आता मी थोडक्यात आपल्याला सांगणार आहे की, आपण कुठल्या उद्देशासाठी उठून उभे राहिलेलो आहोत. आपण सर्व त्या लोकांसाठी जे स्वतःला इस्लामचा पाईक मानतात, हा संदेश देऊ इच्छितो की, त्यांनी वास्तवमध्ये इस्लामला आपला दीन (धर्म / व्यवस्था) बनवायला हवा. त्याला व्यक्तीगत आणि सामुहिक जीवनामध्ये लागू करावयास हवा. त्याच्या इस्लामी तत्वांना आपल्या घरामध्ये, आपल्या परिवारामध्ये, आपल्या सोसायटीमध्ये , आपल्या शैक्षणिक संस्थांमध्ये, आपल्या साहित्य आणि पत्रकारितेमध्ये, आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या आर्थिक उलाढालीमध्ये, आपल्या सामाजिक संस्थांमध्ये, आपल्या इतर संघटनांमध्ये आणि सामुहिक रितीने आपल्या कौमी पॉलीसी (मुस्लिम समाजाच्या नीती निर्धारणामध्ये) प्रत्यक्षात लागू करावे आणि आपल्या वाणी आणि कृतीने जगापुढे इस्लाम खरा असल्यासंबंधीची खर्या अर्थाने साक्ष द्यावी.
आम्ही त्यांच्यासमोर हे ही स्पष्ट करू इच्छितो की, मुस्लिम होण्याच्या नात्याने धर्माची स्थापना करणे आणि धर्मासंंबंधीची खरी साक्ष देणे हाच तुमच्या जीवनाचा खरा उद्देश आहे. यामुळे तुमच्या सार्या प्रयत्नांचा केंद्रबिंदू याच गोष्टीवर फोकस व्हायला पाहिजे. तुम्हाला ते प्रत्येक काम सोडून द्यावे लागतील जे या उद्देशाच्या विपरीत असतील आणि इस्लामविषयी चुकीचे प्रतिनिधीत्व करत असतील. इस्लामला केंद्रस्थानी ठेऊन आपल्या पूर्ण जीवनाचा आढावा घ्या. पुन्हा एकदा सर्व गोष्टी तपासून पाहा. जेथे त्रुटी आढळतील त्यांना दूर करा आणि आपले सर्व प्रयत्न याच एका मार्गामध्ये लावून टाका जेणेकरून इस्लाम संपूर्णपणे प्रत्यक्षात प्रत्येकाच्या जीवनात आणि समाजात प्रस्थापित होवून जाईल. या संबंधीची साक्ष व्यवस्थित दिली जाईल, याकडे लक्ष द्या. जेणेकरून कोणालाही असे सांगण्याची संधी मिळू नये की, आम्हाला तर सत्यमार्गाची कल्पनाच नव्हती.
हा आहे जमाअत-इस्लामीच्या स्थापनेमागचा एकमेव उद्देश्य. या उद्देशाच्या प्राप्तीसाठी जी पद्धत आम्ही अवलंबिलेली आहे ती ही आहे की, सर्वप्रथम मुस्लिमांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करून द्यावी. स्पष्ट शब्दात त्यांना सांगावे की इस्लाम काय आहे? आणि तो तुमच्याकडून काय अपेक्षा करतो? मुस्लिम असण्याचा अर्थ काय आहे? आणि मुस्लिम होताच कुठल्या जबाबदार्या त्यांच्यावर येतात?
जेव्हा लोक या गोष्टी समजून घेतात तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की, इस्लामला अपेक्षित असलेले सर्व काम व्यक्तीगतरित्या साध्य करणे शक्य नाही. त्यासाठी सामुहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. इस्लामचा एक छोटासाच भाग व्यक्तीगत जीवनाशी संबंधी आहे. त्याची स्थापना तुम्ही स्वतःच्या जीवनामध्ये करूनही घेतली तरी संपूर्ण इस्लामी व्यवस्थेला त्यामुळे समाजात लागू करता येणार नाही किंवा संपूर्ण इस्लाम संबंधीची साक्ष पूर्णपणे देण्याची जबाबदारी पार पाडता येणार नाही. उलट जेव्हा सामुहिक जीवनावर कुफ्र (इन्कार करणार्यांची व्यवस्था) कायम असेल. तेव्हा व्यक्तीगत जीवनातील बहुतेक भागांवरही इस्लामी आदेश लागू करता येणार नाहीत आणि सामुहिक व्यवस्थेची पकड दिवसेंदिवस या व्यक्तीगत इस्लामच्या सीमांना कमी-कमी करत जाईल. म्हणून संपूर्ण इस्लामला कायम करण्यासाठी आणि त्याची खरी-खरी साक्ष देण्यासाठी आवश्यक आहे की, ते सारे लोक जे मुस्लिम असल्याच्या नात्याने इस्लामी ज्ञान बाळगून आहेत व प्रामाणिक पणे त्या ज्ञानाला लागू करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना संघटित होऊन, संघटित प्रयत्नांद्वारेच इस्लामला प्रत्यक्षात आपल्या व्यक्तिगत आणि सामुहिक जीवनामध्ये प्रस्थापित करता येईल. तेव्हाच ते जगाला आपल्याकडे बोलविण्याचा प्रयत्न करू शकतात. सामुहिकरित्याच ते या कामात येणार्या अडचणींवर मात करू शकतात. हेच कारण आहे की ज्यामुळे इस्लाममध्ये सामुहिकतेला अनिवार्य करण्यात आलेले आहे. इस्लामची प्रतिस्थापना करण्यासाठी आणि त्याच्या संदेशाकडे दुसर्यांना बोलावण्यासाठी, एक क्रम आणि योजना ठेवली गेलेली आहे. म्हणजेच अगोदर एक जमाअत असावी, मग त्या जमाअतने अल्लाहच्या मार्गामध्ये प्रयत्न करावेत. हेच कारण आहे की, जमाअत शिवाय जे लोक जीवन जगतात त्यांना अज्ञानी जीवन जगणारे असे संबोधले जाते आणि जमाअतपासून वेगळे राहणार्यांना इस्लामपासून विभक्त राहणार्यांच्या बरोबर असल्याचे भाकीत केले गेलेले आहे.
जे लोक ही गोष्ट समजतात आणि त्यातून त्यांच्यामध्ये मुस्लिम होण्याच्या नात्याने (त्यांच्यावर) येणार्या जबाबदार्यांची जाणीव एवढी मजबूत होऊन जाते की, ते आपल्या दीनसाठी आपले वैयक्तिक फायदे आणि अहंकाराचा त्याग करून जमाअतच्या अनुशासन आणि व्यवस्थेचा स्वीकार करतात, अशा लोकांसमोर आम्ही स्पष्ट करतो की, आता तुमच्यासमोर तीन मार्ग उपलब्ध आहेत आणि तुम्ही स्वतंत्र आहात की, या तिन्ही मार्गापैकी कुठलाही एक मार्ग स्वतःसाठी निवडू शकता. जर तुमचे मन साक्ष देत असेल की आमचा संदेश (दावत), श्रद्धा (अकीदा), उद्देश (मक्सद) आणि जमाअतची व्यवस्था व आमच्या काम करण्याच्या पद्धती सर्व काही शुद्ध इस्लामी आहे आणि आम्ही तेच काम करण्यासाठी उभे ठाकलेलो आहोत जे काम कुरआन आणि हदीसच्या अनुसार मुस्लिम उम्मतचे मुलभूत कार्य आहे तर आमच्यासोबत व्हा. जर काही कारणांमुळे तुम्हाला आमच्यावर व आमच्या कार्यपद्धतीवर विश्वास होत नसेल व तुमच्या नजरेमध्ये दुसरी एखादी जमाअत अशी असेल की जी इस्लामी व्यवस्थेच्या स्थापनेच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन इस्लामी पद्धतीने कार्य करीत असेल तर तुम्ही त्यात सामील होऊन जा. आम्हाला स्वतःला सुद्धा अशी जमाअत आढळून आली असती तर आम्ही तीत सामील झालो असतो, कारण की आम्हाला स्वतःची दीड विटांची वेगळी मस्जिद बनविण्याची इच्छा नव्हती आणि जर का तुम्हाला ना आमच्यावर विश्वास आहे ना कुठली दुसरी जमाअत अशी आढळून येते जी की तुमच्या अनुसार शुद्ध इस्लामी पद्धतीने कार्यरत आहे, तेव्हा तुमच्यावर हे अनिवार्य आहे की आपल्या इस्लामी कर्तव्याच्या पुर्तीसाठी स्वतः उभे रहावे आणि इस्लामच्या मुलभूत शिकवणीवर आधारित एक अशी जमाअत तयार करावी, जीचा उद्देश संपूर्ण दीन (इस्लाम)ची स्थापना करणे आणि वाणी आणि वर्तनाने त्याची साक्ष देणे असेल. या तीन मार्गापैकी जो मार्ग तुम्ही अवलंबाल इन्शाअल्लाह तो सत्यमार्ग असेल.

(मौलाना अबुल आला मौदूदी, शहादत-ए-हक या पुस्तकातून) (भाग - 6)
Post a Comment