Halloween Costume ideas 2015

अल्बकरा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(२४३) तुम्ही२६५ त्या लोकांच्या दशेचा विचार केला जे मृत्यूच्या भीतीने आपले घरदार सोडून निघाले होते आणि हजारोंच्या संख्येत ते होते? अल्लाहने त्यांना फर्माविले, मरा! नंतर त्याने त्यांना पुन्हा जिवंत केले.२६६ वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाह मानवावर मोठी कृपा करणारा आहे, परंतु बहुसंख्य लोक कृतज्ञता व्यक्त करीत नाहीत.
(२४४)
मुस्लिमांनो! अल्लाहच्या मार्गात युद्ध करा आणि चांगलेच समजून असा की अल्लाह ऐकणारा व जाणणारा आहे.
(२४५) तुमच्यात असा कोण आहे की जो अल्लाहला चांगले कर्ज२६७ देईल की अल्लाह त्याला कित्येक पटीने वाढवून परत करील? घट करणेसुद्धा अल्लाहच्या अखत्यारीत आहे आणि वाढविणेदेखील, आणि त्याच्याकडेच तुम्हाला परत जावयाचे आहे.
(२४६) मग तुम्ही त्या घटनेवर विचार केला जी मूसा (अ.) च्या नंतर बनीइस्राईलच्या सरदारांच्या बाबतीत घडली होती? त्यांनी आपल्या नबीला सांगितले, ‘‘आमच्यासाठी राजा नेमून टाका की ज्यामुळे आम्ही अल्लाहच्या मार्गात युद्ध करावे.’’२६८ नबीने विचारले, ‘‘असे तर होणार नाही ना की तुम्हाला युद्धाचा आदेश देण्यात यावा आणि मग तुम्ही लढू नये?’’ ते सांगू लागले, ‘‘बरे हे कसे होऊ शकते की आम्ही अल्लाहच्या मार्गात लढू नये जेव्हा आम्हाला आमच्या घरातून काढण्यात आले आहे आणि आमची मुले-बाळे आम्हापासून वेगळी केली गेली आहेत.’’ परंतु जेव्हा त्यांना युद्धाचा आदेश दिला गेला तेव्हा एक अल्पशा संख्येशिवाय इतर सर्वजणांनी पाठ फिरविली आणि अल्लाह त्यांच्यापैकी प्रत्येक अत्याचाNयाला चांगलेच ओळखतो.

२६५)     येथून व्याख्यानाचा दुसरा क्रम सुरू होतो. यामध्ये मुस्लिमांना अल्लाहच्‌या मार्गात जिहाद आणि आर्थिक त्याग करण्यासाठी प्रवृत्त केले गेले आहे आणि त्यांना त्या कमजोरींपासून सुरक्षित राहण्याचे मार्गदर्शन दिले की ज्‌यांच्‌यामुळे बनीइस्त्राईल लोक विनाशाच्‌या खाईत कडेलोट झाले होते. या प्रसगांला समजून घेण्यासाठी ही गोï ध्यानात ठेवली पाहिजे की मुस्लिम या वेळी मक्काहुन बाहेर काढले गेले होते. दीड वर्षापासून मदीना येथे शरणार्थ म्हणून राहात होते. विरोधकांच्‌या अत्याचाराला कंटाळून पुन्हा पुन्हा विनंती करीत होते की आम्हास युद्ध करण्याची परवानगी मिळावी. परंतु जेव्‌हा त्यांना लढाईचा आदेश देण्यात आला तर त्यांच्‌यातील काहीजण पळ काढू पाहात होते. जसे की आयत नं. २१६ मध्ये स्पï केले आहे. म्हणून येथे बनीइस्त्राईली इतिहासातील दोन महÎवाच्‌या घटनांद्वारा त्यांना धडा घेण्यास सांगितले गेले आहे.
२६६)     हा संकेत बनीइस्त्राईल निघून जाण्याच्‌या घटनेकडे आहे. अध्याय माइदाच्‌या आयत नं.20 मध्ये अल्लाहने या घटनेला सविस्तर वर्णन केले आहे. हे मोठ्या संख्येने इजिप्तहुन निघाले होते. जंगलात आणि सपाटीवर बेघर सैरावैरा फिरत होते. एक सुरक्षित ठिकाण मिळण्यासाठी ते बेचैन होते. परंतु जेव्‌हा अल्लाहच्‌या परवानगीने आदरणीय पैगंबर मूसा (अ.) यांनी त्यांना आदेश दिला की अत्याचारी कनायीनांना पॅलेस्टाईनमधून हुसकून लावा आणि त्या क्षेत्रावर विजय प्राप्त करा. तेव्‌हा त्यांनी कच खाल्ली आणि पुढे जाण्यास नकार दिला. शेवटी अल्लाहने त्यांना चाळीस वर्षांपर्यंत जमिनीवर परागंदा फिरण्यासाठी सोडून दिले. त्यांची  एक  पिढी  नï  झाली  आणि  दुसरी  पिढी  वाळवंटात  जन्माला  येऊन  मोठी  झाली.  तेव्हा अल्लाहने त्यांना कनायीन लोकांवर वर्चस्व बहाल करून दिले. माहीत  होते  की  याच  घटनेला  मृत्यू  आणि  मृत्यूनंतर  पुन्हा  जीवन  देणे  या  शब्दांनी  व्यक्त  केले  आहे.
२६७)     अरबीमध्ये ""कर्जे हसन'' प्रयोग झाला आहे, मराठीत त्यास ""उत्तम कर्ज'' म्हणतात. याने अभिप्रेत निव्‌वळ चांगल्‌या हेतुने पुण्यप्राप्तीसाठी आणि निस्वार्थभावाने अल्लाहच्‌या मार्गात संपत्ती खर्च करणे आहे. यास अल्लाह आपल्‌यावरचे कर्ज समजतो आणि वचन देतो की मी फक्त मुद्दलच फेडणार नाही तर त्याहुन कित्येक पटीने जास्त देणार आहे.
२६८)     ही सुमारे एक हजार वर्ष इ. स. पूर्वीची घटना आहे. त्या वेळी बनीइस्त्राईल वर अमालिका प्रबळ झाले होते आणि त्यांनी इस्त्राईलींपासून पॅलेस्टाईन मोठ्या भागाला हिसकावून घेतले होते. समोएल नबी त्या काळी बनीइस्त्राईलींवर शासन करीत होते. परंतु ते फार म्हातारे झाले होते, म्हणून बनीइस्त्राईलच्‌या सरदारांनी दुसऱ्याला शासक म्हणून निवडून त्याच्‌या नेतृत्वात युद्ध करण्याचे ठरविले. परंतु त्या काळी बनीइस्त्राईलींमध्ये  अज्ञानता शिगेला पोहचली होती आणि ते मुस्लिमेतर चालीरीतींनी इतके प्रभावित झाले होते की खिलाफत आणि  बादशाहीमधील  अंतर  त्यांच्‌या  मनातून  केव्‌हाच  निघून  गेले  होते.  म्हणून  त्यांनी  जे  निवेदन केले ते  खलीफा नियुक्तीचे नव्‌हते तर एक बादशाह नियुक्तीचे होते. या संदर्भात बायबल ग्रंथ सॅम्युल भाग १ मध्ये विस्तृत तपशील आलेला आहे. ""सॅम्युएल जीवनभर इस्त्राईलींवर शासन करीत होता. तेव्‌हा सर्व इस्त्राईल बुजुर्ग मंडळी गोळा होऊन सॅम्युएल जवळ आले आणि त्याला विचारु लागले, ""पाहा, तू म्हातारा झाला आहेस, आणि तुझे पुत्र तुझ्या मार्गावर चालत नाहीत. तेव्‌हा तू आमच्‌यापैकी कोणालाही बादशाह म्हणून नियुक्त कर ज्‌याने इतरांप्रमाणे आमच्‌या वर शासन करावे.''

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget