Halloween Costume ideas 2015

पालनकर्त्याच्या महानतेचे सत्य केवळ तोच जाणतो

शोधनमधील ‘अल्लाहची सर्वश्रेष्ठ निर्मिती - मानव’ या लेखात (११-१७ ऑगस्ट २०१७) सय्यद सालार पटेल यांनी लिहिले आहे,  ‘‘कुरआनमध्ये म्हटले आहे की, ‘मी मातीपासून एक मानव बनविणार आहे. मग त्याला पूर्णपणे बनविन आणि त्यात माझा आत्मा फुंकीन. तेव्हा तुम्ही त्याच्यासमोर नतमस्तक व्हा.’’ (कुरआन ३८:७१-७२) याचा अर्थ मनुष्यात जो आत्मा फुंकला गेला आहे तो खरे  तर ईश्वरी गुणाचे एक प्रतिबिंब किंवा छाया आहे. जीवन, ज्ञान, सामर्थ्य, निश्चय, अधिकार आणि इतर सर्व वैशिष्ट्ये मनुष्यात सापडतात. त्यांचा सर्वांचा मिळून आत्मा बनतो. मनुष्यरूपी आत्म्याचा सन्मान व्हावा.’’ (शोधन,११-९- २०१७)
वास्तविक अल्लाहने ‘स्वत:चा’ आत्मा आदममध्ये फुंकला नाही तर ‘स्वनिर्मित’ आत्मा फुंकला. कुरआनचे भाषांतर ‘अहसनुल  कुरआन’मध्ये आहे की, याचा अर्थ तो आत्मा ज्याचा स्वामी मी (अल्लाह) आहे, माझ्याशिवाय त्यावर कुणी अधिकार बाळगीत नाही.  नि:संशय अल्लाहचे दैवी गुणधर्म (अस्मा व सिफात) विश्वातील कोणतीही सजीव-निर्जीव वस्तू धारण करू शकत नाही. कारण  अल्लाहच्या दैवत्वात कुणी भागीदार नाही, जे कुणी याभागीदारीचा दावा करतात ते ‘मुश्रिक’ आहेत आणि या भागीदारीला ‘शिर्क’  म्हणतात, जो घोर अपराध आहे, ज्याला अल्लाह कधीच माफ करीत नाही. काही सूफी मताचे लोक अल्लाहच्या दैवी गुणधर्मांना  मनुष्यात असण्याचा प्रसार करतात, त्याला ते छाया, सया, प्रतिबिंब आदी विशेषणे लावून आपल्या खोट्या श्रद्धेचा प्रचार करतात. त्याला ते ‘वहदतुल वजूद’ (प्रत्येक गोष्टीत / वस्तूत ईश्वराचा अंश असणे) आणि ‘हुलूल’ (माणसाने ईश्वरामध्ये प्रवेश होणे)  म्हणतात. हा अकीदा (श्रद्धा) इस्लामच्या मूलभूत श्रद्धेविरूद्ध आहे. हा अकीदा खऱ्या ‘अहले सुन्नत वल जमात’चा अजिबात नाही.  कुरआनच्या आयतींचा अन्वयार्थ व भ्रष्टीकरण झालेले स्पष्टीकरण होय. जर अल्लाह एखाद्या जीवंत वा मृत वस्तूत प्रवेश करीत  असेल किंवा मनुष्याचे अल्लाहत प्रवेश होणे असेल तर तौहीदचा अर्थ काय? तौहीद म्हणजे एकेश्वरवाद. अल्लाहच एकमेव ईश्वर  आहे, त्याचा कोणी भागीदार नाही. याचा अर्थ काय? सूफी याचे सप्रमाण उत्तर देत नाहीत, तर आमच्यावर शरियत बांधिल नसून  आम्ही आमच्या स्वत:च्या इबादतीच्या पद्धती शोधून काढल्या आहेत, ज्याद्वारे (तरीकात) प्राप्त करीत असतो. वास्तविक महान  अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आणलेली शरियत संपूर्ण जीवनात व मानवजातीकरिताच आहे. सूफी त्यातून अलीफ कसे? मानवजातीला सरळमार्ग केवळ आणि केवळ शरियतच देऊ शकते आणि त्याद्वारेच मानवाचा मोक्ष (जन्नत) आहे. हे सत्य कोणी  नाकारू शकत नाही.
लेखक पुढे लिहितात की, ‘‘जीवन, ज्ञान, सामथ्र्य, निश्चय, अधिकार आणि इतर सर्व वैशिष्ट्ये मनुष्यात सापडतात. त्यांचा सर्वांचा  मिळून आत्मा बनतो. मनुष्यरूपी अल्लाहचा सन्मान व्हावा.’’ पवित्र कुरआन व हदीस ग्रंथात असे एखादे सप्रमाण वचन आले आहे  का, ज्यात आत्म्याची व्याख्या वर दिल्याप्रमाणे असावी? जर नसेल तर ती एक मानवी कल्पना व मानवनिर्मित अंदाजच म्हणावा लागेल. आत्मा व मनुष्य या दोन विभक्त गोष्टी आहेत. लेखकाने ‘मनुष्यरूपी आत्मा’ ही संज्ञा वापरली आहे. ती आक्षेपार्ह वाटते.  कारण मनुष्य आत्म्याचे रूप घेत नाही ना आत्मा मनुष्याचे रूप घेतो. मनुष्य मरण पावल्यावर केवळ शरीर उरते. आत्मा मात्र  वेगळा होतो. आत्म्याविषयी पवित्र कुरआनमध्ये आणि हदीसमध्ये जे काही वर्णन आले आहे तेवढीच माहिती शरियतनुसार अधिकृत  आहे. यहुद्यांनी जेव्हा एकदा आत्म्याविषयी प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याकडे विचारणा केली तेव्हा ‘बनी इस्राईल’ या सूरहमध्ये आयत  अवतरली. (हदीस सही बुखारी) ‘‘आणि हे लोक तुम्हाला आत्म्यासंबंधी प्रश्न विचारतात, तुम्ही उत्तर द्या की आत्मा माझ्या पालनकर्त्याच्या हुकूमाने आहे आणि तुम्हाला जे ज्ञान देण्यात आले आहे ते अत्यल्प आहे. (कुरआन १७:८५) पवित्र कुरआनचे भाष्यकार मुहम्मद जूनागढी यांनी ‘अहसानूल बयान’मध्ये या आयतीचे वर्णन करताना लिहिले आहे की, या आयतीचा अर्थ हा आहे की तुमचे ज्ञान अल्लाहच्या ज्ञानाच्या तुलनेत फारच अल्प आहे आणि हा आत्मा ज्याच्या बाबतीत तुम्ही विचारत आहात त्याचे ज्ञान  तर अल्लाहने प्रेषितांसमवेत कुणालाच दिले नाही. बस्स! इतके समजा की, हा माझ्या पालनकत्र्याचा हुकूम आहे आणि माझ्या पालनकर्त्याच्या महानतेपैकी आहे, ज्याचे सत्य केवळ तोच जाणतो.
- निसार मोमीन, पुणे.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget