कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता ओसरत चालला आहे. नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन केल्याचे फलित यामाध्यमातून दिसत आहे. 24 मार्च 2020 पासून कोरोनाला रोखण्यासाठी देशाला ताळेबंदी जाहिर करावी लागली. जवळपास सहा महिने अगदी कडक लॉकडाऊन राहिले. तदनंतर अनलॉकडाऊन सुरू झाले. या कालावधीत कोरोनाचा राज्यभर उद्रेक होऊ लागला होता. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र आता सुखद बातमी अशी आहे की, राज्यात 4 नाव्हेंबर रोजी 4909 नवीन रुग्ण आढळले. तर 120 जणांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे 6973 रुग्ण कोरोनामुक्त झाले. यासोबत राज्यातील एकूण रुग्णसंख्या 16 लाख 92 हजार 693 झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 15 लाख 31 हजार 277 रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 90.46 टक्क्यांवर गेला आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत 44 हजार 248 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यू दर हा 2.61 एवढा झाला आहे. राज्यात सध्या 1 लाख 16 हजार 593 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
कोरोनाचा आलेख घसरत असला हे दिलासादायक असलं तरी बिनधास्त होऊन चालणार नाही. मास्कचा सक्तीने वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार हात धुणे या 3 गोष्टींचं कटाक्षाने पालन केलं तर कोरोना दूर राहू शकतो. यात हलगर्जीपणा झाला तर दुसरी लाट येऊ शकते असा इशाराही तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
कसं शक्य होत आहे...
लॉकडाऊनमुळे सगळ्याच स्तरातील नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले. यातून सावरण्यासाठी राज्य सरकारने कोरोनाप्रतिबंधासाठी ज्या मोहिमा हाती घेतल्या आहेत, त्याचे परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या माध्यमातून जो काळजीवाहू ट्रेंड सुरू आहे. त्याचा मोठा परिणाम जनमानसावर झाला आहे. आशा वर्कर घरोघरी जावून नागरिकांचे ऑक्सिजन लेवल, ताप आदी चेकअप करीत आहेत. सोबतच नागरिक स्व: मोठ्या प्रमाणात मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर सुरू आहे. लस येईपर्यंत तरी नागरिकांना सतर्क रहावे लागेल,एवढे मात्र निश्चित. राज्य सरकारचे कोरोना प्रतिबंधासाठी जेवढ्या कसोशिने प्रयत्न करीत आहे, ते वाखाण्याजोगे आहे.
Post a Comment