वसमत
या कार्यक्रमाची सुरवात पवित्र कुरआन च्या श्लोका ने झाली, कार्यक्रमात शेकडो लोकांची उपस्थिती होती. त्यामध्ये प्रामुख्याने प्रतिष्ठित व्यापारी बंधू, ज्येष्ठ नागरिक, कर्मचारी व पत्रकार बांधव होते. मौलाना म. इम्तियाज बरकाती साहेब यांनी सांगितले की, एक मुस्लिमेतर माणूस मदिन्यातील 'मस्जिद-ए-नबवी' या पवित्र मस्जिदित येऊन जिथे नमाज पढतात तेथे उभे राहून चक्क लघुशंका करू लागला. काही लोक रागावुन उठले, पण प्रेषित मुहम्मद (स.) यांनी त्यांना रोखले आणि त्या माणसाला पूर्णपणे लघुशंका करू दिली, नंतर त्याला प्रेमाने समजावून सांगितले की, जरा स्वच्छता बाळगत जा, असे कुठेही लघुशंका करू नये. ही ती जागा नाही. ती व्यक्ती प्रेषितांच्या या सहिष्णुतापूर्ण व्यवहाराने इतकी प्रभावित झाली की, तो माणूस त्यांचा अनुयायी बनला. नांदेडचे प्रमुख मार्गदर्शक अब्दुल मजीद खान यांनी मस्जिद परिचय करून देतांना सांगितले की, आपण सर्व एक माता-पिताची संतान आहोत. या नात्याने आपण सर्व अपसात एकमेकांचे बहीणभाऊ आहोत. एकमेकांशी प्रेम आणि सेवा याचे नातेसंबंध असले पाहिजेत.
आपणा सर्वांचा मालक, पालक, शासक अल्लाह आहे. त्याच्याशिवाय कोणीही भक्तीस पात्र नाही. त्याच्याशिवाय कोणाचीही भक्ती करू नये. या पृथ्वीवर आपण सर्वांना भक्ती आणि परीक्षेच्या उद्देशाने जीवन देण्यात आले आहे. आपण सर्वांनी सरळमार्ग (पुण्याचा मार्ग) अवलंबून पाप करण्यापासून अलिप्त राहिले पाहिजे. कारण कर्माचे दोन्ही जगात परिणाम भोगावे लागतील. आपण सर्वांनी या पृथ्वीवर जीवन कसे व्यतीत करावे याचे मार्गदर्शन इस्लाममध्ये आहे. पवित्र कुरआन आणि आदरणीय प्रेषित मुहम्मद (स) इस्लामचे दोन स्रोत आहेत. दिव्य कुरआन अल्लाहने अवतरित केलेले आदेश आहे आणि प्रेषित मुहम्मद (स) यांनी कुरआननुसार प्रत्यक्ष आचरणाचे उच्चतम आदर्श जीवन जगून दाखविले आहे. त्यांचा आदर्श समोर ठेवून आचरण केले पाहिजे. आपण सर्वांचा मृत्यू अटळ आहे. मृत्यू कधीही अचानक येईल. याप्रमाणे इस्लामविषयी माहिती दिली गेली आणि पूर्वग्रहित गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न केले गेले.
आमच्या मुस्लिमेत्तर बांधवाचे अनेक शंका दूर केल्या. त्यामध्ये मस्जिद म्हणजे काय? नेमक मस्जिद काय असत? सृष्टीचा निर्माता, पालनकर्त्याची प्रार्थना कशी करतात? अजान व नमाज म्हणजे काय? याची सविस्तरपणे मराठी भाषेत सांगण्यात आले. हा कार्यक्रम बेनजीर जहाँ मस्जिद कमिटी (मंगळवारा मस्जिद) व स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (एसआयओ) वसमत शाखेच्या वतीने आयोजन करण्यात आला.

Post a Comment