Halloween Costume ideas 2015

इकबाल मुकादम यांच्या ‘अकल्पित’ या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

मुंबई-
कोकणातील दापोलीतील लेखक इक्बाल शर्फ मुकादम यांच्या २१ व्या पुस्तकाचे अनावरण येथील अंजुमन इस्लाम हायस्कूलच्या करिमी हॉलमध्यें अब्दुल कादर मुकादम यांच्या हस्ते  पार पडले. व्यासपीठावर डॉ अब्दुल सत्तार दळवी, आर डी खतीब डिंपलचे अशोक मुळे, डॉ. कय्यूम मुकादम आणि हाजी एल एस खलफे मान्यवर उपस्थित होते.
लेखक इक्बाल मुकादम यांनी प्रस्तावनेत ‘अकल्पित’ कथासंग्रहाविषयी थोडक्यात भाष्य केले. तर अब्दुल कादर मुकादम यांनी पुस्तकातील अनेक कथा या गूढ असून शेवट वाचताना   O Henry या इंग्रजी लेखकाच्या कथांसारखा चटका लावून जातात. कोकणाच्या मातीशी इमान राखणारा हा लेखक स्वत:ची एक शैली निर्माण करतो. असे मत व्यक्त केले. मुकादम हे  नामवंत लेखक, तसेच विचारवंत व व्याख्याते म्हणून मराठी साहित्यक्षेत्रात ओळखले जातात. आर डी खतीब यांनी शर्फ मुकादम यांचे स्मरण करून लेखकास शुभेच्छा दिल्या.
डॉ अब्दुल सत्तार दळवी यांनी क्रिएटिव्हिटीचा एक वेगळा अनुभव देणारे हे पुस्तक म्हणून वाचकांनी त्याचे स्वागत करावे, असे नमूद केले. कार्यक्रम कोकण उर्दू फोरम या संस्थेच्या  वतीने आयोजित करण्यात आला होता. जमालुद्दीन यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरिफ मोहीमतुले यांनी केले. कार्यक्रमानंतर लगेचच प्रसिद्ध संगीतकार  मझर शेख यांनी इकबाल मुकादम लिखित/स्वरबद्ध केलेल्या एकूण ३५ गाण्यापैकी ९ निवडक गाणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली व कार्यक्रमाची संगीतमय सांगता झाली. खेड/  मंडणगड/ दापोलीतल्या मुंबईस्थित साहित्य मंडळाचे अध्यक्ष सुधीर कदम आणि सहकारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी दापोलीहून रत्नागिरी टाईम्स या लोकप्रिय दैनिकाचे उपसंपादक रमेश जोशी आवर्जून उपस्थित होते. दापोली, मुंबई, ठाणे, बदलापूर, पनवेल, खारघर पुणे येथून अनेक मान्यवर या इव्हेंटमध्ये सामील झाले होते.
‘नवकथाकार' या कल्याण येथील व्हाट्सऍपच्या ग्रुपमधील अनेक कथाकार आवर्जून आले होते. पैकी पटवर्धन मॅडम यांनी सोशल मीडियावरील मुकादम यांच्या एकूण लिखाणाची दखल  घेत आपले विचार व्यक्त केले. आखलाक नागोठणे हे शैक्षणिक क्षेत्रातील समाजसेवक यांनी लेखकाची ऑनलाईन मुलाखत घेतली.
तसेंच साहिल फाऊंडेशनचे चाँद खतीब, आसिफ तसेच अल्ताफ आणि साहिलच्या महिला मंडळाच्या सदस्या नजमा खतीब, मुनिरा टिकले, फातिमा मुकादम ही सर्व मंडळी विशेष उपस्थित होती.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget