Halloween Costume ideas 2015

अर्रअद : ईशवाणी (सुबोध कुरआन)


(३०) हे पैगंबर (स.)! याच वैभवाने आम्ही तुम्हाला पैगंबर बनवून पाठविले आहे४५ एका अशा जनसमूहात ज्याच्यापूर्वी अनेक जनसमूह होऊन गेले आहेत, जेणेकरून तुम्ही या लोकांना तो संदेश ऐकवावा जो आम्ही तुमच्यावर अवतरला आहे, अशा स्थितीत की हे आपल्या अत्यंत मेहरबान अल्लाहचे द्रोही (नाकारणारे) बनले आहेत.४६ यांना सांगा की तोच माझा पालनकर्ता आहे, त्याच्याशिवाय कोणीही ईश्वर नाही, त्याच्यावरच मी भरोसा केला व तोच माझे आश्रयस्थान आहे. 

(३१) आणि काय झाले असते जर एखादा असा कुरआन अवतरला गेला असता ज्याच्या शक्तीने पर्वत चालू लागले असते अथवा जमीन दुभंगली असती अथवा मृतलोक कबरीतून निघून बोलू लागले असते?४७ (अशा प्रकारच्या निशाण्या दाखविणे काही कठीण नाही.) किंबहुना सर्वाधिकारच अल्लाहच्या अखत्यारीत आहे.४८ मग काय ईमानधारक (आतापर्यंत नाकारणाऱ्यांच्या मागणीच्या उत्तरात एखादी निशाणी प्रकट होण्याची आशा लावून बसले आहेत आणि ते हे समजून) निराश झाले नाहीत की जर अल्लाहने इच्छिले असते तर सर्व मानवांना मार्गदर्शन केले असते?४९ ज्या लोकांनी अल्लाहशी द्रोहाची (इन्कार) वर्तणूक अवलंबिली आहे त्यांच्यावर त्यांच्या कृत्यामुळे कोणती न कोणती आपत्ती येतच असते अथवा त्यांच्या घराजवळ एखाद्या जागी आपत्ती कोसळत असते. हा क्रम चालू राहील येथपावेतो की अल्लाहचे वचन पूर्ण होईल. नि:संशय अल्लाह आपल्या वचनाविरूद्ध जात नाही.

(३२) तुमच्यापूर्वीदेखील कित्येक पैगंबरांची चेष्टा केली गेली आहे, परंतु मी सदैव इन्कार करणाऱ्यांना ढील दिली आणि सरतेशेवटी त्यांना पकडले. मग पाहा, माझी शिक्षा किती कठोर होती.


४५) म्हणजे अशा निशाणीविना ज्याची हे लोक मागणी करतात.

४६) म्हणजे त्याच्या उपासनेपासून विमुख झालेले आहेत. त्याच्या गुणांमध्ये, अधिकारांमध्ये आणि हक्कांमध्ये दुसऱ्याला त्याचा भागीदार बनवित आहेत आणि अल्लाहच्या देणग्यांच्या प्रती आभार मात्र दुसऱ्याचे व्यक्त करतात.

४७) या आयतला समजण्यासाठी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की यात संबोधन नाकारणाऱ्यांशी नाही तर मुस्लिमांशी आहे. मुस्लिम नाकारणाऱ्यांकडून नेहमी निशाण्यांची मागणी करताना ऐकत होते तेव्हा त्यांच्या मनात बैचेनी निर्माण होत होती की त्यांना एखादी निशाणी मान्य करण्यासाठी दाखविली गेली असती तर बरे झाले असते. अशाप्रकारची निशाणी उतरत नाही हे जेव्हा त्यांना कळून येत आणि याचमुळे विरोधकांना लोकांच्या मनात पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पैगंबरत्वाविषयी शंका निर्माण करण्याची संधी मिळते तेव्हा त्यांची ही बैचेनी आणखीनच वाढत होती. यावर मुस्लिमांना सांगितले जात आहे की कुरआनच्या एखाद्या अध्यायाबरोबर त्वरित निशाण्या दाखविल्या गेल्या असत्या तर काय या लोकांनी ईमान धारण केले असते? काय तुम्ही यांच्याविषयी आशावादी आहात की ते सत्य स्वीकारण्यासाठी तयार बसलेले आहेत, की केवळ एक निशाणी प्रकट होण्याची बाकी आहे? ज्यांना कुरआनच्या मार्गदर्शनात, सृष्टीच्या निशाण्यांमध्ये, पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पवित्र जीवनात तसेच त्यांच्या साथीदारांच्या जीवनक्रांतीमध्ये सत्यप्रकाश दिसत नाही, काय अशांना पर्वतांच्या चालण्याने, जमीन फाटल्याने आणि प्रेतांचे कबरीतून जिवंत निघाल्याने सत्यप्रकाश प्राप्त् होणार आहे?

४८) म्हणजे निशाण्या न दाखविण्याचे मूळ कारण हे नाही की अल्लाह त्यांना दाखविण्याचे सामर्थ्य राखत नाही. तर मूळ कारण म्हणजे या पद्धतीने काम घेणे अल्लाहच्या योजनेविरुद्ध आहे. कारण वास्तविकपणे अभिप्रेत मार्गदर्शन आहे, एका पैगंबराचे पैगंबरत्व मान्य करावयास लावणे नव्हे आणि लोकांच्या चिंतन आणि विवेकशक्तींचा सुधार झाल्याशिवाय मार्गदर्शन संभव नाही.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget