाबदार धरतात त्याची कारणे काय आहेत हेदेखील पाहणं अत्यंच अवश्यक तसेच उत्सुकतेचे ठरेल. तसेच या सर्व घडामोडींशी बांगलादेशचा काय संबंध आहे हेही सर्वांना माहीत असायला हवे. कारण जी परिस्थिती, दिवाळखोरी आज भारताच्या सर्वच क्षेत्रांत, राजकीय वर्तुळात आणि सामान्य माणसांच्या दैनंदिन जगण्यात दिसत आहे ही अचानक २०१४ साली भाजपकडून केंद्राची सत्ता हस्तगत केल्यावर उद्भवलेली नाही, तर आजपासून जवळजवळ ४५ वर्षांपूर्वी बिहार राज्यातील कॉलेजमध्ये भ्रष्टाचाराशी संबंधित एका क्षुल्लक घटनेपासून सुरू झाली आहे. त्या भ्रष्टाचाराच्या क्षुल्लक घटनेने आज या देशाला अशा वळणावर आणून सोडले आहे की यापुढे काय? असा प्रश्न देळाच्या एकन् एक नागरिकाच्या मनामध्ये आहे. पण कुणासही त्याचे उत्तर सापडत नाही. दुसरा प्रश्न खरंच आजच्या परिस्थितीला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी अर्थात नेहरू-गांधी घराणे जबाबदार आहे की फक्त नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी हे सगळं कारस्थान रचलं गेलंय हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरेल.
१९७१ साली पाकिस्थानची फाळणी करून पूर्वाश्रमीच्या पूर्व पाकिस्तानची (सध्याचा बांगलादेश) फाळणी करून त्या देशातील बंगाली नागरिकांना त्यांचा स्वतंत्र देश निर्माण करण्यासाठी मुजीबुर्रहमान यांनी पाकिस्तानात भलेमोठे आंदोलन छेडले होते. या आंदोलनास इंदिरा गांधी यांनी पाठिंबा दिला आणि पूर्व पाकिस्तानात आपली सैनिकी कारवाई सुरू केली. परिणामस्वरूप पाकिस्तान-भारत युद्ध सुरू झाले. बांगलादेशात परिस्थिती इतक्या टोकाला गेली की तिथलं सामान्य जनजीवन विस्कळीत झाले. तिथल्या गरीब आणी विशेष: हिंदू नागरिकांना आपलं घरदार सोडून पलायन करण्याव्यतिरिक्त कोणताच पर्याय नव्हता. परिणामी पूर्व पाकिस्तानातून जवळपास एक ते सव्वा कोटी नागरिकांनी भारताची वाट धरली. सीमेलगतच्या भारतीय राज्यांत लाखो लोक येऊन थडकले. असाम, मेघालय, बिहार, पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा राज्यांत या विस्थापितांना राहण्याची सोय, अन्न पुरविणे आणि आजाऱ्यांची विचारपूस करण्याशिवाय या राज्यांच्या शासन-प्रशासनाला दुसरे कोणतेच कार्य उरले नव्हते. सरकारच्या इमारती, शाळा-कॉलेजेस, सामाजिक स्थळे सगळे या विस्थापितांना राहण्यासाठी मोकळी करण्यात आली.
भारताची फाळणी करून पाकिस्तानची निर्मती करणाऱ्यांना पाकिस्तानची फाळणी बांगलादेशाची निर्मिती पहीकडे आणखीन काय महत्त्वाचे असेल. म्हणूनच या संग्रामात इंदिरा गांधी यांनी आपले सर्वस्व पणाला लावले. लक्षावधी विस्थापितांना मदत पुरवण्यात त्यांनी कसलीही कुचराई केली नाही. पण राजकीय वर्तुळात शासन दरबारी ज्याच्या-त्याच्या सर्वांच्या तोंडावर आणि विचारांमध्ये एकच प्रश्न होता हे युद्ध आपण जिंकू शकू काय आणि जरी ते जिंकले तरी एक-दीड कोटी विस्थापितांना आपण परत त्यांच्या देशात पाठवू शकणार काय? ज्या लोकांनी आपली घरंदारं सोडून भारतात शरण घेतली होती, त्यंची संसारे तिथे उद्ध्वस्त झालेली होती. (काही उरले असेल तर) परत आपल्या देशात जाऊन आपण जगू शकू का, हा विचार त्यांच्या समोर होता.
एकट्या माजी पंतप्रधान त्या वेळी अशा नेत्या होत्या ज्यांना ठाम विश्वास होता की आपण भारतात वास्तव्य करीत असलेल्या सर्व पूर्व पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवणार आहोत. यात बहुसंख्येने हिंदू नागरिक असतानादेखील त्यांना परत पाठवणं इंदिरा गांधी यांनी निश्चय केलेला होता आणि काहींनी त्यांच्या निश्चयावर विश्वास ठेवला तर काहींना त्यांच्या दाव्यावर कसलाच विश्वास बसत नव्हता.
(क्रमश:)
- सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment