माननीय अबू सईद खुदरी (रजी.) यांचे कथन आहे की, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे की, ‘‘तुमच्यापैकी ज्याने आपल्या समाजात वाईट कर्म पाहिले आणि बलपूर्वक वाईट कर्मास रोखले, त्याने आपले कर्तव्य पार पाडले. ज्याने शक्ती आणि पात्रता असुनदेखील आपल्या जिभेचा वापर केला व त्याविरूद्ध आवाज उठविला, त्याने सुद्धा आपले कर्तव्य पूर्ण केले. तसेच ज्याच्यामध्ये तोंड उघडण्याची व जीभेने विरोध करण्याचीही शक्ती नसेल आणि केवळ आपल्या मनात त्यास वाईट समजत असेल तर तो सुद्धा जबाबदारीतून मुक्त होईल, परंतु हा इमान (श्रद्धा) चा किमान दर्जा आहे.’’ (हदीस : तऱगीब व तरहीब, निसाई)
भावार्थ- या हदीसचा अर्थ असा आहे की, कूकर्म संपविण्याची शक्ती असतानादेखील, ते कूकर्म न संपविल्यास ईश्वराच्या कोपास बळी पडण्यापासून राहणार नाहीत. त्याकरीता माणसाने आपली सर्व शक्ती व पात्रता पणाला लावून दुष्कर्माविरूद्ध कंबर कसली पाहिजे, अट मात्र एवढीच की दुष्कर्मिकाविरूद्ध बळाचा वापर करण्याच्या परिणामस्वरूप एखादे मोठे संकट उभे राहू नये. या हदीसमध्ये हे स्पष्ट होते की, असत्य आणि दुष्कर्माच्या वर्चस्वकाळात सत्यवानांनी कोणत्याही परिस्थितीसमोर आत्मसमर्पण करून आरामाची झोप घेणे निर्लज्जतेचे आणि सत्याची प्रेम नसल्याचे लक्षण आहे.
अल्लाह दासांची परीक्षा घेण्यासाठी जी पद्धत स्विकारतो, त्यापैकी एक पद्धत ही आहे की जेव्हा कधी व्यक्ती किंवा समुदायात अवज्ञा वाढत जाते तर त्याच्यासमोर अवज्ञेच्या संधीचे दार उघडले जाते. ह्यामुळे त्याची इच्छा जी आत लपलेली असते ती स्पष्टत: समोर येते. ज्या अपराधांद्वारा ते आपल्या स्वत:ला कलंकित करू इच्छितात, ते यामुळे वंचीत राहू नये की त्यांना संधीच मिळाली नाही. प्रेषित मुहम्मद (स.) सांगतात, ‘‘अल्लाह थोरामोठ्यांच्या अपराधांसाठी जनसामान्यांना शिक्षा देत नाही जोपर्यंत जनसामान्य आपल्या डोळ्यांसमोर वाईट कृत्ये होतांना पाहतात, आणि त्या दुष्ट कामांचा प्रतिबंध करण्याचे सामर्थ्य ठेवून सुद्धा त्याविरूद्ध रोष व्यक्त करीत नाहीत, जेव्हा लोकांची ही अवस्था होते, तेव्हा सामान्य, असामान्य, सर्वावर अल्लाहचा कोप कोसळतो.’’
सामुहिक उत्पाताची आग जेव्हा भडकते, त्यात चांगले आणि वाईट, सगळेच त्याचे भक्ष ठरतात. यापासून सुरक्षीत राहण्यासाठी समाजाचे सामुहिक अंतर्मन जागृत असावे. एखादा उत्पात डोके काढीत असलेला पाहून, तत्क्षणीच तो दाबून टाकण्याचा प्रयत्न करावा. आग लावणाऱ्याचे हात त्याचवेळी धरावेत. या आज्ञेनुसार जोपर्यंत मुसलमान वागत राहिले, तोपर्यंत त्याच्यात कोणत्याही उत्पाताने डोके वर काढले नाही.
धन, संपत्ती माझ्या समुदायाचा (उत्पात) फितना
ह. क़ाब बिन अया़ज (रजी.) म्हणतात की, ‘‘प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे की, प्रत्येक मानवी समुहाचा उत्पात (फितना) वेगवेगळा आहे, धनसंपत्ती माझ्या समुहाचा फितना आहे.’’(हदीस : तिर्मिजी)
वेगवेगळ्या काळात, मानवी समुहाला, ईश्वराने वेगवेगळ्या पद्धतीने परीक्षा घेतली आहे. प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांच्या समुहाची परीक्षा धनसंपत्तीद्वारे होईल. भौतीक जगालाच जीवनाचे सार्थक एखादी व्यक्ती समजत असेल तर त्याची धन, संपत्ती त्याच्यासाठी एक कठीणतम परीक्षा सिद्ध होईल. अर्थात यामध्ये तो (असफल) नापास होईल.

Post a Comment