Halloween Costume ideas 2015
April 2019

कोल्हापूर
संत गाडगे महाराज अध्यासन व करवीर साहित्य परिषद यांच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा विशेष ग्रंथ पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार व लेखक, सा. करवीर काशीचे संपादक, सुनीलकुमार  सरनाईक यांच्या ‘पाऊलखुणा’ पुस्तकाला समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. चंद्रकुमार नलगे यांच्या अध्यक्षतेखाली व रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य,  उद्योजक एम. बी. शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत शाहू स्मारक भवनात कार्यक्रम झाला. ज्येष्ठ लेखक प्राचार्य रा. तु. भगत यांनी प्रास्ताविक केले. रोटरी क्लबचे एस. एन. पाटील.  बालसाहित्यिक शाम कुरळे, निवृत्त प्रशासकीय अधिकारी बा. ग. जोशी, आदींनी मनोगत व्यक्त केले.
किसनराव कुराडे, जयश्री दानवे, डॉ. सुनिल पाटील, सिनेदिग्दर्शक भास्कर जाधव, श्रीकांत हिरवे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. टि. आर. गुरव यांनी सूत्रसंचालन केले. निलीमा दोशी  यांनी आभार मानले. पुणे येथील स्वरूप प्रकाशनने सरनाईक यांचे ‘पाऊलखुणा’ हे पुस्तक प्रकाशित केलें असून त्यास प्रा. डॉ. प्रकाश पवार यांची प्रस्तावना लाभली आहे. सरनाईक  यांच्या माणसं मनातली, रोखठोक, जोतिबा : एक लोकदैवत, कृपावंत, ग्राहक जागर, स्मरणगाथा या पुस्तकांना विविध साहित्यिक संस्थांनी गौरविले आहे. सरनाईक यांना भारत  सरकारच्या वतीने स्वामी विवेकानंद राष्ट्रीय युवा पुरस्काराने, तसेच बाळशास्त्री जांभेकर- दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मास्टर ऑफ जर्नालिझम परीक्षेत  प्रथम क्रमांकावर उतीर्ण झाल्याबद्दल टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे ज्येष्ठ पत्रकार (कै.) बापुसाहेब दफ्तरदार पारितोषिकाचे ते मानकरी ठरले आहेत.

माननीय अबू सईद खुदरी (रजी.) यांचे कथन आहे की, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे की, ‘‘तुमच्यापैकी ज्याने आपल्या समाजात वाईट कर्म पाहिले आणि बलपूर्वक वाईट  कर्मास रोखले, त्याने आपले कर्तव्य पार पाडले. ज्याने शक्ती आणि पात्रता असुनदेखील आपल्या जिभेचा वापर केला व त्याविरूद्ध आवाज उठविला, त्याने सुद्धा आपले कर्तव्य पूर्ण केले.  तसेच ज्याच्यामध्ये तोंड उघडण्याची व जीभेने विरोध करण्याचीही शक्ती नसेल आणि केवळ आपल्या मनात त्यास वाईट समजत असेल तर तो सुद्धा जबाबदारीतून मुक्त होईल, परंतु  हा इमान (श्रद्धा) चा किमान दर्जा आहे.’’ (हदीस : तऱगीब व तरहीब, निसाई)

भावार्थ- या हदीसचा अर्थ असा आहे की, कूकर्म संपविण्याची शक्ती असतानादेखील, ते कूकर्म न संपविल्यास ईश्वराच्या कोपास बळी पडण्यापासून राहणार नाहीत. त्याकरीता माणसाने  आपली सर्व शक्ती व पात्रता पणाला लावून दुष्कर्माविरूद्ध कंबर कसली पाहिजे, अट मात्र एवढीच की दुष्कर्मिकाविरूद्ध बळाचा वापर करण्याच्या परिणामस्वरूप एखादे मोठे संकट उभे  राहू नये. या हदीसमध्ये हे स्पष्ट होते की, असत्य आणि दुष्कर्माच्या वर्चस्वकाळात सत्यवानांनी कोणत्याही परिस्थितीसमोर आत्मसमर्पण करून आरामाची झोप घेणे निर्लज्जतेचे आणि  सत्याची प्रेम नसल्याचे लक्षण आहे.
अल्लाह दासांची परीक्षा घेण्यासाठी जी पद्धत स्विकारतो, त्यापैकी एक पद्धत ही आहे की जेव्हा कधी व्यक्ती किंवा समुदायात अवज्ञा वाढत जाते तर त्याच्यासमोर अवज्ञेच्या संधीचे दार उघडले जाते. ह्यामुळे त्याची इच्छा जी आत लपलेली असते ती स्पष्टत: समोर येते. ज्या अपराधांद्वारा ते आपल्या स्वत:ला कलंकित करू इच्छितात, ते यामुळे वंचीत राहू नये की  त्यांना संधीच मिळाली नाही. प्रेषित मुहम्मद (स.) सांगतात, ‘‘अल्लाह थोरामोठ्यांच्या अपराधांसाठी जनसामान्यांना शिक्षा देत नाही जोपर्यंत जनसामान्य आपल्या डोळ्यांसमोर वाईट  कृत्ये होतांना पाहतात, आणि त्या दुष्ट कामांचा प्रतिबंध करण्याचे सामर्थ्य ठेवून सुद्धा त्याविरूद्ध रोष व्यक्त करीत नाहीत, जेव्हा लोकांची ही अवस्था होते, तेव्हा सामान्य, असामान्य, सर्वावर अल्लाहचा कोप कोसळतो.’’
सामुहिक उत्पाताची आग जेव्हा भडकते, त्यात चांगले आणि वाईट, सगळेच त्याचे भक्ष ठरतात. यापासून सुरक्षीत राहण्यासाठी समाजाचे सामुहिक अंतर्मन जागृत असावे. एखादा उत्पात  डोके काढीत असलेला पाहून, तत्क्षणीच तो दाबून टाकण्याचा प्रयत्न करावा. आग लावणाऱ्याचे हात त्याचवेळी धरावेत. या आज्ञेनुसार जोपर्यंत मुसलमान वागत राहिले, तोपर्यंत त्याच्यात कोणत्याही उत्पाताने डोके वर काढले नाही.

धन, संपत्ती माझ्या समुदायाचा (उत्पात) फितना
ह. क़ाब बिन अया़ज (रजी.) म्हणतात की, ‘‘प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे की, प्रत्येक मानवी समुहाचा उत्पात (फितना) वेगवेगळा आहे, धनसंपत्ती माझ्या समुहाचा  फितना आहे.’’(हदीस : तिर्मिजी)
वेगवेगळ्या काळात, मानवी समुहाला, ईश्वराने वेगवेगळ्या पद्धतीने परीक्षा घेतली आहे. प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांच्या समुहाची परीक्षा धनसंपत्तीद्वारे होईल. भौतीक जगालाच जीवनाचे सार्थक एखादी व्यक्ती समजत असेल तर त्याची धन, संपत्ती त्याच्यासाठी एक कठीणतम परीक्षा सिद्ध होईल. अर्थात यामध्ये तो (असफल) नापास होईल.

(८८) मग हे तुम्हाला झाले तरी काय आहे की दांभिकासंबंधी तुमच्या दरम्यान मतभिन्नता किंवा दुमत आढळते११६ वस्तुत: जे दुष्कर्म त्यांनी कमाविले आहे त्यांच्यामुळे अल्लाहने  त्यांना परत फिरविले आहे.११७ काय तुम्ही हे इच्छिता की ज्याला अल्लाहने सरळमार्गावर आणले नाही त्यांना तुम्ही सरळमार्गावर आणाल? वस्तुत: ज्याला अल्लाहने  मार्गभ्रष्ट केले  त्याच्यासाठी तुम्हाला कोणताच सन्मार्ग आढळणार नाही.
(८९) ते तर हे इच्छितात की ज्याप्रमाणे ते स्वत: नाकारणारे आहेत त्याचप्रमाणे तुम्हीही नाकारणारे बनावे, म्हणजे तुम्ही व ते सर्वजण एकसारखेच व्हावे. म्हणून त्यांच्यापैकी  कोणालाही आपला मित्र बनवू नका जोपर्यंत ते अल्लाहच्या मार्गात देशांतर (हिजरत) करून येत नाहीत, आणि जर ते स्थलांतरापासून पराङ्मुख राहतील तर जेथे आढळतील तेथे त्यांना  पकडा व ठार करा११८ आणि त्यांच्यापैकी कोणासही आपला मित्र व सहाय्यक बनवू नका.
(९०) परंतु ते दांभिक या आदेशाला अपवाद आहेत जे एखाद्या अशा जनसमुदायाला जाऊन मिळतील ज्याच्याशी तुमचा करार आहे.११९ अशाचप्रकारे ते दांभिकदेखील अपवाद आहेत जे  तुमच्यापाशी येतात आणि युद्धाविषयी त्यांचे मन खिन्न आहे, ते तुमच्याशीही युद्ध करू इच्छित नाहीत आणि आपल्या लोकांशीही नाही. अल्लाहने इच्छिले असते तर त्यांना तुमच्यावर  लादले असते आणि तेदेखील तुमच्याशी लढले असते. म्हणून जर ते तुमच्यापासून अलिप्त झाले आणि लढाईपासून दूर राहिले आणि तुमच्याकडे सलोखा व शांतीचा हात पुढे केला तर  त्यांच्यावर हात उचलण्याचा कोणताच मार्ग अल्लाहने तुमच्यासाठी ठेवला नाही.
(९१) आणखी एका प्रकारचे दांभिक तुम्हाला असे आढळतील जे इच्छितात की तुमच्याकडूनदेखील अभय लाभावे व आपल्या लोकांकडूनसुद्धा, पण जेव्हा कधी त्यांना उपद्रवाची संधी  लाभेल तेव्हा ते त्यात उडी घेतील. असले लोक जर तुमच्याशी दोन हात करण्यापासून दूर राहत नसतील आणि समेट व शांती तुम्हापुढे सादर करत नसतील व आपले हात आवरत  नसतील तर जेथे ते सापडतील त्यांना धरा व मारा, त्यांच्यावर हात टाकण्यासाठी आम्ही तुम्हाला उघड अधिकार देऊन टाकला आहे.

११६) येथे त्या दांभिक मुस्लिमांच्या समस्येवर विचार केला आहे ज्यांनी मक्का येथे आणि अरबच्या इतर ठिकाणी इस्लामचा स्वीकार तर केला होता परंतु हिजरत (देशत्याग) न करता  व `दारूल इस्लाम'मध्ये (इस्लामी राज्यात) न जाता अनेकेश्वरवादी बरोबर राहात होते. ते इस्लाम विरोधी बहुतेक कारवायांमध्ये त्यांच्यासोबत भाग घेत होते. त्यांच्याशी कोणता मामला  करावा याची मोठी समस्या मुस्लिमांसमोर होती. काही म्हणत की शेवटी ते मुस्लिमच आहेत. कलमा पढतात, नमाज अदा करतात, रोजे ठेवतात आणि कुरआनची तिलावत करतात.  यांच्याशी विद्रोही सारखा व्यवहार कसा होईल? अल्लाहने या रूकुअमध्ये (प्रभाग) याच समस्येचे उत्तर दिले आहे. या ठिकाणी हे स्पष्ट समजून घेतले पाहिजे अन्यथा फक्त येथेच नव्हे  तर कुरआनच्या त्या सर्व आयतींना समजण्यात मोठी घोडचूक होईल जिथे हिजरत न करणाऱ्या मुस्लिमांचा समावेश दांभिकात केला आहे. सत्य हे आहे की जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.)  यांनी मदीनाकडे हिजरत केली तेव्हा एक लहानसा भूभाग अरबच्या धरतीवर असा मिळाला की जेथे एक ईमानधारकाला आपल्या इस्लामी जीवनपद्धतीच्या सर्व आवश्यकतांना पूर्ण करणे  संभव होते. म्हणून जाहीर आदेश देण्यात आला की जेथे कोठे ईमानधारक असतील आणि ते विरोधकांमुळे दबलेले आहेत, त्यांना इस्लामी जीवनपद्धतीने आपले जीवन जगणे अशक्य  प्राय आहे; तेथून ते हिजरत करून `दारूल इस्लाम' मदीना येथे त्यांनी यावे. त्या वेळी हिजरत करण्याचे ज्यांच्यात सामथ्र्य होते आणि फक्त यासाठी आले. नाहीत की त्यांना त्यांचे  घरबार, नातेवाईक आणि भौतिक स्वार्थ इस्लामपेक्षा जास्त महत्त्वाचे होते; ते सर्व दांभिक, ढोंगी (मुनाफिक) घोषित केले गेलेत. जे लोक त्या वेळी खरोखरी विवश होते त्यांचा  `कमजोर' (मुस्तजआफीन) लोकांत समावेश केला गेला जसे पुढे रूकअ १४ मध्ये येत आहे. आता हे स्पष्ट आहे की `दारूल कुफ्र' चा रहिवाशी एखाद्या मुस्लिमास केवळ हिजरत न  केल्याने मुनाफिक (दांभिक) याच स्थितीत समजले जाऊ शकते की जेव्हा दारूल इस्लामकडे सर्व मुस्लिमांना बोलाविले गेले असेल किंवा त्यांच्यासाठी आपले दार उघडे ठेवले असेल. या  स्थितीत ते सर्व मुस्लिम दांभिक ठरतील जे `दारूल कुफ्र'ला `दारूल इस्लाम' बनविण्याचे प्रयत्नसुद्धा करीत नाही आणि सामथ्र्य असून हिजरतसुद्धा करीत नाहीत. परंतु `दारूल इस्लाम'  कडून बोलाविले गेले नसेल आणि आपले दार मुहाजिरांसाठी उघडे ठेवले नसेल तर अशा स्थितीत हिजरत न करणे एखाद्या मुस्लिमाला दांभिक बनवू शकत नाही. तो मुनाफिक त्या वेळी ठरेल ज्यावेळी त्याच्या हातून दांभिकतेचे कार्य घडेल.
११७) म्हणजे ज्या दुरंगी आणि परलोक जीवनाऐवजी लौकिक या जगातील प्राधान्य देण्याची वृत्ती त्यानी अवलंबलेली आहे, त्यामुळे अल्लाहने त्यांना त्याच दिशेने फेरले आहे, ज्या  दिशेने हे लोक आले होते. त्यांनी विद्रोहातून इस्लामकडे वाटचाल केली. परंतु याकडे आल्यानंतर ज्या एकाग्रचित्त होण्याची आणि बलिदानाची गरज होती तसेच परलोक जीवनावर प्रगाढ  विश्वासाची गरज होती ज्यामुळे मनुष्य मोठ्या आत्मविश्वासाने आपल्या या जगातील जीवनाचा त्याग करू शकतो; हे सर्व त्या लोकांना प्रिय वाटले नाही आणि म्हणून जेथून आले   तिकडेच पलटून गेले. आता त्यांच्याविषयी मतभेद कोणत्या मुद्यावर होऊ शकतो?
११८) हा आदेश त्या दांभिक मुस्लिमांसाठी आहे जे युद्धरत इस्लामविरोधी राष्ट्राशी संबंध ठेवून आहेत आणि इस्लामी राजवटी विरोधी शत्रुतापूर्ण कारवायात ते व्यावहारिक रूपात भाग घेतात.
११९) हा अपवाद या आदेशाचा नाही, ``त्यांना मित्र व सहाय्यक बनविले जाऊ नये'' तर या आदेशाशी आहे, ``त्यांना धरावे आणि मारावे'' अर्थ आहे की ईमानधारकाचे ढोंग करणारे  मुस्लिम ज्यांना ठार मारणे आवश्यक आहे, त्यांनी जर एखाद्या इस्लामविरोधी राज्यात आश्रय घेतला ज्याच्याशी इस्लामी राज्याचा करार झालेला आहे; तर त्यांच्या क्षेत्रात त्या दांभिक  मुस्लिमांचा पाठलाग करता येणार नाही. तसेच हेही योग्य नाही की इस्लामी राज्याचा एखादा मुस्लिम निष्पक्ष राज्यात गेल्यानंतर एखाद्या दांभिक मुस्लिमास पाहून त्याला ठार मारील. येथे सन्मान दांभिक मुस्लिमाच्या रक्ताचा नाही तर कराराचा आहे.

आपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था आहे. त्यामुळे बहूपक्ष पध्दतीची संसदीय लोकशाही अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष असतात. बहुमताच्या जोरावर निवडून आलेला तो सत्ताधारी पक्ष आणि दुसरा विरोधी पक्ष, ज्या पक्षांकडे आवश्यक ते संख्याबळ असत नाही अर्थात लोकशाही समाजव्यवस्था ही विरोधी पक्षांवर अवलंबून असते. म्हणून  विरोधी पक्ष लोकशाहीच्या रक्षणासाठी महत्त्वाचा असतो. सत्ताधारी हा नेहमीच ‘हम करे सो कायदा’ या न्यायाने वागत असतो. मात्र विरोधी पक्ष मजबूत व कणखर असेल तर  सत्ताधारी पक्षाला हुकूमशाही पद्धतीने वागता येत नाही. सत्तेचा गैरवापर होऊ द्यायचा नसेल तर मजबूत विरोधी पक्षाची अत्यंत आवश्यकता असते. विधायक कामासाठी विरोधी पक्ष  सत्तेवर आलेल्या पक्षाला दिशादर्शन करणारा असतो. देशहिताचे निर्णय कसे घ्यावेत हे विरोधी पक्ष दाखवून देत असतो.
मात्र सध्या आपल्या देशात विरोधी पक्षांचे अस्तित्व आहे की नाही, अशी परिस्थिती आहे. विरोधी पक्ष कमकुवत व हतबल झाल्यासारखे आहे. ही परिस्थिती चिंताजनक आहे, येणारा  काळ सशक्त लोकशाहीसाठी सकारात्मक असेलच असे ठामपणे कुणीच सांगू शकत नाही.
भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हे दोनच राष्ट्रीय पातळीवरील मुख्य पक्ष आहेत. डाव्या पक्षाचा प्रभाव नगण्य आहे. त्यांच्याबद्दलची विश्वासाहर्ता संपुष्टात आली आहे.  बाकीचे पक्ष नावापुरतेच राष्ट्रीय आहेत. काही ठराविक ठिकाणी राज्यातील ठराविक भागांत त्यांचे अस्तित्व दिसून येते. अर्थात राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली असली तरी ते  पक्ष प्रादेशिकच आहेत. परिणामी आजच्या काळात लोकसभेच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर केंद्रातील सत्तास्पर्धेसाठी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हे दोनच पक्ष अधोरेखित होतात. देशभरात असंख्य राजकीय पक्ष असले तरी केंद्रीय स्तरावर यातील बहुतेक पक्ष भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष या दोन पक्षांपैकी एका पक्षाचे  आघाडीचे घटक पक्ष असणार आहेत.
भारतीय जनता पक्षाचे एन.डी.ए. सरकार तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे यु.पी.ए. सरकार या देशातील जनतेने अनुभवली आहेत. १९९० पासून आघाडी सरकार स्थापन व्हायला सुरुवात  झाली. २०१४ साली भारतीय जनता पक्षाचे सरकार हे एन.डी.ए.चे सरकार म्हटले तरी संपूर्ण बहुमत भारतीय जनता पक्षाकडे होते. त्यामुळे २०१४ ते २०१९ ही पाच वर्षे भारतीय जनता  पक्ष हा एकमेव सत्ताधारी पक्ष होता. राष्ट्रीय काँग्रेस पक्ष विरोधी बाकावर होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात स्थापण झालेल्या सरकारने संपूर्ण ५ वर्ष सत्ता उपभोगली. या पाच वर्षात नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारची लोकप्रियता पूर्वीसारखी  राहिलेली नाही, हे वास्तव आहे. मध्यंतरी लोकसभेच्या झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पानिपत झाले आहे. गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थानसारख्या मोठ्या राज्यांत भाजपच्या लोकप्रियतेच्या बाबतीत सुरूंग लागला असल्याचे दिसून आले. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय नेते हडबडले. २०१४ ची परिस्थिती आता राहिलेली नाही, हे त्यांनी  ओळखले. नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेला ग्रहण लागले आहे ही जाणीव झाली. त्यामुळे पुलवामाचा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतांने पाकिस्तानात हवाई हल्ला केला व  चोख प्रत्युत्तर दिले, याचा फायदा भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांना झाला. आपल्या देण्यासाठी असणारी आपत्ती भाजपसाठी इष्टापत्ती ठरली. या घटनेचं भाजपने चांगले भांडवल करून पुन्हा आपले आसन खुट्टा मारून जाम केले. अर्थात भाजपच्या जागी काँग्रेस असती तर त्यांनीही तेच केलं असतं. काँग्रेस पक्ष जे प्रश्न भाजपच्या नेत्यांना विचारत आहेत, तेच प्रश्न भाजपच्या नेत्यांनी काँग्रेस पक्षाला विचारले असते. हवाई हल्ल्याचा पुरेपूर वापर भाजप करून घेत आहेत. लोकमत पुन्हा आपल्याकडे वळविण्यात भाजप यशस्वी  झाले आहे. या इष्टापतीमुळे देशबांधवांना आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातील प्रश्नांचा विसर पडला आहे. देशभरातील बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, स्वामिनाथन आयोगाच्या  शिफारशी, चलनवाढ, नोटाबंदी, वाढलेल्या भ्रष्टाचार, काळापैसा, दहशतवादी कारवाया, मॉब लिंचिंग, धार्मिक असहिष्णुता, जातिभेद, गोहत्याबंदी, त्यातून झालेल्या हिंसाचाराच्या घटना  यासारखे अनेक प्रश्न आपोआप मागे पडले आहेत. केवळ पाकिस्तानचा दहशतवाद आणि मोदी यांचे राष्ट्रप्रेम हे दोनच मुद्दे लोकांच्या लक्षात राहिले आहेत. पाकिस्तानला नमवायचे  असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही, असा बहुतेकांचा समज करून देण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी झाला आहे. खरं तर देशाच्या सीमासुरक्षेची जबाबदारी ही सरकारची असते.  शिवाय अशा कठीण परिस्थितीत देशातील प्रत्येक नागरिक व विरोधी पक्षासह सर्व राजकीय पक्ष हे सरकारसोबत असतात. मात्र भाजपने सर्जिकल स्ट्राईक करुन सर्वांचं लक्ष  आपल्याकडे वेधून घेतले. विरोधी पक्षाने मात्र सरकारने सर्जिकल स्ट्राईक केलाच नाही, अशी भूमिका घेतली व पुरावे मागत बसण्याचा मूर्खपणा केला, त्यामुळे आपोआपच जनतेच्या  मुख्य प्रश्नांवरुन जनतेला देशभक्तीच्या मुद्द्यावर केंद्रित करण्याची भाजपची खेळी अफलातून यशस्वी झाली. त्यामुळे भाजपच्या अंगात पुन्हा बळ आल्यासारखे सध्यातरी वाटत आहे.  फसलेली नोटा बंदी, राफेल करार व त्यातील भ्रष्टाचार, जीएसटी, स्विस बँकेतील काळा पैसा परत आणणे, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे, तरूणांना नोकऱ्या उपलब्ध  करून देणे, अंबानी, अदाणी, विजय माल्या यांच्या आर्थिक भानगडी व त्यांच्यावर असलेला भाजपचा वरदहस्त हे चर्चेत असलेल्या मुद्द्यांवर आपोआपच पडदा पडला आहे. पाकिस्तान  पोसत असलेल्या दहशतवादीवर भाजपच्या तडफदार नेतृत्वाखाली केलेली धडक कारवाई हा मुद्दा जनमानसांत ठसविण्याचा भाजपचा प्रयत्न पुरेपूर यशस्वी झालेला आहे, असे आता तरी  स्पष्टपणे दिसून येते आहे.

- सुनीलकुमार सरनाईक
मो.: ७०२८१५१३५२, कोल्हापूर

जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश असलेल्या आपल्या देशातील लोकसभेच्या निवडणुकीची संपूर्ण जगाला किती उत्सुकला आहे हे प्रसारमाध्यमांतील बातम्यांवरून आपणास कळून  येते. या उत्सुकतेत त्यांची स्वार्थी आस किती खोलवर रुजलेली आहे हे त्या त्या देशाची पार्श्वभूमी पाहता आपण समजू शकतो. पाकिस्तानाचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नरेंद्र मोदीच पंतप्रधान व्हावेत असा आशावाद नुकताच व्यक्त केला. भारत-पाकिस्तानचे संबंध सुधारण्याच्या दृष्टिकोनातून मोदीच अतिशय योग्य प्रधानसेवक असल्याचे त्यांचे म्हणणे आहेत. फक्त  इम्रान खानच नव्हे तर जगभरातील अनेक देशांच्या पंतप्रधानांना आणि प्रमुखांना मोदींच्या पुनरागमनाची आशा लागून राहिली आहे. यामागे अनेक कारणे असू शकतात. इम्रान खान  मनापासून बोलले की कोणाच्या दबावाखाली त्यांना असे बोलावे लागले, अशीही चर्चा झाली. पाकिस्तान हे आपले शेजारी राष्ट्र असले तरी दोन देशात नेहमीच तणावाचे संबंध राहिले. पुलवामा येथे सीआरपीफच्या जवानांच्या काफिल्यावर झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानव्याप्त बालाकोट येथे दहशतवादी केंद्रावर केलेले  बॉम्बफेक या घटनांपासून दोन देशातील संबंध आणखी चिघळले आहेत. मग इम्रान यांना मोदींविषयी अचानक प्रेम का उफाळून आले? इम्रान खान यांना माहीत आहे की आपण ज्याची  बाजू घेऊन त्याच्या विरोधात तेथील विरोधी पक्ष त्या वक्तव्याचा मुद्दा बनवतील आणि त्यास उत्तर देण्यास त्या व्यक्तीला भाग पडेल आणि निश्चितच काही मतदार त्यांच्यापासून दूर  जातील, ही खेळीदेखील असू शकते. यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत हिंदुमुस्लिम धृवीकरण आणि पाकिस्तानला धडा शिकवणारे नेतृत्व, या मुद्यावर भाजपने जोर दिला आहे. भाजपने  आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात पुन्हा एकदा अयोध्येत राम मंदिर उभारणार असल्याची घंटा वाजवली आहे. समान नागरी कायदा आणण्याचे व काश्मीरसाठी लागू असणारे ३७० वे  कलम रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच काश्मीरला विशेष दर्जा दिलेले ३५ ए हे कलमही रद्द करण्याचा शंख फुंकला आहे. भाजपने दिलेली आश्वासने ही हिंदू व्होट बँकेला  आकर्षित करणारी आहेत. ३७० कलम रद्द केले तर काश्मीर खोऱ्यात भारताचा तिरंगा फडकणार नाही, अशी धमकी नॅशनल कॉन्फरन्सचे सर्वोसर्वा फारूख अब्दुल्ला यांनीच दिली आहे.  पंधरा दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताकडून पाकिस्तानवर हल्ला होण्याची शक्यता असल्याचे म्हटले होते. अशा पार्श्वभूमिवर इम्रान खान यांनी मोदीच पुन्हा भारताचे  पंतप्रधान व्हावेत, असे म्हणणे हा पाकिस्तानाच्या कुटनीतीचा एक भाग दिसतो. मोदी पंतप्रधान झाले तर काश्मीरमध्ये निर्माण होणारी अशांतता पाकिस्तानच्या पथ्यावर पडत असावी.  अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाचे अध्यक्ष ब्लादेमार पुतीन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली होती. तीच कुटनीती इम्रान खान भारतातील निवडणुकीच्या निमित्ताने अवलंबत आहेत काय? इम्रान खान यांच्या वक्तव्याचा भाजपला फायदा होईल का? असा प्रश्न उपस्थित होतो. भारतातील निवडणुका जाहीर  होताच रशियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या देशातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार (ऑर्डर आफ सेंट अ‍ॅन्ड्यू द एपोस्टल) देण्याची घोषणा केली. या पुरस्काराची सुरूवात १७व्या  शतकाच्या शेवटी रशियाचे तत्कालीन सम्राट जार पीटर प्रथम यांनी केली होती. परंतु जुलै १९९८ मधे तत्कालीन राष्ट्रपती बोरिस एल्तसिन यांनी यांनी हा पुरस्कार पुन्हा सुरू केला.  मोदी यांना रशियासह आठ आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळतील. यामध्ये संयुक्त राष्ट्राचा सर्वोच्च पर्याररण पुरस्कार चॅम्पियन ऑफ अर्थ द अवार्ड यासारखा प्रतिष्ठित पुरस्काराचादेखील  समावेश आहे.
यामध्ये चार पुरस्कार मुस्लिम देशांकडून- सऊदीअरब, पॅलेस्टाइन, अफगानिस्तान आणि संयुक्त अरब अमीरातचा (जायद मेडल हा सर्वच्च नागरिक पुरस्कार) यांनी दिले आहेत. हे सर्व   पुरस्कारांची घोषणा निश्चितच आंतरराष्ट्रीय राजकीय उद्देशापोटीच केली जाते हे उघड आहे. मात्र मतदारांना वाटू लागते की येथील नेत्याचा जग इतका सन्मान करते तर आपण त्यांना  का मत देऊ नये? सन २०१९च्या सुरूवातीलाच जगाला माहीत झाले होते की भारतातील सार्वत्रिक निवडणुकांची उलटी गणना सुरू झालेली आहे. तरीही ते मोदींनाच पसंत करीत आहेत,  हे अकारण असू शकत नाही. गत फेब्रुवारीत त्यांना आशियाचा नोबेल समजला जाणारा दक्षिण कोरियाचा आंतरराष्ट्रीय शांती पुरस्कार देण्यात आला होता. इस्रायल व अमेरिकादेखील  यामध्ये मागे राहिलेला नाही. त्यानेदेखील भारताचे गुणगान सुरू केले आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी यापूर्वीच मोदींना मित्र बनविले आहे. जगभरातील हे अनेक देश  मोदींचा उदो उदो करून भारताशी जागतिक राजकारणची आपली पोळी भाजू पाहात आहेत. मात्र जर का त्यांचे पुनरागमन झाले तर त्याचे धोके येथील जनतेलाच भोगावे लागतील, हे विसरून चालणार नाही.

-शाहजहान मगदुम
(मो.:८९७६५३३४०४, Email: magdumshah@eshodhan.com)

आज आपल्या देशात शिक्षण हक्क कायदा झाल्यानंतरही मुस्लिम समाजातील हजारो मुले-मुली शिक्षणापासून वंचित आहेत. या समाजातील मुलांपैकी शाळेत न जाणाऱ्यांची संख्या आज  लाखांच्या घरात आहे. शिक्षणाच्या बाबतीत मुस्लिम समाज देशात मागे आहे. शैक्षणिक क्षेत्रात त्यांची प्रगती व विकास खुंटलेला आहे. यासाठी त्यांची आर्थिक परिस्थिती कारणीभूत  आहे.
सर्वशिक्षा अभियान महाराष्ट्रात आले तेव्हा येथील शाळाबाह्य मुलांची संख्या जवळपास १६ लाख होती. दुसऱ्या वर्षी दोन लाखांवर आली. एका वर्षात जवळपास १४ लाख मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली, पण दुसरीकडे राज्यातील प्राथमिक शाळेत जाणाऱ्या मुलांची एकूण संख्या वाढली नाही. म्हणन तर देशभरात शिक्षणाची नको एवढी दुरवस्था झाली आहे. शिक्षणाचा दूर्गम भागापर्यंत प्रचार व प्रसार व्हावा यासाठी राज्य शासनाने प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाची योजना हाती घेतली ती सरकारी पातळीवरून चांगल्या प्रकारे राबवली  खरी परुंत तरीही दुर्दैवाने प्राथमिक शिक्षण प्रत्येक मोहल्ल्यात व वाडीवस्तीपर्यंत, डोंगरखोऱ्यात राहणाऱ्या मुस्लिम समाजातील मुलामुलींपर्यंत अद्यापही पोहोचली नाही, हे वास्तव आज  समाजाला स्वीकारावेच लागेल.
शिक्षण तळागाळापर्यंच पोहोचविण्याच प्रयत्न भरपूर झाले पाहिजेत. शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत हक्क बनला असताना त्याला मोफत व सक्तीचे शिक्षण देणारा कायदाही देशात  आहे. तरीही मुस्लिम समाजातील ती गोरगरीब मुले शाळेपासून वंचित राहण्यापासून वाचू शकलेली नाहीत. उलट शाळेत येणारी मुलेदेखील प्राथमिक शाळा बंद झाल्यामुळे शिक्षण  प्रवाहाच्या बाहेर फेकली जात आहेत.
मुस्लिम समाजातील मुलांची मोठी संख्या शाळाबाह्य राहण्यामागचे दुसरे प्रमुख कारण म्हणजे ग्रामीण भागातील कुटुंबांची रसातळाला पोहोचलेली सामाजिक आणि आर्थिक स्थिती. ही  परिस्थिती मुलांच्या शिक्षणातील मोठी अडचण ठरत आहे. एका बाजूला श्रीमंत आणि मध्यमवर्गीयांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे या मुस्लिम मसाजात गरिबीही मोठ्या प्रमाणात  वाढत आहे. अठराविश्वे दारिद्र्यात खितपत पडलेल्यांची संख्या लक्षणीय आहे. दारिद्र्यामुळे त्यांना पोटाचीच भ्रांत असते. तेथे मुलामुलींना शिक्षण कोठून देणार? कामावर नाही गेले तर  खायला मिळणार नाही याची त्यांना चांगलीच जाणीव आहे. म्हणून मुस्लिम समाजचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. शिक्षणाच्या अभावामुळे पुढील जीवनात अनेक अडचणींना तोंड द्यावे  लागते. विचार करण्याची शक्ती कमी झालेली असते आणि बुद्धी मर्यादित काम करीत असते. त्यामुळे जीवनात नैराश्य येणे आणि आयुष्यभर आपल्या आईवडिलांना दोष देणे एवढेच उरते.
त्यामुळे जीवनात नको त्या समस्यांना बळी पडावे लागते. या समाजातील अनेक गरीब लोक दिवसभर बाजारात फळभाजी विकणे, मिस्त्रीकाम, पेंटर, हमाली, पाव विकणे, मोटार  सायकल दुरुस्ती करणे, विटभट्ट्यांवर काम करणे आणि शेतात कामे करतात. त्यामुळे कुटुंबाची आर्थिक गरज भागविण्यासाठी मुलांना शाळेत पाठविण्याएएवजी मजुरीला पाठवणे त्यांच्यासाठी गरजेचे असते. आजच्या काळात जगण्यासाठी पैशाची गरज असते हे सत्य कुणालाच नाकारता येणार नाही. जीवन जगताना प्रत्येक ठिकाणी पैसा लागतो आणि पैसे हवे  तर त्यासाठी हातांना काम हवे. काम करणारे हात जास्त असतील तर दोन पैसे अधिक मिळतील, अगदी हाच विचार करून अनेक मुस्लिम कुटुंबे आपल्या मुलांना शाळेत  पाठविण्याऐवजी आपल्यासोबत कामाला घेऊन जातात. त्यामुळेच लहान लहान मुले अनेक स्वयंरोजगारीच्या क्षेत्रात आढळून येतात. अजूनही कित्येक मुस्लिम लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटलेले नसल्याने आपण अज्ञानी राहिलो याची खंत असूनही ते मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यास विवश आहेत. विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पुस्तके, शैक्षणिक साहित्य,  दुपारचे जेवण इ. पुरवत असूनदेखील मुस्लिम समाजातील मुले शिक्षणाच्या प्रवाहाबाहेरच दिसून येतात, याची कारणे तुम्ही आम्ही सर्वांनी शोधली पाहिजेत.
हा प्रश्न मुस्लिम समाजाला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारा आहे. अनेकदा असेही आढळून येते की शाळेतील शिक्षकांना शिकविण्याऐवजी सदोदीत अशैक्षणिक अशा शासकीय  कामांना जुंपलेले असते. बऱ्याचदा मुले शाळेत तर शिक्षक वर्गाबाहेर ही स्थिती सरकार व राज्यकर्त्यांच्या आशीर्वादाने सर्वदूर दिसून येते. त्याचा परिणाम मुलांच्या हजेरीवर व शैक्षणिक  आवडीवर होताना दिसून येतो. हे सामाजिक वास्तव असले तरी राज्यकर्त्यांनी त्यापासून काही बोध घेतल्याचे दिसत नाही. समाजातील एकही मूल शाळाबाह्य राहाणार नाही असे वाटत  असेल तर मुस्लिम समाजाने हातात हात घालून प्रामाणिकपणे काम करण्याची अत्यंत गरज आहे. असे जर समाजाने मनावर घेतले तकर शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न  कायमचा सुटेल.
समाजातील मुलामुलींच्या शिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे. ती आज काळाची गरजही आहे. तसेच गरीब मुलांच्या शिक्षणाची दुरवस्था झालेली आहे. सरकारी शाळांतील गरीब मुलांच्या शिक्षणाचा पुरता सत्यानाश झाला आहे. सरकारी शाळांमध्ये येणारी मुस्लिम मसाजातील मुले अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आलेली असतात. बऱ्याच जणांचे पालक  अशिक्षित असतात. अनेक मुलांच्या राहण्याचा, खाणन्याचा पत्ता नसतो. रस्त्यावर उघड्यावर त्याची जीवन असते. अशा भयावह परिस्थितीतील मुलांना शिकण्यासाठी सरकारी शाळा  हाच एकमेव पर्याय असतो. परंतु त्या आधारावरच या ना त्या कारणाने सरकार हा आधारच बंद करून टाकत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस राज्यात गरीब मुस्लिम मुलांच्या शिक्षणाचे  काय? हा प्रश्न मुस्लिम समाजासाठी चिंतनातून चिंतेचा झाला आहे. मुस्लिम समाजाला मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत जागृत केले पाहिजे. आपल्या मुलामुलांना शाळेत पाठविण्यास  त्यांना बाध्य केले पाहिजे. शाळेच महत्त्व त्यांना पटवून सांगितले पाहिजे. त्यांच्या शैक्षणिक हितांसाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले पाहिजेत. शासनाचे लक्ष या समस्येकडे वेधले  पाहिजे, तरच मुस्लिम समाजाचा विकास व उन्नती होईल अन्यथा निरंतर हा समाज दारिद्र्यात खितपत राहील.

- गुलाब नजीर पिंजारी
निंभोरा- रावेर (जि.जळगाव)
मो. 9689035792

मुंबई-
कोकणातील दापोलीतील लेखक इक्बाल शर्फ मुकादम यांच्या २१ व्या पुस्तकाचे अनावरण येथील अंजुमन इस्लाम हायस्कूलच्या करिमी हॉलमध्यें अब्दुल कादर मुकादम यांच्या हस्ते  पार पडले. व्यासपीठावर डॉ अब्दुल सत्तार दळवी, आर डी खतीब डिंपलचे अशोक मुळे, डॉ. कय्यूम मुकादम आणि हाजी एल एस खलफे मान्यवर उपस्थित होते.
लेखक इक्बाल मुकादम यांनी प्रस्तावनेत ‘अकल्पित’ कथासंग्रहाविषयी थोडक्यात भाष्य केले. तर अब्दुल कादर मुकादम यांनी पुस्तकातील अनेक कथा या गूढ असून शेवट वाचताना   O Henry या इंग्रजी लेखकाच्या कथांसारखा चटका लावून जातात. कोकणाच्या मातीशी इमान राखणारा हा लेखक स्वत:ची एक शैली निर्माण करतो. असे मत व्यक्त केले. मुकादम हे  नामवंत लेखक, तसेच विचारवंत व व्याख्याते म्हणून मराठी साहित्यक्षेत्रात ओळखले जातात. आर डी खतीब यांनी शर्फ मुकादम यांचे स्मरण करून लेखकास शुभेच्छा दिल्या.
डॉ अब्दुल सत्तार दळवी यांनी क्रिएटिव्हिटीचा एक वेगळा अनुभव देणारे हे पुस्तक म्हणून वाचकांनी त्याचे स्वागत करावे, असे नमूद केले. कार्यक्रम कोकण उर्दू फोरम या संस्थेच्या  वतीने आयोजित करण्यात आला होता. जमालुद्दीन यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरिफ मोहीमतुले यांनी केले. कार्यक्रमानंतर लगेचच प्रसिद्ध संगीतकार  मझर शेख यांनी इकबाल मुकादम लिखित/स्वरबद्ध केलेल्या एकूण ३५ गाण्यापैकी ९ निवडक गाणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली व कार्यक्रमाची संगीतमय सांगता झाली. खेड/  मंडणगड/ दापोलीतल्या मुंबईस्थित साहित्य मंडळाचे अध्यक्ष सुधीर कदम आणि सहकारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी दापोलीहून रत्नागिरी टाईम्स या लोकप्रिय दैनिकाचे उपसंपादक रमेश जोशी आवर्जून उपस्थित होते. दापोली, मुंबई, ठाणे, बदलापूर, पनवेल, खारघर पुणे येथून अनेक मान्यवर या इव्हेंटमध्ये सामील झाले होते.
‘नवकथाकार' या कल्याण येथील व्हाट्सऍपच्या ग्रुपमधील अनेक कथाकार आवर्जून आले होते. पैकी पटवर्धन मॅडम यांनी सोशल मीडियावरील मुकादम यांच्या एकूण लिखाणाची दखल  घेत आपले विचार व्यक्त केले. आखलाक नागोठणे हे शैक्षणिक क्षेत्रातील समाजसेवक यांनी लेखकाची ऑनलाईन मुलाखत घेतली.
तसेंच साहिल फाऊंडेशनचे चाँद खतीब, आसिफ तसेच अल्ताफ आणि साहिलच्या महिला मंडळाच्या सदस्या नजमा खतीब, मुनिरा टिकले, फातिमा मुकादम ही सर्व मंडळी विशेष उपस्थित होती.

पुरोगामी विचार-चळवळ गतिमान झाली पाहिजे -डॉ. आ. ह. साळुंखे


सातारा-
पुरोगामी विचार -चळवळ गतीमान झाली पाहिजे, असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी व्यक्त केले व या दिशेने मिनाज सय्यद यांचे कार्यभूषणास्पद असल्याचे  सांगितले. संबोधी प्रतिष्ठानचे संस्थापक सदस्य ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिवंगत कॅप्टन साहेबराव बनसोडे यांचे स्मरणार्थ देण्यात येणारा या वर्षीचा बारावा सामाजिक कार्यकर्ता  पुरस्कार परिवर्तनवादी डाव्या संघटना समन्वय समितीचे संघटक व महाराष्ट्र राज्य पातळीवरील जातीय-धार्मिक सलोखा गटाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मिनाज सय्यद यांना डॉ. आ. ह. साळुंखे  यांच्या हस्ते नगर वाचनालयाच्या पाठक हाँलमध्ये झालेल्या समारंभात प्रदान करण्यात आला, त्या प्रसंगी ते बोलत होते.
विचारमंचावर ज्येष्ठ अभ्यासक कार्यकर्ते किशोर बेडकिहाळ, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य अण्णासाहेब होवाळे, उपाध्यक्ष दिनकर झिंब्रे, कार्यवाह अ‍ॅड. हौसेराव धुमाळ उपस्थित होते. या  वेळी किशोर बेडकिहाळ व डाँ. साळुंखे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा येथील राजवाड्यातील छ. प्रतापसिंह हायस्कूलमध्ये पहिली ते चवथी इयत्तापर्यंत फी भरून  शिक्षण घेतले. याबाबतची शाळेच्या दप्तरातील बाबासाहेबांची सहीची नोंद असलेली ऐतिहासिक दस्तावेज फोटो काँपीसह संबोधीच्या बत्तीस वर्षातील वाटचालीमधील निवडक कार्यक्रमांचे  दोनशेहून अधिक रंगीत फोटोंचा समावेश असलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
डॉ. साळुंखे म्हणाले, प्रसिद्धीपासून दूर राहून चिकाटीने काम करण्याचा समान दुवा कॅप्टन साहेबराव बनसोडे व मिनाज सय्यद यांच्यात असल्याने योग्य व्यक्तीचा योग्य वयात गौरव  होत आहे, याचा आनंद आहे. किशोर बेडकिहाळ म्हणाले, मिनाजच्या चळवळीतील प्रवासाचा मी साक्षीदार आहे. युवा पिढीला घडवण्याचे त्याचे कार्य कौतुकास्पद आहे. संबोधी प्रतिष्ठान  बत्तीस वर्षापासून प्रबुद्ध नागरी समाज घडविण्याचे मौलिक कार्य करीत आहे. महाराष्ट्रातील सामाजिक संस्थांनी त्यांचे अनुकरण करावे.
मिनाज सय्यद यांनी आपल्या जीवनप्रवास व चळवळीतील अनुभव कथन केले. त्यांच्या पत्नी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजश्री देशपांडे, सलोखा गटाचे पुणे येथील कार्यकर्ते लेखक प्रमोद  मुजुमदार तसेच थोरांच्या स्मृती व्याख्यानमालेचे बीजारोपण करणारे आर. आर. पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. त्यांचा तसेच कॅप्टन बनसोडे यांच्या पत्नी यमुनाताई यांचा या वेळी  सत्कार करण्यात आला. प्रा. प्रशांत साळवे यांनी आभार मानले. अ‍ॅड. हौसेराव धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले.
प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष केशवराव कदम, विश्वस्त रमेश इंजे, प्राचार्य संजय कांबळे, आयुर्विमा महामंडळाचे निवृत्त अधिकारी भास्कर फाळके, प्रसिद्ध शास्त्रज्ञ लेखक डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, नगरचे प्रसिद्ध चित्रकार श्रीधर अंभोरे यांच्यासह विविध संस्था-संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते तसेच अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुरआनमधील आले इमरान या अध्यायात आयत क्र. 26 मध्ये म्हटले आहे की, ’वतु इज़्ज़ुमनत्तशाऊ वतू ज़िल्लूमनत्तशाऊ’ अर्थात सन्मान आणि अपमान दोन्ही अल्लाहकडूनच  आहेत. सदरची आयत प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्यावर अवतरित झाली ती प्रलयाच्या दिवसापर्यंत येणाऱ्या लोकांसाठी मार्गदर्शक आहे. याचा अर्थ समजून घेणे प्रत्येक व्यक्तीसाठी  आवश्यक आहे. या आयातीचा अर्थ लावताना कुरआनच्या अनेक भाष्यकारांनी अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत. थोडक्यात सांगायचे म्हणजे या आयातीचा उद्देश पुण्यवान लोकांना  अधिक पुण्याची कामे करण्यासाठी प्रेरित करणे आहे.
माणूस जेवढा जास्त नीतिमान होतो आणि पुण्याची कामं करतो तेवढाच तो अल्लाहच्या पसंतीला उतरतो आणि त्या बदल्यात त्याला जगामध्ये सन्मान आणि प्रसिद्धी दोन्ही मिळतात.  पुण्याची कामे केल्याने सन्मान आणि प्रसिद्धी विनासायास यासाठी मिळते की, त्या कामामुळे सामान्य जनांना त्याचा सरळ लाभ होतो आणि सामान्य माणसं मग पुण्यवान माणसांची  कदर करू लागतात, त्यांचा सन्मान करतात आणि त्यांचे नाव लोकांच्या तोंडात राहते आणि लोकालोकी त्यांच्या पुण्यकर्माची प्रसिद्धी उत्तरोत्तर वाढत जाते.
जगामध्ये काही असे लोकही आहेत जे स्वार्थी, घमंडी आणि सदैव प्रसिद्धीस हपापलेले असतात. त्यांना येनकेन प्रकारेन स्वतःची प्रतिष्ठा वाढवायची आणि काहीही करून प्रसिद्धी  मिळवायची इच्छा असते. अशा लोकांना सुद्धा या आयातीमध्ये चेतावनी दिलेली आहे की, तुम्ही कितीजरी प्रयत्न केला तरी जोपर्यंत अल्लाह सन्मान आणि प्रसिद्धी प्रदान करणार नाही  तोपर्यंत तुम्हाला ती प्राप्त होणार नाही. सर्वसाधारणपणे पुण्य न करता प्रसिद्धी प्राप्त करणाऱ्या लोकांनी आपल्या मनाशी एक खूनगाठ बांधलेली असते की, प्रसिद्धी आणि सन्मान दोन्ही  स्वतःच्या प्रयत्नांनी अर्जित करता येतात. अनेक लोक बोलूनसुद्धा दाखवितात की, ही प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी आम्ही स्वकष्टाने अर्जित केलेली आहे. मात्र ती कमावतांना ते अनैतिक मार्गाचा सुद्धा अवलंब करत असतात. ज्यावेळेस असे लोक अनैतिक मार्गाचा अवलंब करतात तर अल्लाह त्यांना मोहलत (संधी) देत असतो. मात्र काही लोक या संधी मागील ईश्वरीय  मन्सुब्याला ओळखू शकत नाहीत आणि आपल्याच भ्रमात फार पुढे निघून जातात. अशा लोकांना प्रसिद्धी आणि सन्मान दोन्ही मिळतात पण त्यातील फोलपणा त्यांना कळत नाही. अशा लोकांना मिळालेली प्रसिद्धी ही नकारात्मक असते आणि सन्मान हा फक्त तोंडावर केला जातो. पाठ फिरताच लोक वाईट बोलू लागतात. कारण ज्या पद्धतीने खोटे बोलून, चोरी   करून, फसवणूक करून, अप्रामाणिकपणे असे लोक धन, सन्मान आणि प्रसिद्धी मिळवत असतात त्याबद्दल जनतेला खडा न् खडा माहिती असते. केवळ ते तोंडावर बोलून दाखवत  नाहीत एवढेच. या वाईट गोष्टींबरोबर केली जाणारी प्रगती ही खरी प्रगती नसते. कारण या सगळ्या गोष्टी अल्लाहला नापसंत असून, त्याचा रोष ओढवून घेण्यासाठी पुरेशा आहेत.  अल्लाह आपल्या प्रत्येक बंद्याकडे पाहत असतो. त्याच्या चांगल्या आणि वाईट कर्माकडे पाहत असतो. ज्याला ज्या पद्धतीने प्रसिद्धी आणि प्रगती हवी असते तो त्याला त्याच पद्धतीने  पुढे जाण्यासाठी मार्ग प्रशस्त करत असतो. जर वाम मार्गाने सन्मान आणि प्रगती मिळविणारे लोक वेळीच सावधान झाले आणि त्यांनी तौबा केली व वाईट मार्गाचा त्याग करून सन्मार्गाला लागले तर अल्लाह त्यांना क्षमा करतो. मात्र प्रगती आणि प्रसिद्धीच्या नशेमध्ये ती खेचून आणण्याकडेच ज्या लोकांचा कल असतो ते संधी मिळूनही सावध होत नाहीत, असे  लोक जेव्हा एका मर्यादेपेक्षा जास्त पुढे जातात तेव्हा अल्लाह त्यांना त्यांची जागा सुद्धा दाखवून देण्यास मागे पुढे पाहत नाही. हाच या आयातीचा खरा अर्थ आहे.
म्हणजेच अल्लाह ज्याला सन्मान आणि प्रगती देऊ इच्छितो त्यांना ती देतो आणि ज्यांना देऊ इच्छित नाही त्यांना ती बिल्कूल देत नाही. तो अल्लाहच आहे ज्याने सर्व सृष्टीची निर्मिती केलेली आहे. आपलीही रचना त्यानेच केलेली आहे आणि तोच पूजनीय आहे.
अनेक लोक खोट्या सन्मान आणि प्रसिद्धीच्या मागे आयुष्यभर पळत असतात. आजकाल स्वस्थ प्रसिद्धी आणि खोटा सन्मान प्राप्त करण्यामध्ये लोक एकमेकांशी स्पर्धा  करीत आहेत  आणि हीच लालसा त्यांना वाममार्गाकडे घेऊन जात आहे. पण प्रसिद्धीच्या नशेमध्ये झिंगलेल्या या लोकांना आपण काही वाईट करत आहोत, हेच लक्षात येत नाही, असे लोक चांगल्या  लोकांचा दुस्वास करतात, त्यांची इर्शा करतात. अनीतिने कमाविलेल्या पैशाच्या जोरावर सन्मान प्राप्त करण्याच्या प्रयत्नात असतात.
त्याच वेळेस दूसरे लोक अत्यंत प्रामाणिकपणे अल्लाहने सांगितलेल्या मार्गावर चालून कठीण परिश्रम करत असतात आणि लोकांची सेवा करत असतात. खऱ्याने वागत असतात.  इतरांची मदत करतात. मग अल्लाह त्यांना त्याच मार्गामध्ये बरकत अता करतो. ज्यामुळे अशा लोकांची प्रगती आणि सन्मान जनतेमध्ये उत्तरोत्तर वाढत जातो. मात्र यामध्ये  कोणताही नकारात्मक पैलू नसतो.
या दोन्ही प्रकारच्या लोकांच्या वर्तणुकीचा अभ्यास केला असता एक गोष्ट लक्षात येते की, प्रसिद्धी आणि प्रगती एका गटाला अल्लाहकडून पुरस्कार स्वरूपात मिळत असते तर दूसरा  गट ती स्वतःच्या बळावर खेचून आणण्याच्या प्रयत्नात असतो. अशा लोकांना अल्लाह सन्मार्गावर चालण्याची समज देओ आणि जी प्रगती आणि सन्मान अल्लाहकडून मिळतो त्या  पुण्यवान लोकांची तशीच प्रगती होवो. (आमीन.)

- फेरोजा तस्बीह
मिरजोळी, 9764210789

विरोध आणि विद्रोह केवळ हौसेपोटी नसतो. तो तसा नसावाही. केवळ फॅशन किंवा प्रचलन म्हणून ओरड होत असेल तर कोरडेहासे थांबतील. माझी ओरड दुःखाच्या ओलाव्यांनी भरलेली  आहे. प्रचारार्थ भारलेल्या सगळ्याच पक्षपार्ट्यांमधून अंधभक्ताची सहेतूक वाढ ही लोशकाहीचा गळा घोटणारी ठरू पाहतेय. सामान्य लोकांचा आवाज कोणत्याही पक्षाच्या आवाजात  मिसळत नाही. त्यातूनही मुस्लिम प्रादेशिकतेमध्ये अडकलेला बेरोजगार तरूण अत्यवस्थ आहे. आपलं म्हणावं ज्यांना त्यांच्या अजेंड्यातून ’मुस्लिम आरक्षण’ गायब आहे. किंवा इथूनही  ’नजीब’चा पत्ता गायबच! हंगामी मुव्हमेंटचे म्होरके कुणाच्या सावलीत विसावतहोत हेही कळायला मार्ग नाही. समाज भयभीत आहे, निद्रिस्त आहे, धमक्यांच्या जाणीवांनी शांत आहे.  उरला उच्चवर्ग रोखठोक नाही. कुबड्या घेऊनच सारा प्रवास, आपण सगळेच अपंग (सॉरी दिव्यांग).
लोकशाहीत अंतिम सत्ता लोकांच्याच हाती असते पण त्या शक्तीसामर्थ्यानं मतांच्या माध्यमातून सत्तानिर्माण करण्याची ताकद आपलीच आहे, हे जाणण्याची योग्य प्रगल्भता समाजात  असायला हवी, तीचा अभाव आहे तो अजून कितीकाळ राहील? दरवेळेस वचने, जाहीरनामे, भविष्यातले वादे खूप झाले. खरंच आपल्यासाठीची म्हणून सुखसमृद्धी येणार असेल तर ती  येणार कधी?
वास्तवाशी भिडून, सत्यकथन करणारी एखादी नवी मांडणी सुद्धा या ’बेमूर्वत’ काळात मोडून पडली आहे.
भयतालातील अंधारी साम्राज्य दूर जाऊन दीप उजळावेत खाण्यापिण्याराहण्याची, शिकण्या-बोलण्या - लिहिण्याची प्राथमिक गरज ही संशयाच्या तराजूत तोलून मिळत असेल तर खडबडून  जागे होणार कधी आपण?
कुचकामी विचारवंत, व्यक्तीमहात्म्याने भारलेली राजकीय भाषा, इतिहासाच्या मोडतोडीतून आलेले मुद्दाम दुषित असलेले संस्कार, साहित्यातील हुजरेगिरी, सांस्कृतिक दारिद्रय आणि  उपाशीपोटातून नव्या क्रांतीचं कोणतं गाणं आपण सुरात गाणारं आहोत?
सत्ताधिश कोणीही असो, तो प्रस्थापित झाला की माणसाचं जगणंच कुचकामी ठरवतो. अशा सत्तापतींना जबर चपराक देणाऱ्या विवेकवाद्यांची मोठी जपमाळ हल्ली जपली जातेय.  केवळ सध्याचेच सत्ताधीश जनसामान्याला त्याच्या आवाजाला दाबून ठेवतात असे नाहीच. चार विचारवंत शहिदांशी सख्य सांगत गळे काढणारे तंत्रयुगाचे विकीपीडितांत्रिक म्हणजे इथले  सगळेच गटातटांचे ’वादी’ आपोआप काही नावांना बगल देतात.
प्रागतिक आणि सामान्यजणांची सुख-दुःख भाषा बोलणाऱ्या मांडणाऱ्या सफदर हाश्मींच्या शहीदी बद्दल काय? सत्तेला विरोध करताना सर्वसमावेशक भूमिकेला अधोरेखित होते पण  त्यातूनही विवेकवाद्यांच्या बाजूने प्रस्थापितांवर ‘हल्लाबोल’ करणारा सफदर हरवला जातो. (पारंपारिक सॉफ्टवेअर ब्राम्हणी सौंदर्यशास्त्राचं)... ’पढना लिखना सिखो’ ते सडकनाट्याचा  कलात्मक निर्माता. बहुअंगी व्यक्तीमत्वाचा उच्चार ही मर्यादित करून, मेमरीतून त्याला गायबच करायचा हे पक्क ठरवून केलं जातं.
बाकीच्या शहिदांचे बाजारीकरण, फोकसिंग ठिकठाक घसघशीत.. एकूण काय.. नावात जात, जातीत धर्म, कर्मव्यवाधिकारस्ते, करीत रहा कर्म.. शोधित रहा व्यवस्थेच मर्म...
सफदरचा सालगीराह आणि विस्कटलेल्या विचारांचे षंढ धागे- लिहवत नाही... म्हणून निदा फाजलीच्या या सत्याला भिडणाऱ्या ओळींना ठेवतो...

हर एक घर में दिया भी जले, अनाज भी हो,
अगर न हो कहीं ऐसा तो एहतेजाज भी हो
हुकूमतों को बदलना तो कुछ मुहाल नहीं
हुकूमतें बदलती हैं वो समाज भी हो
रहेगी कबतलक वादों में कैद खुशहाली
तुम्हारे शहर में कुछ और कामकाज भी हो...

- साहिल शेख
8668691105

पूर्ण विश्वामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या प्राचीन संस्कृतीमध्ये ग्रीक, रोमन, सिंधू, इजिप्त यांचा समावेश होतो आणि या संस्कृतीनुसार जीवनपद्धतीने जीवन जगणारे आणि चालणाऱ्या  देशांमध्ये ग्रीक, रशिया, इजिप्त, भारत, इराण, इराक या देशांचा अंतर्भाव होतो. या देशांच्या इतिहासापूर्वी पृथ्वीतलावर एका आदीमानवांचं जोडपं म्हणजे नर-मादी (आदम व हव्वा)  यांचे प्रगटन झाले आणि त्यापासून मानव जातीचा विकास व निर्मिती झाली. स्वतःच्या जीवीताच्या रक्षणासाठी मानव समूह करून राहू लागला व जसजशी मानवांच्या संख्येत वाढ  झाली तसतसा तो नदीच्या बाजूच्या सुपीक प्रदेशात वास्तव्य करू लागला. त्यातून विविध संस्कृतींची निर्मिती झाली. उदा. सिंदू नदीच्या खोऱ्यातील सिंधू संस्कृती तसेच नाईल नदीच्या  खोऱ्यातील इजिप्तची संस्कृती होय.
अशा अनेक संस्कृतीमध्ये जीवन जगत असताना मानवाने आपल्या बुद्धीकौशल्यावर स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचा यथायोग्य प्रयत्न केला.  परिणामी धर्मव्यवस्था प्रचलित झाली. ’’धर्म म्हणजे जीवन जगण्याची नियमावली.’’ निसर्गाद्वारे धर्माची आचारसंहिता अवतरली. एका मूळ धर्माचे अनेक धर्म झाले. नंतर यापैकी अनेक  धर्मांमध्ये काही कालावधीपर्यंत स्त्रीचे स्थान अत्यंत दीन किंवा निकृष्ठ दर्जाचे होते त्यामुळे तिच्याकडे उपभोग्य वस्तू अथवा निर्जीव वस्तू म्हणून तिला हीन लेखले जात होते.
ग्रीक, रशिया, इजिप्त, इराक, भारत, चीन या प्रत्येक ठिकाणी स्त्रीयांवर अत्याचारच होत होता. बाजार, उत्सव, उरूस यामध्ये स्त्रीयांची कवडीमोल किंमतीत विक्री खरेदी आणि तस्करी होत होती. पैगंबर मुहम्मद (सल्ल.)  यांच्या पूर्वीच्या काळात तर ग्रीकमध्ये स्त्रीला आत्मा आहे की नाही, यावर हजारो वर्ष वादविवाद झाले. पाप-पुण्याच्या कल्पना मांडत असतानाच  पापाचे प्रतिरूप म्हणून स्त्रीकडे पाहिले जाऊ लागले. पापाची सुरूवात स्त्रीच्या जन्मापासून सुरू झाली अशाही अख्याईका रचल्या गेल्या आणि त्याला पौरोहीत्याच्या आधार दिला गेला. त्यामुळे स्त्री जन्माला आल्यापासून ते तिच्या अंतापर्यंतचे संपूर्ण जीवन दुसऱ्याच्या अधिन करण्यात आले. त्याचबरोबर तिला दुसऱ्यावर विसंबुनच जगण्याची व्यवस्था बहुतांशी देशांमध्ये  निर्माण केली गेली. जन्मापासून विवाहापर्यंत तिला वडिलांच्या अधिन ठेवले तर विवाहानंतर वृद्धापकाळापर्यंत पतीच्या तर वृद्धापकाळापासून मृत्यूपर्यंत मुलाच्या अधिन अशाप्रकारची जीवनपद्धती तीच्या नशिबी मारली. एवढेच नाही तर ’’नारी नरक का द्वार है’’ असेही समजले गेले. तर तिचे संपूर्ण जीवन हे हक्काशिवाय होते. त्यामुळे मुलगी जन्माला येणे म्हणजे  पाप समजले जायचे, मुलीच्या जन्माच्या बातमीने पिता अपमानीत व्हायचा आणि तो अपमान रक्ताचा घोट गिळल्यासारखा त्याला गिळंकृत करावा लागायचा. अपमानाने व शरमेने तो  आपले तोंड लपवून फिरायचा तर मान खाली घालून जीवन कंठायचा. अशा प्रकारची स्त्रीविषयी अनास्था अनेक धर्मात थोड्या-अधिक प्रमाणात होती.
पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांच्या पूर्वीच्या काळातही अरबी टोळ्यामध्ये वरील परिस्थितीपेक्षा खूप काही वेगळी गत नव्हती. कारण अरबवासी मुलांना संपत्ती व गर्वाचे साधन समजायचे  तर मुलगी अपमानाचे,क्लेशदायक व लज्जास्पद समजत. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पूर्वीच्या काळामध्ये मुलींच्या बाबतीत काही अरबी टोळ्यामध्ये काही अमानवी प्रथा होत्या.
मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या गळ्यावरून सुरी फिरवली जात असे, डोंगर कड्यावरून खाली फेकून दिले जात असे, पाण्यामध्ये बुडविले जात असे. मुलीच्या जन्मानंतर लगेचच  मारून टाकून कुत्र्याला खायला त्याच्यासमोर टाकले जाई, प्रसुतीसमयी एक खड्डा खोदला जात असे आणि जर मुलगी जन्मली तर जन्मानंतर त्वरीत तिला गाडून टाकण्यात येई,  मुलगी थोडी मोठी झाल्यावर शृंगारसाजासहीत वाळवंटामध्ये नेऊन एका खोल खड्डयामध्ये ढकलून देऊन वरून माती ढकलली जात असे. (संदर्भ : स्त्री भ्रूणहत्या- कारणे व उपाय)

वरील विवरण जरी सत्य असले तरी जेवढया मुली जन्मास येत होत्या त्या सर्वांशीच वरिलप्रमाणे कठोर वर्तन होत होते असे नाही.
जगात जवळपास एक लाख 24 हजार पैगंबरानंतर  पृथ्वीतलावर सर्वांत शेवटी पैगंबर मुहम्मद (स.) हे अंतिम पैगंबर म्हणून आले. त्यानंतर पुन्हा पृथ्वीतलावर दुसरा कोणताही पैगंबर येणार नाही हे निश्चित झाले आणि त्यानुसार  एकमेव ईश्वराने पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडून धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, नैतिक क्रांती समाजामध्ये यथायोग्य घडवून आणली. त्यामध्ये स्त्री जातीविषयी अमुलाग्र बदल  घडवून आणले. संपूर्ण जगात स्त्रियांची अवस्था अत्यंत दयनीय असताना सर्वांत प्रथम इस्लाम धर्मामध्ये आपुलकीची व तिच्या अधिकारांची जाणीव करवून दिली जाऊ लागली. पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांचा संदेश असा की, ’’ मुलीच्या जन्माचे स्वागत करा.’’ आणि या सुधारणेचे सर्वाना पालन करणे अनिवार्य  झाले, कारण इस्लाममध्ये न्यायनिवाड्याच्या दिवसाचा अंतर्भाव झालेला असल्यामुळे प्रत्येकाला ईशभय वाटायला लागले आणि आजच्या स्त्रीभ्रूणहत्या विरोधातील मोहिमेची सुरूवात  चौदाशे वर्षापूर्वी पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांनी इस्लाम धर्मात केली. इस्लाममध्ये स्त्रीभ्रूणहत्या पाप तर आहेच पण ते कृत्य म्हणजे एक सैतानी कृत्य समजले गेले. तसेच अल्लाहच्या  न्यायालयात स्त्रीहत्या करणाऱ्याला कठोर शासनाची तरतूद न्यायनिवाड्याच्या दिवशीच निश्चित केली. मुलीची हत्या झाली तर शेवटच्या महाप्रलयाच्या दिवशी तीचा न्यायनिवाडा होईल  आणि तो न्यायनिवाडा चालू असताना अल्लाह त्या मुलीला विचारेल तुझी हत्या कोणत्या कारणाने केली? किंवा कोणत्या अपराधासाठी तुझी हत्या झाली?
जगातील प्रत्येक मानवाची निर्मिती एक पुरूष आणि एका स्त्रीपासूनच झाली आहे. विज्ञान कितीही प्रगत झाले तरी कोणतीही एक व्यक्ती दुसऱ्या नवीन मानवाची निर्मिती करूच शकत  नाही. याचाच अर्थ स्त्री-पुरूष या जोडीपासून मानव जन्मतो. म्हणजे सर्वांना समान अधिकार आहे. स्त्री-पुरूष समानता आहे. ईश्वराचे पैगंबर मुहम्मद (स.) आपल्या अनुयायाकडून काही  गोष्टींबाबत वचने घेतात. त्यामध्ये संततीची हत्या करणार नाही हे देखील आहे. मग स्त्री अर्भकाचा संतती या शब्दात अंतर्भाव होतो की नाही? हा प्रश्न आज पुन्हा उभा राहिला.
’’ हे नबी (स.)! जेव्हा श्रद्धावंत स्त्रिया तुम्हाजवळ बैअत (प्रतिज्ञा) करण्याकरिता येतील आणि या गोष्टींची प्रतिज्ञा करतील की, अल्लाहबरोबर कोणालाही सामील करणार नाही, चोरी  करणार नाही, व्याभिचार करणार नाही, आपल्या संततीची हत्या करणार नाही, आपल्या हातापायासमोर कोणतेही कुभांड रचनार नाही आणि कोणत्याही चांगल्या कामामध्ये तुमची  अवज्ञा करणार नाही, तर त्यांच्याकडून बैअत (प्रतिज्ञा) घ्या, आणि त्यांच्या बाबतीत अल्लाहजवळ क्षमेची प्रार्थना करा निःसंशय अल्लाह क्षमा करणारा आणि दया करणारा आहे’’.  (दिव्य कुरआन, 60ः12).
वरील विवेचन हुदैबिया येथील तहानंतर ते मक्का विजयापूर्वीपर्यंत अनेक महिला मक्केहून स्थलांतर करून मदिनेत आल्या तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांनी त्या महिलेकडून वरील  वचने घेतली. अशा प्रकारचे वचन फक्त स्त्रीयांकडूनच घेतले असे नाही तर ती वचने पुरूषांकडूनही घेतली आहेत.
स्त्री अत्याचारपीडित असताना तसेच चोहोबाजूंनी तिच्याविषयी निषेध होत असताना तिची बाजू घेऊन तिला न्याय मिळवून देण्याचे काम सर्वप्रथम इस्लामने केले आहे. ज्या स्त्रीला जन्माला येण्याचा किंवा जन्मल्यावर जगण्याचा अजिबात अधिकार नसताना त्यांना तो इस्लामने मिळवून दिला. मानवाची मग ती स्त्री असो वा पुरूष उपजीविका अल्लाह चालवितो. तो  दोघांमध्ये कधीच भेदभाव करत नाही. त्याचीं उपजीविका सांभाळण्याची जबाबदारी अल्लाहची आहे. त्याला त्यांच्या भाकरीची काळजी आहे. आपण विनाकारण तसा गैरसमज बाळगण्याचे  कारण नाही की दारिद्रयात खितपत पडले असताना मुलगी जन्मास आल्याने ती आर्थिक संकट ठरते. कारण तिची काळजी तुमच्यापेक्षा अधिक नक्कीच अल्लाहला आहे आणि तोच तर  आपल्या सर्वांची उपजीविका चालवितो. मग आपल्या मुलींची उपजीविका चालवणार नाही असा स्त्रीभ्रुणहत्या करणाऱ्या दांम्पत्यास अविश्वास वाटतो की काय? इस्लाममध्ये मुलगी  जन्मास येणे म्हणजे स्वर्गाचे (जन्नतचे) दार खुले करणे आहे. इतर साधनांपैकी ते एक स्वर्गप्राप्तीचे साधन आहे. म्हणजेच ज्याला एक मुलगी असेल तो नरकापासून दूर, ज्याला दोन मुली त्यास स्वर्गप्राप्ती अनिवार्य, ज्याला तीन मुली त्यासुद्धा स्वर्गप्राप्ती. या परिवर्तनाने क्रांती झाली जे अरब मुलींची हत्या करायचे ते मुलींच्या जन्माची वाट बघायचे. एवढेच नाही तर  तिच्या जन्माचा आनंदोत्सव साजरा करू लागले.
जेवढे स्थान परिवारात मुलाला होते त्यापेक्षा अधिक श्रेष्ठत्व मुलीला देऊ लागले. इस्लामने स्त्रीला जगण्याच्या अधिकाराबरोबर तिला संरक्षणाचाही अधिकार दिला. त्या संरक्षणाची  जबाबदारी पिता, पती व पुत्र यांच्यावर सोपविली.
’’जी व्यक्ती दोन मुलींचे सज्ञान होईपर्यंत पालनपोषन करेल, शिक्षण, प्रशिक्षण, रितीरिवाज, शिष्टाचार, शिकवेल सहानुभूतीने वागवून त्यांचा विवाह करेल, ती व्यक्ती अंतिम न्यायनिवाड्याच्या दिवशी हाताच्या दोन बोटातील अंतराएवढ्यावर माझ्या (पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या) इतका जवळ असेल.’’
अशी शिकवण अनुयायांना त्यांनी दिली. त्यांनी म्हटले आहे ’’ जसा तुम्ही मुलाशी व्यवहार करता तसाच व्यवहार (वर्तन) मुलीशी करा.’’
जसे शरीराला पोशाख अत्यावश्यक आहे, अन्न पाणी आवश्यक आहे, निवारा आवश्यक आहे तसेच किंवा त्यापेक्षा अधिक स्त्रीला पुरूष आणि पुरूषाला स्त्री अत्यावश्यक आहे. त्यामुळे  प्रत्येक स्त्री-पुरूषाला अगदी आपापल्या आवडीनिवडीचे समान अधिकार आहेत.
इस्लामची शिकवण आहे की, प्रत्येक मुलाला त्याच्या जन्माने नैतिक व कायदेशीर अधिकार क्रमप्राप्त आहेत. त्याच्या पालनपोषणाची सर्व जबाबदारी त्याच्या पालकांची आहे. जेवढ्या  काळजीने मुलाचे संगोपन केले जाते त्यापेक्षा अधिक काळजीने मुलीचे करावे. मुलगी आपल्या उदरी जन्मास घालून अल्लाह आपल्याला आजमावण्याबरोबरच स्वर्गप्राप्तीची संधी देतो. हे  जग फक्त आणि फक्त अल्लाहच्या देणगीनेच चालते आणि ती देणगी म्हणजे स्त्री. म्हणून जेव्हा तुम्ही खाल तेव्हा तिला खायला द्या, तुम्ही जेव्हा कपडे घ्याल, तेव्हा तिलाही घ्या.  मुलीला बरेवाईट बोलू नका, मारू नका वा घरातून हाकलू नका. मुलीशी घृणा करू नका कारण ती सहानुभूतीची प्रतिमा आहे. तसेच ती अनमोलदेखील आहे. मुलीच्या सर्व गरजा  भागविण्याबरोबरच तीला मुलाप्रमाणे शिक्षण-प्रशिक्षण देणे हेदेखील अनिवार्य आहे. तिला नुसतेच शिक्षण देणे असे नाही तर तिच्या शिक्षणावर विशेष लक्ष देण्याची सूचना करण्यात आली आहे. महात्मा जोतीबा फुले म्हणतात, ’’ विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतिविना वित्त गेले एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले.’’ शिक्षणाशिवाय प्रगती नाही म्हणून इस्लामने जेवढा शिक्षणाचा अधिकार मुलाला दिला तेवढाच मुलीलाही दिलेला आहे. इस्लाममध्ये स्त्रियांना शिक्षणाची दारे चौदाशे वर्षांपूर्वी खुली करण्यात आली आहेत. मुलीचे  शिक्षण-प्रशिक्षण ही बाब पुण्यकार्य वर्तिली आहे. इस्लाममध्ये प्रत्येक स्त्री पुरूषास भक्ती, नैतिकता, शरियतचे सर्व नियम पाळावेच लागतात आणि हे नियम ज्ञानाशिवाय अंमलात येणे  शक्य नाही. याचाच मतितार्थ स्त्री-पुरूष दोघांनी शिक्षण घेऊन ज्ञानी होणे जरूरीचे समजले जाते. इस्लामच्या प्रत्येक अनुयायाला धर्माचे मुलभूत ज्ञान असायलाच पाहिजे.  धर्मज्ञानासाठीही शिक्षणाची गरज आहे. शिक्षणाने शहाणा झालेला समूह हा अंधश्रद्धांना बळी पडत नाही. म्हणूनच इस्लाममध्ये अंधश्रद्धा बाळगणे गैर समजले आहे. उदा. गृह-ताऱ्यावरून  भविष्य पाहणे हे अज्ञान काळाचे लक्षण समजले जाते.
स्त्रीला शिक्षणाच्या आधारे उद्योगधंदा, व्यापार, कृषी, देवाणघेवाण, कारागिरी, नौकरी, अध्ययन-अध्यापन, पत्रकारिता, लेखन या क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी इस्लामची अनुमती आहे.  पण या क्षेत्रामध्ये कार्य करताना इस्लामने घालून दिलेल्या मर्यादा ओलांडता कामा नयेत. स्त्रीने-सन्मानाने व आपल्या अब्रूचे संरक्षण करीत जीवन जगत-जगत विविध क्षेत्रांमध्ये नाव कमवावे. वाड्.मय, साहित्य क्षेत्रात कार्य करताना सामाजिक, सांस्कृतिक, अधिकारदेखील प्रदान केल आहेत. अशा विविध क्षेत्रामध्ये कार्य करीत असताना तिने मिळविलेल्या  मिळकतीवर मालकी दाखविण्याचा पूर्णपणे अधिकार त्या स्त्रीला आहे.

(सदर लेख इस्लामिक मराठी पब्लिकेशनच्या ’इस्लामी सुरक्षित सावलीतील स्त्री’ या पुस्तकातून घेतलेला आहे.)

