जामियानगर नवी दिल्ली येथील जमाअते इस्लामी हिंदच्या मुख्यालयात 26 ते 29 एप्रिल 2023 दरम्यान देशभरातून आलेल्या 162 केंद्रीय प्रतिनिधी सभेच्या सदस्यांनी चर्चा करून सय्यद सआदतुल्लाह हुसैनी यांची पुढच्या चार वर्षांसाठी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
यापूर्वी 2019 मध्ये त्यांची पहिल्यांदा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. याच महिन्यात त्यांचा कार्यकाळ संपल्याने प्रतिनिधी सभेत झालेल्या निर्णयाअनुसार त्यांना फेरअध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. हुसैनी यांचा जन्म 1973 साला तेलंगनाच्या महेबूबनगर जिल्ह्यामध्ये झाला. त्यांचे बालपण महाराष्ट्राच्या नांदेड शहरात व्यतीत झाले. ते इले्नट्रॉनिक अँड कम्युनिकेशन या विषयाचे पदवीधर असून, एक विचार आणि लेखक म्हणून देशात त्यांना ओळखले जाते. ते आपल्या विद्यार्थी जीवनापासून सामाजिक कार्यात अग्रेसर राहिलेले आहेत. ते 1999 ते 2003 या कालावधीमध्ये दोन वेळेस स्टुडन्ट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाचे दोन वेळा राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आहेत. अध्यक्ष होण्यापूर्वी ते केंद्रीय सल्लागार समितीचे सदस्य आणि उपाध्यक्षही राहिलेले आहेत. त्यांचा संबंध हैद्राबाद, दिल्ली, बैंगलोर सारख्या शहरात अनेक सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांशीही राहिलेला आहे. अनेक ठिकाणी ते बोर्डाचे सदस्य आहेत. अनेक वर्तमानपत्रातून ते स्तंभलेखक म्हणून ते नावाजलेले असून, समसामायिक मुद्यांवर ते नेहमी आपले विचार प्रकट करीत असतात. प्रसिद्ध उर्दू मासिक जिंदगी-ए-नौ चे ते मुख्य संपादक असून, त्यांनी उर्दू आणि इंग्रजी भाषेमधून 22 पेक्षा अधिक पुस्तके आणि 400 पेक्षा अधिक लेख लिहिलेले आहेत. त्यांचे लिखान इस्लाम, अल्पसंख्यांक मुद्दे, नितीनिर्माण, तत्वज्ञान आणि अर्थशास्त्राशी संबंधित विषयांवर आहे.
त्यांच्या अनेक पुस्तकांचा अनुवाद हिंदी, मल्याळम, तमील, तेलगू, गुजराती आणि बंगाली भाषेमध्ये झालेले आहेत.
Post a Comment