Halloween Costume ideas 2015

शरीरामध्ये छिद्रे आणि टॅटू

शरीरामध्ये छिद्रे (बॉडी पैरसिंग) आणि गोंदण्याच्या क्रिये (टाटू) च्या फॅशनला आपल्या देशासह संपूर्ण जगात, मागील काही वर्षापासून खूप मोठी लोकप्रियता लाभली आहे. काही वर्षापूर्वी नाकामध्ये नथ, रिंग, फुल्ली आणि कानामध्ये डूल इत्यादी दागिने घालण्यासाठी परंपरावादी कुटुंबामध्ये केल्या जाणार्‍या छिद्रासाठी कडवी टीका केली जात होती आणि अशा कृतीला स्त्रियांवरील अत्याचार म्हटले जात होते. परंतु, आता जगभराच्या उद्योगाला फायदा करूद देण्यासाठी स्त्रियांच्या शरीराच्या प्रत्येक अवयवावर छिद्रे करून घेण्यास तयार करण्यात आले आहे. या तर्‍हेने ओठ, जीभ, हनुवटी, पापण्या, भुवया, पोट, बेंबी आणि इतर अवयवावर छिद्रे पाडून घेऊन त्यात रिंग इत्यादीची फॅशन सर्वसामान्य झाली आहे. ज्वेलरी इंडस्ट्रीच्या शेअर - होल्डरांना, नाक, कान, गळा, मान, मनगट आणि पायापर्यंत पसरलेल्या दागिन्याचे समाधान होत नव्हते (जिथे कपडे नसतात तेथे दागिने असतात. जेव्हा सर्व शरीरच नग्न केल्यास प्रत्येक ठिकाणी दागिन्यांची आवश्यकता तर असणारच). म्हणून गुप्तांगापासून शरीराच्या सर्व अवयवयांसाठी दागिने बनविले गेले. हे दागिने घालण्यासाठी प्रत्येक अवयवावर छिद्रे पाडली जाऊ लागली. आज संपूर्ण पश्‍चिमी जगातील स्त्रियांच्या शरीराची चाळण बनविण्याची दुकाने जागोजाग उघडली गेली आहेत. कान आणि नाक व्यतिरिक्त कोणत्याही नाजूक अवयवावर छिद्रे पाडणे सोपे नाही. त्यासाठी कुशल व्यावसायिकांची आवश्यकता असते. म्हणून भांडवलवाद्यांना नवीन उद्योग मिळाला. या व्यतिरिक्त मूळ हेतू ज्वेलरी उद्योगाला लाभ पोहोचविणे आणि त्याची भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये केंद्रीय भूमिका राहिली आहे. आपल्या देशात ही प्रवृत्ती मोठ्या वेगाने वाढत आहे, याचा अंदाज या गोष्टीमुळे होत आहे की फक्त मुंबईतील एका केंद्रात दर दिवशी दहा स्त्रिया छिद्रे करवून घेत आहेत. भुवया आणि बेंबीची छिद्रे सर्वात जास्त लोकप्रिय आहेत आणि स्त्रिया शरीरात 18-18 छिद्रे पाडून घेत आहेत.
    याच तर्‍हेने मॉडेल्स आणि अभिनेत्री यांच्याद्वारे गोंदण्याची (टॅटू) फॅशन सर्वसामान्य करण्यात आली आहे. शरीराच्या निरनिराळ्या अवयवावर गोंदवून घेण्याची या दीर्घ आणि त्रासदायक क्रियेसाठी स्त्रिया सहज तयार होतात. काही स्त्रिया तर आपल्या संपूर्ण शरीरावर टॅटू गोंदवून घेतात. काही दिवसानंतर जुने डिझाइन बरे वाटत नाही म्हणून किंवा ज्या बॉयफ्रेंड (बॉय फ्रेंड) चे नाव किंवा चित्र गोंदविले होते, त्याच्याशी संबंध तुटल्यानंतर दुसर्‍या बॉयफ्रेंडशी संबंध प्रस्थापित होतो. त्यामुळे टॅटू बदलण्याची गुंतागुंतीची आणि त्रासदायक शस्त्रक्रिया करून घतली जाते. त्यामुळे सर्वात जास्त फायदा भांडवलदाराला होतो. टॅटूमुळे होणार्‍या नुकसानीबद्दल रेडक्रॉस आणि इतर दुसर्‍या संस्थांनी टॅटू केलेल्या स्त्रियांकडून चार महिने ते एक वर्षाच्या कालावधीत रक्तदानाचा स्वीकार केला नाही. ज्या स्त्रिया टॅटूसाठीसुद्धा तयार होत नसतील तर त्यांच्यासाठी सोप्यातली सोपी बॉडी आर्टची सोयसुद्धा अस्तित्वात आहे. प्रोफेशनल डिझायनर्सकडून खूप पैसे घेऊन मेहंदी आणि कृत्रिम रंगांद्वारे सर्व शरीराच्या भिन्नभिन्न अवयवांवर आणि कधी-कधी संपूर्ण शरीरभर चित्रकारी केली जाते. ही महागडी चित्रकारी त्यांच्या शरीरावर दीर्घकाळपर्यंत राहावी अशी बहुदा सर्व स्त्रियांची इच्छा असते. हे कार्य नैसर्गिक मेहंदी किंवा इतर नैसर्गिक पदार्थांनी होऊ शकत नाही. ही काढलेली चित्रे दीर्घकाळ शरीरावर टिकून राहावीत म्हणून कृत्रिम रासायनिक रंगाचा उपयोग केला जातो. त्यामुळे त्वचेला खाज, अ‍ॅलर्जी आणि कधीकधी कॅन्सर इत्यादीसुद्धा कारणीभूत होतात. या सार्‍या गोष्टींना स्त्रियांमध्ये लोकप्रिय करणसाठी योजनाबद्ध पद्धतीने सौंदर्य स्पर्धा आयोजित केल्या जातात. सौंदर्याच्या राणीचा राजमुकूट व वास्तविक भांडवलशाहीच्या गुलामीचा पट्टा असतो. एका मुक्या जनावरांप्रमाणे सौंदर्याची राणी भांडवलशाहीच्या आदेशांचे पालन करते. सौंदर्यप्रसाधनांपासून सौंदर्यवर्धक शस्त्रक्रियेपर्यंत, ज्या-ज्या वस्तूंचा भांडवलदारवर्ग जनतेमध्ये लोकप्रिय करू इच्छितो. त्या वस्तू सौंदर्याची राणी शरीरावर अजमावून पाहते. ती सर्व उत्पादने आणि सेवा यांची प्रयोगशाळा आणि व्यावहारिक पुरावा बनून शहरा शहरात फिरत राहते.
    हाच व्यवहार सिने अभिनेत्री (फिल्म स्टार्स), पेज थ्री पार्ट्या, पॉप सिंगर आणि दुसर्‍या प्रसिद्ध महिला यांच्याबरोबर होत असतो.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget