Halloween Costume ideas 2015

जमाअतच्या मोफत रोगनिदान शिबिरात १७० रुग्णांची तपासणी

मुंबई (नाझिम खान)-
जमाअत-ए-इस्लामी हिंद मुंबई मेट्रो शाखेतर्फे वांद्रे येथील जकेरिया नगर येथे मोफत रोगनिदान शिबीर घेण्यात आले. हृदयरोगासाठी  आवश्यक असलेली चाचणी ८-९ इ.सी.जी., मधूमेहासाठी रक्तशर्करा चाचणीसह सर्व रोग निदान शिबिराचा १७० रुग्णांनी फायदा  घेतला.
के. जी. सोमय्या हॉस्पीटल रिसर्च सेंटरचे तज्ज्ञ डॉक्टर प्रियांका मोदी, एम.डी. यांच्या नेतृत्वाखाली पाच तज्ज्ञ डॉक्टर व  इतर साहाय्यक डॉक्टरांचे बहुमूल्य सहकार्य या शिबिरास लाभले. या शिबिरात हृदयरोग, मधूमेह, गुडघादुखी, महिलांच्या विविध  आरोग्य समस्या, डोळ्यांची तपासणी आदी करण्यात आली. डॉ. तलहा, डॉ. नयना, डॉ. निवेदिना, डॉ. तनवी टुटेजा यांच्यासह जनरल  सर्जन डॉ. मधुरकर यांनी अत्यंत आस्थेवाईकपणे रुग्णांची तपासणी करून योग्य ती औषध उपाययोजना केली. किचकट व्याधीग्रस्तांना, पुढील आवश्यक चाचण्यांसाठी अत्यंत माफक दरात सोमय्या हॉस्पीटलमध्ये व्यवस्था करण्यात आली.
जमाअत-ए-इस्लामी हिंद मुंबई मेट्रोचे सचिव हुमायूँ शेख आणि जमाअतच्या वैद्यकीय साहाय्य विभागाचे प्रमुख नईम शेख याच्या  मार्गदर्शनाखाली जमाअतच्या सदस्यांनी सर्वतोपरी सहकार्य केले. वांद्रे येथील समाजसेवक नासिरभाई, अय्यूबभाई व जुबेरभाई यांच्या  अथक परिश्रमामुळे हे शिबीर यशस्वी झाले. शिबिराला स्त्री-पुरुषांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सर्वधर्मीय, जातीय अशा गरीब  रुग्णांसाठी मोफत शिबिराचे आयोजन केल्याबद्दल रुग्णांकडून जमाअतला धन्यवाद, दुआ देण्यात आली.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget