काँग्रेस नेहरूंच्या काळापासून गटनिरपेक्ष देशांच्या यादीत होती. मात्र भाजपा ही सुरूवातीपासूनच अमेरिका धार्जिनी होती. 2014 नंतर या अमेरिका धार्जिने पणावर शिक्कामोर्तबच झालेला आहे. दोन दिवसांत 100 कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्च करून ट्रम्प यांचे स्वागत करून, ट्रम्पसाठी राजकीय समर्थन देऊन अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षाची नाराजी ओढवून घेऊन भारतानेे काय मिळविले, याचा हिशेब टाकला तर शुन्य असे उत्तर येईल. डोनाल्ड ट्रम्प एक अत्यंत बेभरोसादायक व्यक्तीमत्व असून, भारताच्या भूमीवरून त्यांनी काश्मीरसंबधीं परत मध्यस्थीचा राग आळवला. एवढेच नव्हे तर ट्रम्प 3 अब्ज रूपयांची डील पदरी पाडून मायदेशी निघून गेले. भारताच्या पदरी काय पडले. तर मोदी यांचे गुणगान.
रशियाचे मिजाईल डिफेन्स सिस्टम हे अमेरिकेच्या मिजाईल डिफेन्स सिस्टमपेक्षा अधिक चांगले आहे. याची परिचिती इराकमध्ये नुकतीच आली. मेजर जनरल सुलेमानी यांच्या हत्येनंतर इराणने इराकमधील अमेरिकन मिजाईल डिफेन्स सिस्टम भेदून अमेरिकेच्या लष्करी ठिकाण्यावर यशस्वी हल्ला केला. ज्यात अनेक अमेरिकी सैनिक मारले गेले व अनेक जखमी झाले. गुप्तपणे इजराईल आणि जर्मनीमध्ये नेऊन त्यांच्यावर इलाज करण्याची नामुष्की अमेरिकेवर ओढवली. असे भेदल्या जाऊ शकणारे मिजाईल डिफेन्स सिस्टम कोट्यावधी रूपये खर्चून घेऊन उपयोग काय तर त्यापेक्षा रशियाचे सिस्टम घेतले असते तर देशहितासाठी अधिक चांगले झाले असते. परंतु, अगदी दम देऊन अमेरिकेने रशियाकडून मिजाईल डिफेन्स सिस्टम घेण्यापासून भारताला रोखले.
अमेरिकेतून निघण्यापूर्वीच ट्रम्प यांनी भारताने आमच्यासोबत चांगला व्यवहार केला नाही. मात्र मोदी हे माझे चांगले मित्र आहेत, असे म्हणून त्यांनी एका अर्थाने भारतीयांचा अपमानच केला. भारत चांगला नाही मोदी चांगले आहेत, असे म्हणणे हास्यास्पद आहे.
ट्रम्प हे एक गुलछब्बू व पक्के व्यापारी व्यक्तीमत्व आहे. मोदींना कसे हाताळावे, हे त्यांना पक्के माहित आहे. साबरमती आश्रमामध्ये अभिप्राय पुस्तीकेमध्ये गांधींचे नाव न लिहिता मोदींचे नाव लिहून त्यांनी आपले इरादे स्पष्ट केले. पुन्हा-पुन्हा मोदींना मिठ्या मारण्याची संधी देऊन देशवासियांना दोघांच्या प्रेमाची प्रचिती येईल, याची व्यवस्था केली. परंतु, सचिन तेंडूलकरचे नाव सुचिन तेंडूलकर व विराट कोहलीचे नाव विराट कोली असे उच्चारून ट्रम्प यांनी भारताबद्दलचे आपले किती ज्ञान आहे याची प्रचिती आणून दिली. तर मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव डोलान्ड ट्रम्प असे उच्चारून त्यांना ट्रम्प बद्दल किती आत्मीयता आहे, याची प्रचिती देशाला करून दिली.
मोदी यांनी अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणात एका पक्षाची बाजू घेऊन फार मोठी जोखीम पत्करलेली आहे. उद्या रिपब्लिकनचे सरकार अमेरिकेत आले तर रिपब्लिकन्सच्या मनात भारताविषयी काय प्रतिमा राहील, याचा जरासुद्धा विचार पंतप्रधान मोदी यांनी केला नाही. डोनाल्ड ट्रम्प नुकतेच महाअभियोगोला तोंड देऊन बाहेर पडले असून, त्यांची लोकप्रियता कमालीची घसरलेली आहे. अशात 40 लाख भारतीय मतदारांना रिझवण्यासाठी त्यांनी भारत दौरा करून एका प्रकारे आपल्या प्रचाराची सुरूवात अहेमदाबादमधून केली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प हे दोघेही भांडवलशाही जागतिकीकरणाचे प्रतिक आहेत. हे जागतिकीकरण मानवतेसाठी किती तापदायक आहे, या संदर्भात शोधनचे माजी संपादक, लेखक आणि विचारवंत सय्यद इफ्तेखाद म्हणतात, ” भांडवलशाही जागतिकीकरण हे इस्लामी जागतिकीकरणापेक्षा वेगळे आहे. इस्लामी जागतिकीकरणाचे मूळ ध्येय जगामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुभावसह नैतिकतेचा प्रचार आणि प्रसार हे आहे. या उलट भांडवलशाही जागतिकीकरण पाश्चात्य साम्राज्यवाद्यांनी आपल्या शक्तीच्या बळावर परकीय राष्ट्रांच्या बाजारपेठावर कब्जा मिळविण्यासाठी, त्यांची संपत्ती लुटण्यासाठी आणि तेथील नागरिकांना आपले वैचारिक, राजकीय आणि आर्थिक गुलाम बनविण्यासाठी लागू केलेली आहे.”

(संदर्भ ः प्रेषित मुहम्मद सल्ल. आणि नवयुगाचे प्रणेते या पुस्तकात पान क्रमांक 471). या विधानाची शंभर टक्के प्रचिती 24 आणि 25 फेब्रुवारीच्या ट्रम्प यांच्या भारत दौर्याने आली.
Post a Comment