Halloween Costume ideas 2015

पुनरागमनाची स्वार्थी आस

जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश असलेल्या आपल्या देशातील लोकसभेच्या निवडणुकीची संपूर्ण जगाला किती उत्सुकला आहे हे प्रसारमाध्यमांतील बातम्यांवरून आपणास कळून  येते. या उत्सुकतेत त्यांची स्वार्थी आस किती खोलवर रुजलेली आहे हे त्या त्या देशाची पार्श्वभूमी पाहता आपण समजू शकतो. पाकिस्तानाचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नरेंद्र मोदीच पंतप्रधान व्हावेत असा आशावाद नुकताच व्यक्त केला. भारत-पाकिस्तानचे संबंध सुधारण्याच्या दृष्टिकोनातून मोदीच अतिशय योग्य प्रधानसेवक असल्याचे त्यांचे म्हणणे आहेत. फक्त  इम्रान खानच नव्हे तर जगभरातील अनेक देशांच्या पंतप्रधानांना आणि प्रमुखांना मोदींच्या पुनरागमनाची आशा लागून राहिली आहे. यामागे अनेक कारणे असू शकतात. इम्रान खान  मनापासून बोलले की कोणाच्या दबावाखाली त्यांना असे बोलावे लागले, अशीही चर्चा झाली. पाकिस्तान हे आपले शेजारी राष्ट्र असले तरी दोन देशात नेहमीच तणावाचे संबंध राहिले. पुलवामा येथे सीआरपीफच्या जवानांच्या काफिल्यावर झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानव्याप्त बालाकोट येथे दहशतवादी केंद्रावर केलेले  बॉम्बफेक या घटनांपासून दोन देशातील संबंध आणखी चिघळले आहेत. मग इम्रान यांना मोदींविषयी अचानक प्रेम का उफाळून आले? इम्रान खान यांना माहीत आहे की आपण ज्याची  बाजू घेऊन त्याच्या विरोधात तेथील विरोधी पक्ष त्या वक्तव्याचा मुद्दा बनवतील आणि त्यास उत्तर देण्यास त्या व्यक्तीला भाग पडेल आणि निश्चितच काही मतदार त्यांच्यापासून दूर  जातील, ही खेळीदेखील असू शकते. यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत हिंदुमुस्लिम धृवीकरण आणि पाकिस्तानला धडा शिकवणारे नेतृत्व, या मुद्यावर भाजपने जोर दिला आहे. भाजपने  आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात पुन्हा एकदा अयोध्येत राम मंदिर उभारणार असल्याची घंटा वाजवली आहे. समान नागरी कायदा आणण्याचे व काश्मीरसाठी लागू असणारे ३७० वे  कलम रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच काश्मीरला विशेष दर्जा दिलेले ३५ ए हे कलमही रद्द करण्याचा शंख फुंकला आहे. भाजपने दिलेली आश्वासने ही हिंदू व्होट बँकेला  आकर्षित करणारी आहेत. ३७० कलम रद्द केले तर काश्मीर खोऱ्यात भारताचा तिरंगा फडकणार नाही, अशी धमकी नॅशनल कॉन्फरन्सचे सर्वोसर्वा फारूख अब्दुल्ला यांनीच दिली आहे.  पंधरा दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताकडून पाकिस्तानवर हल्ला होण्याची शक्यता असल्याचे म्हटले होते. अशा पार्श्वभूमिवर इम्रान खान यांनी मोदीच पुन्हा भारताचे  पंतप्रधान व्हावेत, असे म्हणणे हा पाकिस्तानाच्या कुटनीतीचा एक भाग दिसतो. मोदी पंतप्रधान झाले तर काश्मीरमध्ये निर्माण होणारी अशांतता पाकिस्तानच्या पथ्यावर पडत असावी.  अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाचे अध्यक्ष ब्लादेमार पुतीन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली होती. तीच कुटनीती इम्रान खान भारतातील निवडणुकीच्या निमित्ताने अवलंबत आहेत काय? इम्रान खान यांच्या वक्तव्याचा भाजपला फायदा होईल का? असा प्रश्न उपस्थित होतो. भारतातील निवडणुका जाहीर  होताच रशियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या देशातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार (ऑर्डर आफ सेंट अ‍ॅन्ड्यू द एपोस्टल) देण्याची घोषणा केली. या पुरस्काराची सुरूवात १७व्या  शतकाच्या शेवटी रशियाचे तत्कालीन सम्राट जार पीटर प्रथम यांनी केली होती. परंतु जुलै १९९८ मधे तत्कालीन राष्ट्रपती बोरिस एल्तसिन यांनी यांनी हा पुरस्कार पुन्हा सुरू केला.  मोदी यांना रशियासह आठ आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळतील. यामध्ये संयुक्त राष्ट्राचा सर्वोच्च पर्याररण पुरस्कार चॅम्पियन ऑफ अर्थ द अवार्ड यासारखा प्रतिष्ठित पुरस्काराचादेखील  समावेश आहे.
यामध्ये चार पुरस्कार मुस्लिम देशांकडून- सऊदीअरब, पॅलेस्टाइन, अफगानिस्तान आणि संयुक्त अरब अमीरातचा (जायद मेडल हा सर्वच्च नागरिक पुरस्कार) यांनी दिले आहेत. हे सर्व   पुरस्कारांची घोषणा निश्चितच आंतरराष्ट्रीय राजकीय उद्देशापोटीच केली जाते हे उघड आहे. मात्र मतदारांना वाटू लागते की येथील नेत्याचा जग इतका सन्मान करते तर आपण त्यांना  का मत देऊ नये? सन २०१९च्या सुरूवातीलाच जगाला माहीत झाले होते की भारतातील सार्वत्रिक निवडणुकांची उलटी गणना सुरू झालेली आहे. तरीही ते मोदींनाच पसंत करीत आहेत,  हे अकारण असू शकत नाही. गत फेब्रुवारीत त्यांना आशियाचा नोबेल समजला जाणारा दक्षिण कोरियाचा आंतरराष्ट्रीय शांती पुरस्कार देण्यात आला होता. इस्रायल व अमेरिकादेखील  यामध्ये मागे राहिलेला नाही. त्यानेदेखील भारताचे गुणगान सुरू केले आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी यापूर्वीच मोदींना मित्र बनविले आहे. जगभरातील हे अनेक देश  मोदींचा उदो उदो करून भारताशी जागतिक राजकारणची आपली पोळी भाजू पाहात आहेत. मात्र जर का त्यांचे पुनरागमन झाले तर त्याचे धोके येथील जनतेलाच भोगावे लागतील, हे विसरून चालणार नाही.

-शाहजहान मगदुम
(मो.:८९७६५३३४०४, Email: magdumshah@eshodhan.com)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget