Halloween Costume ideas 2015

अन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(८८) मग हे तुम्हाला झाले तरी काय आहे की दांभिकासंबंधी तुमच्या दरम्यान मतभिन्नता किंवा दुमत आढळते११६ वस्तुत: जे दुष्कर्म त्यांनी कमाविले आहे त्यांच्यामुळे अल्लाहने  त्यांना परत फिरविले आहे.११७ काय तुम्ही हे इच्छिता की ज्याला अल्लाहने सरळमार्गावर आणले नाही त्यांना तुम्ही सरळमार्गावर आणाल? वस्तुत: ज्याला अल्लाहने  मार्गभ्रष्ट केले  त्याच्यासाठी तुम्हाला कोणताच सन्मार्ग आढळणार नाही.
(८९) ते तर हे इच्छितात की ज्याप्रमाणे ते स्वत: नाकारणारे आहेत त्याचप्रमाणे तुम्हीही नाकारणारे बनावे, म्हणजे तुम्ही व ते सर्वजण एकसारखेच व्हावे. म्हणून त्यांच्यापैकी  कोणालाही आपला मित्र बनवू नका जोपर्यंत ते अल्लाहच्या मार्गात देशांतर (हिजरत) करून येत नाहीत, आणि जर ते स्थलांतरापासून पराङ्मुख राहतील तर जेथे आढळतील तेथे त्यांना  पकडा व ठार करा११८ आणि त्यांच्यापैकी कोणासही आपला मित्र व सहाय्यक बनवू नका.
(९०) परंतु ते दांभिक या आदेशाला अपवाद आहेत जे एखाद्या अशा जनसमुदायाला जाऊन मिळतील ज्याच्याशी तुमचा करार आहे.११९ अशाचप्रकारे ते दांभिकदेखील अपवाद आहेत जे  तुमच्यापाशी येतात आणि युद्धाविषयी त्यांचे मन खिन्न आहे, ते तुमच्याशीही युद्ध करू इच्छित नाहीत आणि आपल्या लोकांशीही नाही. अल्लाहने इच्छिले असते तर त्यांना तुमच्यावर  लादले असते आणि तेदेखील तुमच्याशी लढले असते. म्हणून जर ते तुमच्यापासून अलिप्त झाले आणि लढाईपासून दूर राहिले आणि तुमच्याकडे सलोखा व शांतीचा हात पुढे केला तर  त्यांच्यावर हात उचलण्याचा कोणताच मार्ग अल्लाहने तुमच्यासाठी ठेवला नाही.
(९१) आणखी एका प्रकारचे दांभिक तुम्हाला असे आढळतील जे इच्छितात की तुमच्याकडूनदेखील अभय लाभावे व आपल्या लोकांकडूनसुद्धा, पण जेव्हा कधी त्यांना उपद्रवाची संधी  लाभेल तेव्हा ते त्यात उडी घेतील. असले लोक जर तुमच्याशी दोन हात करण्यापासून दूर राहत नसतील आणि समेट व शांती तुम्हापुढे सादर करत नसतील व आपले हात आवरत  नसतील तर जेथे ते सापडतील त्यांना धरा व मारा, त्यांच्यावर हात टाकण्यासाठी आम्ही तुम्हाला उघड अधिकार देऊन टाकला आहे.

११६) येथे त्या दांभिक मुस्लिमांच्या समस्येवर विचार केला आहे ज्यांनी मक्का येथे आणि अरबच्या इतर ठिकाणी इस्लामचा स्वीकार तर केला होता परंतु हिजरत (देशत्याग) न करता  व `दारूल इस्लाम'मध्ये (इस्लामी राज्यात) न जाता अनेकेश्वरवादी बरोबर राहात होते. ते इस्लाम विरोधी बहुतेक कारवायांमध्ये त्यांच्यासोबत भाग घेत होते. त्यांच्याशी कोणता मामला  करावा याची मोठी समस्या मुस्लिमांसमोर होती. काही म्हणत की शेवटी ते मुस्लिमच आहेत. कलमा पढतात, नमाज अदा करतात, रोजे ठेवतात आणि कुरआनची तिलावत करतात.  यांच्याशी विद्रोही सारखा व्यवहार कसा होईल? अल्लाहने या रूकुअमध्ये (प्रभाग) याच समस्येचे उत्तर दिले आहे. या ठिकाणी हे स्पष्ट समजून घेतले पाहिजे अन्यथा फक्त येथेच नव्हे  तर कुरआनच्या त्या सर्व आयतींना समजण्यात मोठी घोडचूक होईल जिथे हिजरत न करणाऱ्या मुस्लिमांचा समावेश दांभिकात केला आहे. सत्य हे आहे की जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.)  यांनी मदीनाकडे हिजरत केली तेव्हा एक लहानसा भूभाग अरबच्या धरतीवर असा मिळाला की जेथे एक ईमानधारकाला आपल्या इस्लामी जीवनपद्धतीच्या सर्व आवश्यकतांना पूर्ण करणे  संभव होते. म्हणून जाहीर आदेश देण्यात आला की जेथे कोठे ईमानधारक असतील आणि ते विरोधकांमुळे दबलेले आहेत, त्यांना इस्लामी जीवनपद्धतीने आपले जीवन जगणे अशक्य  प्राय आहे; तेथून ते हिजरत करून `दारूल इस्लाम' मदीना येथे त्यांनी यावे. त्या वेळी हिजरत करण्याचे ज्यांच्यात सामथ्र्य होते आणि फक्त यासाठी आले. नाहीत की त्यांना त्यांचे  घरबार, नातेवाईक आणि भौतिक स्वार्थ इस्लामपेक्षा जास्त महत्त्वाचे होते; ते सर्व दांभिक, ढोंगी (मुनाफिक) घोषित केले गेलेत. जे लोक त्या वेळी खरोखरी विवश होते त्यांचा  `कमजोर' (मुस्तजआफीन) लोकांत समावेश केला गेला जसे पुढे रूकअ १४ मध्ये येत आहे. आता हे स्पष्ट आहे की `दारूल कुफ्र' चा रहिवाशी एखाद्या मुस्लिमास केवळ हिजरत न  केल्याने मुनाफिक (दांभिक) याच स्थितीत समजले जाऊ शकते की जेव्हा दारूल इस्लामकडे सर्व मुस्लिमांना बोलाविले गेले असेल किंवा त्यांच्यासाठी आपले दार उघडे ठेवले असेल. या  स्थितीत ते सर्व मुस्लिम दांभिक ठरतील जे `दारूल कुफ्र'ला `दारूल इस्लाम' बनविण्याचे प्रयत्नसुद्धा करीत नाही आणि सामथ्र्य असून हिजरतसुद्धा करीत नाहीत. परंतु `दारूल इस्लाम'  कडून बोलाविले गेले नसेल आणि आपले दार मुहाजिरांसाठी उघडे ठेवले नसेल तर अशा स्थितीत हिजरत न करणे एखाद्या मुस्लिमाला दांभिक बनवू शकत नाही. तो मुनाफिक त्या वेळी ठरेल ज्यावेळी त्याच्या हातून दांभिकतेचे कार्य घडेल.
११७) म्हणजे ज्या दुरंगी आणि परलोक जीवनाऐवजी लौकिक या जगातील प्राधान्य देण्याची वृत्ती त्यानी अवलंबलेली आहे, त्यामुळे अल्लाहने त्यांना त्याच दिशेने फेरले आहे, ज्या  दिशेने हे लोक आले होते. त्यांनी विद्रोहातून इस्लामकडे वाटचाल केली. परंतु याकडे आल्यानंतर ज्या एकाग्रचित्त होण्याची आणि बलिदानाची गरज होती तसेच परलोक जीवनावर प्रगाढ  विश्वासाची गरज होती ज्यामुळे मनुष्य मोठ्या आत्मविश्वासाने आपल्या या जगातील जीवनाचा त्याग करू शकतो; हे सर्व त्या लोकांना प्रिय वाटले नाही आणि म्हणून जेथून आले   तिकडेच पलटून गेले. आता त्यांच्याविषयी मतभेद कोणत्या मुद्यावर होऊ शकतो?
११८) हा आदेश त्या दांभिक मुस्लिमांसाठी आहे जे युद्धरत इस्लामविरोधी राष्ट्राशी संबंध ठेवून आहेत आणि इस्लामी राजवटी विरोधी शत्रुतापूर्ण कारवायात ते व्यावहारिक रूपात भाग घेतात.
११९) हा अपवाद या आदेशाचा नाही, ``त्यांना मित्र व सहाय्यक बनविले जाऊ नये'' तर या आदेशाशी आहे, ``त्यांना धरावे आणि मारावे'' अर्थ आहे की ईमानधारकाचे ढोंग करणारे  मुस्लिम ज्यांना ठार मारणे आवश्यक आहे, त्यांनी जर एखाद्या इस्लामविरोधी राज्यात आश्रय घेतला ज्याच्याशी इस्लामी राज्याचा करार झालेला आहे; तर त्यांच्या क्षेत्रात त्या दांभिक  मुस्लिमांचा पाठलाग करता येणार नाही. तसेच हेही योग्य नाही की इस्लामी राज्याचा एखादा मुस्लिम निष्पक्ष राज्यात गेल्यानंतर एखाद्या दांभिक मुस्लिमास पाहून त्याला ठार मारील. येथे सन्मान दांभिक मुस्लिमाच्या रक्ताचा नाही तर कराराचा आहे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget