प्रेषित मुहम्मद (स.) यांनी असे सांगितले आहे, अल्लाहचं म्हणणं आहे की अत्याचार करणअयास मी स्वतःवर देखील निषिद्ध केले आहे. तुम्ही एकमेकांवर अत्याचार करता कामा नये. तुम्ही सर्व भरकटलेले आहात. ज्याला मी मार्ग दाखवला त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही माझ्याकडे विनंती करा, मी तुम्हाला मार्ग दाखवीन. ज्याला मी अन्न-पाणी दिले, त्या व्यतिरिक्त तुम्ही सर्व भुकेलेले आहात. मला मागा मी तुमच्या जेवणाची सोय करेन. मी ज्याला वस्त्रं दिली त्याशिवाय तुम्ही सर्व निर्वस्त्र आहात. तुम्ही मला विनंती करा, मी तुम्हाला वस्त्रं देईन. माझ्या भक्तांनो! तुम्ही रात्रंदिवस गुन्हा (पाप) करीत असता, तरी मी तुम्हाला क्षमा करतो. तुम्ही माझ्याकडे याचना करा मी तुम्हाला क्षमा करेन. तुम्ही मला काही केल्या नुकसान पोहचवू शकतन नाही. तसेच माझं काही भलं करण्याची क्षमता देखील तुमच्यात नाही. माझ्या भक्तोहो, जगातील सुरुपातीपासून शेवटपर्यंत जन्माला येणाऱ्यांनी जरी सदाचार केला तरी देखील माझ्या अधिराज्यात यामुळे काही वाढ होणार नाही. तसेच सुरुवातीपासून शेवटपर्यंत जन्माला येणाऱ्या माणसांनी वाईट माणसासारखे वागले तरी देखील माझ्या अधिराज्यामध्ये कोणती कसर होणार नाही. सुरुवातीपासून या जगाच्या अंतापर्यंतच्या साऱ्या माणसांनी एखाद्या मैदानात एकत्र येऊन आपापल्या इच्छेनुसार जे काही मागितले ते सर्व मी त्यांना देऊन टाकले. तरीदेखील समुद्रात एखादी सुई बुडवून बाहेर काढल्यावर तिच्या टोकाला जेवढे पाणी लागले असेल तेवढीदेखील कमी माझ्या खजिन्यात होणार नाही. माझ्या भक्तहो, तुमचे कर्म मी मोजून ठेवत असतो आणि त्यानुसारच तुम्हाला मोबदला देतो. तेव्हा ज्या कुणाला जे काही भलं लाभलं असेल त्यांनी माझे आभार मानावे आणि ज्याला दुसरं काही मिळेल त्यासाठी त्याने स्वतःचीच निंदा करावी. (संदर्भ – हजरत अबू जर (र), मुस्लिम)
पवित्र कुरआनात अल्लाह म्हणतो,
‘‘मी मानवांवर अत्याचार करणारा नाही.’’ (सूरह – काफ : ३९)
‘‘अल्लाहला आपल्या दासांवर अत्याचार करण्याची कोणती इच्छा नाही.’’
(सूरह – अलमोमिन : ३१)
‘‘जगवासीयांवर अत्याचार करण्याची अल्लाहची मुळीच इच्छा नाही.’’
(सूरह – आलेइमरान : १०)
Post a Comment