Halloween Costume ideas 2015

मुस्लिम समाजातील मुले शिक्षणापासून वंचित का?

आज आपल्या देशात शिक्षण हक्क कायदा झाल्यानंतरही मुस्लिम समाजातील हजारो मुले-मुली शिक्षणापासून वंचित आहेत. या समाजातील मुलांपैकी शाळेत न जाणाऱ्यांची संख्या आज  लाखांच्या घरात आहे. शिक्षणाच्या बाबतीत मुस्लिम समाज देशात मागे आहे. शैक्षणिक क्षेत्रात त्यांची प्रगती व विकास खुंटलेला आहे. यासाठी त्यांची आर्थिक परिस्थिती कारणीभूत  आहे.
सर्वशिक्षा अभियान महाराष्ट्रात आले तेव्हा येथील शाळाबाह्य मुलांची संख्या जवळपास १६ लाख होती. दुसऱ्या वर्षी दोन लाखांवर आली. एका वर्षात जवळपास १४ लाख मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली, पण दुसरीकडे राज्यातील प्राथमिक शाळेत जाणाऱ्या मुलांची एकूण संख्या वाढली नाही. म्हणन तर देशभरात शिक्षणाची नको एवढी दुरवस्था झाली आहे. शिक्षणाचा दूर्गम भागापर्यंत प्रचार व प्रसार व्हावा यासाठी राज्य शासनाने प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाची योजना हाती घेतली ती सरकारी पातळीवरून चांगल्या प्रकारे राबवली  खरी परुंत तरीही दुर्दैवाने प्राथमिक शिक्षण प्रत्येक मोहल्ल्यात व वाडीवस्तीपर्यंत, डोंगरखोऱ्यात राहणाऱ्या मुस्लिम समाजातील मुलामुलींपर्यंत अद्यापही पोहोचली नाही, हे वास्तव आज  समाजाला स्वीकारावेच लागेल.
शिक्षण तळागाळापर्यंच पोहोचविण्याच प्रयत्न भरपूर झाले पाहिजेत. शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत हक्क बनला असताना त्याला मोफत व सक्तीचे शिक्षण देणारा कायदाही देशात  आहे. तरीही मुस्लिम समाजातील ती गोरगरीब मुले शाळेपासून वंचित राहण्यापासून वाचू शकलेली नाहीत. उलट शाळेत येणारी मुलेदेखील प्राथमिक शाळा बंद झाल्यामुळे शिक्षण  प्रवाहाच्या बाहेर फेकली जात आहेत.
मुस्लिम समाजातील मुलांची मोठी संख्या शाळाबाह्य राहण्यामागचे दुसरे प्रमुख कारण म्हणजे ग्रामीण भागातील कुटुंबांची रसातळाला पोहोचलेली सामाजिक आणि आर्थिक स्थिती. ही  परिस्थिती मुलांच्या शिक्षणातील मोठी अडचण ठरत आहे. एका बाजूला श्रीमंत आणि मध्यमवर्गीयांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे या मुस्लिम मसाजात गरिबीही मोठ्या प्रमाणात  वाढत आहे. अठराविश्वे दारिद्र्यात खितपत पडलेल्यांची संख्या लक्षणीय आहे. दारिद्र्यामुळे त्यांना पोटाचीच भ्रांत असते. तेथे मुलामुलींना शिक्षण कोठून देणार? कामावर नाही गेले तर  खायला मिळणार नाही याची त्यांना चांगलीच जाणीव आहे. म्हणून मुस्लिम समाजचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. शिक्षणाच्या अभावामुळे पुढील जीवनात अनेक अडचणींना तोंड द्यावे  लागते. विचार करण्याची शक्ती कमी झालेली असते आणि बुद्धी मर्यादित काम करीत असते. त्यामुळे जीवनात नैराश्य येणे आणि आयुष्यभर आपल्या आईवडिलांना दोष देणे एवढेच उरते.
त्यामुळे जीवनात नको त्या समस्यांना बळी पडावे लागते. या समाजातील अनेक गरीब लोक दिवसभर बाजारात फळभाजी विकणे, मिस्त्रीकाम, पेंटर, हमाली, पाव विकणे, मोटार  सायकल दुरुस्ती करणे, विटभट्ट्यांवर काम करणे आणि शेतात कामे करतात. त्यामुळे कुटुंबाची आर्थिक गरज भागविण्यासाठी मुलांना शाळेत पाठविण्याएएवजी मजुरीला पाठवणे त्यांच्यासाठी गरजेचे असते. आजच्या काळात जगण्यासाठी पैशाची गरज असते हे सत्य कुणालाच नाकारता येणार नाही. जीवन जगताना प्रत्येक ठिकाणी पैसा लागतो आणि पैसे हवे  तर त्यासाठी हातांना काम हवे. काम करणारे हात जास्त असतील तर दोन पैसे अधिक मिळतील, अगदी हाच विचार करून अनेक मुस्लिम कुटुंबे आपल्या मुलांना शाळेत  पाठविण्याऐवजी आपल्यासोबत कामाला घेऊन जातात. त्यामुळेच लहान लहान मुले अनेक स्वयंरोजगारीच्या क्षेत्रात आढळून येतात. अजूनही कित्येक मुस्लिम लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटलेले नसल्याने आपण अज्ञानी राहिलो याची खंत असूनही ते मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यास विवश आहेत. विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पुस्तके, शैक्षणिक साहित्य,  दुपारचे जेवण इ. पुरवत असूनदेखील मुस्लिम समाजातील मुले शिक्षणाच्या प्रवाहाबाहेरच दिसून येतात, याची कारणे तुम्ही आम्ही सर्वांनी शोधली पाहिजेत.
हा प्रश्न मुस्लिम समाजाला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारा आहे. अनेकदा असेही आढळून येते की शाळेतील शिक्षकांना शिकविण्याऐवजी सदोदीत अशैक्षणिक अशा शासकीय  कामांना जुंपलेले असते. बऱ्याचदा मुले शाळेत तर शिक्षक वर्गाबाहेर ही स्थिती सरकार व राज्यकर्त्यांच्या आशीर्वादाने सर्वदूर दिसून येते. त्याचा परिणाम मुलांच्या हजेरीवर व शैक्षणिक  आवडीवर होताना दिसून येतो. हे सामाजिक वास्तव असले तरी राज्यकर्त्यांनी त्यापासून काही बोध घेतल्याचे दिसत नाही. समाजातील एकही मूल शाळाबाह्य राहाणार नाही असे वाटत  असेल तर मुस्लिम समाजाने हातात हात घालून प्रामाणिकपणे काम करण्याची अत्यंत गरज आहे. असे जर समाजाने मनावर घेतले तकर शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न  कायमचा सुटेल.
समाजातील मुलामुलींच्या शिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे. ती आज काळाची गरजही आहे. तसेच गरीब मुलांच्या शिक्षणाची दुरवस्था झालेली आहे. सरकारी शाळांतील गरीब मुलांच्या शिक्षणाचा पुरता सत्यानाश झाला आहे. सरकारी शाळांमध्ये येणारी मुस्लिम मसाजातील मुले अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आलेली असतात. बऱ्याच जणांचे पालक  अशिक्षित असतात. अनेक मुलांच्या राहण्याचा, खाणन्याचा पत्ता नसतो. रस्त्यावर उघड्यावर त्याची जीवन असते. अशा भयावह परिस्थितीतील मुलांना शिकण्यासाठी सरकारी शाळा  हाच एकमेव पर्याय असतो. परंतु त्या आधारावरच या ना त्या कारणाने सरकार हा आधारच बंद करून टाकत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस राज्यात गरीब मुस्लिम मुलांच्या शिक्षणाचे  काय? हा प्रश्न मुस्लिम समाजासाठी चिंतनातून चिंतेचा झाला आहे. मुस्लिम समाजाला मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत जागृत केले पाहिजे. आपल्या मुलामुलांना शाळेत पाठविण्यास  त्यांना बाध्य केले पाहिजे. शाळेच महत्त्व त्यांना पटवून सांगितले पाहिजे. त्यांच्या शैक्षणिक हितांसाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले पाहिजेत. शासनाचे लक्ष या समस्येकडे वेधले  पाहिजे, तरच मुस्लिम समाजाचा विकास व उन्नती होईल अन्यथा निरंतर हा समाज दारिद्र्यात खितपत राहील.

- गुलाब नजीर पिंजारी
निंभोरा- रावेर (जि.जळगाव)
मो. 9689035792

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget