अहमदनगर (शोधन सेवा) - एबीपी माझाचे प्रतिनिधी राहूल कुलकर्णी लातूरच्या कायमखानी मस्जिदीमध्ये सुरू केलेल्या मस्जिद परिचय कार्यक्रमाने एव्हाना बरीच मजल गाठलेली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातच नव्हे तर देशभरात मस्जिद परिचयाच्या कार्यक्रमांचा धडाका सुरू झालेला आहे. याचे चांगले परिणाम समोर येत आहेत. मस्जिदीसंबंधी असलेले अनेक समज, गैरसमज या कार्यक्रमातून हिंदू बांधवांच्या मनातून दूर होतांना दिसत आहेत. भारतासारख्या बहुआयामी देशांमध्ये मिश्र संस्कृतीमध्ये अनेक प्रकारची धार्मिक स्थळे आढळून येतात. वास्तविक पाहता अशा धार्मिक स्थळांमध्ये त्या-त्या धर्माची मंडळी नियमितपणे जात असते. परंतु, दुसर्या धर्मातील लोकांना आपल्या धार्मिक स्थळामध्ये बोलावून त्यांना आपल्या धार्मिक स्थळाचा परिचय करून देण्याची अफलातून योजना जमाअते इस्लामी हिंदच्या महाराष्ट्र युनिटने पुढाकार घेऊन राबविली. याच योजनेचा एक भाग म्हणून अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारील कासमखानी मस्जिदमध्ये 24 मार्च रोजी सर्व धर्मियांसाठी मस्जिद परिचयाचा एक स्तुत्य कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.
या कार्यक्रमाची पुरेशी प्रसिद्धी झाल्यामुळे महिला आणि पुरूषांनी संध्याकाळी चार पासूनच मस्जिदीमध्ये गर्दी करण्यास सुरूवात केली. येणार्या बंधू-भगिनींचे स्वागत करण्यासाठी जमाअतचे कार्यकर्ते आणि मुस्लिम समाजातील इतर प्रतिष्ठित लोक उपस्थित होते. पुरेशी गर्दी जमा झाल्यानंतर पाहुण्यांना मस्जिद आतून पूर्णपणे फिरवून दाखविण्यात आली. सुरूवात स्वच्छतागृहापासून ज्याला की वजूखाना म्हणतात तेथून करण्यात आली. तहारतचा अर्थ समजून सांगण्यात आला. गुसल म्हणजे काय? हे समजून सांगण्यात आले. वजू म्हणजे काय आणि तो कसा केला जातो? यासंबंधी मार्गदर्शनकरण्यात आले. त्यानंतर अजान कशी दिली जाते, प्रत्यक्षात नमाज कशी अदा केली जाते, या सर्वांचे प्रात्याक्षिक दाखविण्यात आले. नमाजमध्ये पठण केलेल्या कुरआनच्या आयातींचा अर्थ मुश्ताक शेख, मुस्तफा लांडगे, अल्ताफ शेख, जावेद शेख, अॅड. आरिफ शेख, डॉ. जहीर, फैजान सय्यद आदी लोकांनी समजावून सांगितला.
या प्रसंगी हिंदू बंधूंकडून विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरेही देण्यात आली. शिवाय, मराठीत लिहिलेल्या कुरआनाच्या प्रती उपस्थितांना भेट म्हणून देण्यात आल्या. याप्रसंगी हाफिज सलीम, हाफिज अ.खदीर, शौकत तांबोळी, शफी जहागीरदार, अमोल डांगे, डॉ. विलास मांडीकर, डॉ. किरण बालवे यांच्याशिवाय, जुनेद शेख, जुबेर शेख, सय्यद सलीम, सय्यद नदीम, आमेर सय्यद, सय्यद जिया, सय्यद नईम, तौफिक तांबोळी, इक्बाल शेख इत्यादींची विशेष उपस्थिती होती. यांनी व जमाअते इस्लामीच्या सर्व कार्यकर्त्यांनी हा सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये मोठा सहभाग घेतला. हा कार्यक्रम सायंकाळी 4 ते रात्री 9 पर्यंत म्हणजे ज्या काळात तीन नमाज अदा केल्या जातात , राबविण्यात आला. यामध्ये हिरहिरीने हिंदू, ख्रिश्चन, सीख आणि दलित बांधवांनी सहभाग घेतला.

Post a Comment