Halloween Costume ideas 2015

आपले राजकारणी तंत्र जातीयतेच्या विषापासून मुक्त करा : न्या.काटजू

Katju
समस्त भारतीयांनी त्या सर्व तत्वांना धुळीस मिळविले पाहिजे, जी तत्वे धार्मिक तिरस्काराची आग भडकविण्यात व तिला वाढविण्यात आस्था राखतात. आज भारतात अनेक हिंदू आणि मुसलमान जातीयतेच्या व्हायरसने बाधित आहेत. वस्तूस्थिती ही की, इ.स.1857 च्या पूर्वी बहुतेक भारतीयांमध्ये जातीयवादी भावनांचा लवलेशही नव्हता. यात शंका नाही की, हिंदू आणि मुसलमानांच्या दरम्यान त्या काळातही काही मतभेद नव्हते. तथापि, त्यांच्यात वैमनस्य नव्हते. हिंदू बांधव ईद साजरी करण्यात मुसलमानांसह भाग घेत. तर मुसलमान हिंदूंसोबत होळी आणि दिवाळीचा सण साजरा करीत असत आणि ते सर्व भाउ-बहिणींसारखे मिसळून राहत असत. आपल्या या खंडप्राय देशात 150 वर्षानंतर शत्रूत्व नसले तरी दोन प्रमुख संप्रदायांच्या दरम्यान, परस्पर शंका-संशय कशा प्रकारे वाढीस लागला? आज भारतीय मुसलमानांना हिंदूंकडून भाड्यावर घर मिळविण्यात का अडचण येत आहे.
    जेव्हा भारतात एखाद्या ठिकाणी बॉम्बस्फोट होतो तेव्हा पोलीस खर्‍या अपराध्याला पकडण्यात असमर्थ (कारण वैज्ञानिक तपास कार्याचे त्यांना प्रशिक्षण दिले गेलेले नाही.) असल्यामुळे डझनभर मुसलमानांना अटक करून त्यांनी न केलेल्या अपराधाचा खुलासा मागतात. त्यांच्यापैकी अनेकजण कारावासात अनेक वर्ष घालविल्यानंतर शेवटी न्यायालयीन प्रक्रियेद्वारे निर्दोष आढळून येतात. परिणामी, देशात मुसलमान एकाकी पडलेले आहेत. पाकिस्तानात अल्पसंख्यांकांची अवस्था याहूनही दयनीय आहे. ते तिथे भयावह परिस्थितीत राहतात आणि उग्रवादी तसेच धार्मिक रूढीवाद्यांपासून भयभीत असतात.
    भारताच्या इतिहासात 1857 चे वर्ष वॉटर शेड वर्ष ठरले. भारतात विभिन्न संप्रदायांच्या परस्पर संबंधांच्या इतिहासाने 1857 मध्ये एक नवीन वळण घेतले. 1857 पूर्वी जातीयतेची समस्या नव्हती. त्या काळी दंगे होत नव्हते. अर्थात त्या काळात हिंदू-मुसलमानांच्या दरम्यान मतभेद नव्हते असे नाही. आता एकाच पित्याच्या संतती असलेल्या भावा-बहिणींमध्येही मतभेद असतात. तथापि, त्या काही हिंदू आणि मुसलमान शांती सलोख्याने राहत असत. आणि संकट प्रसंगी दोघेही भेदभाव सोडून एकमेकांना मदत करीत असत.
    निःसंशय ज्या मुसलमानांनी भारतावर आक्रमण केले, त्यांनी इथल्या अनेक मंदिरांना उध्वस्त केले, परंतु, त्यांचे वारसदार, जे स्थानिक मुसलमान शासक झाले त्या सर्वांनीच सांप्रदायिक सद्भावना निर्माण केली. हे काम ते आपल्या हितासाठी करीत. कारण त्यांच्या प्रजेत बहुसंख्य हिंदू होते. त्यांना ही जाण होते की त्यांनी जर मंदीरे पाडली तर देशात अराजकता पसरेल, दंगे भडकतील आणि फार मोठा अनर्थ घडून येईल, असे घडावे असा कोणताही शासक इच्छित नाही. यामुळेच भारतातील जवळ-जवळ सर्वच शासक मग ते मोगल असोत, अवध, मुर्शिदाबाद, अराकाटचे नवाब, टिपू सुलतान अथवा हैद्राबादचा निजाम या सर्वांनीच सांप्रदायिक सद्भाव वाढीस लागला.
    1857 मध्ये पहिले स्वातंत्र्य युद्ध छेडले गेले. ज्यात हिंदू आणि मुसलमानांनी संयुक्तपणे इंग्रजांविरूद्ध लढा दिला. हा लढा मोडून काढल्यानंतर इंग्रजांनी निर्णय केला की, भारतावर नियंत्रण राखण्याचा एकमेव फार्म्युला फूट पाडा आणि राज्य करा हाच आहे. अशा प्रकारे भारताचा राज्यसचिव सर चार्ल्स वूड याने व्हाईसरॉय लॉर्ड एल्गीनला 1862 च्या आपल्या एका पत्रात लिहिले, ” आम्ही भारतात आपली सत्ता एका संप्रदायाला दूसर्‍या संप्रदायाविरूद्ध उभे करून कायम ठेवले आहे आणि असे सातत्याने केले पाहिजे. यासाठी या सर्वांना त्यांच्यात समान भावना विकसित करण्यापासून रोखण्याकरिता तुम्ही जे काही करू शकता ते करा.
    राज्य सचिव विस्काऊंट क्रॉसने 14 जानेवारी 18587 ला गव्हर्नर जनरल डफरीनला लिहिले की, ” धार्मिक भावनांची वाटणी जास्त करून आमच्या हिताची आहे. आणि भारतीय शिक्षण व शैक्षणिक सामुग्रीच्या तपासणीकरिता नेमलेल्या तुमच्या समितीच्या परिणाम स्वरूपी मी काही भलेपणाची अपेक्षा करतो.”
(माजी न्या.मार्कंडेय काटजू यांच्या लेखातून साभार ः गैरसमजांचे निराकरण)
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget