भारताला क्रिकेटच्या बाबतीत जगात शहनशाहा संबोधले जाते. कारण क्रिकेटच्या बाबतीत भारताच्या खेळाडूंनी तसा इतिहासात सुध्दा रचला आहे व इतिहास घडविणारे खेळाडू आजही आहेत. परंतु पाकिस्तान सोबतची शर्मनाक हार आणि न्युझीलंड सोबतची बेजबाबदारपणाची खेळी यामुळे भारतीय क्रिकेट संघाचा खेळण्याचा स्तर पूर्णपणे घसरल्याचे सध्याच्या परिस्थितीत दिसून येते.
कोणताही खेळ म्हटला की हार किंवा जीत अटल आहे यात दुमत नाही. परंतु भारताची पाकिस्तान व न्युझीलंड सोबतची हार ही खेळ जगतच्या इतिहासात नोंदविल्या जाईल. कारण भारतासह जगातील क्रिकेट प्रेमिंना भारतीय क्रिकेट संघाकडून अशी निराशाजनक हार अपेक्षा नव्हतीच. परंतु भारताच्या खेळाडूंच्या खेळण्यावरुन स्पष्ट दिसून आले की खेळाडूंची खेळण्याची एकाग्रता पूर्णपणे भंगल्याचे दिसून आले. कारण भारतीय क्रिकेट संघाच्या अशा घाणेरड्या खेळांवरून लक्षात येते की भारतीय क्रिकेट खेळाडूंना जास्तच घमंड आल्याचे स्पष्ट दिसून आले. त्यांच्या खेळण्यामध्ये आपुलकीची भावना दिसून आली नाही.
आज जगातील संपूर्ण क्रिकेट बोर्डाचा विचार केला तर भारतीय क्रिकेट बोर्ड व भारतीय क्रिकेट खेळाडू सर्वात जास्त श्रीमंत असल्याचे दिसून येते. त्यामुळे पाकिस्तान व न्युझीलंड सोबत झालेली हार भारताची 130 कोटी जनता कदापि सहन करणार नाही. भारताच्या या शर्मशार हारण्याचे दु:ख संपूर्ण माजी खेळाडूंना झाले. कारण त्यांनी इतिहास घडविला आणि यांनी इतिहास गमवीला. त्यामुळे क्रिकेट बोर्ड व क्रिकेट संघामध्ये मोठा फेरबदल करण्याची गरज आहे.
जगात सध्या भारतातील क्रिकेट खेळाडू नामांकित आहे.परंतु भारताची लगातार दुसऱ्यांदा शर्मशार हा भारतवासीयांसाठी आणि क्रिकेट प्रेमींसाठी दु:खद व चिंताजनक विषय आहे. न्युझीलंड सोबत झालेल्या हारीमुळे क्रिकेट संघात नामुष्की दिसून आली. यामुळे टिममॅनेजमेंटने व कॅप्टनने मीडीयासमोर तोंड दाखवायला सुध्दा आले नाही. या ठिकाणी टिममॅनेजमेंटने जसप्रीत बुमराहला आपली ढाल बनविली व या ढालीच्या मागे लपून बसले. यावरून असे वाटते की भारतीय क्रिकेट संघ एवढा कसा काय अपंग झाला. भारतीय क्रिकेट संघाची ढासळती परीस्थिती पहाता सरकारने संपूर्णपणे ऑलिंपिक खेळांकडे वळले पाहिजे. कारण भारतातील क्रिकेट आयपीएलमुळे क्रिकेट खेळाडूंमध्ये जास्तच घमंड आल्याचे दिसून येते.
आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून करोडोंची कमायी करायची व आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलेंडर होऊन नामुष्की पत्करायची याला खेळ म्हणता येणार नाही तर 11 खेळाडूंनी 130 कोटी जनतेच्या डोळ्यात धुळ झोकून बेवकूफ बनविले व संपूर्ण भारतात नैराश्याचे वातावरण निर्माण केले. क्रिकेटच्या आजच्या संघाने कपील देव, गावस्कर, चेतन शर्मा, अझरूद्दीन, वेंगसरकर, तेंडुलकर, विश्वनाथ असे अनेक महान खेळाडू आजही भारतात आहे. त्यांना क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या अनुभवाची ताकद भारतीय क्रिकेट संघाने आपल्या खेळांमध्ये संपूर्णपणे झोकली पाहिजे व पुढे चालून पाकिस्तान व न्युझीलंड सारखी शर्मनाक हार पुन्हा उदभवनार नाही याची दक्षता घेतली पाहिजे.
- रमेश कृष्णराव लांजेवार
नागपूर, मो.नं.९३२५१०५७७९
Post a Comment