Halloween Costume ideas 2015

चांगले आणि वाईट राजकारण


कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरत असताना सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. तिसरी लाट येणार नाही असे अनेक वैज्ञानिक, आरोग्य अधिकारी आणि डॉक्टर म्हणत होते आणि म्हणता म्हणताच तिसऱ्या लाटेची सुरुवात झाली, तीही त्सुनामीसारखी भयंकर! या महामारीतून मानवतेची सुटका होणार की नाही असा प्रश्न आता सर्वांना पडलेला असणार. अडीच वर्षांपासून जनसामान्यांचे सामान्य जीवन विस्कळीत झालं आहे. मात्र उद्योगपती याच कालखांडात चौपट-पाचपटीने श्रीमंत झाले ही समजता येणारी गोष्ट नाही. लॉकडाऊनच्या काळात जेव्हा सगळे उद्योगधंदे बंद असतात नेमक्या त्याच काळात त्यांच्या कमाईत कशी वाढ होते याचे तयांना आणि ईश्वरालाच माहीत असणार. आता तिसऱ्या लाटेत ते किती कमाई करतील त्यांनाच माहीत. त्यांची तर इच्छाच असणार की तिसऱ्यानंतर चौथी, पाचवी अशा सतत लाटा येत राहाणार, जेणेकरून देशातील कोट्यवधी लोक दारिद्र्यात लोटले जाणार आणि देशाची सर्व संपत्ती त्यांच्याकडे एकवटावी. जागतिक आरोग्य सेवेचे महासंचालक डॉ. टेड्रोस यांनी म्हटले आहे की ही महामारी २०२२ साली संपून जाणार आहे, पण त्यासाठी तमाम जगातल्या लोकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. लोकांनी जर लस घेतली नाही तर कोरोनाचे व्हेरियंट्स वारंवार येतच राहाणार आहेत. पण सध्या ओमायक्रॉन व्हेरियंट बाधित लोकांचा जो अहवाल आलेला आहे त्यात असे म्हटले आहे की ज्यांना लसीचे दोन्ही डोस दिले गेले होते अशा ८५ टक्के लोकांना ओमायक्रॉन पॉझिटिव्ह झालेत. या अहवालावरही त्यांनी काही भाष्य केले असते, तर बरे झाले असते. ते नक्की काय म्हणतात माहीत नाही. जगातल्या सर्व लोकांनी लस घ्यावी यावर त्याचा जास्त भर आहे की जगातून या रोगाचे उच्चाटन करण्यासाठी लसीबरोबरच आणखी काय काय करता येईल. लस घेतली नाही तर महामारी चालूच राहाणार की लस घेतल्यावर यातून सुटका होणार, यावर त्यांनी अभ्यासपूर्वक विधान केले असते तर जगभरातील लोकांना दिलासा मिळाला असता. कोरोणाच्या दुसऱ्या लाटेत देशाचे जे हाल झाले ते सर्वांना माहीत आहे. तिसऱ्या लाटेत तसे काही होऊ नये अशी सर्वांची ईश्वराकडे प्रार्थना असणार. महाराष्ट्र राज्यासाठी सुदैवाची गोष्ट अशीहोती की या काळात राज्यात देशातील सर्वोत्तम सरकार होते आणि आताही आहे ही खरोखरच ईश्वराची कृपा आहे. या सरकारने जशी काळजी घेतली त्याचे वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. महाराष्ट्राबाहेर दुसऱ्या लाटेत लोकांचे जे हाल झाले होते ते जर पाहिले असेल तर आपल्या सरकारच्या उत्तम कामगिरीची प्रचिती येईल. राज्य सरकार तर होतेच त्याहीपेक्षा महाराष्ट्राला लाभलेला प्रथमच असा मुख्यमंत्री आजवर कोणत्या राज्याला मळाला नसेल. कोरोना काळात त्यांनी स्वतःला प्रजेसाठी बाहून त्यांच्या आरोग्यासाठी जी कामगिरी केली त्याचे दुसरे उदाहरण नाही. ते प्रामाणिक आहेत, बुद्धिवान आहेत. माणुसकी त्यांच्या रक्तात भिनलेली आहे. याच काळात चांगलं राजकारण आणि वाईट राजकारण कसे असते हेही पाहायला मिळालं. उद्धव ठाकरे यांचं चांगलं राजकारण ज्याची प्रशंसा उच्च न्यायालयाने सुद्धा केली. आणि विरोधी पक्षाचे वाईट राचकारण हे दोन्ही समोर आले. हे राज्यातील जनतेचे दुर्दैव की अशा भल्या मुख्यमंत्र्यांना एकीकडे महामारी आणि दुसरीकडे त्यांच्या आजारामुळे काही जास्त करता आले नाही.

आपला समाज कोणत्या दिशेने चालला आहे?

वीज, रस्ते, पाणी आणि आर्थिक विकास यांची आकडेवारीएखाद्या देशाच्या विकासाचे प्रमाण ठरवू शकतेका? कदाचित आपण त्यांच्याबरोबर मानसिक विकास करणे आवश्यक आहे म्हणून नाही, ज्यात आपण अजूनही मागे राहू शकतो. आपल्या समाजाचा आजही मानसिक विकास झालेला नाही. आज आपण दुहेरी मानसिकतेत जगत आहोत, आपण केवळ आपल्या स्वार्थासाठी, आपल्या स्वार्थासाठी बोलतो. इतरांच्या बाबतीत जे घडले त्याचा आपल्या जीवनावर कोणताही परिणाम होत नाही. आम्हाला इतरांचे दुःख अनुभवायचे नाही. लोकशाही देशात इतके अधिकार असूनही, दुसऱ्यावर अत्याचार करण्याचा अधिकार कोणी दिला? आपण कोणत्या दिशेने जात आहोत? समाजात हक्क असेल तर तो सर्वांसाठीच असला पाहिजे. शिक्षण असे असले पाहिजे की समाजातील प्रत्येक घटक एकमेकांच्या भावनांचा आदर करतो. कदाचित हक्कांचा खरा उद्देश कुठेतरी पूर्ण होईल. किंबहुना, कोणत्याही माणसाला दुसऱ्या व्यक्तीच्या वेदना जाणवत नाहीत. त्याला असे वाटते की मी सुरक्षित असू शकतो आणि अशा घटना माझ्या बाबतीत कधीच घडू शकत नाहीत. कदाचित आपण सर्वजण एकच विचार करतो आणि अशा गंभीर मुद्द्यांवर आवाज उठवत नाही. आपला समाज कोणत्या दिशेने चालला आहे? आपले शिक्षण, आपली घटना, राज्यघटना, कायदा, न्याय हे सर्व इतके कमकुवत झाले आहेत की आपल्या सभोवतालची परिस्थिती आपल्याला समजत नाही, की ती परिस्थिती समजून घेऊन त्याकडे दुर्लक्ष करायचे? आपल्या तरुण पिढीला भविष्यात सुसंस्कृत आणि विकसित समाजाचा भाग बनवायचे असेल, तर त्यांची मानसिकता बदलणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्यासाठी शिक्षण, समानता, न्याय इत्यादींना त्यांच्या व्यवहारात उतरावे लागते, कारण जोपर्यंत व्यावहारिकदृष्ट्या एखादी व्यक्ती शिक्षणाचा वापर करत नाही, तोपर्यंत तो अशा सभ्य समाजाचा भाग होईल आणि स्वत:साठी जगण्याचा प्रयत्न करेल. समाजाच्या विचारसरणीवर काम करण्याची गरज आहे. मानसिकता बदलूनच सभ्य समाज निर्माण होऊ शकतो ज्यासाठी सध्याची शिक्षण व्यवस्था व्यावहारिक करणे आवश्यक आहे.

- सय्यद इफ्तिखार अहमद

संपादक, 


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget