Halloween Costume ideas 2015

मोबाईलवर तासनतास बोलणे बंद केली पाहिजे

विवाह सोपा करा कार्यशाळा : जुबेदा बाजी यांचे प्रतिपादन

नागपूर (डॉ. राशीद)
विवाह प्रक्रिया साधी आणि सोपी केली पाहिजे. विवाहित मुलींनी सासरमध्ये तनावमुक्त जीवन जगण्यांवर लक्ष द्यायला हवं. प्रत्येक गोष्ट शरियतच्या कसोटीत पाहून आचरण करायला हवं. घरातील वृद्धांना मान, सन्मान द्यायला हवा, त्यांची सेवा करायला हवी हे पुण्याचे काम आहे. वर्तमान काळात मोबाईल फोनवर तासन्तास बोलण्यामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे ते टाळले पाहिजे, असे प्रतिपादन नागपूर येथील जुबेदा बाजी यांनी येथे केले.
    जमाअत-ए-इस्लामी हिंद नागपूर महिला विभागातर्फे गड्डीगोदामच्या वाय.एम.सी.ए. हॉलमध्ये आयोजित ’विवाह सोपा करा’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. मंचावर जेबा खान यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरूवात इरफाना कुलसुम यांनी कुरआनमधील सुरे निसा आयत क्रमांक 34 आणि 35 से पठण केले. व त्याचा अनुवाद सादर केला. यावेळी त्या म्हणाल्या, कुटुंबामध्ये पतीचा दर्जा जबाबदारीचा आहे. चांगली पत्नी ती आहे जी आपल्या पतीची अज्ञाकारी आहे. पत्नीने पतीच्या अनुपस्थितीमध्ये अल्लाहच्या रक्षणातून पतीच्या अधिकारांची रक्षा करते. पती-पत्नीच्या मध्ये काही कारणाने वितुष्ट निर्माण झाल्यास मध्यस्थांची भूमिका प्रामाणिक असेल तर ते संबंध अल्लाहच्या कृपेने पुनःश्‍च बहाल होतात.
    यावेळी जेबा खान म्हणाल्या, इस्लामी सिद्धांतानुसार कोणतीही व्यक्ती अविवाहित रहायला नको. विवाह खूप साधेपणानं व्हावेत. प्रेषित हजरत मुहम्मद सल्ल. यांच्या काळात त्यांचे घनिष्ठ सोबती हजरत अब्दुल रहमान बिन औफ रजि. यांनी आपला विवाह खूपच साधारण पद्धतीने केला होता. या विवाहाबद्दल त्यांनी प्रेषित सल्ल. यांनाही कळविले नव्हते. प्रेषित सल्ल. यांनी आपल्या मुलींचे विवाह एकदम साध्या पणाने केले. त्यामुळे कमीत कमी प्रत्येक मुस्लिम बांधवांने प्रेषित सल्ल. यांचे अनुकरण करावे, असे आवाहनही जेबा खान यांनी केले.  त्या पुढे म्हणाल्या, श्रीमंत लोक आपल्या मुलींचे विवाह मोठ्या थाटामाटात करून आपला मोठेपणा दाखवतात. याचा परिणाम गरीब लोकांवरही होतो. तो ही कर्ज काढून का होईना आपल्या मुलीचा विवाह तसाच करायला जातो अन् तो अनंत अडचणीत फसतो. त्यातून त्याला बाहेर पडायला फार मोठा कालावधी जातो. त्यामुळे विवाह करताना सगळ्या स्तरातील लोकांनी साधेपणा स्वीकारावा. वायफळ खर्चाला फाटा देत समाजोपयोगी कामात तो खर्च करावा, असे आवाहनही खान यांनी केले. यावेळी उपस्थित महिलांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमास परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सुत्रसंचालन अफरोज अंजुम यांनी केले. जुबेदा बाजी यांनी दुआ केली.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget