Halloween Costume ideas 2015

ताजमहाल आणि विघटनकारी राजकारणाचा खेळ

- रामपुनियानी 

भारत फक्त प्राकृतिक सौंदर्याने नटलेला देशच नाहीतर या ठिकाणी मानवनिर्मित चमत्कारांची संख्याही कमी नाही. जे सगळ्या जगातून पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतात. अचंभित करून टाकणाऱ्या जागतिक इमारतींपैकी ताजमहाल एक अशी इमारत आहे ज्याची निर्मिती मुगल बादशाह शहाजहानने आपल्या प्रिय पत्नी मुमताजमहेल हिची आठवण म्हणून केली होती.
ताजमहल जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य आहे. युनेस्कोने याला विश्वधरोहरस्थळ म्हणून घोषित केलेले आहे. कवि रविंद्रनाथ टागोरबद्दल म्हटलेले आहे की, ’कालके कपोल पर रूकी हुई अश्रू की एक बूंद’. यात कुठलाही संशय नाही की ताजमहल भारतातील सर्वात मोठी पर्यटकांना आकर्षित करणारी इमारत आहे. परंतु, उत्तर प्रदेशच्या योगी सरकारला याच्याशी काय देणे घेणे नाही. नुकतेच सत्तेमध्ये सहा महिने पूर्ण केल्याच्या निमित्ताने योगी सरकारने राज्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी एक पुस्तिका प्रकाशित केली. ज्याचे शिर्षक होते, ’उत्तर प्रदेश पर्यटन- अपार संभावनाएँ’ यात ज्या पर्यटनस्थळांचा परिचय करून देण्यात आलेला आहे. त्यात स्वतः मुख्यमंत्री ज्या पीठाचे प्रमुख आहेत त्या गोरखनाथ पीठासह अनेक पर्यटन स्थळांच्या नावाचा समावेश आहे. या पुस्तिकेमधून धार्मिक पर्यटन स्थळांवर जास्त लक्ष वेधण्यात आलेले आहे. सर्वात आश्चर्यजनक बाब म्हणजे उत्तर प्रदेशमधील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ ताजमहलचे नाव या पुस्तिकेतून गायब आहे. 
मुख्यमंत्री बनताच योगी आदित्यनाथयांनी म्हटले होते की, ताजमहल भारतीय संस्कृतीचा भाग नाही आणि विदेशी पाहुण्यांना ताजमहलची प्रतिकृती भेट देण्याची परंपरा समाप्त व्हायला हवी. त्या जागी गीता आणि रामायणांच्या प्रती भेट स्वरूप दिल्या गेल्या पाहिजेत. त्यांच्या अनुसार ही दोन्ही पुस्तके भारतीय संस्कृती ची प्रतिके आहेत. ताजमहल विषयी योगीच्या या भुमिकेने त्यांचा जातीयवादी चेहरा उघडा केलेला आहे. जेव्हा या मुद्यावरून मीडियामध्ये सरकारवर टिका केली गेली तेव्हा एका मंत्र्याने म्हटले की, ताजमहाल भारतीय विरासतीचा हिस्सा आहे. परंतु, पुस्तिकेमध्ये याचा उल्लेख केला नाही गेला की त्याच्यात फक्त अशा पर्यटन स्थळांचा उल्लेख केला आहे ज्यांचा प्रचार करणे आवश्यक होते. त्यांनी हेही म्हंटले की ताजमहलच्या देखरेखीसाठी सरकारने वेगळा निधी मंजूर केलेला आहे. एवढेच नव्हे तर आग्रामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाचाही प्रस्ताव विचाराधीन आहे. याबाबतीत भाजपाच्या गोटातून वेगवेगळ्या प्रकारचे सूर ऐकायला मिळत आहेत. कोणी म्हणतंय ताजमहाल एक हिंदू मंदिर आहे, कोणी म्हणतंय ते काय विशेष महत्वाचे स्मारक नाही. तर कोणाचे म्हणणे आहे की हे तर भारताच्या गुलामगिरीचे प्रतिक आहे. भाजपा नेता संगीत सोमनी याबद्दल म्हंटलेले आहे की, ”कई लोगों ने इस बात पर दुःख व्यक्त किया के राज्य सरकार की पर्यटन पुस्तिका मे ताजमहल का नाम हटा दिया गया. हम किस इतिहास की बात कर रहे हैं. क्या उस इतिहास की जिसमें ताजमहल के निर्माताने अपने पिता को जेल में डाल दिया था. क्या हम उस इतिहास की बात कर रहे हैं जिसमें इस स्मारक के निर्माताने उत्तर प्रदेश और भारतसे हिंदूओंका सफाया कर दिया था. ये दुःखद और दुर्भाग्यपूर्ण है के इस तरहके अततायीशासक अबभी हमारे इतिहास का हिस्सा हैं”. सोमयांचे हे वाक्य भाजपाच्या विचारधारेला स्पष्ट करण्यास पुरेसे आहे. खरे पाहता ताजमहलला भेट देणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांपासून कमी होत आहे. म्हणून ताजमहलची जाहिरात करणे गरजेचे आहे. 
प्रश्‍न हा आहे की ताजमहलचे नाव पुस्तिके मधून का हटविले गेले. योगी ताजबद्दल जे वक्तव्य करत होते त्यावरून स्पष्ट आहे की ते ताजमहलला पसंत करत नाहीत. ताज एका अशा व्यक्तीने निर्माण करवून घेतला आहे ज्याला हिंदुत्ववादी विचारधारा आक्रमणकारी मानते. भारतीय संस्कृतीसंंबंधी गांधीसारख्या नेत्यांची परिभाषा ही योगी आणि हिंदुत्वयांच्या विचारधारेपेक्षा एकदम वेगळी आहे. भाजपा आणि हिंदुतत्ववाद्यांसाठी हिंदू संस्कृती ही भारतीय संस्कृती आहे. यापेक्षाही पुढे जावून काही संघवादी असेही म्हणत आहेत की, ताजमहाल एक हिंदू मंदिर आहे ज्याचे नाव तेजोमहालय होते. हा दावा इतिहासाच्या कसोटीवर टिकत नाही. शहाजहानवर लिहिलेल्या बादशाहानामा या पुस्तकात स्पष्ट म्हटलेले आहे की, ताजमहालची निर्मिती शहाजहाननेच करवून घेतली होती. त्याकाळात भारतात आलेला एक युरोपीय पर्यटक पीटर मुंढीने लिहिलेले आहे की, ’शाहजहान आपल्या प्रिय पत्नीच्या मृत्यु मुळे दुःखाच्या सागरात बुडालेला आहे आणि तिची आठवण म्हणून एक शानदार मकबरा तयार करवून घेत आहे. ’एक प्रसिद्ध फ्रांसीसी सोनार टेवरनियर जो त्या काळात भारतात होता ने सुद्धा हेच म्हटलेले आहे, जे की पीटर मुंढीने म्हटलेले आहे. शाहजहान यांच्या वही खात्यामध्ये ताजमहलच्या निर्मितीचा जमाखर्च लिहिलेला आहे. ज्यात संगमरवरी दगड खरेदी आणि मजुरांना दिलेली मजुरी यांचा तपशील नमूद आहे. ताजमहालला शिवमंदीर म्हणणाऱ्यांचे म्हणणे हे आहे की, ज्या जमिनीवर ताजमहाल तयार करण्यात आला ती जमीन शाहजहानने राजा जयसिंग यांच्याकडून खरेदी केली होती. इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी आहे की, जयसिंह एक वैष्णव होते. आणि एका वैष्णव राजाकडून शिवमंदिर निर्माण करण्याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. 
खरे पाहता ताजमहलचे महत्व कमी करण्याचे हे प्रयत्न भारतीय इतिहासाचे पुर्नलेखन करू पाहणाऱ्या हिंदुत्ववादी योजनेचा एक भाग आहे. या योजने अंतर्गत इतिहासाची व्याख्या जातीयवादी आधारावर केली जात आहे. सत्य घटनांचा विपर्यास केला जात आहे. दावा तर इथपर्यंत केला जात आहे की, राणा प्रताप आणि अकबर यांच्यामध्ये हलदीघाटी येथे जे युद्ध झाले होते त्यात राणा प्रताप विजयी झाले होते. वास्तविक पाहता हलदी घाटीचे युद्ध सत्तेसाठी लढले गेले होते धर्मासाठी नव्हे. आपण सर्व जाणून आहोत अकबर आणि राणा प्रताप या दोघांच्याही साह्यकांमध्ये हिंदू आणि मुसलमान दोन्ही धर्माचे लोक सामिल होते. ना अकबर इस्लामचा रक्षक होता ना राणा प्रताप यांनी हिंदू धर्माची ध्वजा उचलली होती. ते दोघेही आपापल्या साम्राज्याचा विस्तार करू इच्छित होते. 
असं वाटतंय की ताजमहल आणि मुस्लिमराजांद्वारे निर्माण केलेल्या अनेक दुसऱ्या इमारती जातीयवादी शक्तींच्या डोळ्यांमध्ये खटकत आहेत. आता जेव्हा हिंदुतत्वादी सत्तेत आलेले आहेत तेव्हा त्यांनी ताजमहालला भारतीय इतिहासातून संपविण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. फक्त ताजमहलच नव्हे तर ते कदाचित मुस्लिमांनासुद्धा वेगळे पाडू इच्छितात. या लोकांचे पुढील टार्गेट लाल किल्ला आहे काय? जेथून देशाचे पंतप्रधान स्वातंत्र्यदिनी देशाला संबोधित करतात. ताजमहल आणि अशाच प्रकारच्या दुसऱ्या ऐतिहासिक इमारती भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहेत. त्यांचे संरक्षण आणि संवर्धन आवश्यक आहे. जेणेकरून भारताच्या गंगा-जमनी संस्कृतीला चालना देता येईल.
 (इंग्रजीतून हिंदीत अमरिश हरदेनिया तर हिंदीतून मराठीत एम.आय.शेख, बशीर शेख यांनी भाषांतर केले.)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget