Halloween Costume ideas 2015

महाराष्ट्रात दिवाळीत फटाके बंदीची शक्यता


मुंबई

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्यांमध्ये यंदा फटाक्यांवर बंदी घालण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागानेही याबाबत प्रस्ताव तयार केला असून तो मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. फटाकेमुक्त दिवाळीसाठी आपण आग्रही असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेले राज्य टास्क फोर्स व डेथ ऑडिट कमिटीची बैठक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करणे आणि कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठीच्या पूर्वतयारीबाबत आढावा यावेळी घेण्यात आला.

या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना टोपे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  दिवाळी तोंडावर आलेली असताना यावेळी आपल्याला फटाकेमुक्त दिवाळी कशी साजरी करता येईल, ही मानसिकता आत्तापासून ठेवणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी याबाबत आग्रह धरणार असून फटाक्यांच्या धुरामुळे विषारी वायू हवेत सोडले जातात, थंडीमुळे हे वायू वर जाऊ शकणार नाहीत. त्यामुळे श्वसनाला अधिक जास्त बाधा निर्माण  होऊ शकते.

सध्या कोरोना नियंत्रणात असला तरी आगामी दिवाळी सण लक्षात घेता नागरिकांनी अधिक खबरदारी बाळगावी. मास्कचा वापर करावा, फिजिकल डिस्टंन्सिग पाळावे, हात सातत्याने धुत रहावे या उपाययोजनांचा अवलंब करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. 

मुंबईत फटाके फोडण्यावर निर्बंध, पालिकेची लवकरच नियमावली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावर निर्बंध आणले आहेत. जर कोणी अशा ठिकाणी फटाके फोडताना आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यानुसार, मरिन ड्राईव्ह, जुहू बीच, वरळी सी फेस यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडता येणार नाहीत. सोसायटी आणि घराच्या आवारातच मर्यादित स्वरुपात फटाके फोडण्यास परवानगी असेल. एकाच ठिकाणी जास्त प्रदूषण झाले तर कोरोनाच्या संसर्गात वाढ होऊ शकते, लोकांची ऑक्सिजनची पातळी खालावू शकते. त्यामुळे लोकांनी स्वतःहून यावर निर्बंध घालणे गरजेचे असल्याचे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले. दोन दिवसांत याबाबत नियमावली येणार असल्याचेही ते म्हणाले.

राजस्थान, ओरिसा, स्निकीममध्ये फटाक्यांवर बंदी

राज्य मंत्रिमंडळात याबाबत चर्चा झाल्यास राजस्थान, ओरिसा, दिल्ली आणि सिक्कीम पाठोपाठ महाराष्ट्रात दिवाळीत फटाक्यांवर बंदी घातली जाऊ शकते. याबाबत आज टास्क फोर्ससोबत झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली आहे. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत यंदा फटाकेबंदी करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. 


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget