Halloween Costume ideas 2015

अल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(१२) ...आणि तुम्हाला अशा उद्यानांत दाखल करीन ज्यांच्या खालून कालवे वाहात असतील, परंतु त्यानंतर तुमच्यापैकी ज्याने कुफ्रचे (नकार) वर्तन अंगीकारले तर त्याने वास्तविक पाहता सन्मार्ग३५ हरवून टाकला.’’
(१३) मग त्यांचे हे करारभंग करणेच होते की ज्यामुळे आम्ही त्यांना आपल्या कृपेपासून दूर ढकलले आणि त्यांची मने कठोर बनविली. आता त्यांची दशा अशी आहे की शब्दांत फेरफार  करून गोष्ट कोठल्या कोठे नेतात. जी शिकवण त्यांना दिली गेली होती त्याचा मोठा भाग ते विसरले आहेत आणि तुम्हाला नेहमीच त्यांच्या कोणत्या न कोणत्या अपहाराची माहिती मिळत असते. त्यांच्यापैकी फारच थोडे या दोषांपासून वाचले आहेत. (मग जेव्हा हे या स्थितीप्रत पोहोचले आहेत तर ते जो काही खोडसाळपणा करतील तो यांच्याकडून अपेक्षितच  आहे.) म्हणून यांना क्षमा करा आणि त्यांच्या कृत्याकडे दुर्लक्ष करीत राहा. अल्लाह त्या लोकांना पसंत करतो जे उत्तम वर्तन राखतात.३५) म्हणजे त्याने `सवाउस्सबील' (सरळमार्ग) प्राप्त् करून नंतर पुन्हा मार्गभ्रष्ट झाला आणि विनाशाच्या मार्गावर भरकटत  राहिला. `सवाउस्सबील' शब्दाची सार्थकता समजण्यासाठी  प्रथम हे समजून घेतले पाहिजे की मनुष्याचे स्वत:चे एक विश्व आहे ज्याच्या आत अगणित वेगवेगळया शक्ती, योग्यता, कामना, भावना,रूची तसेच मन व शरीराच्या वेगवेगळया  मागण्या आहेत आणि आत्मा आणि स्वभावाच्या वेगवेगळया अपेक्षा आहेत. मग या व्यक्तींच्या एकत्रिकरणाने जे सामाजिक जीवन साकारते तेसुद्धा असीम गुंतागुंतीच्या संबंधांनी  बनलेले आहे. (हे संबंध दिवंसेदिवस वाढणारेच असते.) मग जगात चहुकडे मनुष्याच्या आजूबाजूला जीवनसामग्री पसरली आहे. त्यांच्यापासून काम घेण्यासाठी आणि त्यांना मानवी  सभ्यतेसाठी प्रयोगात आणण्यासाठीचा प्रश्न व्यक्तिगत आणि सामुस्रfयक रूपाने एकानंतर एक जटिल समस्यांना जन्म देतो. मनुष्य आपल्या कमजोरीमुळे या पूर्ण जीवनकाळावर एकाच  वेळी एक संतुलित दृष्टी टाकू शकत नाही. म्हणून मनुष्य आपल्यासाठी स्वत: जीवनव्यवस्था निर्माण करू शकत नाही ज्यात त्याच्या सर्व शक्तींशी न्याय होईल.
त्याच्या सर्व आंतरिक आणि बाह्य अपेक्षा न्याय आणि संतुलनासह पूर्ण होतील. त्याच्या सामाजिक जीवनातील सर्व समस्यांचा एक संतुलित आणि सरळ उपाय सापडेल. जेव्हा मनुष्य  स्वत: आपला मार्गदर्शक आणि आपला विधीनिर्माता बनतो तेव्हा यथार्थाच्या विभिन्न बाजूंपैकी एखादी बाजू, जीवनगरजांपैकी एखादी गरज, उपाय, शोध, समस्यांपैकी एखादी समस्या   मनुष्याच्या मन:पटलावर इतका प्रभाव टाकते की दुसरी बाजू, समस्या आणि गरजांकडे मनुष्य अनायासे दुर्लक्ष करू लागतो. परिणामत: अन्याय करू लागतो.
हा दृष्परिणाम आहे. मनुष्याने आपण स्वत: निर्मिलेल्या विचारसरणीला बळजबरीने लागू करण्याने जीवनाचे संतुलन बिघडून जाते. अशा असंतुलित स्थितीत मनुष्यजीवन एका टोकाकडे  (मार्गभ्रष्ट) चालू लागते. मग जेव्हा जीवनाची ही मार्गवक्रता आपल्या अंतिम सीमेला पोहचते आणि मनुष्यासाठी त्याचे जीवन असह्य होते, अशावेळी जीवनाच्या ज्या क्षेत्रांवर,  आवश्यकतावर आणि समस्या ज्यांच्यावर अन्याय होत होता त्या न्यायासाठी विद्रोह करू लागतात. तरी न्याय होत नाही कारण (प्रतिक्रिया रूपाने तोच अन्याय आणि असंतुलित कार्य  दुसऱ्या दिशेने सुरु होतो) अशाप्रकारे मानवी जीवनास कधीही सरळमार्गावर येणे शक्य होत नाही. नेहमी जीवननौका डगमगत राहाते आणि विनाशाच्या दरीत लोटली जाते. मनुष्यनिर्मित  त्या सर्व जीवनव्यवस्था वक्रमार्गाच्या रूपात (मार्गभ्रष्ट) आज जगात उपलब्ध आहेत. त्या चुकीच्या मार्गाने चालतात आणि चुकीच्या मार्गात नष्ट होतात आणि पुन्हा दुसऱ्या चुकीच्या  मार्गाने चालू लागतात. या सर्व चुकीच्या आणि वक्रमार्गामध्ये एक असा मार्ग जो अगदी मधोमध आहे, या मध्यमार्गाने मनुष्याच्या सर्व शक्ती आणि कामनांसह त्याच्या सर्व भावना  आणि रूचीबरोबर तसेच मनुष्याचा आत्मा आणि शरीराच्या सर्व मागण्यांबरोबर आणि मानवी जीवनाच्या सर्व समस्यांबरोबर पूर्ण न्याय केला जाईल. अशा या सरळमार्गात (इस्लामी  जीवनपद्धती) एखादी वक्रता किंवा इतर भागांवर अत्याचार आणि अन्याय होणार नाही.
मनुष्यजीवनाचा यथोचित विकास, पूर्ण साफल्य आणि पूर्ण कामनापूर्तीसाठी हीच जीवनव्यवस्था अत्यावश्यक आहे. मानवी स्वभाव याच जीवनव्यवस्थेचा (सरळमार्ग) इच्छुक आहे.  मानवी जीवनाचा यथोचित विकास आणि त्याची सफलता व पूर्ण कामनापूर्तीसाठी हे अत्यावश्यक आहे. मनुष्य स्वाभाविकत: या मार्गाचा (सरळमार्ग) इच्छुक आहे. या सरळमार्गाशी या  मानवनिर्मित वक्रमार्गाचा (अपूर्ण जीवनपद्धती) नेहमी विद्रोह करण्याचे मूळ कारण म्हणजे मानवी स्वभाव त्या सरळमार्गाचा शोध घेतो. परंतु मनुष्य स्वयं त्या सरळमार्गाला जाणून   घेण्याचे सामथ्र्य राखत नाही. त्या सरळमार्गाकडे केवळ अल्लाह मनुष्याला मार्गदर्शन करू शकतो. अल्लाहने जगात आपले पैगंबर याच कारणासाठी पाठविले आहेत जेणेकरून या  सत्यमार्गाकडे मानवाचे मार्गदर्शन करावे. कुरआन याच सरळमार्गास `सवाउस्सबील' आणि `सिराते मुस्तकीम' म्हणून संबोधतो. हा राजमार्ग जगाच्या जीवनातून (इहलोक) निघून परलोक
जीवनापर्यंत अगणित वक्र मार्गातून सरळ निघतो.
जो या मार्गाने चालला (इस्लामी जीवनपद्धतीवर) तो या जगातील जीवनात सन्मार्गी आणि परलोकजीवनात सफल होणार आहे. जो कोणी या मार्गावरून भ्रष्ट झाला तो वक्र चालणारा,  वक्र पाहणारा आणि वक्र कर्म करणारा तसेच (या जगात व परलोकातसुद्धा असफल ठरणारा आहे.) परलोकांत त्याला निश्चितच नरकात जावे लागणार आहे कारण जगातील सर्व  वक्रमार्ग नरकातच जाणारे आहेत.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget