Halloween Costume ideas 2015


(७३) आणि जे सत्याचा इन्कार करणारे आहेत ते एकमेकांचे सहाय्य करीत असतात. जर तुम्ही हे केले नाही तर पृथ्वीवर उपद्रव आणि भयंकर बिघाड उद्भवेल.५१अ (७४,७५) ज्या लोकांनी श्रद्धा ठेवली आणि ज्यांनी अल्लाहच्या मार्गात घरदारांचा त्याग केला, संघर्ष केला व ज्यांनी आश्रय दिला व मदत केली तेच खरे श्रद्धावंत आहेत. त्यांच्यासाठी अपराधांची क्षमा व सर्वोत्तम उपजीविका आहे. आणि ज्या लोकांनी नंतर श्रद्धा ठेवली आणि स्थलांतर करून आले व तुमच्याशी मिळून संघर्ष तथा प्रयत्न करू लागले, त्यांचासुद्धा तुमच्यात समावेश आहे. पण अल्लाहच्या ग्रंथात रक्ताचे नातेवाईक आपापसांत एक दुसऱ्याचे अधिक हक्कदार आहेत.५२ नि:संशय अल्लाह प्रत्येक गोष्टीला जाणतो.


९. अत् तौबा

(मदीनाकालीन, एकूण १२९ आयती)

(१) मुक्तीची (करार समाप्त करण्याची) घोषणा आहे, अल्लाह व त्याचे पैगंबर (स.) कडून त्या अनेकेश्वरवादी लोकांसाठी ज्यांच्याशी तुम्ही करार केले होते. 

(२) तर तुम्ही देशात आणखी चार महिने संचार करून घ्या आणि जाणून असा की तुम्ही अल्लाहला असफल करणारे नाहीत, आणि अल्लाह सत्याचा इन्कार करणाऱ्यांना अपमानित करणारा आहे. 

(३,४) आम सूचना आहे, अल्लाह व त्याचे पैगंबर (स.) कडून हज्जे अकबर३ च्या दिवशी, तमाम लोकांच्यासाठी, की अल्लाह अनेकेश्वरवादी लोकांकडून जबाबदारीपासून मुक्त आहे, आणि त्याचा पैगंबरसुद्धा. आताही जर तुम्ही पश्चात्ताप केला तर ते तुमच्यासाठीच उत्तम आहे आणि जर तोंड फिरवीत आहात तर चांगले लक्षात ठेवा की तुम्ही अल्लाहला असफल करणारे नाहीत, आणि हे पैगंबर (स.)! सत्याचा इन्कार करणाऱ्यांना कठोर यातनेची खुशखबरी ऐकवा त्या अनेकेश्वरवादींखेरीज ज्यांच्याशी तुम्ही करार केले. आणि त्यांनी तुमच्याशी आपला करार पाळण्यात कोणतीही कसूर केली नाही व तुमच्याविरूद्ध कुणाला मदतही केली नाही, तेव्हा अशा लोकांशी तुम्हीदेखील कराराची मुदत पूर्ण होईपर्यंत प्रामाणिक राहा; कारण अल्लाह ईशपरायण लोकांनाच पसंत करतो.

(५) मग जेव्हा निषिद्ध महिने लोटतील तेव्हा त्या अनेकेश्वरवादींना ठार करा, जेथे सापडतील तेथे त्यांची नाकेबंदी करा व प्रत्येक पातळीवर त्यांचा समाचार घेण्यासाठी सज्ज राहा. मग जर त्यांनी पश्चात्ताप केला व नमाज कायम केली आणि जकात दिली तर त्यांना सोडून द्या. अल्लाह क्षमाशील आणि दया दाखविणारा आहे.



५१अ) म्हणजे `दारूल इस्लाम'चे मुस्लिम एक-दुसऱ्यांचे मित्र (वली) बनले नाहीत आणि घरेदारे सोडून (हिजरत) `दारूल इस्लाम' मध्ये न येणारे तसेच `दारूल कुफ्र’ मध्ये निवास करणारे मुस्लिमांना `दारूल इस्लाम'च्या मुस्लिमांनी आपल्या राजनैतिक विलायती पासून त्यांना वेगळे समजू नये. बाहेरच्या पीडित मुस्लिमांची मदत मागितल्यावर त्यांची मदत केली गेली नाही आणि या नियमांचे पालनसुद्धा केले जाऊ नये की ज्या देशाशी इस्लामी राज्याचा समझौता आहे त्याच्याविरुद्ध मुस्लिमांची मदत केली जाणार नाही आणि जगात मुस्लिमांनी काफिरांशी (ईशद्रोही) `मवालात'चा (संरक्षक मित्राचा) संंबंध समाप्त् केला नाही तर धरतीवर उपद्रव आणि मोठा बिघाड माजेल.

५२) म्हणजे इस्लामी बिरादरीच्या आधारावर वारस संपत्तीचे वाटप होणार नाही आणि ते हक्क जे वंश आणि सासरच्या नातेसंबंधावर आधारित आहेत, धार्मिक बंधुना एक दुसऱ्यांच्या मामल्यात प्राप्त् होतील. या मामल्यांत इस्लामी संबंधाऐवजी नातेदारी संबंधच कायदेशीर अधिकारांचा आधार असेल. हे यासाठी सांगितले गेले आहे की हिजरतनंतर पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मुहाजिर आणि अंसार लोकांच्यामध्ये जे बंधुभाव निर्माण केले होते, त्यावरून काही लोक विचार करून होते की हे धार्मिक बंधु एक-दुसऱ्याचे वारससुद्धा होतील. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यानुसार फक्त मुस्लिम नातेवाईक (रक्तसंबंधी) एक-दुसऱ्याचे वारस बनतील. मुस्लिम एखाद्या मुस्लिमेतरांचा िंकवा मुस्लिमेतर मुस्लिमाचा वारसा बनू शकणार नाही.


००००००००००

१) हे व्याख्यान आयत १ पासून आयत ३७ पर्यंतचे आहे आणि हि. सन ०९  मध्ये त्या वेळी अवतरित झाले जेव्हा पैगंबर  मुहम्मद (स.) यांनी माननीय अबू बकर (रजि.) यांना हजसाठी पाठविले होते. त्यांच्या पश्चात जेव्हा हे व्याख्यान अवतरित झाले तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांनी माननीय अली (रजि.) यांना मक्का येथे पाठविले जेणेकरून हजयात्रींच्या जनसभेमध्ये त्यास ऐकवावे आणि निम्नलिखित चार गोष्टींची जाहीर घोषणा करावी.

(१) स्वर्गात कोणी असा मनुष्य दाखल होणार नाही जो इस्लामचा स्वीकार करणार नाही. (२) या वर्षांनंतर कोणी अनेकेश्वरवादी हजसाठी येणार नाही. (३) अल्लाहच्या घराजवळ नग्न होऊन परिक्रमा (तवाफ) करू नये. (४) ज्या लोकांशी अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांचा करार बाकी आहे. म्हणून ज्यांनी करार तोडला नाही त्यांच्याशी करारअवधीपर्यंत पालन केले जावे.

पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या आदेशानुसार माननीय अली (रजि.) यांनी ही घोषणा १० जिल हज्जला केली. या ठिकाणी हे जाणून घेणे लाभप्रद होईल की मक्का विजयानंतर इस्लामी काळाचा पहिला हज हि. सन. ०८  मध्ये प्राचीन पद्धतीने झाले, नंतर हि. सन ०९  दुसरा हज मुस्लिमांनी आपल्या पद्धतीने केला आणि अनेकेश्वरवादींनी आपल्या पद्धतीने केला. यानंतर तिसरा हज हि. सन १० मध्ये विशुद्ध इस्लामी पद्धतीने झाला आणि हाच प्रसिद्ध हज आहे ज्याला ``हिज्जतुल विदाह'' (निरोपाचा हज) म्हटले जाते. पैगंबर मुहम्मद (स.) पहिल्या दोन वर्षी हजसाठी गेले नव्हते. तिसऱ्या वर्षी जेव्हा पूर्ण शिर्क (अनेकेश्वरत्व) नष्ट झाले तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांनी हज अदा केला.

२) सूरह ८ (अन्फाल) आयत ५८ मध्ये आले आहे की जेव्हा एखाद्या राष्ट्राशी विश्वासघात (करारभंग) करण्याची आशंका असेल तर जाहीरपणे त्यांचे करार त्यांच्याकडे फेकून द्या आणि त्याला सचेत करा की आता आपल्या दोघांत करार बाकी राहिला नाही. याच आचारसंहितेनुसार करारभंगाची ही घोषणा त्या सर्व कबिल्याविरुद्ध केली जे प्रतिज्ञा व वचनबद्ध झाल्यानंतरसुद्धा इस्लामविरुद्ध षड्यंत्र करीत होते. वेळ मिळाल्यास त्वरित शत्रुत्वावर येत होते. बराअत (करारभगाच्या) या घोषणेमुळे अरबमध्ये अनेकेश्वरवाद्यांचे आणि विद्रोहींचे अस्तित्व कायद्यानुसार संपुष्टात आले आणि त्यांच्यासाठी पूर्ण देशात शरणस्थळे राहिली नाहीत. कारण देशाचा मोठा भाग इस्लामच्या शासनाधिकारात आला होता. या घोषणेनंतर अरबातील अनेकेश्वरवादींसाठी  कोणताच   उपाय   बाकी   राहिला   नाही.  एकतर   ते   लढण्यासाठी  तयार  व्हावेत  आणि इस्लामी शक्तीशी  सामना करून नष्ट होऊन जावे किंवा त्यांनी देश सोडून निघून जावे. तसेच इस्लामचा स्वीकार करून आपल्या स्वत:ला आणि आपल्या क्षेत्राला इस्लामी जीवनव्यवस्थेच्या स्वाधीन करावे. ज्यास देशाच्या बहुतांश भागास पूर्वीच इस्लामी राजवटीच्या आधीन केले होते.

या उत्तम उपायाची सार्थकता तेव्हाच समजू शकते जेव्हा आम्ही इस्लामी विमुखतेच्या त्या उपद्रवाला डोळयांसमोर ठेवावे जो या घटनेनंतर दीड वर्षाने (माननीय अबू बकर यांच्या खिलाफतच्या आरंभकाळात) घटित झाला. हि. सन ०९  मधील बराअत (करारभंग) च्या या घोषणेमुळे शिर्कची (अनेकेश्वरत्वाची) ही संघटित शक्ती नष्ट केली गेली नसती तर या उपद्रवाने गृहयुद्धाचे भयानक रूप धारण केले असते आणि मग इस्लामचा इतिहास कसा झाला असता? पण यापूर्वीच इस्लामची वैधानिक शक्ती संपूर्ण देशावर प्रभावी झालेली होती.

३) ही घोषणा १० जिल हज्ज हि. सन ०९  मध्ये झाली होती त्या वेळेपासून १० रब्बी उस्सानी हि. सन १०  पर्यंत चार महिन्याचा अवधी त्या लोकांना दिला गेला होता जेणेकरून त्यांनी चांगला विचार करून निर्णय घ्यावा.

४) म्हणजे १० जिल हज्ज ज्याला ``यौमुल नहर'' म्हणतात. सहीह हदीसमध्ये आले आहे की `हिज्जतुल विदाअ'मध्ये पैगंबर मुहम्मद (स.) यांनी प्रवचन देताना उपस्थितांशी विचारले, ``आज कोणता दिवस आहे?'' लोक म्हणाले, ``आज कुर्बानीचा दिवस आहे.'' पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ``हा मोठ्या हजचा (हज्जे अकबर) दिवस आहे.'' हज्जे अकबरचा शब्द `हज्जे असगर' (छोटा हज) च्या विरोधी येतो. अरबचे लोक `उमरा'ला छोटा हज म्हणतात. याविरुद्ध तो हज जो जिल हज्जच्या निश्चित तारखांत केला जातो `हज्जे अकबर' म्हटले जाते.

५) म्हणजे हे ईशपरायणतेच्या विरुद्ध होईल की ज्यांनी करारभंग केला नाही, परंतु तुम्ही स्वत:हून करार तोडता आहात. अल्लाहजवळ प्रिय तेच लोक आहे जे प्रत्येक स्थितीत धर्मपरायणतेला स्वीकारून असतात.

६) येथे हराम महिन्यांनी अपेक्षित पारिभाषिक हराम महिने नाहीत जे हज व उमरासाठी हराम ठरविले गेले आहेत. तर तेथे चारही महिन्यांशी तात्पर्य आहे ज्याची सवलत अनेकेश्वरवादींना दिली होती. या सवलतीच्या काळात मुस्लिमांसाठी अवैध होते की अनेकेश्वरवादींवर हल्ला करावा म्हणून यांना हराम महिने म्हटले गेले आहे. 

७) म्हणजे कुफ्र आणि शिर्क (द्रोह आणि अनेकेश्वरत्व) पासून पश्चात्ताप (तौबा) करून मामला समाप्त् होत नाही तर त्यांना नमाज कायम करावी लागणार आणि जकात द्यावी लागणार. अन्यथा हे मानले जात नाही की त्यांनी कुफ्र त्यागून इस्लामचा स्वीकार केला आहे. याच आयतीला माननीय अबू बकर (रजि.) यांनी इस्लाम विमुखतेच्या उपद्रवासमयी प्रमाणाच्या रूपात ठेवले होते. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या मृत्यूपश्चात ज्यांनी उपद्रव माजविला होता, त्यांच्यापैकी एका गटाने सांगितले की आम्ही इस्लामचे द्रोही नाहीत. नमाज पढण्यास तयार आहोत परंतु जकात मात्र देणार नाहीत. सहाबांना सामान्यता ही परेशानी होत होती की अशा लोकांविरुद्ध युद्ध कसे केले  जाऊ  शकते? परंतु  माननीय  अबू  बकर (रजि.) यांनी याच  आयतीचा  दाखला  देऊन  सांगितले की आम्हाला या लोकांना सोडून देण्याचा आदेश या स्थितीत देण्यात आला होता की हे अनेकेश्वरत्वापासून पश्चात्ताप करतील व नमाज कायम करतील, जकात देतील. परंतु हे तर या तिन्ही अटींपैकी एक अट उडवून देतात तर आम्ही यांना कसे सोडून द्यावे.

८) म्हणजे युद्धासमयी शत्रू तुम्हाला सांगू लागला की मी इस्लामला समजून घेऊ इच्छितो तर मुस्लिमांनी त्याला शरण देऊन आपल्या येथे येण्याची संधी द्यावी आणि त्याला इस्लाम समजावून द्यावा. जर त्याने इस्लाम स्वीकारला नाही तर त्याला संरक्षण देऊन त्याच्या घरी त्याला पोहचवून द्यावे.

९) म्हणजे बनीकिनाना आणि बनीखुजाआ आणि बनीजमरा.

१०) म्हणजे ते तर कराराच्या अटी घालतात, परंतु मनात उल्लंघनाची इच्छा ठेवूनच. याचे प्रमाण अनुभवाने मिळते. त्यांनी जेव्हा कधी करार केला तो मात्र तोडण्यासाठीच.

११) म्हणजे असे लोक आहेत ज्यांना नैतिक दायित्वाची जाणीव नाही की चारित्र्याच्या बंधनांना तोडण्याची पर्वा.

१२) म्हणजे एकीकडे अल्लाहच्या आयती त्यांना भलाई आणि सच्चई आणि त्यावर आधारित नियमांचे पालन करण्याचे आमंत्रण देत होत्या. तर दुसरीकडे जगाच्या क्षणिक फायद्याचे आकर्षण होते जे मनेच्छांचे बेलगाम पालन करुन प्राप्त् होत होते. या लोकांनी या दोन्हींची तुलना केली आणि नंतर पहिलीला त्यागून दुसऱ्याला आपल्यासाठी निवडले.

१३) म्हणजे या अत्याचारींनी येथे थांबून घेतले नाही तर मार्गदर्शनाऐवजी मार्गभ्रष्टतेला आपल्यासाठी पसंत केले आणि यापेक्षा पुढे जाऊन त्यांनी प्रयत्न केले की सत्य संदेशाचे काम पुढे न चालले पाहिजे. भलाई आणि सुधाराच्या पुकारला कोणीही ऐकू नये किंबहुना ते तोंडच बंद करावे ज्याकरवी हा सत्यसंदेश बुलंद होत आहे. ज्या आदर्श व मंगल जीवनव्यवस्थेला अल्लाह पृथ्वीवर स्थापित करू इच्छितो, त्या स्थापनेला रोखण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्या लोकांचे जगणे अवघड केले जे सत्याचे अनुयायी बनले होते.

१४) ``जाणणारे''म्हणजे ते लोक जे अल्लाहच्या अवज्ञेचे परिणाम जाणून आहे आणि अल्लाहच्या कोपचे भय आपल्या मनात ठेवून असतात आणि हे जे सांगितले गेले की जर असे केले तर ``ते तुमचे धर्म (दीनी) बंधु आहेत.'' तर याचा अर्थ असा आहे की या अटींना पूर्ण करण्याचा परिणाम केवळ हाच होणार नाही की तुमच्यासाठी त्यांच्यावर हात उठविणे आणि त्यांच्या जीव आणि वित्ताला नुकसान करणे अवैध होईल तर याचा लाभ म्हणजे त्यांना इस्लामी समाजात समान अधिकार प्राप्त् होतात. सामाजिक, सांस्कृतिक आणि कायदे संदर्भात ते इतर मुस्लिमांसारखेच होतील. काही एक भेदभाव त्यांच्या विकासाच्या मार्गात येणार नाही.

१५) या आयतच्या शब्दांनी प्रत्यक्ष असे वाटते की जर त्यांनी आपल्या प्रतिज्ञेला तोडले तर त्यांच्याशी युद्ध करा. परंतु संदर्भावर विचार केल्यावर स्पष्ट होते की येथे प्रतिज्ञा म्हणजे इस्लाम आणि आदेशाचे पालन करण्याची प्रतिज्ञा आहे. कारण करारभंग अगोदरच झालेला होता आणि पुढे त्यांच्याशी करार करणे संभव नव्हते. म्हणून येथे कराराविरुद्ध काम करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ही आयत वरच्या आयत नंतर त्वरित आलेली आहे. त्यात सांगितले आहे की जर त्यांनी पश्चात्ताप व्यक्त केला आणि नमाज आणि जकातची पाबंदी स्वीकार केली तर ते तुमचे दिनी (धर्म) बंधु आहेत. यानंतर असे म्हणणे, ``जर ते आपला करारभंग करतील'' याचा स्पष्ट अर्थ होतो की याने तात्पर्य त्यांनी इस्लामचा स्वीकार करणे आणि इस्लामच्या सामुदायिक व्यवस्थेचे पालन करण्याची प्रतिज्ञा करून ती तोडणे आहे. खरे तर या आयतीत इस्लामविरुद्ध त्या उपद्रवाकडे संकेत आहे जो दीढ वर्षानंतर माननीय अबू बकर (रजि.) यांच्या खिलाफतीच्या आरंभी निर्माण झाला होता. माननीय अबू बकर (रजि.) यांनी या वेळी जी कर्यपद्धती स्वीकारली ती ठीक या आदेशानुसार जो या आयतीत दिला गेला होता. (तपशीलासाठी पाहा माझा उर्दूग्रंथ ``मुरतद की सजा इस्लामी कानून मे'') 

१६) आता व्याख्यानाचे संबोधन मुस्लिमांकडे वळते. त्यांना युद्धासाठी उभारणे तसेच धर्माविषयी नातेसंबंध आणि भौतिक लाभाचा विचार न करण्याची ताकीद दिली आहे. व्याख्यानाच्या या भागाची पूर्ण भावना समजण्यासाठी पुन्हा एकदा त्या स्थितीला डोळयांपुढे ठेवणे आवश्यक आहे जी त्या वेळी निर्माण झाली होती. यात शंका नाही की इस्लामचा प्रभाव देशाच्या मोठ्या भागावर होता. अरबमध्ये आता अशी एखादी मोठी शक्ती उरली नव्हती जी इस्लामला आव्हान देऊ शकेल. तरीपण निर्णायक पाऊल आणि अतिक्रांतीकारक पाऊल यावेळी उचलले जात होते त्याच्यात अनेक धोके प्रत्यक्षदर्शी लोकांना दिसत होते. 

(१) सर्व अनेकेश्वरवादी कबिल्यांना एकाच वेळी सर्व करार रद्द करण्याचे आव्हान देणे, नंतर अनेकेश्वरवाद्यांच्या हज करण्यावर बंदी आणणे, तसेच काबागृहाच्या प्रबंध व्यवस्थेत परिवर्तन करणे आणि अज्ञानतापूर्ण रूढी-परंपरांचा संपूर्ण नायनाट करणे म्हणजे सर्व देशाला पेटविण्यासारखे होते. अनेकेश्वरवादी आणि दांभिक आपल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आपल्या दुराग्रहासाठी आणि स्वार्थासाठी लढण्यास व मरण्यास तयार होते. 

(२) हजला फक्त एकेश्वरवादी लोकांसाठी निश्चित करणे आणि अनेकेश्वरवादींसाठी काबागृहाचा रस्ता कायमचा बंद करणे म्हणजे देशाचा मोठा भाग जो अद्याप अनेकेश्वरवादी होता, त्यांना काबाकडे येण्या-जाण्यापासून रोखणे होते. ही फक्त धार्मिक दृष्टीनेच नव्हे तर आर्थिक दृष्टीनेसुद्धा अरब देशात महत्त्वपूर्ण घटना होती. अरब देशाच्या आर्थिक जीवनाचा तो महत्त्वाचा कणा होता.

(३) जे लोक हुदैबियाच्या करार आणि मक्का विजयानंतर ईमान आणून मुस्लिम बनले होते अशा नुकत्याच मुस्लिम झालेल्या लोकांसाठी हे सर्व अत्यंत कठीण कार्य होते. कारण त्यांचे अनेक भाईबंद नातेसंबंधी अनेकेश्वरवादी होते. त्यांपैकी काही लोक असे होते ज्यांचे आर्थिक हित प्राचीन अज्ञानी व्यवस्थेशी जुडलेले होते. आता प्रत्यक्षात अरबच्या सर्व अनेकेश्वरवाद्यांना संपविण्याची तयारी केली जात होती. त्याचा अर्थ म्हणजे या नवमुस्लिमांनी आपल्या स्वत:च्या हाताने आपले परिवार आणि नातेवाईकांना संपविणे आणि त्यांची प्रतिष्ठा आणि पद आणि पूर्वस्थापित भेदभाव नष्ट करणे होते.

यातील एखादा धोका व्यावहारिक रूपात समोर आला नाही. स्वत:ची त्यांच्यापासून सुटका करून घेण्याच्या घोषणेने देशात गृहयुद्ध भडकण्याऐवजी अरबांचे राहिलेले अनेकेश्वरवादी कबीले आणि सरदारांचे प्रतिनिधीमंडळ येऊ लागले. ते सर्व पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यासमोर इस्लामचा स्वीकार करत गेले आणि आज्ञापालनाचे प्रण करत गेले. त्यांनी इस्लाम स्वीकारल्यानंतर पैगंबर मुहम्मद (स.) यांनी त्यांना आपापल्या पदावरच ठेवले. परंतु ज्या वेळी या नवीन पद्धतीची घोषणा केली जात होती तेव्हा त्याच्या या परिणामांना कोणीही जाणू शकत नव्हता. या घोषणेबरोबरच मुस्लिम याला पूर्ण शक्तीनिशी लागू करण्यास तयार झाले नसते तर संभवता हा परिणामसुद्धा पुढे आला नसता. म्हणून अनिवार्य होते की मुस्लिमांना या समयी अल्लाहच्या मार्गात प्रयत्नांची पराकाष्ठा (जिहाद) करण्यासाठी उभारले जाणे आवश्यक होते. त्यांच्या मनातून या प्रणाली विरुद्ध त्या सर्व आशंकांना दूर सारले गेले. मुस्लिमांना यावेळी आदेश देण्यात आला की अल्लाहची मर्जी संपादन करण्यासाठी कोणत्याच गोष्टीची पर्वा करू नये. या व्याख्यानाचा हाच विषय आहे.  

१७) हा एक हलकासा संबंध आहे त्या संभावनेकडे जी पुढे घटनेच्या रूपात प्रकट झाली होती. मुस्लिम हे समजत  होते  की  त्या  घोषणेनंतर  त्वरित  देशात  रक्ताचे  पाट  वाहू  लागतील. त्यांच्या  या  भ्रमाला  दूर करण्यासाठी  संकेत रूपात त्यांना दाखविले गेले.  ही प्रणाली स्वीकारल्यावर शक्यता आहे गृहयुद्ध सुरु होईल याची संभावना आहे आणि तशीच संभावना लोकांना पश्चाताप व्यक्त करण्याची संधी प्राप्त् होईल. परंतु या संकेताला अधिक स्पष्ट यासाठी केले नाही की एकीकडे  युद्ध तयारी करण्याचे मुस्लिमांचे प्रयत्न हलके पडले असते. तसेच दुसरीकडे अनेकेश्वरवादींसाठी या धमकीचा परिणाम हलका-पुसटसा झाला असता ज्यामुळे त्यांना आपल्या कमजोर स्थितीवर गंभीरतापूर्ण विचार करण्यास आणि शेवटी स्वत:ला इस्लामी जीवनव्यवस्थेत एकरूप होण्यास तयार केले गेले.

१८) हे संबोधन आहे त्या नव्या लोकांशी जे नुकतेच इस्लाममध्ये आले होते. त्यांच्याशी सांगितले जात आहे की जोपर्यंत तुम्ही या परीक्षेला सामोरे जाऊन प्रमाणित करत नाही की वास्तविकपणे तुम्ही आपले जीव व वित्त आणि सगेसोयरे यांच्यापेक्षा जास्त अल्लाह आणि इस्लामला प्रिय ठेवत आहात तोपर्यंत तुम्ही खरे ईमानधारक ठरू शकत नाही. अद्याप प्रत्यक्षाला पाहून तुमची स्थिती अशी आहे की इस्लाम सच्चे ईमानधारक आणि प्रारंभीच्या ईमानधारकांच्या बलिदानाने विजयी झाला आणि देशात प्रभावी ठरला. त्यामुळे तुम्ही आज मुस्लिम बनला आहात. 

१९) म्हणजे ज्या मस्जिदी एकमेव अल्लाहच्या उपासनेसाठी बनलेल्या आहेत त्यांचे प्रबंधक, मुजावर, सेवक आणि उपासक बनण्यासाठी ते लोक योग्य नाहीत जे अल्लाहबरोबर त्याच्या गुणात, हक्कात आणि अधिकारात इतरांना भागीदार बनवतात. त्यांनी स्वत: एकेश्वरत्वाचे आवाहन स्वीकारले नाही आणि स्पष्ट सांगितले की एक अल्लाहच्या उपासनेला आम्ही बांधील नाही. तेव्हा त्यांना काय अधिकार आहे की एखाद्या अशा उपासनागृहाचे प्रबंधक बनून राहावे की जे फक्त एक अल्लाहच्या उपासनेसाठी बनविले आहे. येथे सामान्यत: ही गोष्ट सांगितली आहे आणि आपल्या वास्तविकतेच्या दृष्टीने ती सामान्य आहे. परंतु मुख्यता येथे तिचा उल्लेख करण्याचा हेतू म्हणजे काबागृह आणि मस्जिदे हराम यावरील अनेकेश्वरवादींच्या व्यवस्थापन प्रबंधाला समाप्त् केले जावे. तसेच ते प्रबंधन नेहमीसाठी एकेश्वरवादींच्या हातात दिले जावे आणि एकेश्वरवादी काबागृहाचे नेहमीसाठी प्रबंधक बनावेत.

२०) म्हणजे  जी  थोडी  सेवा  त्यांनी  काबागृहाची  केली  होती  तीसुद्धा  निरर्थक  ठरली  कारण  हे  लोक त्याबरोबर अनेकेश्वरत्व आणि अज्ञानतापूर्ण रीतींची भेसळ करीत होते. त्यांच्या थोड्याशा पुण्याईला भल्या मोठ्या दुष्टतेने खाऊन टाकले.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget