(११) तुमच्या संततीविषयी अल्लाह तुम्हाला आदेश देत आहे की पुरुषाचा वाटा दोन स्त्रीयांच्या बरोबर आहे.१५ जर (मृताचे वारस) दोनपेक्षा जास्त मुली असतील तर त्यांना वारसासंपत्तीपैकी दोन तृतीयांश दिला जावा१६ आणि जर एकच मुलगी वारस असेल तर अर्धी वारसासंपत्ती तिची होय. जर मृतास संतती असेल तर त्याच्या आईवडिलांपैकी प्रत्येकाला वारसासंपत्तीचा सहावा वाटा मिळाला पाहिजे.१७ आणि जर तो नि:संतान असेल आणि आई-वडीलच त्याचे वारस असतील तर आईला तिसरा वाटा दिला जावा.१८ आणि जर मयताचे भाऊ बहिणीसुद्धा असतील तर आई सहाव्या हिश्याची वाटेकरी असेल.१९ (या सर्व वाटण्या त्यावेळी काढल्या जातील) जेव्हा मृत माणसाने केलेले मृत्यूपत्र पूर्ण केले गेले असेल आणि त्याच्यावर असलेले कर्ज अदा केले गेले असेल.२० तुम्हाला माहीत नाही की तुमचे आई-वडील व तुमच्या संततीपैकी कोण लाभाच्या दृष्टीने तुमच्या अधिक जवळ आहे. हे हिस्से अल्लाहने ठरवून दिलेले आहेत, आणि अल्लाह नि:संशय सर्व हकीगती जाणणारा आणि सर्व गर्भित हेतू जाणणारा आहे.२१
(१२) आणि तुमच्या पत्नींनी जे काही मागे सोडले असेल त्याचा अर्धा वाटा तुम्हाला मिळेल, जर त्या नि:संतान असतील, परंतु संतती असल्यास वारसासंपत्तीमध्ये एक चतुर्थांश वाटा तुमचा आहे जेव्हा की त्यांनी जी वसीयत (मृत्यूपत्र) केली असेल ती पूर्ण करण्यात यावी, आणि कर्ज जे त्यांच्या अंगावर असेल ते अदा करण्यात यावे, व त्या तुम्ही पाठीमागे ठेवलेल्या संपत्तीच्या एक चतुर्थांशच्या वाटेकरी असतील जर तुम्ही नि:संतान असाल, परंतु संतान असल्यास त्यांचा वाटा एक अष्टमांश असेल,२२
१५) वारसा हक्कासंबंधीचा हा सर्वप्रथम सैध्दान्ति आदेश आहे की पुरुषाचा वाटा स्त्रीपेक्षा दुप्पट आहे कारण शरियतने कौटुंबिक जीवनात पुरुषावर अधिक आर्थिक जबाबदारींचे ओझे टाकलेले आहे आणि स्त्रीला बहुतांश आर्थिक जबाबदारीच्या ओझ्यांपासून अलिप्त् ठेवले आहे. म्हणून न्यायोचित हेच होते की वारसा हक्कात स्त्रीचा वाटा पुरुषापेक्षा कमी ठेवला जावा.
१६) हाच आदेश दोन मुलींचासुद्धा आहे. म्हणजे एखाद्याने मागे मुलगा सोडला नसेल आणि त्याला मुलीच असतील मग त्या दोन असोत की अधिक, त्यांना संपत्तीचा दोनतृतीयांश (२/३) वाटा मिळेल आणि बाकी एकतृतीयांश (१/३) दुसऱ्या नातेवाईकांत वाटला जाईल. मृतकाचा जर एकच मुलगा असेल आणि इतर वारस नसतील तर गैरहजेरीत त्याला संपूर्ण संपत्ती मिळेल आणि जर दुसरे वारस असतील तर त्यांचा वाटा देऊन बाकीची सर्व संपत्ती त्याची असेल.
१७) म्हणजे मृतकाची संतती असल्यास मृतकाच्या आईवडिलांपैकी प्रत्येक जण सहाव्या हिश्याचा वाटेकरी असेल. मग मृतकाचे वारस फक्त मुली असोत, फक्त मुले असोत, मुले आणि मुली दोन्ही असो, एक मुलगा असो किंवा एक मुलगी असो. राहिले दोनतृतीयांश (२/३) तर त्याच्यात दुसरे इतर वारस वाटेकरी असतील.
१८) आईवडिलांशिवाय कोणी दुसरा वारस नसेल तर बाकी दोनतृतीयांश (२/३) हिस्सा बापाला मिळेल. नसता दोनतृतीयांश (२/३) हिश्यामध्ये बाप आणि दुसरे इतर वारस सामील होतील.
१९) बहीण भाऊ असतील तर आईचा वाटा १/३ (एकतृतीयांश) ऐवजी सहावा केला आहे आणि आईच्या वाट्यातून सहावा हिस्सा जो घेतला गेला तो वडिलाच्या वाट्याला येईल कारण या स्थितीत वडिलांची जबाबदारी वाढते. येथे हे स्पष्ट लक्षात ठेवावे की मृतकाचे आई-वडील जिवंत असतील तर मृतकाच्या बहीण भावाला हिस्सा (वाटा) मिळत नाही.
२०) मृत्यूपत्राच्या उल्लेखाला कर्जावर प्राथमिकता यासाठी दिली आहे कारण मृतक कर्जदार असेलच असे नाही. परंतु मृत्यूपत्र करणे त्याच्यासाठी आवश्यक आहे. परंतु आदेशाच्या दृष्टीने मुस्लिम समुदाय यावर एकमत आहे की कर्जाला मृत्यूपत्रावर प्राथमिकता आहे. म्हणजे मृतकाच्या डोक्यावर कर्ज असेल तर प्रथम मृतकाच्या संपत्तीतून ते कर्जे फेडले जाईल नंतर वसीयत पूर्ण केली जाईल आणि या नंतर वारसासंपत्तीचे वाटप केले जाईल. मृत्यूपत्रासंबंधी सूरह २, टीप १८२ मध्ये आम्ही दाखविले आहे की मनुष्याला आपल्या संपत्तीच्या तिसऱ्या हिस्स्यापर्यंत मृत्यूपत्र करता येते. हा नियम यासाठी आहे की वारसाहक्काच्या नियमानुसार ज्यांना वाटा मिळाला नाही त्यापैकी ज्यांना तो मदत करू इच्छितो त्यांना वाटा देऊ शकतो उदा. अनाथ नातवंडे असतील किंवा मुलाची विधवा पत्नी सकंटात आहे. भाऊ, बहीण, वहिनी, भाचा, पुतण्या किंवा एखादा नातेवाईक ज्याला मदतीची गरज आहे तर त्यांच्यासाठी वाटा तो मृत्यूपत्राद्वारा निश्चित करू शकतो. जर नातेवाईकांपैकी कोणी नसेल तर जनहिताच्या कामात वसीयतनामा करू शकतो. सारांश असा की मनुष्याच्या एकूण मिळकतीतून दोन तृतीयांश (२/३) किंवा काही जास्त वाट्याविषयी शरीयतने वारसाहक्कासाठी चे नियम बनविले आहेत, त्याद्वारे शरीयतनुसार वारसांना वाटा मिळेल. एकतृतीयांश (१/३) किंवा त्यापेक्षा काही कमी त्या मनुष्यावर सोपविले गेले की त्याने आपल्या पारिवारिक स्थितीनुरुप ज्याप्रमाणे योग्य समजले त्याप्रमाणे वाटप करण्यासंबंधी मृत्यूपत्र करावे. यानंतर जर कोणी आपल्या मृत्यूपत्रात (वसीयत) अत्याचार करील म्हणजे आपल्या अधिकाराचा चुकीच्या मार्गाने वापर करील ज्यामुळे कुणी वैध हक्कापासून वंचित होत असेल तर त्याच्यासाठी विकल्प ठेवला गेला आहे की परिवारातील लोकांनी सहमतीने त्या वसियतला दुरुस्त करावे किंवा काझीचा याविषयी सल्ला घेऊन मृत्यूपत्र (वसीयतनामा) दुरुस्त करावा.
२१) हे उत्तर आहे त्या सर्व अविचारी लोकांना जे वारसा हक्कांच्या या ईशकायद्याला समजत नाहीत आणि आपल्या मर्यादित आणि सदोष बुद्धीने त्या कमतरतेला पूर्ण करू पाहतात जी त्यांच्यामते अल्लाहनिर्मित कायद्यात राहून गेली आहे.
२२) म्हणजे एक पत्नी असो की अनेक, संतती असण्याच्या स्थितीत ती आठव्या हिस्स्याची आणि संतती नसल्याच्या स्थितीत एक चतुर्थांशची वाटेकरी असेल. हा चौथा किंवा आठवा वाटा सर्व पत्नींमध्ये बराबर वाटला जाईल.

Post a Comment