माननीय अनस यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले की, ‘‘ही धर्मद्रोह्याची नमाज आहे, तो सूर्योदयाची वाट पाहात बसतो, अगदी तो उगवतोही आणि अनेकेश्वरवाद्यांची सूर्यपूजेची वेळ होते तेव्हा हा उठतो आणि घाईघाईत चार रकआत पूर्ण करतो (जसे कोंबडी जमिनीवर चोच मारते आणि वर उचलते). असा मनुष्य आपल्या नमाजमध्ये अल्लाहचे अजिबात स्मरण करीत नाही.’’ (हदीस : मुस्लिम)
स्पष्टीकरण
या हदीसद्वारा ईमानधारक आणि धर्मद्रोह्याच्या नमाजमधील फरक स्पष्ट करण्यात आला आहे. ईमानधारक आपली नमाज वेळेवर अदा करतो, रुकुअ आणि सजदा योग्य पद्धतीने
करतो, त्याचे मन अल्लाहच्या स्मरणात गुंतलेले असते आणि धर्मद्रोह्याची नमाज वेळेवर अदा होत नाही, रुकुअ व सजदा योग्य प्रकारे करीत नाही आणि त्याचे मन अल्लाहसमोर नसते. खरे पाहता प्रत्येक नमाज महत्त्वाची आहे, परंतु ‘फजर’ आणि ‘अस्र’च्या नमाजचे महत्त्व अधिक आहे. ‘अस्र’ची वेळ गफलतीची असते. सर्वसाधारणपणे सर्व लोक आपापल्या कामात असतात आणि रात्र होण्यापूर्वी आपला व्यापारउदीम आटोपण्याच्या प्रयत्नात असतात आणि आपल्या विखुरलेल्या कामांना पूर्ण करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. म्हणून ईमानधारकाची बुद्धी जागृत नसेल तर ‘अस्र’ची नमाज सुटण्याची शक्यता असते. तसेच सकाळच्या नमाजचे महत्त्व यासाठी आहे की झोपेची वेळ असते. सर्वांना ठाऊक आहे की रात्रीच्या शेवटच्या प्रहरची झोप गाढ व गोड असते. जर मनुष्याच्या मनात ईमान जागृत नसेल तर तो आपल्या प्रिय झोपेला सोडून अल्लाहचे स्मरण करण्यासाठी उठू शकत नाही.
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जमिनीची देखरेख करणारे रात्र आणि दिवसाचे ‘फरिश्ते’ (देवदूत) आपल्या कामाच्या वेळा बदलत असतात आणि ‘फज्र’ आणि ‘अस्र’च्या नमाजमध्ये एकत्र येतात, मग जे फरिश्ते तुमच्यात असतात ते आपल्या पालनकर्त्यासमोर जातात तेव्हा तो त्यांना विचारतो की तुम्ही माझ्या भक्तांना कोणत्या स्थिती सोडले? तेव्हा ते म्हणतात की जेव्हा आम्ही त्यांच्याजवळ गेलो होतो तेव्हा ते नमाज अदा करीत होते आणि जेव्हा आम्ही त्यांना सोडले तेव्हा ते नमाज अदा करीत होते.’’ (हदीस : मुस्लिम)

ही हदीस ‘फज्र’ आणि ‘अस्र’च्या नमाजचे महत्त्व स्पष्ट करीत आहे. ‘फज्र’च्या नमाजमध्ये रात्रीचे ‘फरिश्ते’ (देवदूत) सहभागी होतात आणि ते फरिश्तेदेखील ज्यांना दिवसा काम करायचे असते. अशाप्रकारे ‘अस्र’च्या नमाजदेखील दोन्ही वेळचे फरिश्ते ईमानधारकांसह नमाजमध्ये सहभागी असतात. ईमानधारकांना फरिश्त्यांचा सहवास लाभावा यापेक्षा मोठे सुदैव ते कोणते. माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘सात प्रकारचे लोक अल्लाह आपल्या छायेत जागा देईल, त्या दिवशी अल्लाहच्या छायेव्यतिरिक्त दुसरी कोणतीही छाया नसेल. (१) न्याय करणारा सम्राट, (२) अल्लाहच्या भक्तीत आपले तारुण्य व्यतीत करणारा तरुण, (३) असा मनुष्य ज्याचे मन मस्जिदशी अडकलेले असते, जेव्हा तो मस्जिदमधून बाहेर पडतो तेव्हा पुन्हा दुसऱ्यांदा मस्जिदमध्ये प्रविष्ट होण्याची वाट पाहत असतो, (४) ती दोन माणसे ज्यांच्या मैत्रीचा आधार अल्लाह आणि अल्लाहचा ‘दीन’ (इस्लाम) आहे, त्याच भावनेसह ते एकत्र येतात आणि त्याच भावनेसाठी ते अलिप्त होतात, (५) तो मनुष्य ज्याने एकांतात अल्लाहचे स्मरण केले आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले, (६) तो मनुष्य ज्याला एखाद्या उच्च कुलीन सौंदर्यवतीने दुष्कृत्यासाठी बोलविले आणि त्याने फक्त अल्लाहच्या भयापोटी तिला नकार दिला आणि (७) तो मनुष्य ज्याने अशाप्रकारे ‘सदका’ (दानधर्म) केला की त्याच्या डाव्या हातालादेखील माहीत नाही की उजव्या हात काय देत आहे.’’
(हदीस : मुत्त़फक अलैहि)
(हदीस : मुत्त़फक अलैहि)
Post a Comment