Halloween Costume ideas 2015

निकाह वासनाशक्तीला बेलगाम होण्यापासून वाचवतो : प्रेषितवाणी (हदीस)

हजरत अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) यांचे निवेदन आहे की प्रेषित (स.) यांनी सांगितले, ‘‘हे तरूणांनो! तुमच्यापैकी जो कोणी निकाहच्या जबाबदाऱ्या उचलण्याचे सामर्थ्य राखतो, 
त्याने निकाह करून घेतला पाहिजे. कारण निकाह हा नजर खाली राखतो आणि लज्जास्थानाचे रक्षण करतो. (म्हणजे मानवी नजरेला इतस्तत: फिरविण्यापासून आणि वासनाशक्तीला  बेलगाम होण्यापासून वाचवितो.) आणि जो निकाहची जबाबदारी उचलण्याचे सामर्थ्य राखत नाही, त्याने वासनेचा जोर तोडण्याकरिता अधूनमधून रोजे राखावेत. (हदीस : बुखारी,  मुस्लिम)

हजरत अबू हुरैरा कथन करतात की प्रेषित (स.) यांनी सांगितले की, स्त्रीशी चार गोष्टींच्या आधारावर विवाह केला जातो. तिच्या धनसंपत्तीच्या आधारावर, तिच्या वंशिक सभ्यतेच्या आधारावर, तिच्या सौंदर्याच्या आधारावर, आणि तिच्या दीनधर्माच्या आधारावर. जेव्हा तुम्ही धार्मिक प्रवृत्तीच्या स्त्रीला प्राप्त करा, तुमचे भले होवो. (मुत्तफिक अलैया)

भावार्थ
या हदीसवचनाचा अर्थ असा आहे की, स्त्रीच्या संदर्भात चार गोष्टी आढळून येतात. कोणी धनसंपत्ती पाहतो, कोणी वंशप्रतिष्ठेचा विचार करतो, तर कोणी तिच्या रूपसौंदर्यावर भाळून तिच्याशी विवाह करतो. आणि कोणी तिची धर्मपरायणता पाहतो. प्रेषित हजरत मुहम्मद (स.) यांनी समस्त मुस्लिमांना ताकीद केली आहे की खरी गोष्टी जी पाहण्याची आहे ती  म्हणजे स्त्रीचे धार्मिक प्रवृत्ती आणि तिची ईशपरायणता. याखेरीज इतर सर्व गुणवैशिष्ट्ये तिच्यात असतील तर अतिशय उत्तम, पण धार्मिकतेला दृष्टीआड करणे आणि केवळ  धनसंपत्ती, तिचे रूपसौंदर्य, तिचा सामाजिक दर्जा, यांच्याच आधारावर विवाह करणे, हे ईमानधारकाचे काम नव्हे. प्रेषितांनी सांगितले की स्त्रियांशी त्यांच्या सौंदर्यामुळे विवाह करू नका.  संभवत: त्यांचे सौंदर्य त्यांचा सर्वनाश करेल. त्यांच्या धनवान असल्यामुळे त्यांच्याशी विवाह करू नका, शक्य आहे त्यांची धनसंपत्ती त्यांना गर्वोन्नमत्त करून टाकील. किंबहुना  धर्माच्या आधारावर त्यांच्याशी विवाह करा. काळ्या रंगाची दासी जर धर्मपरायण असेल तर ती अल्लाहच्या नजरेत गोऱ्या उच्चकुलीन स्त्रीपेक्षा अधिक चांगली आहे.

हजरत सुफियान सुरी (रजि.) कथन करतात की, प्रेषित (स.) यांनी आदेश दिला आहे, हे ईमानधारकांनो! अल्लाहचा कोप होण्यापासून आपला बचाव करण्याची पुरेपूर काळजी घ्या.  आणि मरेपर्यंत ईशआदेशांचे पालन करण्यात मग्न राहा. आपल्या पालनकर्त्याच्या नाराजीपासून स्वत:चा बचाव करीत राहा. ज्यांनी तुम्हाल एका जिवापासून निर्माण केले आणि  त्यापासून त्याचा जोडा (जीवनसाथी) बनविला. मग त्या दोघांद्वारे अनेक पुरुष व स्त्रिया जगात पसरविले. तेव्हा अशा रचयित्या पालनकर्त्याच्या नाराजीपासून भय बाळगत राहा.  ज्यांच्या नावाने तुम्ही आपापसांत एकमेकांजवळ आपल्या हक्काची मागणी करता आणि नातेवाईकांच्या हक्कांचीही जाणीव राखा. लक्षात ठेवा अल्लाह तुमच्यावर देखरेख ठेवणार आहे.

भावार्थ
हा खुतबा (प्रवचन) आहे जो प्रत्येक निकाहच्या प्रसंगी दिला जातो. इथे त्याचा उल्लेख करण्याचा हेतू हे दर्शविणे आहे की निकाह केवळ आनंदोत्सव नव्हे तर तो एक वचनकरार आहे. तो एक पुरुष आणि स्त्री यांच्या दरम्यान ठरविला जातो की आम्ही दोघे जीवनभरचे साथी आणि सहाय्यक बनलो. हा करार करताना ईश्वव आणि उपस्थित लोक दोघांनाही साक्षीदार  बनविले जाते. निकाहच्या खुतब्याच्या आयती या गोष्टीकडे स्पष्ट इशारा करतात की,जर या वचनकरारारत पती किंवा पत्नीकडून एखादा बिघाड निर्माण केला गेला, आणि त्याचे  यथायोग्य पालन केले गेले नाही, तर अल्लाहचा कोप त्याच्यावर कोसळेल. ते जहान्नुमच्या शिक्षेस पात्र ठरतील.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget