विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 चा उत्सव सुरू आहे. 21 ऑक्टोबर रोजी राजकीय नेते पेपर देत आहेत. तर 24 ऑक्टोबर रोजी जनतेने पक्षांना दिलेल्या गुणांचा निकाल लागणार आहे. गेल्या पाच वर्षात राजकीय पक्षांनी काय केले यावरून जनता आपला फैसला सुनावणार आहे. तसा पाठ्यक्रम नेत्यांसाठी अवघड नव्हता. मात्र तेवढा सोपाही नव्हता. गेल्या पाच वर्षाच्या सध्याच्या सरकारच्या कारकिर्दीचा अभ्यास आणि विरोधकांची भूमिका व त्यांचे कार्य यांचे मुल्यांकन होणार आहे. यानिमित्ताने नागरिकांच्या राजकीय प्रगल्भतेची कसोटी लागणार आहे. सत्ताधारी आणि विरोधक आम्हीच कसे चांगले आहोत, आम्हीच कसा राज्याचा विकास करू आणि आम्ही तुम्हाला हे देवू, ते देवू अशा भूलथापा व आश्वासने देत आहेत. खरं तर सध्या कलयुग आहे. जुमलेबाजीचे दिवसं आहेत. असे म्हटले जाते की, प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असते तसे राजकीय मंडळींनी निवडणुकीचा काळात जे काही बोलले त्याची पूर्तता नाही झाली तर ते माफीत ग्राह्य धरावं, अशीच अपेक्षा ठेवून आहेत. त्यामुळे जनतेने कोणाचं काय ऐकावं, की स्वतः पेन, वही घेऊन अभ्यास करून मतदान करावं की जनतेपर्यंत अपडेट पोहोचविणार्या चौथ्या स्तंभावर विश्वास ठेवावा याचं जनतेनं विचार करायचा आहे. चौथ्या स्तंभातील अधिकतर दृकश्राव्य, मुद्रीत माध्यमं आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे ’मॅनेज’ झाल्याचे वृत्तांकनामधून दिसत आहे. त्यामुळे विश्वासाचं साधन सध्यातरी जनतेला आपला विवेकच आहे, अशी चर्चा नागरिकांत होत आहे. नैतिकतेचा लवलेश उरला नाही, निष्ठेची वाट लागली, विचारांचा गोंधळ आहे आणि विकास तर नेत्यांचा होताना दिसत आहे, राज्य कर्जाच्या डोंगराखाली दबलेले आहे. मात्र नित्याच्या दीड जीबी डेटामुळे बेरोजगारांना रस्त्यावर आंदोलने करायला वेळ मिळाला नाही. महाराष्ट्र विकासाच्या दृष्टीने अजून तेवढा रसातळाला गेला नाही मात्र अशीच परिस्थिती राहिली तर जायलाही वेळ लागणार नाही.
सत्तेकरी वाटेकरी, विरोधक मॅनेजकरी अन् जनता वार्यावरी. तसं पाहिलं तर सध्या सत्ताधार्यांचा धुमाकूळ जास्त आहे. विरोधक आपलं-आपलं क्षेत्र सांभाळण्यात गुंतले आहेत. तरी परंतु, मेगाभरतीतून उरल्या सुरल्या विरोधकांनी रान उठवलं आहे. ते पक्के विरोधक बणून काम करत आहेत. त्यांनाही ईडीने खेटून पाहिलं मात्र उलटा फार्स इडीवरच पडल्याने इडी सध्या शांत आहे. त्यामुळे राज्यात सत्ताधार्यांच्या विरोधात लाट असल्याचे वातावरण आहे. संतांच्या भूमीतील विवेकशील मतदार कोणाला आपलं बहुमुल्य मत देऊन सत्तेवर बसवितात, त्यासाठी 24 ऑक्टोबरचा दिवस उजाडणे आवश्यक आहे. तोपर्यंत मतदार व सर्व राजकीय पक्षांना बेस्ट ऑफ लक.

- बशीर शेख
Post a Comment