Halloween Costume ideas 2015

भारतीय अर्थव्यवस्था चिंताजनक स्थितीत

Abhijit banerjee
या आठवड्यात अभिजित बॅनर्जी नावाच्या अर्थशास्त्राज्ञाने जेव्हा भारतात सुरू असलेल्या मंदीबद्दल चिंता व्यक्त केली आणि त्याच्या नावासमोर प्रतिष्ठित नोबेल पारितोषिक विजेता असे लिहून आले तेव्हा अनेक लोक चकित झाले. हे बॅनर्जी कोण, असा प्रश्‍न सगळेच एकमेकांना विचारू लागले आहेत. लगेच एक बातमी प्रमुख मीडिया हाऊसकडून दिली गेली की, यावर्षीचे अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक हे अभिजित भट्टाचार्यासह तिघांना मिळालेले आहे. त्यामुळे आश्‍चर्याचा सुखद धक्का बसला. जेव्हा या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा असे समजले की, अभिजित बॅनर्जी यांच्यासह त्यांची पत्नी एस्थर डफ्लो आणि मायकेल क्रेमा यांनाही अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळालेले आहे. श्री बॅनर्जी यांचे प्रारंभिक शिक्षण कलकत्ता विद्यापीठातून झाले व जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली येथून त्यांनी उच्चशिक्षण घेतले. पुढील संशोधनासाठी हावर्ड विद्यापीठ गाठले. गरीबी निर्मुलनासाठी मागच्या लोकसभेत काँग्रेसच्या जाहिरनाम्यात जी न्याय्य योजना सामील करण्यात आली होती ती अभिजित यांनीच तयार केलेली होती. या दाम्पत्याने, ’पुअर इकॉनॉमिक्स-ए रॅडिकल थिंकिंग ऑफ द वे टू फाईट ग्लोबल पावर्टी’ अर्थात जागतिक गरीबी निर्मुलनासाठी काय प्रयत्न व्हायला हवेत, याबद्दलचे संशोधन करून आपला अहवाल मांडला होता. त्यांच्याबरोबर काम करणारे क्रेमर हे आफ्रिकेतील संशोधक असून, बॅनर्जी यांनी भारतामध्ये संशोधन केलेले आहे. गरीबी दूर करण्यासाठी ज्या सरकारी योजना तयार केल्या जातात त्यामधील दोष आणि अडचणी याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी जे निष्कर्ष काढले त्याची सैद्धांतिक मांडणी केल्यामुळे आणि त्या मांडणीवरून रॉयल स्विडिश अकॅडमीने गरीबांच्या प्रश्‍नावर सगळ्या जगाचे लक्ष वेधले. उच्च दर्जाचे शिक्षण आणि रोजगाराच्या संधी या भरपूर प्रमाणात उपलब्ध करून दिल्यास लोकांची गरीबी लोक स्वतःच दूर करून घेतात. ती दूर करण्यासाठी शासनाला वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत, असे त्यांच्या संशोधनाचे निष्कर्ष आहेत.
    अमेरिकेतील एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, जगातलं दारिद्र्य कमी व्हावं यासाठी आम्ही गेल्या वीस वर्षांपासून प्रयत्न करतो आहोत. द्रारिद्र्य ही समस्या आहे, त्यावर कायमस्वरुपी उपाय योजण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. मात्र भारतीय अर्थव्यवस्था सध्या चिंताजनक आहे.     एकीकडे विरोधक सरकारवर ढासळत्या अर्थव्यवस्थेवरुन आणि समोर आलेल्या जीडीपीच्या आकडेवारीवरुन टीका करत असताना आता अर्थशास्त्रातील योगदानाबद्दल नोबेल मिळालेल्या अभिजित बॅनर्जी यांनीही ढासळत्या अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे येणार्‍या काळात अर्थव्यवस्था कुठल्या दिशेने मार्गक्रमण करेल हे सांगणे अद्यापि शक्य नाही.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget