Halloween Costume ideas 2015

दिल्ली’चे दोषी अजूनही मोकाट

48 जणांचा मृत्यू : 200 पेक्षा अधिक जखमी, पीडितांसाठी सर्वांनीच हातभार लावणे आवश्यक

देशाची राजधानी दिल्लीचा ईशान्य पूर्व भाग 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान दंगलीमध्ये होरपळला जात होता. यामध्ये आत्तापर्यंत 48 जणांचा मृत्यू झाला तर 200 पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी आहेत. दुकाने, व्यवसाय, जाळण्यात आले. ईशान्य दिल्लीच्या अनेक भागांमध्ये नागरिकांचे प्राण कंठाशी आले आणि हे सर्व कोणी केले हे अधिकृतपणे सांगायला तयार नाही. हे कुणाचे कुटील कारस्थान होते, हे सांगायची गरज भासत नाही.
    पोलिसांचाही यात जीव गेला. मात्र काही पोलिसांची भूमिका ही संशयित राहिल्याने  केंद्राच्या अखत्यारितील या विभागावर सगळ्यांचीच नाराजी आहे. दोषींवर कारवाई करायचे तर दूरच दोषींबद्दल बोलणार्‍या न्यायाधीशांचीच बदली करण्यात आली, याहून मोठे दुर्दैव काय? परंतु, दंगलीतील निरपराध्यांबाबत माणुसकीचा दृष्टीकोण ठेऊन मदत करणं हे सर्वांचच कर्तव्य बनतं. दंगल ही मानवनिर्मित आपत्तीच आहे. यालाही तोंड देण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे आलेच पाहिजे. बर्‍याच सामाजिक संस्था, संघटना आणि केजरीवाल सरकार दिल्ली पूर्वपरिस्थितीवर आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. खासकरून जमाते इस्लामी हिंद संघटनेने दिल्लीत सौहार्द कायम रहावा  म्हणून व पीडितांच्या मदतीसाठी तात्काळ सर्वोतोपरी प्रयत्न केले आहे आणि करीत आहे. याच्याच अंतर्गत चालणारी सोसायटी फॉर ब्राईट फ्युचर हा विभाग मोठ्या प्रमाणात मदत कार्य करीत आहे.
    दंगली घडविणार्‍या लोकांना उघडे पाडण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. घर, दुकान बनवायला कित्येक वर्षे लागतात आणि दंगेखोर त्यांना काही क्षणातच जाळतात. त्यामुळे दंगेखोरांना समोर आणले गेले पाहिजे.
    हे ही लक्षात घ्यायला हवे की, कोणी कितीही प्रयत्न केले तरी समाजात वैराचे बी रूजू न देण्याची काळजी आपल्यापैकी प्रत्येकाने घ्यायला हवी. ऐक्य हीच आपली ओळख आहे व एकोपा हीच ताकद आहे. हे असेल तर भारत महासत्ता होईल अन्यथा नाही

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget