Halloween Costume ideas 2015

सत्य-असत्य

- मुहम्मद फारूक खान
जीवनाचा स्त्रोत कोठे आहे? हे समस्त विश्व आणि यात असणाऱ्या प्राणि आणि वनस्पतीसारख्या सजीवसृष्टीस ना-ना प्रकारे सुसज्ज करणारी शक्ती आणि संकल्पना कोणती आहे? अर्थातच मनुष्यासाठी हा प्रश्न अत्यंत गंभीर आणि अतिशय महत्वपूर्ण आहे.     
   
आज आपण जर अशा प्रकारे जरी विचार केला की, समजा वर्तमान जीवनाव्यतिरिक्त मानवाचे कोणतेही भवितव्यच नाही तरीसुद्धा हा प्रश्न आहेच की आपण ’आज ते कोणात्या स्थानावर आहे’ त्याचे शाश्वत आणि चिरस्थायी भविष्य नसले तरीसुद्धा आणि भविष्य नसल्याने त्याची व्याख्या करण्याची गरज नसली तरी ’वर्तमान’ हीच एक वास्तविकता आहे आणि ही वास्तविकतासुद्धा पिच्छा सोडायला तयार नाही. वर्तमानाची व्याख्या केल्याशिवाय त्याला समाधान लाभणार नाही. म्हणूनच जेव्हा डार्विनने उत्क्रांतीचा सिद्धांत सादर केला. तेव्हा त्यास खूप महत्व प्राप्त झाले. याचे कारण असे होते की, त्याने जीवनाचे रहस्य उलगडण्याचा दावा करीत जीवनाची व्याख्या केली होती. म्हणून डार्विनने केलेल्या या कार्याविषयी लोकांचा कळत-नकळत भावनात्मक संबंध दिसून येतो. डार्विनच्या सिद्धांतामध्ये बऱ्याच त्रुट्या असूनदेखील सुरूवातीस या त्रुट्यांकडे सहसा जास्त लक्ष दिले गेले नाही. कारण हा मनुष्य स्वभावच आहे की त्याला नाही वाटत की सोने समजून त्याने उचललेल्या एखाद्या धातूचा तुकडा पितळाचा निघावा. हेच कारण आहे की डार्विनचा सिद्धांत जरी त्यांच्या परिकल्पनेची पुष्टी करण्याचा भरपूर खटाटोप करण्यात आला आणि एवढेच नव्हे तर कित्येक वैज्ञानिक आणि संशोधकांनी यासाठी आपल्या बहुमूल्य वेळ आणि शक्तीची आहुती दिली आणि आजही यासाठी भरपूर प्रयत्न व अनुसंधानाचे कार्यक्रम चालूच आहेत.
परलोकाची कल्पना
    सृष्टी आणि जीवनाशी संबंधित निर्माण होणाऱ्या या मौलिक प्रश्नांचे एकप्रकारे सुस्पष्ट उत्तर म्हणजे इस्लाम होय. उपरोल्लेखित जीवनाविषयक प्रश्नांचे आशादायी उत्तर हेच इस्लामचे स्वरूप होय. म्हणून आपण याची उपेक्षा नव्हे तर यावर चांगल्या रितीने व गंभीरपणे चिंतन व मनन करावयास हवे. इस्लामी शिकवणीनुसार हे विश्व आणि जीवनसृष्टी एका चिरंजीवी सत्तेची रचना आहे. अर्थातच या विश्वाची आणि यातील समस्त जीवनसृष्टीची रचना एका चिरंजीवी सत्तेने केली आहे. शिवाय, यामागे एक महान उद्देश आहे. याचे एक निश्चित लक्ष्य आहे. याच लक्ष्यपूर्तीसाठी विश्व कार्य करीत आहे. हे जीवन आणि ही सृष्टी अतिशय तीव्र गतीने आपले लक्ष्य गाठण्यासाठी धावत आहे. यास रोखण्याची कोणातही शक्ती नाही आणि ते शक्यदेखील नाही. या सृष्टीचा कल आणि स्वभाव तसेच त्यातील निहित मूळ प्रयोजन बदलणे हे माणसाच्या अधिकारकक्षेच्या बाहेर आहे.
    या जगाची रचना झाली आणि ज्याची रचना होते त्याचा आरंभसुद्धा निश्चितपणे असून उद्देशयुक्त असल्यामुळे या जगात एक महान परिवर्तनसुद्धा घडणार आहे. या परिवर्तनास आपण चरमविकासाचे नाव द्यावे अथवा त्यास निर्माणात्मक सृजनाच्या उपाधीने विभूषित करावे. मात्र ज्याप्रमाणे प्रत्येक निर्माण कार्यापूर्वी विध्वंस होणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे या विकसित आणि परिपूर्ण जगाची निर्मिती होण्यापूर्वी या वर्तमान सृष्टीचे पतन आणि विनाश अनिवार्य होय. एक प्रलयकारी घटना निश्चितच घडल्याशिवाय राहणार नाही आणि परिणामी वर्तमान विश्वाची ही व्यवस्था नाश पावेल. त्यानंतर वनसृजनतेची वेळ येऊन ठेपेल. त्यावेळी मात्र एक असे जग आपल्यासमोर असेल की, जे वर्तमान जगापेक्षा खूपच भिन्न स्वरूपाचे असेल. वर्तमान जीवनात आढळणाऱ्या त्रुट्या आणि कमतरता तेथे मुळीच नसतील. तेथे कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. त्या ठिकाणी विकास आणि सृजनतेची चरम आणि परमस्थिती असेल, तिला पाहिल्यावर प्रत्येकाच्या लक्षात येईल की, हे ते जग आहे जे आजपर्यंत आपल्याला दिसलेले नव्हते मात्र जे जग याच जगनिर्मितीचे लक्ष्य गाठण्याकडे भावत होते आणि त्यातील प्रत्येक संकेत याकडेच अंगुलिनिर्देश करीत होते.
    ज्याप्रमाणे समुद्रास पाहिल्यावर नद्या, तलाव, वृक्ष-वल्ली आणि मानव व पशु-पक्ष्यांच्या शरीरात प्रवाहित असलेल्या पाणी व आर्द्रतेचे रहस्य उलगडते, त्याचप्रमाणे मरणोत्तर जीवनास अर्थात पारलौकिक जीवनास पाहिल्यावर एकीकडे आपल्याला वर्तमान जीवनाचे उगमस्थान आणि मूळ आधाराचा थांग लागेल तर दुसरीकडे आपल्याला जगाच्या मूळ उद्देश आणि अभिप्रायाचे तात्विक ज्ञानसुद्धा प्रतिक्रियात्मक स्वरूपात लागेल. मनातील समस्त शंका-कुशंकाचे मळ धुतले जाऊन ते स्वच्छ आरशाप्रमाणे होईल. आपली आजची असमर्थता समर्थतेत परिवर्तित होईल, ज्या बाबी आज डोळ्यांनी दिसत नाहीत त्या प्रत्यक्ष समोर दिसतात. तेथे फक्त योग्य तेच होईल आणि अयोग्य व अनिष्ट बाबींचे अस्तित्वसुद्धा नसेल. उदाहरणार्थ, आज साधारणतः भौतिक वस्तुंचेच आपल्याला आकर्षण वाटते तर याउलट अत्यंत सूक्ष्म आणि अभौतिक वा आत्मिक वस्तूंची अवहेलना केली जाते. शरीराचे मूल्य आणि महत्व आपल्याला समजते मात्र आत्मा आणि प्रेम दिसत नाही.
सतर्कतेची आवश्यकता
  वरील मजकुरावरून हे स्पष्ट होते की, कुरआनने वर्तमान जगत आणि मानव जीवनाविषयी जी सूचना दिली, विश्व आणि मानवसृष्टी हे मुळात शुन्य आणि सर्वथा लोप पावणार नसून त्या एका विकसित आणि परिपूर्ण जीवनाकडे अग्रेसर आहे.
    मानवाची स्थिती अत्यंत नाजूक आणि गंभीर आहे. कारण त्याचे पारलौकिक जीवन हे पूर्णतः त्याच्या कर्मावर अवलंबून आहे. वर्तमान जीवन आपल्या वास्तविकतेच्या दृष्टीकोणानुसार एक प्रयत्न असून याच आधारावर मानवाचे भावी आणि सार्वकालीन जीवन सुसंघठित व सृजनशील असेल. या वर्तमान अगर लौकिक जीवनात मिळणारे सर्वच सुख किंवा फायदे आणि साधने व सुविधा मुळात गौण व नगण्य आहेत. म्हणूनच वास्तविकता जाणून घेण्यात थोडासा विलंबदेखील परवडणारा नाही. अगदी किंचितही हलगर्जीपणा व असावधानी खूप महाग पडणार आहे. म्हणून आजच सतर्क आणि सजग राहण्यात तसेच जीवनाच्या संभाव्य भवितव्यावर विचार करून ईश्वराकडून प्राप्त होणाऱ्या चेतावनीकडे लक्ष देण्यातच शहाणपण ठरेल. आणि ही चेतावनी ईश्वराने प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या माध्यमाने अंतिम ग्रंथातून मिळत आहे.
    या ठिकाणी हे विसरता कामा नये की, हा अंतिम ईश्वरी ग्रंथ म्हणजे कुरआन मानवाकरिता चेतावनी आहे आणि मंगल सूचनासुद्धा आहे. कुरआनच्या शिकवणी आत्मसात करून त्यानुसार जबाबदाऱ्या योग्यरित्या निभावणाऱ्यांसाठी कुरआन ही मंगलसूचना आणि खूशखबर आहे. मात्र कुरआनच्या हाकेस प्रतिसाद न देणाऱ्या आणि जीवनाची अवहेलना करणाऱ्या व आपल्या जबाबदारीस पाठ दाखविणाऱ्यांसाठी हा ग्रंथ चेतावनीच होय. परलोकांसबंधी कुरआनने जी धारणा सादर केली आहे ती केवळ दर्शनीय व पाहण्यापुरती नसून तिचा आपल्या वर्तमान आणि भावी जीवनाशी गाढ संबंध आहे. परलोकावर विश्वास अगर श्रद्धा ठेवल्यावर माणसाच्या जीवनाची दिशा व आत्मविश्वास अगर श्रद्धा न ठेवणाऱ्याच्या अगदी भिन्न असते. याबाबतीत आपल्याला एखादा दरम्यानचा मार्ग सापडतही नाही. अर्थातच परलोकी जीवनावर श्रद्धा ठेवली असो की नसो, जीवन व्यतीत करण्यासाठी होणारी धावपळ सारखीच असेल. तिच्यात मात्र कसलाच फरक होणार नाही. जर परलोकी जीवनाप्रती आपली धारणाच नसेल तर परलोकी यशाकरिता निश्चितच आपल्याकडून कोणतेही प्रयत्न होणार नाहीत. शिवाय, पारलौकिक जीवन सत्य असल्यास आपण परलोकी जीवनातील वाईट परिणामांपासून स्वःचे रक्षण कसे करणार? म्हणूनच या विषयावर आपण विचार करणे आवश्यक आहे. 
(क्रमशः) (उर्दूतून मराठी भाषांतर सय्यद जाकीर अली)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget