Halloween Costume ideas 2015

8 हजार व्यावसायिकांच्या आत्महत्या

Stress
केंद्र सरकार काहीही म्हणो परंतु, देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक ट्रेंड सुरू झालेला आहे. बँकिंग क्षेत्र डबघाईला आलेले असून, कोट्यावधी रूपयांचे कर्ज घेऊन सरकारच्या जवळच्या व्यावसायिकांनी परदेशी पलायन केलेले आहे. मार्केटमध्ये माल उपलब्ध आहे पण मालाला उठाव नाही. मोठ्या उद्योगपतींप्रमाणे छोट्या व्यावसायिकांना बँकेचे कर्ज बुडवून विदेशात चैनीचे जीवन जगण्याची सोय नाही. म्हणून व्यावसायातील धोके सहन न झाल्यामुळे तणावग्रस्त होऊन 2018 मध्ये सुमारे 8 हजार व्यावसायिकांनी आपले जीवन स्वतःच्या हाताने संपविल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संस्थेच्या ताज्या आकडेवारीवरून उघडकीस आलेले आहे. एनसीआरबीच्या जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार 2018 मध्ये एकूण 7 हजार 778 व्यावसायिकांनी मृत्यूला कवठाळले आहे. आत्महत्या करणार्‍यांमध्ये सर्वाधिक व्यावसायिक कर्नाटकातील असून, या राज्यात 1 हजार 113 व्यावसायिकांनी आत्महत्या केलेली आहे. त्या खालोखाल महाराष्ट्र 969 आणि तामिळनाडू 931 या राज्यांचा क्रमांक लागतो. विशेष म्हणजे देशाच्या सकल घरेलू उत्पादनाच्या वाढीमध्ये या तिन्ही राज्यांचा मोठा वाटा असतो. कर्जबाजारी व्यावसायिक प्रतिष्ठेमुळे आपले दुखणे सहसा कोणाला सांगत येत नाहीत. ज्या वेळेस सहन करण्यापलिकडचा आर्थिक बोजा पडतो, चारीही बाजूंनी कोंडी होते तेव्हा शेतकर्‍यांप्रमाणे तेही इभ्रतीला बट्टा लागू नये म्हणून आत्महत्या करतात. महाराष्ट्र आतापोवेतो शेतकरी आत्महत्यासाठी कुप्रसिद्ध होता. आता त्यात व्यावसायिकांच्या आत्महत्येची भर पडलेली आहे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. आर्थिक विवंचनेशिवाय कौटुंबिक वाद, आजारपण, लग्नासंबंधी उद्भवलेल्या अडचणी,व्यसनाधिनता आणि प्रेम प्रकरणामुळे बाकीच्या आत्महत्या झालेल्या आहेत.
    आर्थिक आणि सामाजिक अडचणींना तोंड देण्यासाठी माणसं आतून खंबीर आसावी लागतात. भौतिकवादामुळे  चंगळवाद वाढलेला आहे. त्यातून लोकांच्या कृत्रिम गरजा वाढलेल्या आहेत. ज्याच्यावर कोट्यावधींचा अनाठायी खर्च केला जातो. हा खर्च श्रीमंत व्यावसायिक लिलया पेलतात परंतु, मध्यमवर्गीय व्यावसायिक बडेजाव मिरविण्याच्या नादात हा अनाठायी खर्च करून दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचतात. ज्याचा शेवट आत्महत्येसारख्या टोकाचा पाऊल उचलण्यात होतो.
    भारतीय समाज हा संकीर्ण विचार सरणीचा मुक्त समाज आहे. या समाजातील बहुतांशी लोकांना युरोप, अमेरिकेसारखे शान, शौकीचे जीवन जगण्याचे प्रचंड आकर्षण आहे. परंतु, तेवढी आपली आर्थिक ऐपत नाही. याचे भान त्यांना त्यावेळेस जेव्हा चारीही बाजूंनी आर्थिक कोंडी झालेली असते.
    आर्थिकच नव्हे तर सामाजिक क्षेत्रात सुद्धा भारतीय समाजाची पिछेहाट होतांना दिसत असून, मागच्याच आठवड्यात मुंबईमध्ये एका पाठोपाठ एक चार सेक्स रॅकेटचा छडा लावण्यामध्ये मुंबई पोलिसांना यश आले आहे. यातील बहुतांशी मुली ह्या चित्रपट आणि मॉडलिंग क्षेत्राशी संबंधित असून, कडव्या स्पर्धेला तोंड देत-देत त्यांचे स्खलन देहविक्री करण्यापर्यंत झालेले आहे.
    चाईल्ड पोर्नोग्राफीमध्येही महाराष्ट्राचे नाव आल्याची नुकतीच बातमी माध्यमांमध्ये येवून गेली आहे. देशभरात गेल्या पाच महिन्यात 25 हजारांहून जास्त लहान मुलांच्या लैंगिक संबंधाचे चित्रफिती समाजमाध्यमांवर टाकण्यात आल्याचा गौप्यस्फोट अमेरिकेने केलेला आहे. यावरून आपल्या समाजाची वाटचाल कोणत्या दिशेने होत आहे, याचा अंदाज यावा. शेकडो डेटिंग वेबसाईटवरून तरूण-तरूणी लग्नाची बंधणे जुगारून एकमेकांशी शरीरसंबंध स्थापित करत आहेत. याची जाणीव सर्वांनाच आहे. परंतु, बोलायला कोणीच तयार नाही. आश्‍चर्य तर त्या संस्थांचे वाटते जे स्वतःला सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था म्हणवून घेण्यात गर्व करतात. त्या सुद्धा याबाबतीत चकार शब्द काढत नाहीत. एकंदरित देशाचा प्रवास हा सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या अधोगतीकडे जात आहे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget