Halloween Costume ideas 2015

प्रेषितवाणी (हदीस)


चहाडी करणे

    माननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी चहाडी करणे, चुगलखोरी करणे आणि चुगलखोरी ऐकण्याची मनाई केली आहे. (हदीस : रियाजुस्सालिहीन)
ईर्ष्या
    पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘स्वत:ला ईर्ष्येपासून वाचवा. कारण आज जशी लाकडाला भस्म करते तशी ईर्ष्या पुण्यकर्मांना भस्म करते.’’ (हदीस : अबू दाऊद)

वाईट दृष्टी

    माननीय जरीर बिन अब्दुल्लाह (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना अनोळखी स्त्रीवर अचानक दृष्टी पडण्याच्या बाबतीत विचारले असता पैगंबर म्हणाले, ‘‘तुम्ही आपली दृष्टी दुसरीकडे वळवा.’’ (हदीस : मुस्लिम)
    माननीय बुरीदा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी माननीय अली (रजि.) यांना सांगितले, ‘‘हे अली! एखाद्या अनोळखी स्त्रीवर अचानक दृष्टी पडल्यास दृष्टी दुसरीकडे वळवा. दुसऱ्यांदा तिच्याकडे पाहू नका. पहिली दृष्टी तुमची आहे आणि दुसरी दृष्टी तुमची नाही (शैतानची आहे).’’ (हदीस)
चांगल्या नीतीमत्तेचे महत्त्व
    पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘नीतीमत्तेचा चांगुलपणा सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी मला अल्लाहकडून पाठविण्यात आले आहे.’’ (हदीस : मुअत्ता इमाम मालिक)
स्पष्टीकरण : पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पैगंबरीचा उद्देश असा आहे की लोकांची नीतीमत्ता व परिस्थिती सुधारावी. त्यांच्यातील वाईट सवयी मुळापासून नष्ट कराव्यात आणि त्यांच्या जागी चांगल्या सवयी निर्माण कराव्यात, हे शुद्धीकरण करणे हा पैगंबरांना पाठविण्यामागील उद्देश आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आपल्या उक्ती व कृतीद्वारे अनेक चांगल्या शिष्टाचारांची सूची तयार केली आणि संपूर्ण जीवनामध्ये, जीवनातील अनेक क्षेत्रांमध्ये लागू केले आणि प्रत्येक प्रकारच्या स्थितीमध्ये त्यांचा अवलंब करण्याचा उपदेश दिला.
    ‘चांगली नीतीमत्ता’ (हुस्ने अ़खलाक) म्हणजे काय? याचे स्पष्टीकरण अब्दुल्लाह बिन मुबारक यांनी पुढील शब्दांत केले आहे- ‘‘हुवा तला़कतुल वज्हि व ब़जलुल मअरू़फि व क़फ़्फुल अ़जा.’’ म्हणजे चांगली नीतीमत्ता म्हणजे उत्साही चेहरा, (सद्कारणी) धनसंपत्ती खर्च करणे आणि कोणाला त्रास न देणे.
    पाहा चांगल्या नीतीमत्तेचा परीघ किती मोठा आहे.
    माननीय अब्दुल्लाह बिन अमर बिन अल-आस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) कधी निर्लज्जपणाचे वक्तव्य करीत नव्हते, निर्लज्जपणाचे काम कधी करीत नव्हते आणि दुसऱ्यांना वाईट बोलत नव्हते. पैगंबर मुहम्मद (स.) म्हणत होते, ‘‘तुमच्यापैकी ज्यांची नीतीमत्ता चांगली आहे तेच लोक उत्तम आहेत.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
    माननीय मुआ़ज (रजि.) यांनी सांगितले, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मला यमनला पाठविताना ‘रकाब’ (घोड्यावर किंवा उंटावर स्वार होताना पाय ठेवण्यासाठी बनविलेली लोखंडी कडी) वर पाय ठेवताना शेवटचे मार्गदर्शन केले ते असे, ‘‘लोकांशी सदाचाराने वागा.’’ (हदीस : मुअत्ता इमाम मालिक)

शिष्टता व सहिष्णुता

    माननीय इब्ने अब्बास (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी अब्दुल कैस कबिल्याच्या शिष्टमंडळाच्या प्रतिनीधीला (अशज या पदावर असलेला) म्हटले, ‘‘तुमच्यामध्ये दोन अशी गुणवैशिष्ट्ये आढळतात जी अल्लाहला पसंत आहेत, ती म्हणजे गंभीरता, शिष्टता व सहिष्णुता. (हदीस : मुस्लिम)
स्पष्टीकरण : अब्दुल कैस यांचे जे शिष्टमंडळ पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे आले होते त्यातील आणखी काही माणसे मदीनेला पोहोचताच पैगंबरांना भेटण्यासाठी घाईघाईत आले. त्यांनी न आंघोळ केली, न हात-तोंड धुतले आणि न आपले सामान कुठे व्यवस्थित ठेवले. ते दूरून आले होते, शरीरावर धूळ माखली होती. त्यांच्या विपरीत त्यांच्या प्रतिनिधीने कसलीही घाई-गडबड केली नाही. आरामात उतरले, सामान व्यवस्थित ठेवले, स्वारीच्या जनावरांना चारा-पाणी दिले, मग आंघोळ वगैरे करून शिस्तबद्धपणे पैगंबर मुहम्मद (स.) यांना भेटण्यासाठी आले.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget