Halloween Costume ideas 2015

संविधान ते मनुस्मृती व्हाया सी.ए. ए., एन.आर.सी.

samvidhan te manusmruti
संविधान ते मनुस्मृती व्हाया सी.ए. ए., एन.आर.सी.’ अशा शीर्षकाची सत्यशोधकी पध्दतीने लिहिलेली अडतीस पानी पुस्तिका वाचनात आली. ज्येष्ठ विधीतज्ञ, लेखक, विचारवंत तसेच  बिनीचे सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. के. डी. शिंदे यांनी ती लिहीली आहे.या पुस्तिकेच्या प्रकाशनाबद्दलची भुमिका मांडतांना अ‍ॅड. शिंदे यांनी लिहिले आहे की, ‘‘केंद्र सरकारला सर्वच  आघाड्यांवर चौफेर अपयश आल्याने देशवासीयांसमोर त्यांच्या जीवनमरणाच्या प्रश्नांनी धुमाकूळ घातला. जागतिक पातळीवर देश विकसनशील देशांच्या यादीतून बाहेर पडला आणि  त्याचे स्थान अविकसित देशांच्या यादीत आले.केंद्र सरकारने आईच्या जगण्यापेक्षा गायीच्या जगण्याला महत्त्व दिले. बेरोजगारीवर मात करण्याऐवजी मंदिर बांधकामासाठी प्राधान्य दिले.  विचारवंतांना अर्बन नक्सल ही नवीन संज्ञा शोधून काढून लावली. तडीपार, गुंड, खुनी, दंगलखोर या देशाचा कारभार बघायला लागल्यावर दुसरं काय वेगळं अपेक्षित नव्हतंच. पण  हळूहळू देशातील सुज्ञ जनता यांच्या फेकूगिरीवर नाराज व्हायला लागली, म्हणून त्यांनी नवीन हत्यारं काढली. नागरिकत्व कायदा १९५५ मध्ये धर्माच्या आधारावर असंविधानिक बदल  केला. धर्मनिरपेक्ष चौकटीची खुलेआम मोडतोड करून देश मनुस्मृतीच्या दिशेने नेण्याचे एक ठोस पाऊल त्यांनी उचलले. मुस्लिम समाजाला टार्गेट केले. त्याचबरोबर एन.आर.सी. च्या  जाचक कायद्याच्या पूर्ततेसाठी बहुजन समाजातील राबून खाणारे तसेच इतर मागास घटक यांना वेठीस धरण्याची कायदेशीर तरतूद केली. संसदेत कायदा मंजूर होण्या आधीच दिल्लीतील जवाहरलाल नेहरू, जामिया मिलीया, इत्यादी ख्यातनाम विद्यापीठासह अनेक विद्यापीठांतील विद्यार्थी विद्यार्थिनी रस्त्यावर उतरल्या. सरकारच गुंडांचं असल्यानं त्यांनी  त्यांच्या आर.एस.एस. व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या सराईत गुंडाना विद्यापीठांमध्ये पाठवून आंदोलनकत्र्यांना बेदम मारहाण, तोडफोड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न  केला. त्याचे पडसाद देशभर उमटले. विद्याथ्र्यांपाठोपाठ मुस्लिम - दलित, व संविधान प्रेमी नागरिकांच्या झुंडीच्या झुंडी आंदोलनात उतरल्या.’’
या सगळ्या पाश्र्वभूमीवर सदरच्या पुस्तिकेत अ‍ॅड. के. डी. शिंदे यांनी हा खटाटोप कशासाठी, धर्माधारीत नागरिकत्व दुरुस्ती कायदा२०१९ , नागरिकत्व दुरुस्ती कायदा घटनाबाह्य,एन.  आर.सी. ( National Register of Citizenship) ( संविधानाने दिलेले नागरिकत्व काढून घेण्याची प्रक्रिया), एन. पी. आर. (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर), आदी प्रकरणातून सविस्तर माहिती दिली  आहे.या संदर्भातील त्यांचा व्यासंग निश्चितच वाखाणण्याजोगा आहे. या पुस्तिकेचे शेवटी पुढील परिशिष्टे समाविष्ट करून कायद्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली आहे, त्यामुळे सामान्य  माणसाला ही या कायद्याची माहिती मिळणार आहे.
१)  THE CITIZENSHIP ACT 1955, NO. 57 Of 1955 (30 the December 1955)
२)  THE CITIZENSHIP (AMENDMENT) ACT, 2019- No. 47 of 2019 (12 th December, 2019) , 3) Indian Constitution
ही माहितीपूर्ण आणि संग्राह्य अशी पुस्तिका सामाजिक कार्यकर्ते, तसेच समाजशास्त्रीय अभ्यासकांना व विधी-न्याय शाखेतील अभ्यासकांना उपयोगी पडेल,यात संदेह नाही.
संविधान ते मनुस्मृती व्हाया सी. ए. ए., एन.आर.सी. या पुस्तिकेचे प्रकाशन सांगली येथील कष्टकऱ्यांची दौलत या हॉलमध्ये गुरुवार दिनांक २३ जानेवारी २०२० रोजी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ  अ‍ॅड. सी. आर. सांगलीकर (पुणे) यांच्या हस्ते करण्यात आले.या पुस्तिकेचे स्वागत मूल्य केवळ १५ रुपये असून दिलेल्या माहितीच्या तुलनेने अतिशय माफक आहे. ही पुस्तिका  ‘नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासह एन. आर. सी. विरुद्ध संघर्षाची वात पेटवणाऱ्या भारतातल्या जे. एन. यू., जामियामिलीया, विद्यापीठासह बावीस विद्यापीठातील बहादूर तरुण-तरुणींना  आणि शाहीन बाग मधील लढाऊ स्त्रियांना...’ अर्पण केली आहे.
डॉ. बाबुराव गुरव यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचे शीर्षक प्रत्येक स्वाभिमानी भारतीय नागरिकांना प्रेरणा देणारे आहे,  ‘झोपलात काय बंधूंनो उठा! देश पेटला...!’ अशी एक प्रकारे स्वातंत्र्यासाठीची हाकच दिली आहे. ते म्हणतात... ‘बंधू भगिनींनो, हे सारे भयकारी आपण पराभूत केले पाहिजे, ऐतिहासिक सविनय कायदेभंग, असहकार सुरू केले पाहिजे. आपला  देश, संविधान, लोकशाहीचे संरक्षण केले पाहिजे, घटनाबाह्य कायदे नाकारले पाहिजेत.’ केंद्र सरकारच्या दडपशाहीच्या पाश्र्वभूमीवर या पुस्तिकेचे मोठ्या प्रमाणात स्वागत होईल, यांत 
संदेह नाही.
या संदर्भात लेखक अ‍ॅड. के. डी. शिंदे यांच्याशी संपर्क साधला तरी चालेल, त्यांचा पत्ता असा...
अ‍ॅड. के. डी. शिंदे
जयश्री अपार्टमेंट, एस. टी. कॉलनी,
विश्रामबाग, सांगली-४१६४१५.

प्रकाशक :
सम्यक विद्रोही प्रबोधन संस्था
आनंदी प्रसाद अपार्टमेंट, १०७४,
क बी ५ बी वार्ड,
कोल्हापूर-४१६०१२

- सुनीलकुमार सरनाईक
मो.: ९४२०३५१३५२
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget