१५१३ जणांनी केले रक्तदान
ईद -ए-मिलादन्नु बी (सल्ल.) निमित्त नागपरू मध्ये जमाअते इस्लामी हिंद, आयआरडब्ल्यू, युथविंग, जेआयएच वुमेन वंग, मेडिकल सर्व्हीस सोसायटीतर्फे रक्तदान शिबीर घेण्यात आले. कार्यक्रमाची सुरूवात कुरआन पठणाने करण्यात आली. या शिबिरात सर्वधर्मीय ६५० बांधवांनी रक्तदान करीत प्रेषित सल्ल. यांच्यावरील आपले प्रेम व्यक्त केले.
शहरातील न्यू चोपडे लॉन, अवस्ती चौक, जाफर नगर, मुस्लिम लायब्ररी मुहम्मद अलीसराय मोमीनपुरा, गुजरी बाजार कामठी आदी ठिकाणी शिबीर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन पी.आय. विनोद चौधरी यांनी रक्तदान करून केले.
यावेळी रक्तसंकलन रेनबो ब्लड बॅंक जीवनज्योती, मेओ हॉस्पीटल, डागा हॉस्पीटल, शासकीय मेडिकल कॉलेज यांनी केले. शिबीराच्या यशस्वीतेसाठी मुहम्मद उमर खान, रफिक शेख, हामीद यजदानी, डॉ. एम.ए. रशीद, शकील अहेमद आदींसह अनेकांनी परीश्रम घेतले.
औरंगाबाद येथे झालेल्या रक्तदान शिबीरात जवळपास ६०० जणांनी रक्तदान केले. शहरातील पैठण गेट, टाऊन हॉल, सुनूस कॉलनी आदी ठिकाणी शिबीर घेण्यात आले. शिबीराच्या यशस्वीतेसाठी वाजीद अली खान, वाजीद काद्री,इम्रान अहेम, फुरकान शेख, नाजीश सिद्दीकी, फजल कुरेशी आदींसह जमाअते इस्लामी हिंदच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. येथेही सर्वधर्मीय बांधवांनी रक्तदान शिबीरात भाग घेतला. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे १३० जणांनी रक्तदान केले. अकोला येथे ११३ जणांनी तर नांदेड येथे २० जणांनी रक्तदान केले.
Post a Comment