सध्या काँग्रेस बऱ्याच व्यक्ती आणि बऱ्याच विचारधारांच्या व्यक्तींकडून रोज काही ना काही ऐकायला मिळत आहे. सत्तेत असणाराच केवळ शहाणा असतो आणि एकदा तीच व्यक्ती सत्तेबाहेर गेली तर मग त्याच्या उणिवा काढणारे असंख्य लोक असतात. सत्तेत असताना अशा व्यक्तीच्या चुका का लोकांना आढळत नाहीत, हा मोठा प्रश्न आहे. याचे कारण लोक त्या व्यक्तीला नव्हे तर त्याच्या जवळील सत्तेला घाबरत असतील आणि उगीच विनाकारण अशा व्यक्तीच्या चुका काढून त्याची नाराजी का म्हणून ओढवून घ्यावी या भीतीने काही बोलत नाहीत. याचा अर्थ असा की लोक कुणाला कधी काय म्हणतील, कुणाच्या चुका काढतील हे सर्व त्या व्यक्तीपासून निर्माण होणाऱ्या भीतीला घाबरतात. सध्या देशात सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. कुणी ‘ब्र’ देखील काढलं तर त्याचे काय होईल सांगता येत नाही. म्हणून लोक गप्प आहेत. पण काही लोकांना कुणाच्या ना कुणाच्या चुका काढण्याची सवय लागलेली असते. प्रशांत किशोर नावाचे एक गृहस्थ ज्यांचे पूर्ण नाव प्रशांत किशोर पांडे आहे, मोठ्या चर्चेत आहेत. त्यांचा व्यवसाय म्हणजे कोणत्याही निवडणुकांच्या वेळी ज्या पक्षाला त्यांची सेवा हवी असते त्या पक्षाला ज्या ज्या राज्यात त्यांना एक एक मतदारसंघाचा, लोकसभा असो की विधानसभा, त्या मतदारसंघाचे सर्वेक्षण करून डेमोग्राफिक डेटा तयार करण्यास सांगतात. कोणत्या पक्षाला किती पाठिंबा आहे? येत्या निवडणुकीत मतदारांचे कार्य कोणत्या पक्षाकडे आहे अगदी बारकाईने एकदम सूक्ष्म तपशील तयार करतात आणि मग विश्लेषण करून कोणता पक्ष त्या मतदारसंघातून निवडून येईल त्याच्या उमेदवारांचे प्रोफाइल तयार करतात. त्यांनी निवडणुकीत काय करावे काय नाही, भाषण किती करावे, कोणत्या गोष्टी सांगाव्यात त्या भाषणातून आणि कोणत्या गोष्टी सांगू नयेत या सर्वांचे प्रशिक्षण ते देतात. आपल्या या कामासाठी एका मदरासंघासाठी प्रशांत किशोर २-३ कोटी रु. फी आकारतात. त्यांनी गेल्या दोन दशकांपासून बऱ्याच राजकीय पक्षांना आपली सेवा पुरवली आहे. सध्याच्या घडीला ते हे काम पुढे करू पाहात नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे. पश्चिम बंगाल येथे झालेल्यानिवडणुकीत त्यामी जो अंदाज व्यक्त केला होता तो शंभर टक्के सत्यात उतरला. त्यांनी भाजपला आव्हान दिले होते की तो पक्ष १०० जागांच्या जवळपासही फिरकणार नाही, हेदेखील खरे ठरले. यानंतरच त्यांनी आपले मन बदलले की काय माहीत नाही. त्यांना आता निवडणूक स्ट्रॅटेजिस्टचे काम करायचे नसून स्वतः सक्रीय राजकारणात यायचे आहे, असे संकेत त्यांनी दिले आहेत. यासाठी राजकीय जमीन शोधण्याची त्यांनी सुरुवात केली. ममता बॅनर्जी तर त्यांच्याबरोबर होत्या. आणि आहेतच. त्यांच्याव्यतिरिक्त त्यांनी इतर राजकारण्यांच्या गाठीभेटी घेतल्या. शरद पवार यांच्यासारखे नेते अशा विश्लेषकांाना महत्त्व देत नसतात. तरीदेखील त्यांनी त्यांना भेट दिली. नंतर ते काँग्रेस पक्षाकडे गेले. काय चर्चा झाली माहीत नाही, ण तेथून ते रिकाम्या हाती परतले. ताकाला जाताना त्यांनी भांडे लपवले असले तरी सोनिया गांधी आणि राहूल व प्रियांका यांना प्रशांत किशोर यांना नेमके काय हवंय याचा अंदाज आला असणार. त्यांना ममता बॅनर्जींनी आश्वासन दिले असेल. राज्यसभेत पाठवण्याचे, पण तेवढ्यानेच ते राष्ट्रीय राजकारणात सक्रीय भूमिका कसे साकारणार? म्हणूनच त्यांनी राष्ट्रीय पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रीय राजकीय नेता शरद पवारांची भेट घेतली. पण कुठेच काही मिळाले नाही. शिवाय त्यांनी हासुद्धा विचार केला असेल की जोपर्यंत राहुल आणि प्रियांका गांधी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आहेत तोपर्यंत तर त्यांना पंतप्रधान होण्याची संधी मिळणार नाही. म्हणून आता त्यांनी काँग्रेस पक्षावर टीका करतानाच भाजपचे कौतुक करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे भाजप भविष्यात जरी सत्तेतून बाहेर गेला तरी राष्ट्रीय राजकारणातून संपणार नाही. त्यांच्या या वक्तव्याची गरज काय होती? कोणताही पक्ष एकदा राजकारणात सक्रीय झाला तर तो कायमचा राजकारणात राहातो. भाजप सत्तेत येण्याआधीही राजकारणात होता आणि जरी सत्तेतून बाहेर गेला तरी तो राजकारणात राहणारच. एकानंतर दुसरा पक्ष बाहेर पडला की तो राष्ट्रीय राजकारणातून बाहेर जाणार असे कधीच होत नाही. मग प्रशांत किशोर यांना ही गोष्ट सांगायची गरज काय होती? भाजपला समर्थन देण्यापलीकडे त्यांचा हेतू दुसरा काय असू शकतो! त्यांच्या बाबतीत असे देखील म्हटले जाते की एका पक्षासाठी काम करताना त्याच राज्याच्या निवडणुकीत कुठे भाजपची परिस्थिती जिंकण्याची असेल तर त्या मतदारसंघाचे ते विश्लेषण करत नाहीत जेणेकरून भाजपसमोर आव्हान नसावे. याच भूमीकेत ममता बॅनर्जीही दिसतात. त्यांना राष्ट्रीय राजकारणात यायचे की नाही हे त्यांनी अजून ठरवलेले नसले तरी पश्चिम बंगालची सत्ता कायम राहिती तर देशात भाजपचे सरकार आले तर त्यांना आक्षेप नाही. त्यांनी इतर प्रांतीय पक्षांबरोबर आघाडी करण्याचे संकेत जरी दिले असले तरी त्या खरेच भाजपसमोर आव्हान उभे करणार का हा प्रश्न आहे. ममता बॅनर्जी यांनी सुद्धा काँग्रेसविरूद्ध तसाच मोर्चा उघडला आहे जसा प्रशांत किशोर पांडे यांनी. त्या म्हणतात की काँग्रेस पक्ष गंभीर नसल्याने त्याची मदत भाजपला होणार आहे. म्हणजे दुसऱ्या अर्थाने त्यांचेही समर्थन भाजपला आहे, असा अर्थ काढला तर ते युकीचे ठरणार नाही. हे झाले भाजपबाहेरचे त्याचे समर्थक. आता काँग्रेसमधीलच भाजपेच समर्थक म्हणजे ज्यांना प्रियांका आणि राहुल नको आहेत असे जी-२३ ग्रुपचे नेते. यात प्रामुख्याने कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद वदैरे २३ काँग्रेसी नेते आहेत. या सर्वांची अडचण एकच – काही केल्या प्रिंयाका आणि राहुल गांधी असताना त्यांना पंतप्रधानाची खुर्ची मिळणार नाही आणि त्या गोधांचे वय पाहता बराच काळ त्यांना आव्हान कायम राहाणार आहे, ही वास्तविकता!
- सय्यद इफ्तिखार अहमद
संपादक,
मो.: ९८२०१२१२०७
Post a Comment