निवडणुकीवर परिणाम होईल या भीतीपोटी बातमी दाबून टाकण्याचा प्रयत्न
तिचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या आईने तिचे प्रेत पाटण्याच्या कारगील चौकामध्ये ठेवून आरोपींना फाशी देण्याची मागणी केली. एरव्ही हजारोंच्या संख्येने नेत्यांच्या सभेला हजर राहणारा मुस्लिम समाज यावेळेस मात्र कारगील चौकामध्ये ,’’ या कौम की बेटी’’ च्या प्रेत ठेवलेल्या जागी शेकडोंच्या संख्येनेही गोळा झाला नाही. नवनिर्वाचित मुस्लिम आमदारांपैकी कोणी तिकडे फिरकला नाही. मुलीच्या आईने रडून-रडून मीडियासमोर सांगितले की, गेल्या तीन महिन्यांपासून चंदनकुमार मुलीला लग्नासाठी त्रास देत होता, ’’ शादी करेंगे तो तुमसेही वर्ना तुम्हें जिंदा नहीं छोडेंगे’’ असे उघडपणे म्हणत होता. त्याच्या भीतीने तिचे घराबाहेर निघनेसुद्धा बंद झाले होते. घटनेच्या दिवशी ती कचरा फेकण्यासाठी बाहेर पडली आणि घात लावून बसलेल्या राय बंधूंनी तिच्यावर हल्ला केला. त्यात ती ८० टक्के भाजली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.
रात्रं-दिवस वृत्तवाहिन्यांवर मुस्लिमांच्या विरूद्ध लव्ह जिहादच्या नावाने गळा काढणाऱ्या तथाकथित मीडिया एक्सपर्टनी या संबंधी मौन बाळगलेले आहे. केंद्रातील महिला मंत्री, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा एरव्ही महिलांवर अत्याचार झाला की अत्यंत सक्रीय होवून जातात. मात्र या मुस्लिम मुलीच्या प्रकरणात त्याही शांत आहेत. कोणीही मेणबत्या घेऊन मोर्चा काढलेला नाही. एका आरोपीला अटक झाल्याची अपुष्ट माहिती मिळालेली आहे. एकंदरित एका सालस आणि कोवळ्या तरूणीचा असा दुर्दैवी अंत हा फक्त तिच्या कुटुंबियांचीच हानी नाही तर राष्ट्रीय हानी आहे. याचे भान बहुसंख्यांक बंधूंना येईल. तो सूदिन.
Post a Comment