भेजा गया था जिनको कयादत के वास्ते
गोशा नशीन होके वो दुनिया से कट गए
बातिल है कामियाब मिटाने के वास्ते
हम इत्तेहाद तोडके फिरकों में बंट गए


42 मध्ये ’भारत छोडो’ आंदोलनानंतर ब्रिटिशांची भारतावरील प्रशासकीय पकड कमी होत गेली. तेव्हा ब्रिटनमध्ये भारताला स्वातंत्र्य देऊन टाकावे, असा एक विचार प्रबळ झाला. त्याचा  विरोध करत तत्कालीन ब्रिटिश प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी स्वातंत्र्याच्या पाच महिन्याअगोदर ब्रिटिश संसदेमध्ये भारताला स्वातंत्र्य देण्याच्या मागणीवर भाष्य करताना खालील  टिप्पणी केली होती. ’सत्ता दुष्टांच्या, बदमाशांच्या आणि लुटारूंच्या हातात जाईल. भारताचे सगळे नेते निम्न क्षमता असणारे भुसकटासारखे लोक असतील. त्यांची जीभ गोड असेल  परंतु, मन कामचुकार असेल. ते सत्तेसाठी एकमेकांशी भांडतील आणि याच राजकीय भांडणामध्ये भारताचा खात्मा होऊन जाईल. एक दिवस असा येईल जेव्हा भारतात हवा आणि  पाण्यावर सुद्धा कर लावला जाईल.’
विन्स्टन चर्चिलच्या या भाकीताला दोन वेळा काळजीपूर्वक वाचल्यास प्रत्येक प्रामाणिक वाचकाच्या मनात हा विचार नक्कीच येईल की, यातील बऱ्याच गोष्टी खऱ्या ठरलेल्या आहेत.  चालू लोकसभेच्या निवडणुकींच्या प्रचाराची पातळी पाहता चर्चिलचे भाकीत आपण खरे ठरविण्यासाठी जिवापाड प्रयत्न करत आहोत की काय? अशी शंका येते. प्रचाराची अनेक वळणे  घेत शेवटी मतदान जाती-धर्माच्या आधारावर होतो, पैसा, दारू आणि खर्जुल्या कोंबड्या घेऊन लोक मतदान करतात. दिवसेंदिवस निवडणुकांची व्याप्ती आणि खर्च दोन्ही वाढत आहेत.  नेते एकमेकांशी भांडत आहेत. शस्त्रास्त्रांचा साठा जप्त होत आहे. एकूणच लोकशाहीचा सांगाडा राहिलेला असून, त्यातील आत्मा हरवलेला आहे.
याचे एकमात्र कारण अनैतिक प्रवृत्तींच्या लोकांच्या हाती राजकारणाची सुत्रे गेलेली आहेत. प्रत्येक पक्षात अनैतिक प्रवृत्तीच्या लोकांचा भरणा मोठ्या प्रमाणात झालेला आहे. युपीएच्या काळात भ्रष्टाचार रोखण्यासाठी डॉ. मनमोहनसिंग सारख्या नीतिमान नेत्याला आलेल्या अपयशाचे उदाहरण या संदर्भात पुरेसे बोलके आहे. गल्ली ते दिल्ली पर्यंत प्रत्येक स्तरावर  राजकारणाची सुत्रे अनीतिमान लोकांच्या हाती एकवटली आहेत. म्हणून देशाची मोठ्या प्रमाणावर हानी झालेली आहे. भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. महिलांवर अत्याचार होत आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. मुठभर लोक श्रीमंत होत आहेत. बाकी जनता गरीब होत आहे. खेडी उदास होत आहेत. शहरं भकास होत आहेत. पर्यावरणाची पातळी खालावलेली  आहे. मूलभूत सुविधा कोलमडलेल्या आहेत. जी काही प्रगती झालेली दिसते ती असंतुलित आहे.
गेल्या 70 वर्षात देशाच्या जनतेने अनेक पक्षांना आलटून पालटून सत्तेची सुत्रे देऊन त्यांच्यावर विश्वास ठेवला. मात्र प्रत्येक वेळेस जनतेचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे पार्टी विथ डिफ्रन्स असे बिरूद मिरवणाऱ्या भाजपाला 2014 मध्ये भरघोस मतदान करून एक संधी देऊन पाहिली आहे. मात्र भाजपलाही जनतेचे जीवन सुसह्य करता आले नाही उलट त्यांच्या काळात जगणे अधिक कठिण झाले. बेरोजगारीमध्ये अभूतपूर्व वाढ झाली. सार्वजनिक संस्थांची अपरिमित हानी झाली. म्हणून सध्याच्या निवडणुकांमध्ये 2014 सारखा उत्साह दिसून  येत नाही, ही लोकशाहीच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक स्थिती म्हणावी लागेल. सामान्य माणसाचा विश्वास लोकशाही व्यवस्थेवर टिकून राहणे गरजेचे आहे. मात्र गेल्या 70  वर्षाच्या अनुभवावरून जनतेमध्ये हताशा निर्माण होऊ पाहत आहे.

म्हणून क्रांतीची गरज...
या परिस्थितीला पूर्णपणे बदलून एक नवीन पर्यायी राजकारणाची पायाभरणी केल्याशिवाय खऱ्या अर्थाने देशाची शासनव्यवस्था कल्याणकारी होणार नाही. चालू लोकसभा निवडणुकीमध्ये  राजकारण्यांची जिंकण्यासाठीची फरपट पाहता त्यांच्या कोणाच्या हातून हे पुण्य काम होईल, असे वाटत नाही. म्हणून देशाच्या राष्ट्रीय राजकारणाला नीतिमान बनविण्याचे आव्हान  स्वतःला ’उम्मते वस्त’ म्हणविणाऱ्या मुस्लिमांनी स्विकारायला हवे. आजपर्यंत दोन प्रकारचे राजकारण मुस्लिमांनी केले आहे. एक-गल्लीबोळातील थिल्लर राजकारण तर दूसरे काँग्रेस  आणि इतर धर्मनिरपेक्ष पक्षांमध्ये प्रवेश करून त्यांच्या बरोबर व त्यांच्यासारखेच केलेले राजकारण. या दोन्ही प्रकारच्या राजकारणामध्ये असलेले मुस्लिम
कार्यकर्ते व नेते आणि मुस्लिम्मेत्तर कार्यकर्ते व नेते यांच्यात नावं सोडली तर कुठलाच फरक अनुभवायला आलेला नाही. (अपवाद खेरीज करून तो ही असेल तरच). दोघेही सारखेच  अनीतिमान.
या दोहोंशिवाय, मुस्लिम धार्मिक संस्था आणि संघटनांचा एक मोठा गट गेल्या 70 वर्षापासून राजकारणापासून अलिप्त राहिलेला आहे. या गटामध्ये मोठ्या प्रमाणात नीतिमान उलेमा व इतर बुद्धिमंतांचा भरणा आहे. प्रत्येक निवडणुकीत प्रामाणिकपणे हा गट कुठल्यातरी एका राजकीय पक्षाला, बहुतकरून काँग्रेसला पाठींबा देतो व आपल्या कोषात परत जावून शांतपणे  बसतो. या गटाच्या निष्क्रीयतेचा फटका केवळ मुस्लिम समाजालाच नव्हे तर राष्ट्रीय राजकारणाला सुद्धा बसलेला आहे. आता वेळ आली आहे की, त्यांनी पुढे यावे, स्वतःचा पक्ष  काढावा किंवा योग्य वाटेल त्या पक्षात जावे आणि अगदी पंचायत स्तरापासून लोकसभेपर्यंत नीतिमान राजकारण कसे करतात हे देशाला दाखवून द्यावे.
हे काम अत्यंत कठीण आहे. मात्र अशक्य नाही. अशा नितीमान राजकारणाचे मॉडेल प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी सातव्या शतकात मदिनामध्ये तयार करून ठेवलेले आहे. व चार पवित्र  खलीफांनी ते मॉडेल यशस्वीपणे राबवून कल्याणकारी शासन कसे असते याचे उदाहरण जगासमोर ठेवलेले आहे. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या हिजरत नंतरच्या 23 वर्षाच्या जीवनाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यातील गजवात (युद्ध) वगळून बाकी राजकारण जसेच्या तसे करावे. विरोधकाला विरोध समजावे शत्रू नाही. बोलावे तर खरे बोलावे, वागावे तर खरे वागावे,  जनतेला जी आश्वासने दिली ती पूर्ण करावी. नगरसेवक असो का आमदार किंवा खासदार शासनाकडून मिळालेल्या एकेका पैशाचा सदुपयोग जनतेसाठी करावा. कोणाला आमिष दाखवू  नये. कोणाच्या आमिषाला बळी पडू नये, कोणाची चहाडी करू नये, सर्वांची टिका सहन करावी, विरोध सहन करावा, प्रसंगी मारहाण होईल तीही सहन करावी, मात्र नीतिमान  राजकारणाची बांधिलकी जपावी.
एवढे होऊनही मुस्लिमांच्या विषयी असलेल्या बाय डिफॉल्ट तिरस्कारामुळे मुस्लिमेत्तर बहुसंख्यांक बंधू मुस्लिम राजकारणाला सुरूवातीला स्विकारणार नाहीत. मात्र मुस्लिम राजकारण्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की पक्षपात हा एका मर्यादेपर्यंतच काम करत असतो. त्या पुढे गेले की, तो काम करत नाही. माणूस प्रामाणिक आहे याची खात्री पटली की  अलिकडे ज्या प्रमाणे बॅरिस्टर ओवेसींची स्विकार्हता बहुसंख्य बांधवांमध्ये हळूहळू वाढत आहे. तशीच स्विकार्हता इतर नितीमान मुस्लिम नेत्यांची वाढेल, यात शंका नाही. आज देशातील  जनता अनीतिमान राजकारण्यांना कंटाळलेली आहे. केवळ पर्याय नसल्यामुळे ती त्यांना सहन करत आहे. त्यांची शेवटची आशा भाजपवर होती. ती ही आता मावळलेली आहे. पर्यायी  नीतिमान राजकारणी उपलब्ध असल्यास मग ते कोणत्या जाती, धर्माचे आहेत हे न पाहता त्यांना स्वीकारल्याशिवाय जनतेसमोर पर्याय राहणार नाही, ही गोष्ट लक्षात घेणे आवश्यक  आहे. देशाच्या राजकारणावरून लोकांचा विश्वास उडून जाण्याआधी नीतिमान मुस्लिमांनी पुढे यावे.
किंबहुना नीतिमान राजकारण करण्याची अघोषित जबाबदारी नियतीने त्यांच्यावर टाकलेली आहे. त्यांनी हे आव्हान स्विकारावे व स्वतः नीतिमान राजकारणाचा पर्याय देशाला देऊ  शकतो, हे सिद्ध करून दाखवावे. सुरूवातीला मुस्लिम असल्याकारणाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाईल, माध्यमे दखलही घेणार नाहीत. मात्र हा पक्षपाती विरोध लवकरच गळून पडेल.  कारण माणसं माणुसकीची भुकेली असतात. भारतीय राजकारणातून माणुसकी केव्हाच लोप पावलेली आहे. नीतिमान राजकारण करून तिची पुनर्स्थापना करावी लागेल.
लक्षात ठेवा वैयक्तिकरित्या नीतिमान लोक कोट्यावधींच्या संख्येने असतील तरी समाजाला त्याचा फारसा उपयोग होत नाही. मात्र हेच लोक जर का संघटित झाले व  त्यांनी संभाव्य  विरोध सहन करून जर का एकदा नीतिमान राजकारणाद्वारे मिळेल त्या स्तरावर प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली तर पक्षपात आणि विरोध दोन्ही गळून पडतील. ज्याप्रमाणे बहुसंख्य हिंदू बंधू नीतिमान मुस्लिम व्यापाऱ्यांकडून सामान घेतात. नीतिमान मुस्लिम डॉक्टरकडून औषधोपचार घेतात. नीतिमान मुस्लिम टॅक्सी ड्रायव्हरच्या टॅक्सीचा उपयोग करतात. नीतिमान मुस्लिमाच्या हॉटेलमध्ये आनंदाने जेवण करतात. तसेच एक दिवस असा येईल की ते नीतिमान मुस्लिम राजकारण्यावरही विश्वास ठेवतील. मात्र त्या आधी मुस्लिम  नेतृत्वाला प्रामाणिकपणाच्या टाकीचे घाव सोसावे लागतील. बिन पैशाने जनतेची कामे करावी लागतील. स्वतः नीतिमान असल्याचा पावलो पावली जनतेला प्रत्यय येईल, असे वागावे  लागेल. जेव्हा त्यांच्या नीतिमान राजकारणाचा अनुभव जनतेला वारंवार येतील तेव्हा इस्लाम खरा असल्याचा माझा जेवढा विश्वास आहे तेवढाच विश्वास हे नीतिमान मुस्लिम  राजकारणाला येथील जनता स्वीकारेल, यावरही आहे.
यासंदर्भात जमाअत-ए-इस्लामी हिंदचे संस्थापक अबुल आला मौदूदी म्हणतात, ’’ इस्लाम की आख़री दावत अरब से उठी, अरबों ही को इस का अलम (ध्वज) बुलंद करने का शर्फ  (सौभाग्य) हासील है. मगर इसमें कभी हुकुमत व फ़रवारवाई को अरब के साथ मख़सूस नहीं किया. जब तक अरब सालेह (पात्र) रहे उन्होंने आधी दुनिया पर हुकुमत की. जब उनमें  सलाहीयत (योग्यता) बाक़ी ना रही तो जिन अजमी क़ौमों ( अरबेत्तर लोक समूह) को अरबों ने फ़ताह किया था, वो इस्लामी हुकुमत की मसनदनशीं (सत्ताधारी) बन गये और उन्होंने  ख़ुद अरब पर हुकुमत की. तुर्क इस्लाम के शदीद दुश्मन थे, मगर जब वो इस्लाम के दायरे में दाख़ील हो गये तो दुनिया-ए-इस्लाम के आधे से ज़्यादा हिस्से में उन्हें अपना हूक्मरां  तस्लीम किया और चाटगाम से लेकर ख़रताजना तक उनकी फ़रमारवाई के फरेरे (बैरखें) उडते रहे. हम तस्लीम करते हैं के आज मुसलमान क़ौमों में क़ौमीयत और नसल का  इम्तीयाज़ अच्छा ख़ासा पाया जाता है. मगर उसको इस्लाम से कोई वास्ता नहीं. इस्लामने अपने किसी तालीम में और अपने किसी हूक्म में इस इम्तीयाज़ (फर्क) को ज़र्रा बराबर भी  जगाह नहीं दी है. (संदर्भ : अल जिहाद फिल इस्लाम. पे.नं 130).
एकदा का नीतिमान राजकारणाची मुहूर्तमेढ मुस्लिमांद्वारे रोवली गेली की नाईलाजाने का होईना बाकी राजकारण्यांना सुद्धा नीतिमान राजकारण करणे भाग पडेल व देशामध्ये नितीमान राजकारण करणाऱ्या नेत्यांची संख्या देखील वाढेल व इन-शा- अल्लाह नितीमान शासन देण्यासाठी राजकीय पक्षामध्ये चूरस सुरू होईल व खऱ्या अर्थाने देशात खरी लोकशाही  अस्तित्वात येईल, हे एका वेड्या लेखकाचे स्वप्न आहे, असे समजणाऱ्यांना मी सुचवू इच्छितो की सुरूवातीला कोणतेही काम अशक्यच वाटते. नदी आपल्या उगमाच्या ठिकाणी  छोट्याश्या झऱ्याएवढीच असते. मात्र जेव्हा ती समुद्राला मिळते तेव्हा तिचे पात्र नजरेत मावणार नाही, एवढे विशाला होऊन गेलेले असते.

ऍक्शन प्लान
मुस्लिमांना केवळ निवडणुकीचे राजकारण करून नीतिमान राजकारणाचा डोलारा उभा करता येणार नाही. त्यापूर्वी त्यांना दोन कामे करावी लागतील. एक - आपण ज्या क्षेत्रात आहेत  त्या क्षेत्रात उच्च नितीमुल्यांचा अनुभव जनतेला करून द्यावा लागेल. दुसरे खिदमते खल्क म्हणजेच जनकल्याणाची शक्य तेवढी कामे मोठ्याप्रमाणात करावी लागतील. आज सुरूवात केली की पुढच्या निवडणुकीत लगेच फळ मिळणार नाही. यथाशक्ती निरंतरम या योग तत्वाप्रमाणे सातत्याने हे काम केले तर पुढील पाच-पंचेवीस वर्षात जनतेच्या मनामध्ये नीतिमान  राजकारण आणि नितीमान राज्यकर्त्यांविषयी नक्कीच विश्वासाची भावना निर्माण होईल. कारण की, ’सत्य को परेशान किया जा सकता है पराजित नही’. शेवटी अल्लाहकडे प्रार्थना  करतो की, नीतिमान राजकारणाचे महत्व ओळखून ती करण्याची समज आणि शक्ती तो आपल्या सर्वांना देवो आमीन.

- एम.आय.शेख
9764000737

राजकारणातील नवा ’राज’ पॅटर्न


एखाद्या तज्ञ चित्रकाराने ब्रशच्या फटकाऱ्यांसह लिलया एखादं सुंदर चित्र कॅन्व्हासवर साकारावं तेवढ्याच शिताफीने राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या कॅन्व्हासवर आपल्या कुंचल्यातून फटकारे मारून भाजपला सळो की पळो करून सोडत आहेत. गुढी पाडव्याला 6 एप्रिल रोजी दादरच्या शिवाजी पार्कमध्ये झालेल्या प्रचंड सभेमध्ये त्यांनी भारतीय  राजकारणाला कलाटणी देणाऱ्या एका देखण्या प्रचारशैलीची सुरूवात केली आणि बघता- बघता नांदेड, सोलापूर आणि इचलकरंजीमध्ये त्यांच्या या नव्या भाषण शैलीने भाजपला इतके   घायाळ करून सोडले की, विनोद तावडे यांना राज यांच्या सभां खर्चा संबंधी दाद निवडणूक आयोगाकडे मागावा लागत आहे तर मुख्यमंत्री फडणवीस यांना राज यांनी विचारलेल्या प्रश्नांचे खुलासे करावे लागत आहेत.
2014 सालच्या निवडणूक प्रचारादरम्यान प्रधानमंत्री बनण्याच्या अगोदर मोदींनी केलेल्या अफाट आश्वासनांच्या आणि गेल्या पाच वर्षातील त्यांनी केलेल्या कामामधील विसंगती  नेमक्यापणे हेरून त्यांच्या ऑडिओव्हीडीओ्निलपच्या माध्यमाने लोकांसमोर मांडून त्यांना संमोहित करण्याचे एक नवेच शास्त्र त्यांनी जन्माला घातले आहे. एखादी विसंगती हेरून त्यावर  आपल्या धीर गंभीर आवाजात पार्श्वभूमी तयार करून राज ठाकरे थोडासा पॉज घेतात... सभेमध्ये टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता पसरते आणि लगेच राज ठाकरे म्हणतात ’ये लाव रे तो व्हिडीओ’ आणि लगेच एक व्हिडीओ सुरू होतो आणि व्हीडीओ संपल्याबरोबर त्यातील विसंगतीवर राज ठाकरे आपल्या विशिष्ट शैलीत भाष्य करतात आणि  सभेमध्ये हास्यकल्लोळ होतो. क्रमा-क्रमाने राज ठाकरे प्रधानमंत्री मोदी आणि अमित शहा यांचे एवढे राजकीय वस्त्रहरण करतात की, पाहणाऱ्यांना त्यांची दया यावी.
ते स्वतःही उमेदवार नाहीत, त्यांच्या पक्षाचाही कोणी उमेदवार नाही आणि ते कोणाला मत द्या, म्हणूनही आवाहनही करीत नाहीत. त्याच्यामुळे त्यांना लोकप्रतिनिधीत्व कायद्याखाली किंवा आचारसंहितेखाली आणणेच शक्य नाही. विशेष म्हणजे याच कारणामुळे त्यांच्या सभांचा खर्च मागण्याचाही निवडणूक आयोगाला अधिकार नाही. अशा विचित्र अवस्थेत राज ठाकरे  यांनी या अफलातून प्रचार तंत्राद्वारे अनेकांची गोची करून ठेवलेली आहे. त्यांच्या प्रत्येक सभेमध्ये एकेक नवीन व्हिडीओ सामील केला जात आहे. त्यामुळे उत्सुकता पण प्रत्येक  सभागणिक वाढत आहे. केवळ दादरमध्येच त्यांच्या सभेला गर्दी होते हे गृहितकही त्यांनी मोडून काढलेले आहे. आज महाराष्ट्रात दोनच नाव प्रचारादरम्यान चर्चेत आहेत. एक बॅरिस्टर ओवेसी दूसरे राज ठाकरे.
आजपर्यंत कोणीही प्रचारामध्ये जे तंत्र वापरले नव्हते ते राज ठाकरे यांनी वापरून भाजपच्या प्रचार यंत्रणेला जबर हादरा दिलेला आहे. परीक्षेत अभ्यासक्रमाच्या बाहेरील प्रश्न,  प्रश्नपत्रिकेत पाहून हुशार विद्यार्थ्याचीही जी अवस्था होती तीच अवस्था भाजपची झालेली आहे. स्वतःचा प्रचार करावा का राज ठाकरेंच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत हे त्यांना कळेनासे  झालेले आहे. राज ठाकरेंच्या सभेनंतर त्यांनी सभेत विचारलेल्या प्रश्नाची पुनरावृत्ती प्रचंड प्रमाणात समाजमाध्यमातून होत असल्यामुळे एक नवीनच डोकेदुखी भाजपसमोर निर्माण  झालेली आहे. ज्यांची उत्तरच देता येणार नाहीत, असे प्रश्न विचारून राज ठाकरे यांनी भाजपला बॅकफुटवर जाण्यास भाग पाडलेले आहे.
नरेंद्र मोदी यांच्या प्रचारामधील जनसामान्यांच्या विकासाच्या विषयांना मिळणारी बगल नेमकी हेरून राज ठाकरे थेट पंतप्रधानांना मुद्यांवर येण्यासाठी भाग पाडतांना दिसत आहेत. राज  ठाकरेंच्या या प्रश्नाच्या सरबत्तीने पंतप्रधान मोदी हे गांगारून गेल्याचे अकलूजच्या सभेमध्ये ठळकपणे जाणवले. 17 एप्रिल रोजी अकलूजमध्ये त्यांनी स्वतः मागासवर्गीय असल्यामुळे  सर्व लोक त्यांना छळत आहेत, असे म्हणून स्वतःचा बचाव करण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे. राज ठाकरेंच्या या झंझावाती प्रचाराचा मतदारांवर थेट परिणाम जाणवत आहे.  राज ठाकरे जरी कोणाला समर्थन करायचे, याचा थेट उल्लेख करत नसले तरी शरद पवारांबरोबर औरंगाबाद ते मुंबई पर्यंत केलेला एकत्रित विमान प्रवास आणि सोलापूरला एकाच  हॉटेलमध्ये थांबून त्यांनी मतदारांना योग्य तो संदेश दिलेला आहे. पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना धमकीवजा आव्हान देउन म्हटले आहे की, शरद पवारांची झोप तिहाडमधील  एका कैद्याने उडविलेली आहे. यावरूनही महाराष्ट्रातील मराठा समाज दुखावला गेल्याचे बोलले जात आहे. स्वतः शरद पवार यांनीही यासंबंधी भाष्य करताना मोदींना स्पष्ट सुनावले  आहे की, एकीकडे ते म्हणतात, ’माझे बोट धरून राजकारण शिकलो आणि दूसरीकडे माझ्या परिवारातील सदस्यांवर टिका करतात.’ एकंदरीत दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचार  संपलेला असतांना किमान महाराष्ट्रात तरी अ‍ॅडव्हान्टेज काँग्रेस - राष्ट्रवादी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तसेच येत्या विधानसभेचे आव्हानही कडवे झालेले आहे.

- बशीर शेख
bashirshaikh12@gmail.com

मुसलमानांचा पाठिंबा हवा असेल तर त्याची गुणवत्ता काय असली पाहिजे? त्यांचं मुसलमान असणं किंवा मुसलमानांचा आवाज असणं? हा प्रश्न मी यासाठी विचारतो आहे की, गेल्या  पाच वर्षांत या दोन्ही मुस्लिम (कन्हैय्या व प्रकाश राजविरोधात उभे असलेले मुस्लिम उमेदवार) उमेदवारांनी मुस्लिमांविरोधात सुरू असलेले अत्याचार, शत्रुकरण आणि बहुसंख्याकवाद  यांच्या विरोधात कधी जाहीर व ठोस भूमिका घेतली आहे का?

आमचा भारत देश अशा परिस्थितीतून जात आहे, जिथं शत्रूकरण, सांप्रदायिकता आणि हिंसा घडवणं, ही अतिसामान्य बाब झाली आहे. अशा बहुसंख्याकवादी वातावरणात मुसलमान असणं, मुसलमानांसारखं दिसणं एक अक्षम्य गुन्हा ठरत आहे. इथं कब्रस्तानापासून ते प्रार्थनास्थळावर ताबा मिळवण्यापर्यंत, शिक्षणापासून ते नोकऱ्यांमध्ये बेदखल करण्यापर्यंत,  जीवघेणे हल्ले तसंच आत्मसन्मानावर दररोज होणारे आघात, अगदी सामान्य बाब झाली आहे. ‘गोदी मीडिया’ मुसलमानांविरोधात विष ओकण्याचा एक प्लॅटफॉर्म झालेला आहे. अशा  घटकांना सरकारचा पूर्ण पाठिंबा मिळत आहे. जो मुस्लिमांना मारेल, त्याला सरकार मान मरातब देऊन सन्मानित करत आहे. दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी  आदित्यनाथ यांची एक निवडणूक प्रचारसभा पार पडली. त्यात दादरीमधील अखलाकच्या हल्लेखोर आरोपीला पहिल्या रांगेत बसवण्यात आलं होतं.
एकीकडे भाजपचे लोक निर्लज्जपणे मुसलमानांच्या हत्येचं समर्थन करत आहेत, तर दुसरीकडे सर्वच ‘सेक्युलर’ म्हणवणाऱ्या पक्षाच्या नेत्यांना - मग ते राहुल गांधी असो वा तेजस्वी  यादव किंवा अन्य कोणीही - कधीच असं वाटलं नाही की, गोरक्षकांच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या पीडित कुटुंबांच्या घरी किमान एकदा तरी जाऊन यावं. ‘मुसलमानांबद्दल बोलाल तर  हिंदूंची मतं मिळणार नाहीत. त्यातून मुसलमान समर्थक असल्याचा टॅग लावला जाईल. लढा आता ‘कोण खरा हिंदू आहे?’ यावर आधारित झालेला आहे. मुसलमानांना आता काही  दिवस गप्प बसावं लागेल. कारण त्यातच त्यांचं हित सामावलेलं आहे.ङ्ग हीच गत आजच्या ‘सेक्युलर’ म्हणवणाऱ्या सर्वच राजकीय पक्षाची झाली आहे.
एकदा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ग़ुलाम नबी आझाद म्हणाले होते की, मुस्लिम असल्यानं त्यांना निवडणुकीच्या प्रचारासाठी बोलावलं जात नाही. जर ग़ुलाम नबी आझादांसारख्या ज्येष्ठ  माजी केंद्रीय मंत्र्याची व ज्येष्ठ काँग्रेसी नेत्याची ही स्थिती आहे, तर विचार करा, भारतातील सामान्य मुसलमानांची अवस्था काय असेल? जर अशीच परिस्थिती असेल तर, कोण  करणार मुसलमानांचं नेतृत्व? कोण देणार त्यांच्या वेदनांना आवाज?  तसं पाहिलं तर २०१४च्या लोकसभेत स्वातंत्र्यानंतर सर्वांत कमी मुस्लिम खासदार होते. पण याबद्दल कुणालाही  फारसं काही वाटलं नाही. साहजिकच एक गोष्ट खरी आहे की, भाजप सरकारकडून झालेल्या अशा सर्व प्रकारामुळे उच्चशिक्षित मुस्लिम तरुणांची घुसमट झाली आहे. हा तरुण तर  भारताच्या लोकशाहीला मानतो, पण खरंच आजच्या भारताची लोकशाही त्याचा ‘आपला’ म्हणून स्वीकार करते का? आत्तापर्यत मी जे मांडलं आहे, ती एक सहज भावना आहे. परंतु  याच सहज भावनेचा वापर करून आमच्या संवेदनांशी खेळलं जाऊ शकतं. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर हेच सुरू आहे - ‘मुसलमानांनी कन्हैया कुमार आणि प्रकाश राज  यांचं समर्थन का करावं? तसंच त्या मुस्लिम उमेदवारांनाही आम्ही पाठिंबा का द्यावा, जे या दोघांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत?’
माझा प्रश्न असा आहे की, मुसलमानांचा पाठिंबा हवा असेल तर त्याची गुणवत्ता काय असली पाहिजे? त्यांचं मुसलमान असणं किंवा मुसलमानांचा आवाज असणं? हा प्रश्न मी यासाठी  विचारतो आहे की, गेल्या पाच वर्षांत या दोन्ही मुस्लिम (कन्हैय्या व प्रकाश राजविरोधात उभे असलेले मुस्लिम उमेदवार) उमेदवारांनी मुस्लिमांविरोधात सुरू असलेले अत्याचार, शत्रुकरण आणि बहुसंख्याकवाद यांच्या विरोधात कधी जाहीर व ठोस भूमिका घेतली आहे का? मी तर कधी ऐकलं नाही. ठीक आहे, हे सर्व बाजूला राहू द्या. या दोन्ही उमेदवारांनी  आपलाच सेक्युलर म्हणवणारा पक्ष ज्या वेळी सॉफ्ट हिंदुत्वाकडे झुकत होता, त्या वेळी त्या विरोधात आवाज उठवला आहे का? असं का होतं की, ज्या वेळी कुठलंही अभियान किंवा  जनाआंदोलन उभं करायचं असेल तर प्रकाश राज आणि कन्हैया कुमारला बोलावालं जातं. पण ज्या वेळी मतं देण्याची वेळ येतं, त्या वेळी त्यांना पाठिंबा का दिला जाऊ शकत नाही?  आम्ही रस्त्यावरचा लढा व आंदोलन आणि संसदेमधील प्रतिनिधित्व याला वेगळं करून का पाहतो आहोत?
मुसलमानांनी राजकारणात असणं ही काळाजी गरज आहे. त्यामुळे मुसलमानांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय पातळ्यांवर परीघाबाहेर कशा पद्धतीनं ढकलण्यात आलेलं आहे, याबद्दलही विचार करणं आवश्यक आहे. हा विचार फक्त मुसलमानांपुरताच मर्यिादत न राहता सर्वांबद्दल अपेक्षित आहे. परंतु या लढ्याला ‘टोकनिझम’ (निवडक मुद्द्यापर्यंत) पर्यंत  मर्यिादत ठेवू नका. फक्त निवडक प्रतिनिधींना निवडून आणल्यानं बहुसंख्याकवादाविरोधात तुम्ही लढा देऊ शकत नाही. सत्तेचं बहुसंख्याक चारित्र्य बदलण्यासाठी एकत्रित लढाई  आवश्यक आहे. मग तो कन्हैया कुमार असो वा प्रकाश राज. हे दोघंही त्याच लढ्यातून (जनाआंदोलनातून) पुढे आलेले आहेत. स्मृती इराणी किंवा सुषमा स्वराज यांच्या संसदेत  जाण्यामुळे सत्तेचं पितृसत्तात्मक चारित्र्य बदलत नाही. तसंच उदित राज आणि रामविलास पासवान यांच्या संसदेत जाण्यामुळे सत्तेचं जातीयवादी चारित्र्यदेखील बदलत नाही. त्याच  प्रकारे काही निवडक चेहऱ्यामुळे सत्तेचं बहुसंख्याक चारित्र्य कदापि बदलणं शक्य होणार नाही. काळ कठीण आहे आणि हा लढा आम्हा सर्वांना एकत्र येऊन लढायचा आहे. ही लढाई  फक्त २०१९ पर्यंतच मर्यिादत नाही, तर हा लढा त्यापेक्षा खूप पुढचा आहे. जे लोक म्हणत आहेत की, या लढ्यातून मुसलमानांनी बाजूला व्हायला पाहिजे, त्यांना मौलाना अबुल कलाम 
आझादांचे विचार ऐकवायला हवेत.
१९४७च्या फाळणीनंतर दिल्लीच्या जामा मस्जिदच्या पायऱ्यावर उभं राहून दिलेल्या भाषणात आझाद म्हणाले होते की, ‘तुम्ही पण (शपथ/अहद) करा की, हा देश आमचा आहे.  आमच्याशिवाय या देशाचा भूतकाळ व भविष्यकाळ अपूर्ण आहे.’

- उमर ख़ालिद

मूळ हिंदी लेखाचा अनुवाद - कलीम अजीम

हजरत अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) यांचे निवेदन आहे की प्रेषित (स.) यांनी सांगितले, ‘‘हे तरूणांनो! तुमच्यापैकी जो कोणी निकाहच्या जबाबदाऱ्या उचलण्याचे सामर्थ्य राखतो, 
त्याने निकाह करून घेतला पाहिजे. कारण निकाह हा नजर खाली राखतो आणि लज्जास्थानाचे रक्षण करतो. (म्हणजे मानवी नजरेला इतस्तत: फिरविण्यापासून आणि वासनाशक्तीला  बेलगाम होण्यापासून वाचवितो.) आणि जो निकाहची जबाबदारी उचलण्याचे सामर्थ्य राखत नाही, त्याने वासनेचा जोर तोडण्याकरिता अधूनमधून रोजे राखावेत. (हदीस : बुखारी,  मुस्लिम)

हजरत अबू हुरैरा कथन करतात की प्रेषित (स.) यांनी सांगितले की, स्त्रीशी चार गोष्टींच्या आधारावर विवाह केला जातो. तिच्या धनसंपत्तीच्या आधारावर, तिच्या वंशिक सभ्यतेच्या आधारावर, तिच्या सौंदर्याच्या आधारावर, आणि तिच्या दीनधर्माच्या आधारावर. जेव्हा तुम्ही धार्मिक प्रवृत्तीच्या स्त्रीला प्राप्त करा, तुमचे भले होवो. (मुत्तफिक अलैया)

भावार्थ
या हदीसवचनाचा अर्थ असा आहे की, स्त्रीच्या संदर्भात चार गोष्टी आढळून येतात. कोणी धनसंपत्ती पाहतो, कोणी वंशप्रतिष्ठेचा विचार करतो, तर कोणी तिच्या रूपसौंदर्यावर भाळून तिच्याशी विवाह करतो. आणि कोणी तिची धर्मपरायणता पाहतो. प्रेषित हजरत मुहम्मद (स.) यांनी समस्त मुस्लिमांना ताकीद केली आहे की खरी गोष्टी जी पाहण्याची आहे ती  म्हणजे स्त्रीचे धार्मिक प्रवृत्ती आणि तिची ईशपरायणता. याखेरीज इतर सर्व गुणवैशिष्ट्ये तिच्यात असतील तर अतिशय उत्तम, पण धार्मिकतेला दृष्टीआड करणे आणि केवळ  धनसंपत्ती, तिचे रूपसौंदर्य, तिचा सामाजिक दर्जा, यांच्याच आधारावर विवाह करणे, हे ईमानधारकाचे काम नव्हे. प्रेषितांनी सांगितले की स्त्रियांशी त्यांच्या सौंदर्यामुळे विवाह करू नका.  संभवत: त्यांचे सौंदर्य त्यांचा सर्वनाश करेल. त्यांच्या धनवान असल्यामुळे त्यांच्याशी विवाह करू नका, शक्य आहे त्यांची धनसंपत्ती त्यांना गर्वोन्नमत्त करून टाकील. किंबहुना  धर्माच्या आधारावर त्यांच्याशी विवाह करा. काळ्या रंगाची दासी जर धर्मपरायण असेल तर ती अल्लाहच्या नजरेत गोऱ्या उच्चकुलीन स्त्रीपेक्षा अधिक चांगली आहे.

हजरत सुफियान सुरी (रजि.) कथन करतात की, प्रेषित (स.) यांनी आदेश दिला आहे, हे ईमानधारकांनो! अल्लाहचा कोप होण्यापासून आपला बचाव करण्याची पुरेपूर काळजी घ्या.  आणि मरेपर्यंत ईशआदेशांचे पालन करण्यात मग्न राहा. आपल्या पालनकर्त्याच्या नाराजीपासून स्वत:चा बचाव करीत राहा. ज्यांनी तुम्हाल एका जिवापासून निर्माण केले आणि  त्यापासून त्याचा जोडा (जीवनसाथी) बनविला. मग त्या दोघांद्वारे अनेक पुरुष व स्त्रिया जगात पसरविले. तेव्हा अशा रचयित्या पालनकर्त्याच्या नाराजीपासून भय बाळगत राहा.  ज्यांच्या नावाने तुम्ही आपापसांत एकमेकांजवळ आपल्या हक्काची मागणी करता आणि नातेवाईकांच्या हक्कांचीही जाणीव राखा. लक्षात ठेवा अल्लाह तुमच्यावर देखरेख ठेवणार आहे.

भावार्थ
हा खुतबा (प्रवचन) आहे जो प्रत्येक निकाहच्या प्रसंगी दिला जातो. इथे त्याचा उल्लेख करण्याचा हेतू हे दर्शविणे आहे की निकाह केवळ आनंदोत्सव नव्हे तर तो एक वचनकरार आहे. तो एक पुरुष आणि स्त्री यांच्या दरम्यान ठरविला जातो की आम्ही दोघे जीवनभरचे साथी आणि सहाय्यक बनलो. हा करार करताना ईश्वव आणि उपस्थित लोक दोघांनाही साक्षीदार  बनविले जाते. निकाहच्या खुतब्याच्या आयती या गोष्टीकडे स्पष्ट इशारा करतात की,जर या वचनकरारारत पती किंवा पत्नीकडून एखादा बिघाड निर्माण केला गेला, आणि त्याचे  यथायोग्य पालन केले गेले नाही, तर अल्लाहचा कोप त्याच्यावर कोसळेल. ते जहान्नुमच्या शिक्षेस पात्र ठरतील.

(८१) ते तोंडावर म्हणतात की, आम्ही आज्ञाधारक आहोत, पण जेव्हा ते तुमच्यापासून निघून जातात तेव्हा त्यांच्यापैकी एक गट रात्री एकत्र होऊन तुमच्या गोष्टींविरूद्ध सल्लामसलत  करतो. अल्लाह त्यांच्या या सर्व कुजबुजींची नोंद घेत आहे. तुम्ही त्यांची पर्वा करू नका आणि अल्लाहवर भीस्त ठेवा, तोच भीस्त ठेवण्यास पुरेसा आहे.
(८२) काय हे लोक कुरआनवर विचार करीत नाहीत? जर हे अल्लाहशिवाय अन्य कोणाकडून असते तर यांत पुष्कळसा विसंवाद आढळला असता.१११
(८३) जेव्हा त्यांच्यापर्यंत शांततेची किंवा धोक्याची बातमी पोहचते तेव्हा हे तिचा (सर्वत्र) प्रसार करतात. जर त्यांनी पैगंबर आणि जबाबदार लोकांसमोर निवेदन केले असते तर  त्यांच्यातील जाणकार लोकांनी तिचे स्वरूप जाणून अचूक निष्कर्ष काढला असता.११२ तुम्हा लोकांवर अल्लाहची कृपा व मेहरबानी नसती तर (तुमच्या उणिवा अशा होत्या की) काही  मोजक्या व्यक्ती सोडून तुम्ही सर्वजण शैतानच्या नादी लागला असता.
(८४) तर हे नबी (स.)! तुम्ही अल्लाहच्या मार्गात लढा, तुम्ही आपल्या स्वत:खेरीज इतर कोणासाठी जबाबदार नाही तथापि श्रद्धावंताना लढण्यासाठी प्रवृत्त करा, दूर नाही की अल्लाह  इन्कारकरणाऱ्यांचा जोर मोडून काढील. अल्लाहचा जोर सर्वात प्रचंड व त्याचे शिक्षा कठोर आहे.
(८५) जो चांगुलपणाची शिफारस करील त्याला त्यात वाटा मिळेल आणि जो वाईट गोष्टीची शिफारस करील त्याला त्यातून वाटा मिळेल,११३ आणि अल्लाह सर्व गोष्टींवर नजर ठेवणारा  आहे.
(८६) आणि जेव्हा एखादा अदबीने तुम्हाला सलाम करील तर त्याला त्यापेक्षाही अधिक चांगल्या प्रकारे उत्तर द्या किंवा कमीतकमी त्याचप्रमाणे,११४ अल्लाह प्रत्येक गोष्टीचा हिशेब घेणारा आहे.
(८७) अल्लाह ज्याच्याशिवाय अन्य कोणीही ईश्वर नाही, तो तुम्हा सर्वांना त्या कयामतच्या दिवशी एकत्र करील ज्याच्या येण्यात कोणताही संशय नाही आणि अल्लाहच्या वचनापेक्षा  अधिक खरे वचन कोणाची बरे असू शकेल?११५




१११) ढोंगी, दांभिक, पाखंडी आणि कमी ईमान असणाऱ्यांच्या आचरणावर वरील आयतमध्ये तंबी देण्यात आली आहे, कारण त्यांना कुरआनविषयी शंका होती की काय ते अल्लाहकडून  आहे? त्यांना विश्वास पटत नव्हता की पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर दिव्य प्रकटन होत आहे. तसेच हे आदेश अल्लाहकडूनच पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर अवतरित होत आहेत.  म्हणून या दांभिकांच्या कपटपूर्ण आचरणाची निंदा केल्यानंतर आता सांगितले जात आहे, `हे लोक कुरआनवर विचारच करीत नाही. अन्यथा ही वाणी स्वत: साक्ष देत आहे की अल्लाह  व्यतिरिक्त दुसऱ्याची ही वाणी होऊच शकत नाही.' कोणी मनुष्य याचे सामर्थ्य ठेवून नाही की वर्षानुवर्षे वेगवेगळया परिस्थितीत वेगवेगळया वेळी, वेगळया विषयावर व्याख्यान देत  जावे. प्रारंभापासून अंतापर्यंत त्याचे पूर्ण वक्तव्यें एकरुप, एकरंग आणि एक संतुलित संग्रह बनावा ज्याचा एकभाग दुसऱ्याशी टकराव करीत नाही किंवा नीतीत बदल होण्याचा कुठेच सुगावा लागत नाही. ज्यात संवाददात्याच्या मनातील विभिन्न स्थिती आपापल्या विभिन्न रंगात दिसून येत नाहीत की यावर पुनरावलोकनाची गरजसुद्धा भासत नाही.
११२) तो संघर्षाचा क्षण होता म्हणून चहुकडे अफवा पसरत होत्या. कधी केव्हा धोक्याची निराधार बातमी येऊन मदीना आणि लगतच्या भागात चिंतेचे वातावरण निर्माण व्हायचे. कधी  केव्हा चालाख शत्रू एखाद्या खऱ्या धोक्याला लपविण्यासाठी संतोषपूर्ण बातम्या पाठवित असे आणि लोक त्यांना एकून बेफिकीर होत असत. या अफवा फैलावण्यात ते लोक जास्त  आवडीने भाग घेत असत ज्यांना फक्त हंगामा होणे आवडत होते. अशा लोकांना इस्लाम आणि अज्ञानतेच्या या संघर्षात काहीच रस नव्हता. त्यांना या अफवेच्या गंभीर परिणामांची  खबरसुद्धा नव्हती. त्यांच्या कानावर काही नवीन आले तर जागोजागी त्याचा फैलाव करणे त्यांचे काम होते. याच लोकांना या आयतद्वारे फटकारले गेले आहे आणि त्यांना सकतीने  सचेत करण्यात आले आहे की अफवा फैलावू नका. जी खबर त्यांना मिळाली ती जबाबदार व्यक्तीपर्यंत पोहोच करून गप्प बसावे.
११३) म्हणजे ही आपली आपली पसंत आणि भाग्य आहे की कोण अल्लाहच्या मार्गात प्रयत्नशील राहातो आणि सत्याच्या सत्कीर्तीसाठी लोकांना जागृत करतो. या कामाचा त्याला  चांगला मोबदला मिळतो. दुसरा एखादा कोणी अल्लाहच्या दासांना भ्रमात टाकतो आणि त्यांना निरुत्साही करतो आणि त्यांना अल्लाहच्या वाणीला प्रसिद्धी मिळण्याच्या प्रयत्नांपासून दूर  ठेवतो. असा मनुष्य तर अल्लाहच्या शिक्षेचा हकदार बनतोच.
११४) त्यावेळी मुस्लिम व मुस्लिमेतरांचे संबंध तणावपूर्ण होते. यास्थितीत आशंका होती की मुस्लिम लोकांनी मुस्लिमेतरांशी अशिष्ट व्यवहार करू नये. म्हणून त्यांना आदेश दिला गेला   की जो तुमच्याशी आदरपूर्ण व्यवहार करील त्याच्याशी तुम्ही तसाच किंबहुना त्यापेक्षा जास्त आदरपूर्वक व्यवहार करावा. शालीनतेचे उत्तर शालीनताच आहे. तुम्ही तर दुसऱ्यांपेक्षा  जास्त शिष्टाचारपूर्ण असणे आवश्यक आहे. संदेशदाता आणि प्रचारक लोकांसाठी, जगाला जे सरळमार्गी बनवण्यास आणि सत्यपंथी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत; अशिष्टतता, कडवे  बोल उचित नाहीत. ह्याने तर तुमचे मन संतुष्ट होईल परंतु तुम्ही ज्या उद्देशासाठी कार्यरत आहात, त्याला नुकसान सहन करावे लागते.
११५) म्हणजे ईशद्रोही, अनेकेश्वरवादी, नास्तिक आणि अधर्मी जे काही करीत आहेत त्याने ईश्वराच्या ईशत्वात काहीच फरक पडत नाही. एक अल्लाह असणे आणि अल्लाह निरंकुश  असणे एक अशी वास्तविकता आहे जी कुणाच्या बदलण्याने बदलू शकत नाही. एके दिवशी तो अल्लाह सर्वांना एके ठिकाणी जमा करून प्रत्येकाला त्याचे कर्मफळ दाखवून देईल.  त्याच्या सामर्थ्य शक्तीपासून पळून कोणीही वाचू शकत नाही. म्हणून अल्लाह कदापि या गोष्टीचा गरजवंत नाही की त्याच्यातर्पेâ कोणी त्याच्या विद्रोहींशी द्वेष करावा किंवा त्यांना  त्रस्त करावे. या आयतचा संबंध वरील आयतीशी आहे आणि हीच आयत या पूर्ण वार्ताक्रमाचा अंतसुद्धा आहे जो मागील तीन चार प्रभागापासून (रूकअ) चालत आला आहे. या दृष्टीने  आयतचा अर्थ आहे की जगात मनुष्य ज्या पद्धतीने वाटेल त्याप्रमाणे त्याने चालावे आणि मनाला वाटेल त्या मार्गात आपले प्रयत्न आणि कष्ट झेलावे. शेवटी एके दिवशी सर्वांना  अल्लाहसमोर हजर व्हायचेच आहे ज्याच्याशिवाय कोणी ईश्वर नाही. तिथे प्रत्येक जण आपले कर्मफळ पाहून घेईल.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget