विरोध आणि विद्रोह केवळ हौसेपोटी नसतो. तो तसा नसावाही. केवळ फॅशन किंवा प्रचलन म्हणून ओरड होत असेल तर कोरडेहासे थांबतील. माझी ओरड दुःखाच्या ओलाव्यांनी भरलेली आहे. प्रचारार्थ भारलेल्या सगळ्याच पक्षपार्ट्यांमधून अंधभक्ताची सहेतूक वाढ ही लोशकाहीचा गळा घोटणारी ठरू पाहतेय. सामान्य लोकांचा आवाज कोणत्याही पक्षाच्या आवाजात मिसळत नाही. त्यातूनही मुस्लिम प्रादेशिकतेमध्ये अडकलेला बेरोजगार तरूण अत्यवस्थ आहे. आपलं म्हणावं ज्यांना त्यांच्या अजेंड्यातून ’मुस्लिम आरक्षण’ गायब आहे. किंवा इथूनही ’नजीब’चा पत्ता गायबच! हंगामी मुव्हमेंटचे म्होरके कुणाच्या सावलीत विसावतहोत हेही कळायला मार्ग नाही. समाज भयभीत आहे, निद्रिस्त आहे, धमक्यांच्या जाणीवांनी शांत आहे. उरला उच्चवर्ग रोखठोक नाही. कुबड्या घेऊनच सारा प्रवास, आपण सगळेच अपंग (सॉरी दिव्यांग).
लोकशाहीत अंतिम सत्ता लोकांच्याच हाती असते पण त्या शक्तीसामर्थ्यानं मतांच्या माध्यमातून सत्तानिर्माण करण्याची ताकद आपलीच आहे, हे जाणण्याची योग्य प्रगल्भता समाजात असायला हवी, तीचा अभाव आहे तो अजून कितीकाळ राहील? दरवेळेस वचने, जाहीरनामे, भविष्यातले वादे खूप झाले. खरंच आपल्यासाठीची म्हणून सुखसमृद्धी येणार असेल तर ती येणार कधी?
वास्तवाशी भिडून, सत्यकथन करणारी एखादी नवी मांडणी सुद्धा या ’बेमूर्वत’ काळात मोडून पडली आहे.
भयतालातील अंधारी साम्राज्य दूर जाऊन दीप उजळावेत खाण्यापिण्याराहण्याची, शिकण्या-बोलण्या - लिहिण्याची प्राथमिक गरज ही संशयाच्या तराजूत तोलून मिळत असेल तर खडबडून जागे होणार कधी आपण?
कुचकामी विचारवंत, व्यक्तीमहात्म्याने भारलेली राजकीय भाषा, इतिहासाच्या मोडतोडीतून आलेले मुद्दाम दुषित असलेले संस्कार, साहित्यातील हुजरेगिरी, सांस्कृतिक दारिद्रय आणि उपाशीपोटातून नव्या क्रांतीचं कोणतं गाणं आपण सुरात गाणारं आहोत?
सत्ताधिश कोणीही असो, तो प्रस्थापित झाला की माणसाचं जगणंच कुचकामी ठरवतो. अशा सत्तापतींना जबर चपराक देणाऱ्या विवेकवाद्यांची मोठी जपमाळ हल्ली जपली जातेय. केवळ सध्याचेच सत्ताधीश जनसामान्याला त्याच्या आवाजाला दाबून ठेवतात असे नाहीच. चार विचारवंत शहिदांशी सख्य सांगत गळे काढणारे तंत्रयुगाचे विकीपीडितांत्रिक म्हणजे इथले सगळेच गटातटांचे ’वादी’ आपोआप काही नावांना बगल देतात.
प्रागतिक आणि सामान्यजणांची सुख-दुःख भाषा बोलणाऱ्या मांडणाऱ्या सफदर हाश्मींच्या शहीदी बद्दल काय? सत्तेला विरोध करताना सर्वसमावेशक भूमिकेला अधोरेखित होते पण त्यातूनही विवेकवाद्यांच्या बाजूने प्रस्थापितांवर ‘हल्लाबोल’ करणारा सफदर हरवला जातो. (पारंपारिक सॉफ्टवेअर ब्राम्हणी सौंदर्यशास्त्राचं)... ’पढना लिखना सिखो’ ते सडकनाट्याचा कलात्मक निर्माता. बहुअंगी व्यक्तीमत्वाचा उच्चार ही मर्यादित करून, मेमरीतून त्याला गायबच करायचा हे पक्क ठरवून केलं जातं.
बाकीच्या शहिदांचे बाजारीकरण, फोकसिंग ठिकठाक घसघशीत.. एकूण काय.. नावात जात, जातीत धर्म, कर्मव्यवाधिकारस्ते, करीत रहा कर्म.. शोधित रहा व्यवस्थेच मर्म...
सफदरचा सालगीराह आणि विस्कटलेल्या विचारांचे षंढ धागे- लिहवत नाही... म्हणून निदा फाजलीच्या या सत्याला भिडणाऱ्या ओळींना ठेवतो...
हर एक घर में दिया भी जले, अनाज भी हो,
अगर न हो कहीं ऐसा तो एहतेजाज भी हो
हुकूमतों को बदलना तो कुछ मुहाल नहीं
हुकूमतें बदलती हैं वो समाज भी हो
रहेगी कबतलक वादों में कैद खुशहाली
तुम्हारे शहर में कुछ और कामकाज भी हो...
- साहिल शेख
8668691105

Post a Comment