Halloween Costume ideas 2015

अल्बकरा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(२३३) ज्या पित्यांची इच्छा असेल की त्यांच्या मुलांनी स्तनपान-काल पूर्ण होईपर्यंत दूध प्यावे तर मातांनी - आपल्या मुलांना पूर्ण  दोन वर्षे स्तनपान करावे.२५७ अशा अवस्थेत मुलाच्या पित्याने परिचित पद्धतीनुसार त्यांना जेवण-खाण व कपडे-लत्ते दिले पाहिजेत.  परंतु कोणावरही त्याच्या ऐपतीपेक्षा जास्त भार टाकला जाऊ नये. आईला या कारणास्तव त्रास दिले जाऊ नये की मूल तिचे आहे,
  आणि पित्यालासुद्धा या कारणास्तव त्रास दिला जाऊ नये की मूल त्याचे आहे - दूध पाजणाऱ्या स्त्रीचा हा हक्क जसा मुलाच्या त्यावर  आहे, तसाच त्याच्या वारसांवरदेखील आहे.२५८ परंतु जर उभयपक्ष परस्पर राजी-खुषी आणि सल्ला-मसलतीने दूध सोडवू इच्छित  असतील तर असे करण्यास काही हरकत नाही. तुमचा विचार जर आपल्या मुलाला एखाद्या परक्या स्त्रीकडून दूध पाजावयाचा असेल  तर यातसुद्धा काही हरकत नाही परंतु केवळ या अटीवर की त्याचा जो काही मोबदला ठरवाल, तो परिचित पद्धतीनुसार अदा करा. अल्लाहचे भय बाळगा आणि समजून असा की जे काही तुम्ही करता ते सर्व अल्लाहच्या दृष्टीत आहे.
(२३४) तुमच्यापैकी जे लोक  मरण पावतील, जर त्यांच्या पाठीमागे त्यांच्या पत्नीं जिवंत असतील तर त्यांनी चार महिने दहा दिवस स्वत:ला रोखून ठेवावे,२५९  नंतर जेव्हा त्यांची इद्दत पूर्ण होईल तेव्हा त्यांना अधिकार आहे की, त्यांनी स्वत:संबंधी भल्या पद्धतीनुसार इच्छा असेल तसे करावे.  तुमच्यावर त्याची काहीही जबाबदारी नाही. अल्लाह तुम्हा सर्वांच्या आचरणाची खबर राखणारा आहे.
(२३५) इद्दतच्या काळात तुम्ही  हवे तर त्या विधवा स्त्रियांशी मागणीची इच्छा संकेताने व्यक्त करा, हवे तर मनांत लपवून ठेवा, दोन्ही स्वरूपात काही हरकत नाही.  अल्लाह जाणतो की त्यांचा विचार तुमच्या मनात येणारच. परंतु पाहा, गुप्त करार-मदार करू नका. जर काही बोलणी करावयाची  असेल तर प्रचलित पद्धतीनुसार करा आणि विवाहबद्ध होण्याचा निर्णय तोपर्यंत घेऊ नका जोपर्यंत इद्दत पूर्ण होत नाही. चांगल्या प्रकारे समजून घ्या की अल्लाह तुमची मनोदशादेखील जाणतो. म्हणून त्याचे भय बाळगा व हेदेखील जाणून असा की अल्लाह  सहनशील आहे (लहानसहान गोष्टींना) तो माफ करतो.
(२३६) तुम्हावर काही गुन्हा नाही की तुमच्या पत्नींना तुम्ही तलाक द्यावा  या वेळेपूर्वी की त्यांना स्पर्श करण्याची घटका येईल अथवा महर ठरविला असेल. अशा स्थितीत त्यांना काही ना काही अवश्य दिले  पाहिजे.२६० सुखवस्तु व्यक्तीने आपल्या ऐपतीप्रमाणे व गरीबाने आपल्या कुवतीप्रमाणे परिचित पद्धतीनुसार द्यावे. हा हक्क आहे  सदाचारी लोकांवर.

257) हा त्या स्थितीसाठी आदेश आहे जेव्‌हा पती-पत्नी एक दुसऱ्यापासून विलग झालेले आहेत मग तलाकद्वारा किंवा खुलअद्वारा  किंवा फिस्क और तफरीकद्वारा आणि निकाह तोडण्याने आणि तिच्या जवळ दूध पिणारा बाळ असेल.
258) म्हणजे बाप मरून गेला तर त्याच्या जागी जो मुलाचा पालक असेल त्याला हा हक्क द्यावा लागेल.
259) पतीच्या मृत्यूची ही इद्दत त्या स्त्रियांसाठी ही आहे ज्यांच्याशी त्यांच्या पतींनी शारीरिक संबंध स्थापित केले नसतील. परंतु  गर्भवती महिला या अटीतून मुक्त आहेत. तिच्यासाठी पतीच्या मृत्यूची इद्दत मूल जन्मापर्यंत आहे. मग मूल पतीनिधनानंतरच किंवा  काही महिन्यानंतर जन्माला यावे. "आपणा स्वत:स रोखून धरावे'' म्हणजे फक्त असे नाही की या मुदतीत निकाह करू नये तर याचा  अर्थ स्वत:ला साज शृंगारापासून अलिप्त ठेवावे. हदीसमध्ये स्पï आदेश आहेत की इद्दतच्या काळात रंगीत कपडे व दागिणे घालणे,  मेंहदी, सुरमा व अत्तर लावणे तसेच केश रचना करण्यापासून व केश रंगविण्यापासून अलिप्त राहिले पाहिजे. यात मतभेद आहेत  की काय या काळात ती घराबाहेर पडू शकते की नाही? उमर, उस्मान, इब्‌ने उमर, जैद बिन साबित, इब्‌ने मसऊद, उम्मे सलमा,  सईद बिन मुसय्यिब (रजि.) तसेच इब्राहीम, नखई, मुहम्मद बिन सीरीन आणि चारी इमाम (रह.) यांचे हे मत आहे की इद्दत  काळात तीला त्याच घरात राहणे आवश्यक आहे जिथे तिचा पती मृत्यू पावला असेल. दिवसा आवश्यक कामासाठी ती बाहेर जाऊ  शकते परंतु निवास त्याच घरात असेल. विपरीत माननीय माता आएशा, इब्‌ने अब्‌बास, अली, जाबीर बिन अब्‌दुल्‌लाह (रजि.) अता,  ताअस, हसन बसरी, उमर बिन अब्‌दुल अजीज (रह.) यांचे मत आहे की ती आपल्‌या इद्दतीचा काळ कुठेही पूर्ण करू शकते आणि  त्या काळात प्रवाससुद्धा करू शकते.
260) याप्रकारे नाते-संबंध जोडल्‌यानंतर तोडून देण्यात तीला काहीना काही नुकसान झेलावेच लागते. म्हणून अल्लाहने आदेश दिला  की शक्यतो त्याची पूर्तता करावी.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget