Halloween Costume ideas 2015

नागरिकांनी मताधिकाराचा अवश्य वापर करावा

मुस्लिम बुद्धीजीवींच बैठक : रिजवानुर्रहेमान खान यांचे आवाहन

मुंबई (नाजीम खान)
कुरआन आम्हाला हताश न होता निराशेच्या पुढे जावून एकत्र होवून विचार करण्याची कला शिकवितो. एकात्मता ही कुठल्याही गठबंधनाची शक्ती असते. एकत्रितरित्या मतदान करणे आज सर्वात महत्त्वाचे झालेले आहे. आपल्या या प्रिय  राज्यातील सौहार्द, एकात्मतेचे वातावरण खराब करणार्‍या पक्षांना आपल्या मतांद्वारे उत्तर देण्याची ही संधी मतदारांनी सोडू नये, असे आवाहन रिजवानुर्रहेमान खान यांनी येथे केले.
    महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात मुंबईच्या खिलाफत हाऊसमध्ये जमाअत-ए-इस्लामी हिंद मुंबई मेट्रो द्वारा नुकतीच परिसरातील बुद्धीजीवींची बैठक घेण्यात आली. यावेळी खान बोलत होते.
    प्रास्ताविक मुंबई शहराचे अध्यक्ष अब्दुल हसीब भाटकर यांनी केले. यावेळी त्यांनी बैठकीचा उद्देश्य सांगितला. देशाच्या आणि राज्यातील राजकीय परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करताना जातीयवादी शक्ती ह्या मजबूत होत असून, धर्मनिरपेक्ष शक्ती ह्या कमकुवत होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीसचे प्रदेशाध्यक्ष मुहम्मद सिराज यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की, 2019 च्या निवडणुका ह्या 2009 आणि 2014 च्या तुलनेत एकदम भिन्न आहेत. मुंबईमध्ये सात जागांवर चांगले उमेदवार जिंकण्याच्या स्थितीमध्ये आहेत. मागील निवडणुकांचे विश्‍लेषण करताना त्यांनी सांगितले की, मागच्या वेळेस काही जागी अत्यंत कमी फरकाने धर्मनिरपेक्ष उमेदवार पराभूत झाले होते. यावेळेस परिस्थिती थोडी वेगळी आहे. मागच्या वेळेस नसलेली शिवसेना आणि भाजपची युती यावेळेस झालेली आहे.  तसेच  काँग्रेस-राष्ट्रवादीचीही यावेळी आघाडी झालेली आहे. म्हणून नागरिकांना यासंबंधी योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.
    मुहम्मद सिराज यांच्या वक्तव्यानंतर खुल्या चर्चेला सुरूवात झाली. ज्यात सर्व सहमतीने असे ठरले की, मुस्लिम समुदायाला जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे. देशासमोरील प्रमुख समस्या ह्या प्रचाराच्या केंद्रामध्ये ठेवण्यासाठी शक्य ते प्रयत्न करण्यात यावेत. सरकारी बजेटमध्ये शिक्षण, आरोग्य आणि जनकल्याणाच्या कार्यक्रमांना पर्याप्त निधी मिळावा यासाठी जनजागृती करण्यात यावी. शिवाय, मुस्लिमांचे मतदान विभाजित होणार नाही, यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या उमेदवारांमुळे मतदान विभाजित होण्याची शक्यता आहे त्यांच्या भेटी घेऊन त्यांनाही समजावण्याचा निर्णय घेण्यात आला. याच कार्यक्रमामध्ये जनतेचा जाहीरनामा म्हणून सार्वजनिक निवडणूक घोषणापत्र प्रकाशित करण्यात आले.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget